Monday, 31 July 2023

शैक्षणिक धोरणास न्याय द्यायचे काम शिक्षक करत आहेत -- केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी - 

 प्राथमिक शिक्षण समिती मनपा कोल्हापूर अंतर्गत राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11,कसबा बाबडा मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय येथे संपन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक डॉ अजितकुमार पाटील यांनी केले.
शिक्षण परिषदेत
माझी नोंद,पी जी आय, भाषा गणित विज्ञान पेटी , स्वच्छता मॉनिटर, परसबाग उपक्रम ,सेतू अभ्यासक्रम, रीड इंडिया रीड, तृणधान्य जागृती ,निपुण भारत, गुणवत्ता कक्ष स्थापन याबद्दल तज्ञ मार्गदर्शक बी एस हाके, सौ एम वाय पाटील, अमिता ढोबळे यांनी मार्गदर्शन केले.
 स्वागत व प्रास्तविकमध्ये डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी शैक्षणिक धोरण याच्या अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी प्रयत्न करावेत आज शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यात आली शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना कला, कार्यानुभव ,खेळ, योगासने, कृतीयुक्त गीत आशा आनंददाई शिक्षणावर भर द्यावा आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे पाहण्यासाठी माता पालक गट प्रभावीपणे राबवण्यात यावा असे आवाहन डॉ अजीतकुमार पाटील यांनी केले 
परिषदेमध्ये बी एस हाके यांनी कृती गीत अत्यंत उत्कृष्टपणे सादरीकरण केले.
 शिक्षण परिषदेस गोरख वातकर, छाया हिरुगडे, सरदार पाटील, अनिल सरक, दत्तात्रय डांगरे,अमित परीट, विजय कुरणे, विमल जाधव, छाया पोवार, राजाराम सातपुते सुखदेव सुतार,उत्तम कुंभार, श्रीकांत पाटील,जे जे पाटील यांनी सहकार्य केले.

 आभार टी आर पाटील यांनी मांडले

Saturday, 29 July 2023

कोजिमाशिच्या चेअरमनपदी लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे यांची बिनविरोध निवड


हेरले / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर कागल यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे  शाहूवाडी यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. बैठकिच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे होते. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली.निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले
   शाहुपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी बाळ डेळेकर व व्हाईसचेअरमनपदासाठी प्रकाश कोकाटे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. चेअरमन पदासाठी  बाळ डेळेकर यांचे नाव संचालक राजेंद्र रानमाळे यांनी तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश कोकाटे यांच नाव संचालक अविनाश चौगले यांनी सुचविले.
  यावेळी संचालक राजेंद्र रानमाळे, दत्तात्रय घुगरे, अनिल चव्हाण, प्राचार्य श्रीकांत पाटील, मदन निकम, सुभाष खामकर, अविनाश चौगले, दिपक पाटील, राजेंद्र पाटील, श्रीकांत कदम, जितेंद्र म्हैशाळे, शरद तावदारे, उत्तम पाटील, पांडुरंग हळदकर, मनोहर पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, सौ ऋतुजा पाटील, शितल हिरेमठ आदीसह प्रशासन अधिकारी उत्तम कवडे, संगणक अधिकारी नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
  निवडीनंतर नुतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला. सभासदांनी स्वाभिमानी सहकार आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली. त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडीप्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी दिली.
   आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन बाळ डेळेकर व व्हाईस चेअरमन प्रकाश कोकाटे यांनी केले .

Tuesday, 25 July 2023

मौजे वडगाव येथे ५०० आंब्याच्या वृक्षांचे वृक्षारोपण

हेरले /प्रतिनिधी 
गेल इंडिया लि. व मौजे वडगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गायराण गट नं. ५१२ मध्ये ५०० आंबा वृक्षांचे वृक्षारोपण गेल इंडिया कंपनीचे उप महाप्रबंधक टी. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
                निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. अनेकदा वृक्ष लागवड केल्यानंतर काही दिवसातच हि वृक्ष नष्ट होत होती. व त्याची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूणही फायदा होत नव्हता. म्हणून यावर्षी ५०० आंब्यांच्या वृक्षाची लागवड करण्यात आली असून प्रत्येक वर्षी पाचशे ते सहाशे झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला.
           यावेळी गेल इंडिया कंपनीचे उप महाप्रबंधक टी. राजकुमार , मुख्य प्रबंधक एम. के. जोशी,सरपंच कस्तूरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका बी. एस. ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले ,रघूनाथ गोरड, सदस्या सुनिता मोरे, वरिष्ठ अभियंता आर. जे. येलपले , एम. आर. भगत, टी. के. मोहंती , अविनाश पाटील, ज्ञानेश्वर सावंत, आदीजण उपस्थित होते.

फोटो 
मौजे वडगांव येथे वृक्षारोपण करतांना गेल इंडिया कंपनीचे उप महाप्रबंधक टी. राजकुमार , सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , एम .के. जोशी, सुरेश कांबरे, आदी मान्यवर.

Saturday, 22 July 2023

शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट टीव्ही प्रदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


कोल्हापूर दिनांक 22--
          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 61 वा हिरक महोत्सवी वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समिती कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने मनपा वीर कक्कय विद्यालयास स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला.
        त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणामध्ये संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मनपा शाळेला विविध सदस्यामार्फत पाच लाख रुपयांची मदत करण्याचे शिक्षक समितीच्या वतीने ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे गेल्या वर्षभरामध्ये महानगरपालिकेच्या विविध शाळांना चाळीसहून अधिक स्मार्ट टीव्ही, फर्निचर, साऊंड सिस्टिम, आदी माध्यमातून पाच लाख रुपये देणगीचा टप्पा सदस्यांनी ओलांडला. त्याबद्दल सर्व सदस्यांचे शिक्षक समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

      यावेळी शिक्षक समितीच्या इतिहासाबद्दल व भविष्यात येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी उपाध्यक्ष उमेश देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले. 
          श्री संजय कडगावे यांनी प्रास्ताविक केले . श्री संजय पाटील यांनी आभार मानले. त्यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री उमर जमादार, श्री शकील भेंडवाडे, श्री वसंत आडके,श्री फारूक  डबीर,श्री सुनील नाईक,राजश्री पोळ,वहिदा मोमीन,रुक्साना शेख ,स्वाती संकपाळ,सुनीता चौगले, श्री तानाजी पाटील,श्री.रुपेश नाडेकर,श्री शांताराम पोळ,श्री उत्तम कुंभार,श्री सुनिल पाटील, श्री युवराज सरनाईक,श्री अनिल शेलार आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Thursday, 20 July 2023

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नेमके कसे आहे - डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर

कोल्हापूर 

तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशात 'नवीन शैक्षणिक धोरण २०२०' जाहीर करण्यात आले आहे.इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. या शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या गोष्टी कोणत्या? येणाऱ्या काळात शिक्षण पद्धतीत कोणते आमूलाग्र बदल होणार आहेत याचा मुद्देसूद अभ्यास करणार आहोत.
शैक्षणिक धोरणाचा इतिहास
1.आपल्या देशात सर्वात प्रथम पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 1968 साली पहिले राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले.
2.त्यानंतर राजीव गांधी यांच्या कार्यकाळात 1986 साली दुसरे राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले.
3.त्यानंतर 1992 मध्ये आचार्य राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली 'राष्ट्रीय शिक्षण धोरण कृती आराखडा' समिती स्थापना करण्यात आली. या समितीने दुसऱ्या शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला व काही शिफारशी केल्या.
4.अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सन 2002 साली 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली.
5. त्यानंतर सन 2009 साली शिक्षण हक्क कायदा मंजूर करण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी 2013 पासून करण्यात आली.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 वैशिष्ट्ये
नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. शिक्षण अभ्यासक्रमांना वेगवेगळ्या शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे. याचाच सोपा अर्थ असा आहे की आता, एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार असून २१ व्या शतकासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याला महत्त्व देण्यात आले आहे.
*शालेय शिक्षणाची रचना, नवीन सूत्र* : 
या धोरणातील तरतुदीनुसार तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता. शालेय शिक्षणाची रचना आता 5+3+3+4 

५ *वर्षे मूलभूत Fundamental* 
1. नर्सरी            - ४ वर्षे
2. जूनियर केजी - ५ वर्षे
3. सिनियर केजी- 6 वर्षे।                                                  4.इयत्ता पहिली - 7 वर्षे                                                      5.इयत्ता दुसरी   - 8 वर्षे  
3 वर्षांची प्रारंभिक शाळा (Preparatory)
6. इयत्ता तिसरी  - 9 वर्षे
7. इयत्ता चौथी   - 10 वर्ष
8. इयत्ता पाचवी - 11 वर्षे

3 वर्षांची माध्यमिक शाळा (Middle)
9.   इयत्ता सहावी - 12 वर्षे
10. इयत्ता सातवी - 13 वर्ष
11. इयत्ता आठवी - 14 वर्षे
4 वर्ष माध्यमिक शाळा (Secondary)
12. इयत्ता नववी    - 15 वर्षे
13. इयत्ता दहावीची - 16 वर्षे
14. एफ.वाय.जे.सी‌. - 18 वर्षे
15. एस.वाय.जे.सी. - 19 वर्षे
कसे दिले जाणार शिक्षण?
वरील शिक्षणाच्या नवीन सूत्रानुसार आपल्या लक्षात आलेच असेल आता अंगणवाडी ही प्राथमिक शिक्षणाला जोडली गेली आहे. *वयोगट ३ ते ८ मधील शिक्षण हे मूलभूत शिक्षण* समजले जाईल आणि त्यासाठी बालसुलभ शिक्षण आणि अभ्यासक्रम विकसीत केला जाईल. अंगणवाडीच्या शाळा पूर्वप्राथमिक वर्गाशी जोडल्या जातील. जिथे शक्य असेल तेथे पूर्वप्राथमिकच्या शाळा प्राथमिक शाळेशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील.
ज्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या अंगणवाडी आणि पूर्वप्राथमिक शाळा नवीन अभ्यासक्रम राबविण्यात अपयशी ठरतील त्याठिकाणी सर्व सोयींनी युक्त नवीन स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा उभारल्या जातील आणि शिक्षणाबरोबर ३ ते ६ वयोगटातील मुलाच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील.
३ ते ८ या वयोगटातील मुलासाठी उपक्रमाधारीत, खेळांच्या माध्यमातून आणि लवचिकता असलेले शिक्षण दिले जाईल. पूर्व प्राथमिक शिक्षण पुर्ण होईपर्यत मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
भाषा, व्यावसायिक शिक्षण, आणि मुलांचे मानसशास्त्र
इयत्ता सहावी नंतर तीन भाषा शिक्षण पद्धती सुरू केली जाईल. ज्यात स्थानिक भाषेला प्राधान्य दिले जाईल. ज्या प्रदेशात हिंदी बोलली जात नाही त्या प्रदेशात हिंदी भाषा शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल तर हिंदी भाषिक प्रदेशात इतर कोणत्याही मान्यता प्राप्त भारतीय भाषेला प्राधान्य दिले जाईल.आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल.
व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाईल.शाळांमध्ये असलेल्या हुशार मुलांना अपेक्षित शिक्षण मिळावे म्हणून “राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमा” अंतर्गतदर आठवड्याला पाच तासांचे अतिरिक्त शिक्षण पुरविले जाईल तसेच अपेक्षित क्षमते पेक्षा मागे असलेल्या मुलांसाठी नियमित शाळेच्या वेळेत आणि वेळेनंतरही उपाययोजनात्मक शिक्षण पुरविले जाईल.
प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नीट लक्ष देता यावे यासाठी विध्यार्थी शिक्षक प्रमाण ३०:०१ असे ठेवणे.

वाचनाला आणि त्यातुन ज्ञानवृद्धीला प्राधान्य मिळावे म्हणून संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये ग्रंथालये आणि वाचनकक्ष उभारणे.
मुलांच्या हजेरीवर आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवून त्यात सातत्य राखण्यासाठी प्रत्येक शाळेत एक समाजसेवक आणि एका मानसशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे.
अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी शाळांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरविणे.या बाबींचा धोरणात समावेश आहे.
आंतरशाखीय शिक्षण
९ वी ते १२वी एकत्र करून चार वर्षाचा कोर्स प्रस्तावित आहे ज्यात कला, वाणिज्य आणि शास्त्र असा शाखा निहाय फरक रद्द केला असून एकूण 8 सेमिस्टर चा हा कोर्स असेल ज्यात भाषा, गणित आणि शास्त्र हे विषय बंधनकारक करून इतर कोणतेही विषय आपल्या आवडीनुसार निवडता येतील.
परीक्षा कशा असणार ?
नवीन राष्ट्रीय धोरणानुसार बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे.आता बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील. पाठांतर करून उत्तर लिहिण्याऐवजी दैनंदिन उपयुक्त ज्ञानावर आधारित परीक्षा असेल. विज्ञान व कला अशा वेगळ्या शाखांतील विषय एकत्र घेऊन शिकता येतील. त्यामुळे आंतरशाखीय शिक्षण सुरू होईल.
विद्यार्थ्यांना नवीन प्रगतिपुस्तक
नवीन शैक्षणिक धोरणामुळे जुने प्रगतीपुस्तक इतिहासजमा होणार आहे.प्रगतिपुस्तकात फक्त गुण व शिक्षकांचे शेरे न देता स्वत: विद्यार्थी, सहविद्यार्थी व शिक्षक यांनी मूल्यमापन करायचे आहे. त्याआधारावर विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्यांचा विकास करता येईल.
शिक्षक होण्यासाठी काय करावे लागणार ?
शिक्षक होण्यासाठीची पात्रता काय असणार आहे ? नवीन राष्ट्रीय धोरणानुसार B.Ed. रद्द करून चार वर्षांचा इंटिग्रेटेड पदवी कोर्स सुरू करण्यात येईल. बारावीनंतर थेट या कोर्सला प्रवेश घेता येईल. आणि हे शिक्षक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरतील.
ज्यांनी इंटिग्रेटेड B. Ed. केलेले नाही ते पदवीनंतर ज्या महाविध्यालात इंटिग्रेटेड B. Ed. आहे त्याच महाविद्यालयात एक वर्षाच्या B. Ed. साठी प्रवेश घेऊ शकतील.

आता थेट पीएचडी !
उच्च शिक्षणातही लवचिकता आणली गेली असून महाविद्यालये तसेच विद्यापाठांमध्येही आंतरशाखीय विषय एकत्र शिकता येतील. कुठल्याही टप्प्यावर शिक्षण थांबवता येईल. त्या शिक्षणाचे गुणांक राखून ठेवले जातील व काही काळाने पुढील शिक्षण घेता येईल. ज्या विद्यार्थाना संशोधन करायचे असेल, त्याच्यासाठी 4 वर्षांचा अभ्यासक्रम असेल. त्यानंतर एम.फील करण्याची गरज उरणार नाही, थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येईल. अन्यथा ३ वर्षांत पदवी घेता येईल.
आता, एकच नियामक मंडळ !
हा एक मोठा निर्णय नवीन राष्ट्रीय धोरणात घेण्यात आला आहे.सध्या उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या नियामक संस्था कार्यरत आहेत, त्याऐवजी (विधी आणि वैद्यकीय शाखा वगळता) एकच नियामक मंडळ असेल. अमेरिकेप्रमाणे भारतातही संशोधकाला महत्त्व देणे व त्याचा दर्जा सुधारण्यासाठी राष्ट्रीय संशोधक संस्था स्थापन केली जाईल. केवळ विज्ञानच नव्हे तर समाजशास्त्रातील संशोधनालाही वित्तीय मदत केली जाईल. देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला जाईल. त्यातून परदेशी दर्जेदार शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांंशी संवाद वाढेल व शैक्षणिक देवाणघेवाणही होऊ शकेल. यामुळे सुसंसगत शिक्षणपद्धती अस्तित्वात येणार आहे.

*सरकार शुल्कनिश्चिती करणार* !
२०३० पर्यंत प्रत्येक जिल्ह्य़ात किमान एकतरी बहुविध आंतरशाखीय महाविद्यालय सुरू केले जाईल, असे लक्ष्य केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ठेवले आहे. आत्तापर्यंत एकाच शाखेतील विषय घेऊन पदवी घेतली जात असे, आता पदवी बहुविधशाखांतील विषय एकाचवेळी घेऊन पूर्ण केली जाणार आहे. केवळ विद्यापीठेच नव्हे तर, महाविद्यालयेही बहुविधशाखा अभ्यासक्रमाची होणार असल्याने त्यानुसार शुल्कनिश्चिती केली जाईल. सरकारी तसेच खासगी शैक्षणिक संस्थांच्या शुल्क आकारणीसाठी समान शर्ती निश्चित केल्या जाणार आहेत. त्या चौकटीतच शुल्कनिश्चित केले जाईल व शुल्क आकारणीवर कमाल मर्यादाही घालण्यात येणार आहे. यामुळे पालकवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

डॉ अजितकुमार पाटील     ( पीएच डी - मराठी ) केंद्रमुख्याध्यापक,कोल्हापूर..

Wednesday, 19 July 2023

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमार्फत "इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म भरणे आणि कॅप राऊंड" या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन


हेरले / प्रतिनिधी
  महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी (बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग) प्रवेश २०२३-२४ सामायिक प्रवेश परीक्षा (CET) अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी चालू असलेल्या कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा? या विषयावर इंजिनिअरिंग ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी सकाळी  ठीक. १०:०० वा. राजश्री शाहू स्मारक भवन,  कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांना संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

इंजिनिअरिंग प्रवेशाच्या या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये: मेरिट लिस्ट विश्लेषण, शीट डिस्ट्रीब्यूशन मॅट्रिक्स, स्टेप इन फिलिंग ऑप्शन फॉर्म व स्टेट एक्सेप्टेशनस रुल्स : या प्रवेशासंदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. इंजिनिअरिंग चे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देखील या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटी दिली जाणार आहेत.

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे कारण, नुकताच संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर ला ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) नवी दिल्ली यांनी पदवी इंजिनिअरिंग च्या अभ्यसक्रमास मान्यता मिळालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदविका अभियांत्रिकी सोबतच पदवी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरवात झाली आहे. विषेश करून यामध्ये  मेकॅनिकल इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजिनिअरिंग,  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या शाखा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

 संजय घोडावत इन्स्टिट्यूट डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे यांच्या सोबत संलग्न असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पदविका सोबत पदवी अभ्यासक्रमासाठी  केंद्रीय प्रवेश प्रक्रियानुसार येथे प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व शासकीय शिष्यवृत्ती देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहेत, इथून पुढे संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटकांना उत्कृष्ट,दर्जेदार शिक्षण आणि तेही माफक फी मध्ये आमच्या जागतिक दर्जाच्या संकुलनात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत.

या मार्गदर्शन कार्यक्रमात इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्रामीण व शहरी  साठी भागातील सर्व  विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूट मार्फत आपणा सर्वांना करण्यात येत आहे.

अशा प्रकारे या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या आयोजन केल्याबद्दल, संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, श्री संजयजी घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्याध्यापक संघाचे सर्व उपक्रम, योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय : कौन्सिल सदस्यांची बैठक संपन्न


हेरले / प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सर्व उपक्रम, योजना अधिक जोमाने व प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय संघाच्या कार्यकारी मंडळ व कौन्सिल सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते. 
      संघाच्या वतीने शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात येतात. तसेच गणित प्राविण्य व प्रज्ञा परीक्षा, विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा, इ.१० वी सोशल टॅलेंट सर्च परीक्षा, स्वच्छ सुंदर शाळा, उत्कृष्ट शालेय समृद्ध ग्रंथालय स्पर्धा यासह विविध स्पर्धा राबविल्या जातात.
     या बैठकीत शाळा सिद्धी, शाळा वार्षिक तपासणी, अद्ययावत शालेय अभिलेखे जतन याबाबत मार्गदर्शन तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संघाची प्रकाशने, विविध उपक्रमात शाळांचा सहभाग वाढविणे. संघामार्फत तालुकास्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करणे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सत्कार व नवीन मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एच.वाय.शिंदे, बाजीराव साळवी, आर.वाय.देसाई, श्री. गोसावी, बाबुराव राजीगरे, सौ.स्नेहा नितीन भुसारी, सौ. आर. ए.माने, सौ. पी. एस. टिपूगडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
     यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, शिवाजी माळकर, संचालक सूर्यकांत चव्हाण, बबन इंदुलकर, सौ.अनिता नवाळे, सौ. सारिका यादव, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, पी. व्ही. पाटील, माझीद पटेल यांच्यासह संघाचे कार्यकारी मंडळ व कौन्सिल सदस्य उपस्थित होते. 
      प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक  चेअरमन सुरेश संकपाळ यांनी आभार व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन संचालक रवींद्र मोरे यांनी केले.

Sunday, 16 July 2023

मौजे वडगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


हेरले /प्रतिनिधी  
ग्रामपंचायत मौजे वडगांव व लायन्स आय क्लब इंचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यवर्धिनी प्राथमिक उपकेंद्र मौजे वडगांव येथे मोफत नेत्र रुग्ण तपसणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या नेत्र शिबिरामध्ये गावातील एकूण १०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोतिबिंदू चाचणी मध्ये दोषी आढळलेल्या रुग्णांची संख्या १८ तर नजर कमकुवत आसणाऱ्या रुग्णांची संख्या ९ तसेच ६ विध्यार्थाचाही यामध्ये समावेश आहे. सदर नेत्र तपासणी मध्ये आढळलेल्या ५७ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
        या कार्यक्रमासाठी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरंपच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले , रघूनाथ गोरड ,माजी सदस्य अविनाश पाटील, , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पंकज पाटील, लायन्स आय क्लब इंचलकरंजीचे डॉ. स्वप्नील आवळे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सुपरवायझर , आशा वर्कर यांचे विशेष सहकार्य  लाभले.
फोटो 
प्राथमिक उपकेंद्र मौजे वडगांव येथे मोफत नेत्र रुग्ण
शिबीरामध्ये डॉ. पंकज पाटील मार्गदर्शन करतांना.

Friday, 14 July 2023

वडगाव विद्यालयाच्या अथर्व अजित लाड याने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २६४ गुण संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादीत ४६ वा क्रमांक पटकावला.

पेठवडगाव / प्रतिनिधी

 वडगाव विद्यालय वडगावमध्ये सहावीत शिकणारा कु.अथर्व अजित लाड याने शिष्यवृत्ती परीक्षेसोबत विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 
   पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २६४ गुण संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादीत ४६ क्रमांक पटकाविला. मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक मिळविला ,चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये राज्य गुणवत्ता यादीतून निवड आदी शासकिय स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. त्यास या यशामध्ये  विद्यालयाचे  मुख्याध्यापक व कौन्सिल सदस्य  लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर , उपमुख्याध्यापक  सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ. आर. आर. पाटील, परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके, तंत्रविभाग प्रमुख ए. एस. आंबी , संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे , वरिष्ठ लिपिक अतुल पाटील , जेष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार यांची प्रेरणा मिळाली तर शिक्षिका सौ. एस. जे. क्षीरसागर, सौ. एस.एस. माने, सौ. एस. एस.चव्हाण , सौ. ए. ए. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अथर्व लाडचे व त्यांच्या  पालकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

सपोनि. पंकज गिरी यांचा मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार


हेरले /प्रतिनिधी 
 शिरोली एम .आय. डि. सी. पोलिस ठाण्याचा पदभार सहायक पोलिस निरिक्षक पंकज गिरी यांनी स्विकारला. यापूर्वी ते हुपरी पोलिस स्टेशन येथे कार्यरत होते. शिरोली पोलिस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरिक्षक सागर पाटील यांची बदली झाल्याने ती जागा रिक्त होती. सपोनि. पंकज गिरी यांचा मौजे वडगांव येथील विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या.
              यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी सरपंच सतिशकुमार चौगुले, अँड. विजय चौगुले , ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे, अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले , रघुनाथ गोरड ,अमोल झांबरे , संतोष चौगुले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थिती होते.

फोटो 
नुतन सपोनि पंकज गिरी यांचा सत्कार करतांना मौजे वडगाव येथील विविध संस्थेचे पदाधिकारी

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी -- वसंत आडके

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले प्राथमिक शिक्षक पत संस्थेचे माजी सभापती वसंत आडके, शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार यांचे हस्ते देण्यात आली.

कार्यक्रमासाठी उत्तम पाटील, तमेजा मुजावर, विद्या पाटील, मिनाज मुल्ला, सुशील जाधव ,हेमंतकुमार पाटोळे इत्यादी शिक्षक उपस्थित होते 

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या वयक्तिक लक्ष द्यावे विद्यार्थ्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा शाळेचा डबा, दप्तर, पुस्तक, हातरुमाल, पाण्याची बॉटल, गणवेश इत्यादी वैयक्तिक स्वच्छता बद्दल माहिती सांगितली.दररोज विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, सूर्यनमस्कार घालावे, घरातील आई-वडिलांचे ऐकावे असे सांगितले 
शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य अनुराधा गायकवाड ,दिपाली चौगले, नीलम पाटोळे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार इरेय्या गनिकोप्पा यांनी मानले.

Tuesday, 11 July 2023

मनपा पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद --स्कूल बॅगचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आनंद देणारा-- अतिरिक्त आयुक्त केशव जाधव.

 कोल्हापूर प्रतिनिधी दिनांक 11

 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांच्या साठी स्कूल बॅग देण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. असे उद्गार अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी स्कूल बॅग वितरण प्रसंगी काढले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. यादव उपस्थित होते. श्रीयुत जाधव पुढे म्हणाले, महानगरपालिका शाळांच्या साठी आपण विशेष लक्ष देणार असून ज्या शाळांच्या काही अडचणी आहेत जिथे भौतिक सुविधा कमी आहेत. त्या पुऱ्या करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विविध कला व कौशल्याच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दृष्टीने काही उपक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. पालक, शिक्षक आणि प्रशासन मिळून महानगरपालिका शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान या कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी प्रशासनाधिकारी श्री एस. के. यादव यांनी पतसंस्थेचे विविध उपक्रम हे विद्यार्थी, शाळा व समाज उपयोगी असल्याचे सांगितले. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद हितांच्यासाठी चालू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात तिसरा आल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वर्षी प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी महानगरपालिकेच्या 58 शाळातील जवळपास 1800 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती उमर जमादार होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पतसंस्थेच्या कार्याबद्दलची माहिती मानद चिटणीस सुधाकर सावंत यांनी दिली. त्यावेळी संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आभार कुलदीप जठार यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब कांबळे यांनी केले. यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी संचालक सौ.भारती सूर्यवंशी, सौ. मनीषा पांचाळ, वसंत आडके, राजेंद्र गेजगे लक्ष्मण पवार ,नेताजी फराकटे ,विजय सुतार ,विलास पिंगळे ,प्रभाकर लोखंडे ,मनोहर सरगर, सुनील नाईक, शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह निकम,डॉ अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई,संजय नार्वेकर ,महिला आघाडी प्रमुख आशालता कांजर,नयना बडकस सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मौजे वडगाव ते नागाव रस्त्याच्या कडेला धोकादायक चरीत भराव टाकण्याची मागणी

हेरले /प्रतिनिधी

मौजे वडगांव (ता. हातकणंगले) ते नागाव या गावच्या रस्तावर एचपी ऑईल गॅस प्रायवेट लिमिटेडने गॅस पाईप घातली आहे. श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा दरम्यान तीनशे ते चारशे फूट लांब रस्ताच्या बाजूला तीन ते चार फूट भर न घातल्याने येथे ही पाईप लाईन दोनच फूट खाली असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तरी या कंपनीने येथे तात्काळ भर टाकावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
     मौजे वडगाव ते नागाव रस्त्याच्या बाजूने एचपी ऑईल गॅस प्रायवेट लिमिटेडने अंडर ग्राउंड गॅस पाईप लाईन  नेली आहे. ही पाईप लाईन सहा फूट जमिनाच्या आत खोल खनून  नेली आहे. मात्र श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा या ठिकाणी  तीनशे ते चारशे फूट लांबीच्या या दरम्यान ही गॅस पाईप लाईन दोनच फूट खोल आहे. येथे मोठी चर पडली आहे त्यावर चार फूट मुरूमाची भर टाकणे आवश्यक आहे. आश्रमामध्ये भक्तांची व प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची दररोज  ये जा असल्याने त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे ठिकाण धोक्याचे बनले आहे.
      काही दिवसा पूर्वीच शिरोली एमआयडीसीमध्ये अचानक गॅस पाईप लिक होऊन गॅसचे फवारे हवेत कित्येक वेळ उडाल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी अशा प्रकारच्या अपघाताची स्थिती गॅस पाईप लाईनवर सहा फूट खोलीचा भराव नसल्याने मौजे वडगाव ते नागाव रस्त्यालगत श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा या चारशे फूट लांबीच्या ठिकाणी उदभवन्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने या कंपनीने येथे तात्काळ भर टाकावी अशी मागणी नागरिकातून व पालकातून होत आहे.
         फोटो 
मौजे वडगाव : येथील श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा या चारशे फूट लांबीच्या ठिकाणी गॅस पाईप लाईनवर सहा फूट खोलीचा भराव नसल्याने चार फूट खोलीच्या चरीत झाडे झुडपे उगवली आहेत.

पुलाची शिरोलीत घंटागाडी लोकार्पण

शिरोली / प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतीमध्ये   ग्रामनिधी व १५ वा वित्त आयोग निधीतून खरेदी करणेत आलेल्या घंटागाडी वाहनांचा लोकार्पण सोहळा छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन अमल महाडिक यांच्या शुभहस्ते तसेच  लोकनियुक्त सरपंच पदमजा कृष्णात करपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 
यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहामध्ये ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. व शिरोली हायस्कूल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास  उपसरपंच अविनाश कोळी, ग्राम विकास अधिकारी ए वाय कदम,  वडगाव बाजार समिती सभापती श्री सुरेश पाटील माजी सरपंच विठ्ठल पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील, माजी उपसरपंच  कृष्णात करपे,  सतीश पाटील, सलिम महात, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, विजय जाधव, महंमद महात, अरिफ सर्जेखान, महादेव सुतार, कमल कौंदाडे, सुजाता पाटील, धनश्री खवरे, मनिषा संकपाळ, वसिफा पटेल, कोमल समुद्रे, नजिया देसाई, हर्षदा यादव, अनिता शिंदे, बबन संकपाळ, आदी उपस्थित होते.
  फोटो
पुलाची शिरोलीत घंटागाडी लोकार्पण प्रसंगी माजी आमदार अमल महाडिक, सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, सुरेश पाटील  व इतर मान्यवर.

Saturday, 8 July 2023

स्वर्गीय. बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले)
 गावचे माजी सरपंच पत्रकार, छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटी व हेरले महिला औद्योगिक सोसायटीचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय. बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या २७  व्या स्मृतिदिना निमित्त  त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी फोटो पूजन सुरेंद्र कोरेगावे व श्रीफळ माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आले.
     या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या स्वीकृत संचालक व सल्लागार पदी मुनिर जमादार, 
रावसाहेब चौगुले,पांडुरंग चौगुले,संजय परमाज,सुकुमार कोळेकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनिर जमादार,लोकनियुक्त सरपंच राहूल शेटे  छत्रपती सोसायटी चे चेअरमन अशोक मुंडे ,व्हाईस चेअरमन  कपिल भोसले, माजी चेअरमन विद्यमान संचालक उदय चौगुले ,स्वप्नील कोळेकर,शशिकांत पाटील,सुनील खोचगे,कृष्णात खांबे, बंडू पाटील, सुकमार  कोळेकर, शेतकरी सोसायटीचे संचालक शिवाजी कोळेकर,ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, अंबाजी कोळेकर  दादासो कोळेकर  , बाबासाहेब कोळेकर ,‌संग्रामसिंह रूईकर , अरविंद कोळेकर,आदी मान्यवरांसह सेक्रेटरी  व कर्मचारी उपस्थित होते.
        फोटो 
स्वर्गीय. बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या २७  व्या स्मृतिदिना निमित्त  त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतांना माजी सभापती राजेश पाटील, स्वप्नील कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर.

Friday, 7 July 2023

जवाहर पतसंस्थेत वीज बिल भरणा केंद्राचे उदघाटन


हेरले / प्रतिनिधी


हेरले येथे सुरू करण्यात आलेले  वीज बिल भरणा केंद्र लोकोपयोगी उपक्रम आहे.या माध्यमातून जनतेला चांगली सोय मिळणार असल्याचे प्रतिपादन जवाहर पतसंस्थेचे चेअरमन डॉ सनतकुमार खोत यांनी केले.
यावेळी जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.रुकडी शाखा हेरले येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते वीज बिल भरणा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. 
   खोत पुढे म्हणाले,गेली ३५ वर्ष जवाहर पतसंस्थेने अव्याहात पणे ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे.तसेच  हेरले सह ६ शाखेद्वारे  ग्राहकांना चांगली सोय होणार आहे.
   यावेळी माजी सभापती राजेश पाटील, सरपंच राहुल शेटे, कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे, संचालक सुदर्शन खोत,  बाळासो लाटवडे, अबुबकर जमादार ,एकनाथ बसुगडे,जनरल मॅनेजर चंद्रकांत आंबले,मनोज हांडे, प्रकाश पाटील,तय्यबअली मुल्ला,अश्रफ खतीब व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो:-हेरले (ता हातकणंगले) येथे जवाहर पतसंस्थेत वीज बिल भरणा केंद्रामध्ये पहिले वीज बिल भरल्यानंतर ग्राहक विजय पाटील यांना कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, 5 July 2023

जिल्हा बदलून येणारे शिक्षकांना कोल्हापूर महापालिकेकडे सामावून घ्यावे - - प्राथमिक शिक्षक समितीची मागणी



 कोल्हापूर प्रतिनिधी - 

कोल्हापूर महानगरपालिकेकडे सध्या चाळीसहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अन्य जिल्ह्यामधून कोल्हापूर महानगरपालिकेकडे येऊ इच्छिणाऱ्या जवळजवळ सतरा शिक्षकांचे प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावना मंजुरी द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली. या शिक्षकांच्या मुळे महापालिकेकडे रिक्त असलेल्या काही जागा भरल्या जातील व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले जाईल अशी भूमिका शिक्षक समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी यांनी याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती शिक्षक समितीला दिली. शिक्षक समितीच्या वतीने आज भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये नपा/ मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई ,शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, सुभाष धादवड, वसंत आडके ,उत्तम कुंभार, नयना बडकस, संदीप सुतार, उमर जमादार ,शकील भेंडवडे, कुलदीप जठार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

मौजे वडगांव बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करा


हेरले / प्रतिनिधी 
 मौजे वडगांव येथील बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करावा आशा मागणीचे पत्र उपसरंपच सुनिल खारेपाटणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना दिले.
          नागपूर रत्नागिरी नविन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पण हा रस्ता करत असतांना शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार न करता काम सुरु आसून मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील बारकी पाणंद म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व  गावातील सातशे ते आठशे एकर क्षेत्र असणाऱ्यां शेतकर्ऱ्याना या पाणंद रस्त्यांचा वापर वारंवार करण्यात येत आहे . त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करावा आशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
               अधिक माहिती अशी की, मौजे वडगावातील बहुतांश जमिनी या रस्त्यांमध्ये गेल्या आहेत रस्त्यांसाठी गावातील कोणीही अडचण केली नाही. गावाच्या गायराण व पाझर तलावाकडे जातांना गावातील शेतकरी जनावरे चरणेसाठी व पाणी पिण्यासाठी जातांना याच पाणंद रस्त्यांचा वापर करावा लागतो , तसेच गेल इंडिया , एचपीसीएल ' बीपीसीएल ' यासारखे शासनाचे मोठे प्रोजेक्ट गायराण मध्ये आसत्याने जाणेयेणे साठी याच रस्त्यांचा वापर करावा लागतो. ऊस वाहतूक व जनावरांचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागणार आहे. असा धोकादायक प्रवास करणे शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या जिवावर उठू शकते त्यासाठी गावातील शेतकऱ्यांसाठी हा भुयारी मार्ग करावा अशी मागणी मौजे वडगाव  गावातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने केली या शिष्टमंडळामध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे, , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड. अमोल झांबरे , उपस्थित होते.

  फोटो 
मौजे वडगाव  गावातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाच्या वतीने उपसरपंच सुनिल खारेपाटणे लेखी निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना देतांना
शेजारी सुरेश कांबरे, , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड. अमोल झांबरे आदी मान्यवर

Sunday, 2 July 2023

महापालिका शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबाबत मंत्रालयीन पाठपुरावा करू - - राज्याध्यक्ष विजय कोंबे यांचे आश्‍वासन

कोल्हापूर प्रतिनिधी - - - 

       राज्यातील महानगरपालिका शिक्षकांच्या शंभर टक्के वेतन,पेन्शन व शाळेच्या भौतिक सुविधांसाठी मंत्रालयातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिले. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या सदिच्छा भेटी संदर्भात त्यांनी हे आश्वासन दिले. पतसंस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याबद्दल संचालक मंडळाचे त्यानी अभिनंदन केले. नूतन वास्तू मध्यवर्ती ठिकाणी आणि प्रशस्त असल्याबाबतचे कौतुक केले. *संघटनेचे सक्रिय पदाधिकारी संजय कडगावे सर यांचे चिरंजीव अविनाश कडगावे यांची जर्मनी येथील  मर्सिडीज बेंज कंपनीच्या वतीने  निवड झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने  सत्कार करण्यात आला*. यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते श्री . उदय शिंदे,राज्य सरचीटणीस श्री राजन कोरगांवकर,माजी अध्यक्ष सिंधुदूर्ग जिल्हा श्री.दादा जांभवडेकर कोल्हापूर जिल्हा नेते श्री. बाळू पोवार कोल्हापूर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री. हरिदास वर्णे उपस्थित होते तसेच राज्य नगरपालिका व महानगरपालिकेचे राज्य अध्यक्ष सुधाकर सावंत, उमेश देसाई शहराध्यक्ष  संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे,पतसंस्था सभापती उमर जमादार, सुनील पाटील  उत्तम कुंभार,बी.आर.कांबळे,हनीफ नाकाडे,विनोदकुमार भोंग सुभाष धादवड उपस्थित होते.