Sunday, 29 October 2023

मौजे वडगाव येथील आरसीसी रस्त्याचे काम पूर्ण माजी आम . अमल महाडिक यांच्या कडून ८ लाखाचा निधी


हेरले / प्रतिनिधी  
माजी आमदार अमल महाडिक यांनी मौजे वडगाव गावच्या विकासाला प्राधान्य दिले आहे . गावातील विविध विकास कामासाठी लाखो रुपयेचा निधी दिला आहे . त्यांच्या मदतीने सुतार पाणंद रस्त्याचे काम मार्गी लागले आहे . असे मत लोकनियुक्त सरपंच कस्तूरी पाटील यांनी व्यक्त केले त्या मौजे वडगाव ( ता . हातकणंगले ) येथील आर सी सी . रस्ता कामाच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनिल खारेपाटणे होते
           त्या म्हणाल्या की, महाडिक कुटूंबीय मौजे वडगावच्या विकासासाठी कायमपणे कटिबद्ध आहेत . सध्या गावामध्ये वॉर्ड नं . २ मध्ये महादेव मंदिर पासून तानाजी सावंत घरापर्यंतचा आरसीसी रस्त्यासाठी जनसुविधा अंतर्गत ८ लाखाचा निधी देऊन अत्यंत गरजेचा असणारा रस्ता पूर्ण केला आहे . त्यामुळे वॉर्ड नं . २ मधील ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त होत आहे .
          यावेळी ग्रा पं सदस्य रघूनाथ गोरड , सविता सावंत, सुनिता मोरे , दिपाली तराळ , सुवर्णा सुतार , रावसो चौगुले, श्रीकांत सावंत, मनोहर चौगुले , सतिशकुमार चौगुले, महादेव शिंदे , जयवंत चौगुले, अमोल झांबरे , अविनाश पाटील , आनंदा थोरवत, अमर थोरवत, शब्बीर हजारी , यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक स्वप्नील चौगुले यांनी केले तर आभार सुरेश कांबरे यांनी मानले .

फोटो 
वॉड नं . २ मध्ये आरसीसी रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, ग्रा. पं सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले व मान्यवर

Friday, 27 October 2023

माध्यमिक शिक्षण संघटनांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्द.-- माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर


कोल्हापूर /प्रतिनिधी
   जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटना सहविचार सभा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ येथील सभागृहामध्ये संपन्न झाली. या सभेमध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक  संघटनांचेअध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.
    या वेळी २९ उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधीनी आपआपल्या संघटनेतील प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये वरीष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी, कालबध्द पदोन्नती, अर्धवेळ शिक्षकांचे प्रश्न, सीएचबी काम करणारे शिक्षकांचे प्रश्न, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी स्लिपा वितरीत करणे, वेळेत देणे, शाळांचे अनुदान वेळेत मिळावे, ऑनलाईन माहिती भरतांना येणाऱ्या अडचणी संदर्भात प्रशिक्षण घेणे, पेन्शन पेपरवरती शिक्षणाधिकारी यांच्या सह्या करणे, पे युनिटमधील कर्मचाऱ्यांकडून व माध्यमिक शिक्षण विभागातील लिपीकांच्याकडून वागणूक योग्य प्रकारे मिळावी, अन्य शाळांकडून आलेल्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट स्विकारणे बाबत, विविध शिष्यवृत्त्यांच्या मागणी प्रस्तावांची परिपत्रके १५ दिवस अगोदर पाठवीत, न्यू टयॅब वेळ वाढवून द्यावी, सर्व शिक्षा व समग्र शिक्षा निधी बाबत, शैक्षणिक सहलीची परवानगी बरोबरच खेळाडूसाठी बसेस परवानगी मिळणे, ग्रंथपालांच्या समस्येबाबत कँप लावणे आदी विषयांवर समग्र चर्चा झाली.
    शाळांच्यामध्ये दैंनदिन कामकाज करत असताना, शैक्षणिक दर्जा टिकविणे व गुणवत्ता वाढविणे या बाबत चर्चा करून शैक्षणिक क्षेत्रात उदभवणाऱ्या समस्या, शैक्षणिक काम निकोप वातावरणात पार पडण्यासाठी समस्या सोडविल्या जातील. त्यासाठी कटिबध्द असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी या बैठकीमध्ये सांगितले.
  या बैठकी प्रंसगी  शिक्षणाधिकारी (योजना ) अनुराधा म्हेतरे, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, अधीक्षक प्रवीण फाटक, विस्तार अधिकारी डी. एल. पाटील, जयश्री जाधव, रत्नप्रभा दबडे ,विश्वास सुतार, दगडू कुंभार, निलेश महाळुंगेकर, नितीन खाडे, कल्पना पाटील, अश्विनी पाटील, पुनम ठमके, अजिंक्य गायकवाड, सुशांत शिरतोडे, महेश पवार, सूर्यकांत पाटील, राज म्हेंदकर, उत्तम वावरे, गौरव बोडेकर आदी माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व लिपीक वर्ग उपस्थित होते.
   या सहविचार सभेमध्ये एस .डी. लाड, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, व्ही. जी. पोवार, डॉ. डी एस घुगरे,खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, उदय पाटील, के के पाटील, प्रभाकर हेरवाडे, शिवाजी माळकर, काकासाहेब भोकरे, मिलींद बारवडे, मनोहर जाधव, अरुण मुजुमदार, जगदीश शिर्के, एन एम पाटील, विष्णू पाटील, इरफान अन्सारी, अजित रणदिवे, कृष्णात पोतदार, बाजीराव साळवी आदींनी शैक्षणिक प्रश्न उपस्थित केले. २९ शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
    फोटो 
संघटना सहविचार सभेत बोलतांना
 माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर

वडगाव विद्यालयात दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न.

पेठवडगांव / प्रतिनिधी
 शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी संस्था आणखी काही विद्याशाखा चालू करत आहे. त्यामध्ये लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज इत्यादी विद्या शाखेंचा समावेश असेल. वडगाव विद्यालय सारख्या जुन्या व नामांकित शाळेमध्ये दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा ओघ कायमस्वरूपी चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून जे जे प्रयत्न करता येतील ते आम्ही करू अशी ग्वाही  चेअरमन डॉ.मंजिरी मोरे देसाई यांनी दिली. स्वतः दांडिया खेळून विद्यार्थ्यांना दांडिया खेळण्यास प्रवृत्त केले. सर्व शाळेची पाहणी करून ज्या काही सोयीसुविधा करता येतील हे पाहिले.संस्थेच्या चेअरमन मंजिरी मोरे देसाई यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले.
    श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन व वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या चेअरमन डॉ.मंजिरी अजित मोरे देसाई यांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
      या स्पर्धेत तीन क्रमांक काढले. यामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता दहावीच्या महालक्ष्मी ग्रुपने पटकावला. द्वितीय क्रमांक इयत्ता आठवी व नववीच्या रॉयल ग्रुपने पटकावला. तसेच इयत्ता दहावीच्या डायमंड ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. आर. आर. पाटील यांनी तर आभार ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. पी. एस. मोहिते यांनी मानले. याप्रसंगी   शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य कोजिमाशी पतसंस्थेचे चेअरमन  तथा प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे ,पर्यवेक्षिका सौ आर. आर. पाटील ,संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे, तंत्र विभाग प्रमुख ए. एस. आंबी, परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके, अतुल पाटील ,ज्येष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस. ए. पाटील यांनी केले  या कार्यक्रमाचे छायाचित्रण डी. एस. कुंभार व सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.  परीक्षक म्हणून सौ. एस. एस. चव्हाण व सौ यु .सी.पाखरे यांनी काम पाहिले.
     फोटो 
वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज वडगावमध्ये बोलतांना चेअरमन डॉ. मंजिरी अजित मोरे देसाई , प्राचार्य बाळ डेळेकर व अन्य मान्यवर

Wednesday, 25 October 2023

हेरलेत दुर्गा माता महादौड मोठ्या उत्साहात संपन्न

        
     हेरले /प्रतिनिधी
 हेरले (तालुका हातकणंगले) येथे  सकल हिंदू समाज व श्री शिवप्रतिष्ठान  हिंदुस्तान  यांच्या वतीने गेले  १३ वर्ष अखंडपणे  दुर्गा माता दौड चे आयोजन केले जाते.हेरले शिवप्रतिष्ठान संघटना ही लोकांमध्ये देश प्रेमाची, राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करत असते. दसऱ्या दिवशी दुर्गा माता  महादौड  मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. 
   घटस्थापनेपासून पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत दुर्गामाता दौड सुरू होती. पहिल्यांदा  अतिशय कमी लोकांना घेऊन सुरू केलेल्या ह्या दुर्गा माता दौडचे दसऱ्या दिवशी  विराट अशा  संख्येमध्ये रूपांतर झाले. यात मोठ्या संख्येने  स्वइच्छेने  महिलावर्ग, व लहान मुले, मुली, वडीलधारी पुरुष, तरुणवर्ग, तसेच सर्व बारा बलुतेदार हिंदूनी, हा दुर्गा माता महा दौडीचा उपक्रम अतिशय आनंदी व जल्लोषी वातावरणात पार पडला.    
    यावेळी स्त्रीशक्तीच्या जयघोषाने  परिसर दुमदुमला होता.दौड निघालेल्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करण्यात आले. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. एकीचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दौडमध्ये युवक वर्ग व महिला वर्ग मोठया संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. हातात भगवा ध्वज घेऊन स्फूर्ती गीत गात दौड काढण्यात आली.  गावातील मुख्य मार्गावरून प्रदक्षिणा घालून,  मुख्य चौकात  दौडीची सांगता करण्यात आली. दौडचे नियोजन सकल हिंदू समाज  यांच्यावतीने करण्यात आले होते.

Thursday, 19 October 2023

पारंपारिक संस्कृतीचे संवर्धन करा.. - मंजिरी देसाई मोरे

 कोल्हापूर / प्रतिनिधी
 

आजचा विज्ञान युगात पारंपारिक  संस्कृतीचे अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या पिढीला  संस्कृतीची ओळख करून देणे आहे. पारंपारिक  संस्कृतीचा वसा आणि वारसा उद्योन्मुख पिढीला माहिती व्हावा यासाठी शैक्षणिक संस्था मधुन पारंपारिक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी  कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. असे प्रतिपादन प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या चेअरमन डॉक्टर मंजिरी देसाई मोरे यांनी केले.
     आधुनिकता,विज्ञान आणि संस्कृती” यांची विण जपणारा “महिला सबलीकरण” हे उद्दिष्ट घेवून 35 वर्षे सुरू असणारा महाहादगा सहशालेय उपक्रम मुरगूड विद्यालय ज्युनियर कॉलेज व सौ.सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना मंचच्या वतीने मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे आयोजित करण्यात आलेल्या महादगा बोळवण कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या यावेळी यावेळी सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील व प्राचार्य एस.आर.पाटील प्रमुख उपस्थित होते. विद्यालयातील 800 मुलींनी फेर धरून हादग्याची गाणी गायली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली
    कार्यक्रमास उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक  एस. बी. सूर्यवंशी , पर्यवेक्षक एस.डी साठे , तंत्र विभाग प्रमुख पांडुरंग लोकरे,  उपस्थित होते 
   सुत्रसंचालन विद्या सुर्यवंशी , कल्पना पाटील यांनी  तर आभार. लता पाटील  यांनी मानले

Tuesday, 17 October 2023

शिक्षकांची एनपीएस खाती महिना अखेर पर्यंत काढण्याचे मान्य - शिक्षक समितीचे आंदोलन स्थगित

 कोल्हापूर दि. 18 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी बुधवार दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर महापालिके समोरआंदोलन करण्यात येणार होते. तशी नोटीस प्रशासनाला दिली होती. आज अतिरिक्त आयुक्त मान.केशव जाधव यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक समिती बरोबर बैठक घेऊन शिक्षकांची एन.पी.एस मध्ये खाती या महिना अखेरपर्यंत  काढण्याच्या मागणीची पूर्तता करण्याचे मान्य केले. त्यामुळे शिक्षक समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.मुख्याध्यापक रिक्त जागा भरणे, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रकरणे व स्थायित्व प्रमाणपत्र देणे, विषय शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे ,सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील फरक टप्प्याटप्प्याने देणे,दिव्यांग शिक्षकांना आरक्षणाचा लाभ देऊन पदोन्नती देणे, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक सुविधा देणे इत्यादी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली त्यातील काही मागण्या तातडीने पूर्ण करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, प्रशासनाधिकारी शंकर यादव, शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्य प्रतिनिधी उमेश देसाई, शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, विनोदकुमार भोंग,मयूर जाधव, सुभाष धादवड, उमर जमादार, महिला आघाडी प्रमुख आशालता कांजर, राज्य प्रतिनिधी नयना बडकस,शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे,उषा सरदेसाई ,विजय माळी, कार्यालयीन स्टाफ किरण रणसिंग, सौ.अंबुलगेकर अजय गोसावी,सूर्यकांत ढाले,शांताराम सुतार इत्यादी उपस्थित होते.

Monday, 16 October 2023

हेरले येथे अमरसिंह वड्ड यांची तंटा मुक्त समिती अध्यक्ष पदी निवड जाहीर

कोल्हापूर / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील  ग्रामसभा मध्ये हात उंचावून मतदान घेऊन   सरपंच राहुल शेटे यांनी अमरसिंह वड्ड यांची तंटा मुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली.
   या सभेमध्ये माजी सभापती राजेश पाटील, अशोक मुंडे ,राजगोंड पाटील,मुनिर जमादार,उदय वडड,सयाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हेरले गावच्या महात्मा गांधी  तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी अमरसिह वडड यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली.
   आज सकाळी ११ वाजता प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये सरपंच राहुल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली.तंटा मुक्त समिती अध्यक्षपदासाठी चार जण इच्छुक होते.यापैकी मुनीर जमादार यांनी माघार घेतली.तर मंगेश काशिद,विनोद वड्ड,अमरसिंह वड्ड यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.यावेळी तिन्ही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  सरपंच राहुल शेटे,उपसरपंच बख्तियार जमादार व सर्व  ग्रामपंचायत सदस्यांनी  ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.पण पहिल्यादा प्रत्येक उमेदवार मीच अध्यक्ष होणार या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्या  समर्थकांनी आपल्या नेतृत्वाचीच निवड व्हावी यासाठी आक्रमक झाले.यामध्ये यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे  उपसरपंचासह दहा ग्रामपंचायत सदस्यांनी ही ग्रामसभा तहकूब करावी असे लेखी निवेदन सरपंचांना दिले.व दहा सदस्य तिथून निघून गेले. दरम्यान घटनास्थळी हातकणगले  पोलिस निरीक्षक महादेव तोंदले फौजफाट्यासह दाखल झाले.त्यांनी ही ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.पण समर्थकांचा गोंधळ सुरूच होता.या प्रसंगी सरपंच राहुल शेटे यांनी तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांना हात उंचावून मतदान करावे असे सांगितले.यावर उमेदवार मंगेश काशीद व विनोद वड्ड यांनी आक्षेप घेऊन गुप्त मतदान पद्धतीने सदरची  निवड करावी असे सांगितले . सरपंच राहुल शेटे यांनी हात उंचावून मतदान घेतले यामध्ये अमरसिंह वड्ड यांना हात उंचावून समर्थकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शविल्याने त्यांची तंटा मुक्त समिती अध्यक्षपदी निवड सरपंच राहुल शेटे यांनी जाहीर केली.

वडगाव विद्यालयात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ!


पेठ वडगाव /प्रतिनिधी
 वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावमध्ये घटस्थापना दिनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर कौन्सिल मेंबर, कोजिमाशि चेअरमन तथा  प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांनी सरस्वतीची मूर्ती विद्यालयास अर्पण केली.ढोल ताशाच्या गजरात विद्येची देवता माता सरस्वतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. पुजा विधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीप जोशी यांनी केली. पूजा जेष्ठ शिक्षक डी.एस.कुंभार व त्यांच्या पत्नी विमल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आली.
    सरस्वती मूर्तीची रथामधून  मिरवणूक वडगाव शहरातील प्रमुख मार्गावरून काढली.यामध्ये सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन  सोहळ्याची शोभा वाढवली. एनसीसी विद्यार्थी विद्यार्थिनी, म्युझिक सिस्टीम विभाग, विद्यार्थिनी लेझीम पथक, विद्यार्थी ढोल ताशा पथक यांनी उत्कृष्ट वादन केले.
        या कार्यक्रमामध्ये उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे ,पर्यवेक्षिका सौ.आर.आर. पाटील, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे, तंत्र विभाग प्रमुख ए. एस. आंबी, कार्यालयीन प्रमुख अतुल पाटील, प्रतिभा मोहिते,ज्येष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार, परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके ,के. एच. भोकरे, सौ.एस. एस. चव्हाण, रमेश पाटील,अकबर पन्हाळकर,प्रताप पाटील, संजय गोणी, रविंद्र वासुदेव यांचे सहकार्य लाभले .या संपूर्ण कार्यक्रमाचे  संयोजन व नियोजन एम. व्ही. कुलकर्णी  यांनी केले. यामध्ये सौ. एस. एस. चौगुले, एस. ए. पाटील,श्रीमती आर. ए. माने, ज्युनिअर कॉलेज शिक्षक वृंद , विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, जी. एस., एल आर.  सांस्कृतिक मंत्री,यांचे सहभागासह मोलाचे सहकार्य लाभले.
   फोटो कॅप्शन
वडगाव विद्यालयामध्ये सरस्वती देवीच्या मूर्तीची जेष्ठ शिक्षक डी.एस.कुंभार व त्यांच्या पत्नी विमल कुंभार पूजा व आरती करतांना

Saturday, 14 October 2023

प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक समिती महापालिकेसमोर निदर्शने करणार

 कोल्हापूर दि. 12 - 

     महानगरपालिकेकडे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता महापालिकेसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत येणार आहेत. प्रलंबित प्रश्ना बाबत अनेक वेळेला पाठपुरावा करूनही अद्याप मार्गी लागलेले नाहीत. 2005 नंतर  नोकरीस लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची एन पी एस मध्ये खाती काढलेली  नाहीत.  काही कर्मचारी- शिक्षक यांची सेवानिवृत्ती जवळ आलेली आहे. त्यांना कोणत्याच पेन्शनचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही खाती त्वरित काढावीत ,शैक्षणिक पर्यवेक्षक ,मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांच्या रिक्त जागा  भराव्यात, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, शिक्षक व कर्मचाऱ्यांची स्थायित्व प्रमाणपत्रे द्यावीत ,सहाव्या वेतन आयोगातील व सातव्या वेतन आयोगातील फरक रक्कमा द्याव्यात, शिक्षण समितीकडील जे सेवक  महानगरपालिकेकडे कार्यरत आहेत त्यांना शिक्षण समितीकडे परत पाठवावे , विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, प्रलंबित असलेला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम घ्यावा इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन असून सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रजा काढून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समितीचे नपा/ मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्यप्रतिनिधी उमेश देसाई ,शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, वसंत आडके, सुभाष धादवड,उत्तम कुंभार, अशालता कांजर ,नयना बडकस,फारुक डबीर,शकील भेंडवडे,युवराज सरनाईक, विनोदकुमार भोंग,उमर जमादार,मयूर जाधव, संदीप जाधव आदींनी केले आहे.

Wednesday, 11 October 2023

पुलाची शिरोलीत शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे उत्साही वातावरणात स्वागत

 
हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोलीत शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण भारत देशात विश्व हिंदू परिषद व  बजरंग दलातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या रथाचे शिरोली फाट्यावर आगमण झाले. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, शिरोली चे माजी उपसरपंच कृष्णात करपे,ह .भ.प विठ्ठल पाटील , तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील आदींच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
हिंदू साम्राज्य निर्माते, सनातन हिंदू धर्माचे रक्षक, संवर्धक, राष्ट्रीय प्रेरणेचे अखंड स्रोत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे हे ३५० वे वर्ष. आपल्या धर्मशील आचरणाने, राष्ट्रीय विचाराने, प्रेरक कृतीने, जगभरातील हिंदूंना गेली साडेतीनशे वर्ष स्वातंत्र्याची अव्यहात ऊर्जा प्रदान करणाऱ्या छत्रपती श्री. शिवरायांच्या शौर्याचे स्मरण करणारे, त्यांच्या तेजस्वी पराक्रमाचे जागरण करणारे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे वर्ष.
श्री शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी जागतिक हिंदूंचे बलशाली संघटन असणारी विश्व हिंदू परिषद यावर्षी आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. हिंदुत्वाचा हुंकार जागवणाऱ्या या दोन अमृतयोगी घटनांद्वारे पुन्हा एकदा समाजाचे जागरण करण्यासाठी, हिंदूंच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी, राष्ट्र जागरण कार्यात हिंदू तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी, सनातन हिंदू धर्म रक्षणासाठी संपूर्ण भारत देशात विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज शौर्य जागरण ही शौर्य यात्रा पुलाची शिरोली येथील शिरोली फाटा येथे सकाळी नऊ वाजता यात्रा रथ आला असता या रथाचे व यात्रेचे स्वागत संभाजी उर्फ बंडा साळुंखे, गणेशजी शास्त्री, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, शिरोली चे माजी उपसरपंच कृष्णात करपे,ह .भ.प विठ्ठल पाटील , तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील आणि इतर मान्यवरांनी श्रीफळ वाढवून स्वागत केले. त्यानंतर रथामधील सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र म्हणून शिरोली फाटा येथून शौर्य यात्रेस प्रारंभ करण्यात आला या शौर्य यात्रेचे मुख्य आकर्षण क्रांतीवीर ढोल ताशा पथक बजरंग दल  व अण्णाभाऊ साठे मातंग समाजातील तरुणी व माता-भगिनीनी आरती करून जंगी स्वागत केले. हि  यात्रा शिरोलीच्या मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे मार्गक्रमण करत असताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आतिषबाजी व पुष्पव्रूष्टी केली. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे यात्रा येताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रथावरती जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली. तेथून शौर्य यात्रा रथ ग्रामपंचायत चौकामध्ये आल्यानंतर ग्रामपंचायत समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती व ध्येय मंत्र म्हणल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ करण्यात आली.
  .संभाजी उर्फ बंडा साळुंखे ,गणेश  शास्त्री ,सोमेश्वर वाघमोडे, सुजित कांबळे, मुकुंद उरुणकर ,भास्कर अण्णा कोरवी शैलेश पवार,नियोजन समितीसदस्य  प्रशांत कागले ,निलेश शिंदे, श्रीकांत कदम. मयुर मोरबाळे. शुभम पाटील. ओंकार चव्हाण. राहुल मोरे. अजय मेनीकरे. अभिषेक सुर्यवंशी. हर्षद देशपांडे,  बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, राजेश पाटील, आण्णासाहेब सावंत, दिपक यादव, योगेश खवरे, धनाजी पाटील, विनोद आंची,  शिरोली ग्रामपंचायत चे सर्व सदस्य कर्मचारी शिरोली एमआयडीसी पोलीस  कर्मचारी  आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो.....
पुलाची शिरोलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करताना हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी.

Monday, 9 October 2023

वक्तृत्व कला अंगी असल्यास मनुष्य उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकतो - डॉ. सुनीलकुमार लवटे

.
 कोल्हापूर दिनांक - 9 .माणसाने आपल्या अंगी उत्कृष्ट अशी वक्तृत्व कला विकसित करावी. वक्तृत्व कलेमुळेच मनुष्य उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांनी ही कला आत्मसात करावी असे आवाहन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शहरस्तरीय इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे नपा / मनपा राज्यप्रमुख सुधाकर सावंत होते. डॉ. लवटे सर पुढे म्हणाले, 'लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्यात वक्तृत्व कलेची आवड निर्माण करावी. आज संभाषण कौशल्यामुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या करून सांगता येतात. उत्कृष्ट संभाषण कला अंगी असल्यामुळे अनेक जणानी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या अंगी उत्कृष्ट अशी संभाषण कला जाणीवपूर्वक वाढवावी. इंग्लिश भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील भाषा आत्मसात होण्यासाठी चांगला उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षक समितीचे कौतुक केले.यावेळी सुधाकर सावंत यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती   हक्का बरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून विविध उपक्रम राबवत असते. आज पर्यंत अनेक आपत्तीच्या वेळी शिक्षक समितीने समाजाला मदत केल्याची माहिती दिली. त्याचबरोबर दरवर्षी गांधी जयंती निमित्त महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या साठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी इंग्लिश भाषेची गोडी निर्माण होण्यास मदत होत असल्याची माहिती दिली. यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांना शिवशाहू ट्रस्ट शाहुवाडी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले बद्दल सत्कार करणेत आला.या वेळी शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी उमेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले तसेच नक्षत्र ग्राफिक्स चे डिझायनर श्रीपाद रामदासी हेही उपस्थित होते. यावेळी एकूण सात गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 314 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण चारुलता पाटील,अबोली देशपांडे ,श्रुती कुलकर्णी, अक्षय गुरव,शर्मिन कागदी, निशा साळवी,ज्योती देसाई,पुनम हिरेमठ, मानसी माने, सोमनाथ जाधव,सीमा हावळ,यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस संजय कडगावे कार्याध्यक्ष सुभाष धादवड कोषाध्यक्ष वसंत आडके महिला आघाडी प्रमुख अशालता कांजर,विठ्ठल दुर्गुळे, सुभाष माने, विनोदकुमार भोंग,सी एस पाटील, सुनील पाटील ,उत्तम कुंभार, उमर जमादार ,युवराज सरनाईक,तानाजी पाटील,कुलदीप जठार इत्यादींनी केले.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे*                                                                                          
 *इयत्ता पहिली*                                              
🥇 *प्रथम-* सर्वेशू ज्ञानेश्वर वागरे( लक्ष्मीबाई जरग विद्यालय)                                                    
🥈 *द्वितीय क्रमांक -*                                     विहान तुषार भापकर(महात्मा फुले विद्यालय) ,                                                       
🥉 *तृतीय* अनुश्री शिवप्रसाद कळंत्रे (महात्मा फुले विद्यालय)                         
🏅 *उत्तेजनार्थ -*                                            
अर्णव महेश कुंभार (राजे छत्रपती संभाजी विद्यालय)                                           
🏅कुशल निलेश डोईफोडे( लक्ष्मीबाई जरग विद्या)                       
*इयत्ता दुसरी*                                             
🥇 *प्रथम क्रमांक*: कुंजल सचिन देशमुख(जरग विद्या)                                          
🥈*द्वितीय क्रमांक*: शौर्य रविकिरण सरदेसाई (राजे छत्रपती संभाजी विद्यालय)                         
🥉 *तृतीय क्रमांक*- विभागुन ओम सचिन कुंभार व अनविश जयवंत लोखंडे(जरग विद्या)                               
🏅उत्तेजनार्थ: अथर्व अमर चौगुले व हर्षाली विशाल कांबळे (जरग विद्या)                         
*इयत्ता तिसरी*                                 
🥇प्रथम शांभवी संदीप देशपांडे
(जरगनगर)                                             
🥈 *द्वितीय क्रमांक*: कार्तिकी यशवंत गव्हाणे
(विचारे विद्या)                                             
🥈 *तृतीय क्रमांक*: स्वरा राजेंद्र रेपे (जरगनगर)                                     
🏅उत्तेजनार्थ : कश्मीरा दौलत बारड                                                
(जरग विद्या) जान्हवी नागराज गजाकोष( नेहरुनगर विद्या)                             
*इयत्ता चौथी*                                   
🥇 *प्रथम क्रमांक* : संस्कार शहाजी पाटील (जरगनगर)                                       
🥈 *द्वितीय क्रमांक* : आस्था महेश तूकारे(जरग विद्या )                           
🥉 *तृतीय क्रमांक* विभागुन : जान्हवी दीपक शिंदे (जरगनगर)     स्वरा अरुण पाटील                                       
🏅 *उत्तेजनार्थ -*
श्रेया संतोष आंबेकर( महात्मा फुले विद्यालय)
आराध्या संतोष जठार ( जरग विद्यालय)                                             
*इयत्ता पाचवी*                                 
🥇 *प्रथम क्रमांक*  : स्वरांजली सुकुमार घाटगे (महात्मा फुले विद्यालय)                    
🥈 *द्वितीय क्रमांक* : परिणीती रवींद्र केकतपुरे (टेंबलाईवाडी विद्यामंदिर )                                                  🥉 *तृतीय क्रमांक* - प्रणव जनार्दन ओंकार ( नेहरुनगर विद्यामंदिर )                          🏅 *उत्तेजनार्थ* - ग्रीष्म समित कदम (दत्ताजीराव माने विद्यालय)                                 जुवेरिया हुसेन मुल्ला (लक्ष्मीबाई जरग विद्या)                                 
*इयत्ता सहावी*                                    
🥇 *प्रथम क्रमांक* : लावण्या मारुती कोराणे (लक्ष्मीबाई जरग विद्यालय)                            
🥈 *द्वितीय क्रमांक* : तनिष्का शरद पाटील (जरगनगर )                   
🥉 *तृतीय क्रमांक* विभागुन:आर्या दीपक चराटे (लक्ष्मीबाई जरग विद्या) व मसीरा उस्मानखान पठाण ( शाबाजखान आमिनखान जमादार उर्दू स्कूल)                    
🏅 *उत्तेजनार्थ*- राजवर्धन शशिकांत पाटील( लक्ष्मीबाई जरग विद्यालय)
तृप्ती प्रवीण भिसे ( टेंबलाईवाडी विद्यालय)                                    
*इयत्ता सातवी*                                        
🥇 *प्रथम क्रमांक* : श्रावणी प्रशांत मेधावी ,( महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी)                                                                                
🥈 *द्वितीय क्रमांक*: समीक्षा संतोष अलुगडे (लक्ष्मीबाई जरग विद्यालय)                                                                    🥉 *तृतीय क्रमांक* - श्रेया प्रसाद हैबती (लक्ष्मीबाई जरग विद्यालय)                                     
🏅 *उत्तेजनार्थ* :  निलुफरहा गुलामसरवर अन्सारी( कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालय)             
 समृद्धि  विजय केंद्रे (जरग विद्या)                                            
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून चारुलता पाटील,अबोली देशपांडे ,श्रुती कुलकर्णी, अक्षय गुरव,शर्मिन कागदी, निशा साळवी,ज्योती देसाई,पुनम हिरेमठ, मानसी माने, सोमनाथ जाधव,सीमा हावळ,यांनी काम पाहिले.

Sunday, 8 October 2023

मुरगुड विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


कोल्हापूर / प्रतिनिधी

महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे येथे संपन्न झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या 14  व 17 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही संघांची पेठवडगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  14 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघामध्ये केदार पाटील, जय शिंदे, समर्थ सुतार, सार्थक कांबळे ,प्रथमेश पाटील, हर्षवर्धन पाटील, रणवीर कांबळे, विपिन मोरे, कार्तिक अनुसे, प्रेमराज कापडे, हर्षवर्धन शिंदे, अनुराग खराडे यांचा समावेश आहे. तर  17 वर्षा खालील मुलांच्या कबड्डी संघा मध्ये रोहन कुंभार, प्रमोद कुराडे, अनिकेत पाटील, आदित्य आसवले, उन्मेश गुरव, प्रणव खांडेकर,यश कळमकर, स्वप्नील भांडवले, सुमित शिंदे,समीर देसाई, सार्थक भारमल प्रेम येजरे.या खेळाडूंचा समावेश आहे.
 या खेळाडूंना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे ,पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई ,कोजिमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर ,प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस .बी. सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस. डी. साठे,पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक संभाजी कळंत्रे, अनिल पाटील ,महादेव खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो...
मुरगुड.. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू समवेत प्राचार्य एस. आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य एस .पी. पाटील, पर्यवेक्षक यासाठी क्रीडा शिक्षक एस. एस. कळंत्रे आदी मान्यवर.

श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील :-स्वामीजी


संस्थेच्या १७४ व्या शाखेचे उदघाटन

हेरले / प्रतिनिधी
श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. एक्संबा शाखा हेरले,खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली   ही संस्था  ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील असे मत प.पू.महेशानंद स्वामीजी उर्फ ईश्वर स्वामीजी,लिंगांगयोगी पूज्य श्री जगद्गुरू बसवकुमार स्वामीजी यांनी हेरले (ता हातकंणगले)येथील संस्थेच्या १७४ व्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.स्वागत व प्रास्तविक सुरेश चौगुले सर यांनी केले.
   यावेळी यावेळीडेप्युटी जनरल मॅनेजर बहाद्दूर गुरव म्हणाले, संस्थेच्या अर्थकारण प्रगती तंत्र तंत्रज्ञान ग्राहक सेवा समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या कार्याच्या व संस्थेच्या  सांपत्तिक स्थितीचा  आढावा घेतला.ठेवी ३४०८ कोटी, कर्जवाटप २६२५ कोटी,नफा ३५ कोटी तसेच सभासद ३लाख ६१ हजार आहेत.
    उदघाटक व प्रमुख पाहुणे  खासदार धर्यशील माने,माजी आमदार सुरेश हाळवणकर, जि प सदस्य अरुण इंगवले, ऋषभ जैन हे उपस्थित होते.
      यावेळीडेप्युटी जनरल मॅनेजर बहाद्दूर गुरव, हेरले शाखा मॅनेजर यलगोंडा पाटील,कबनुर शाखा मॅनेजर बिपीन देसाई,महेश कोरवी,रणजित भोसले,सौरभ टिकणे,श्रीगौरी होन्ननवर,गजानन पाटील,नितीन स्वामी,शंकर कोळेकर कर्मचारी नागरिक  उपस्थित होते

फोटो:-श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा हेरले या नूतन शाखेचे उदघाटन व दीपप्रज्वलन करत असताना प.पू.महेशानंद स्वामीजी उर्फ ईश्वर स्वामीजी,लिंगांगयोगी पूज्य श्री जगद्गुरू बसवकुमार स्वामीजी,खासदार धर्यशील माने,माजी आमदार सुरेश हाळवणकर, जि प सदस्य अरुण इंगवले, ऋषभ जैन,डेप्युटी जनरल मॅनेजर बहाद्दूर गुरव उपस्थित होते

Saturday, 7 October 2023

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री नामदार संजय बनसोडे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते लातूर येथे शानदार वितरण

कोल्हापूर/प्रतिनिधी 
आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या..
इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या नामांकित शाळेस प्रदान करण्यात आला. लातूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री ,नामदार संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
  यावेळी बोलताना  नामदार संजय बनसोडे म्हणाले शिक्षक व शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करू. प्रसंगी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासन दरबारी झटत असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.
      शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई,शाळा समितीचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील  को.जी.मा.शी.चे अध्यक्ष बाळ डेळेकर, आजी माजी विद्यार्थी , पालक,शिक्षक, कर्मचारी यांचे याकामी प्रोत्साहन लाभले. प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य  एस.पी.पाटील,पी.एस.पाटील, प्रशांत डेळेकर, श्रीकृष्ण बोंडगे यांनी स्वीकारला.यावेळी दत्तात्रय मुद्देवाड ,बालाजी सुवर्णकार, पंडित पांचाळ, बसवराज स्वामी, विजयकुमार राव जाधव ,लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष दिपाली आवटे, मदन धुमाळ ,आदी मान्यवर उपस्थित होते.
   फोटो 
लातूर येथे मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करताना क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे शिक्षक आमदार विक्रम काळे, दत्तात्रय मुद्देवाड, दिपाली आवटे आदि मान्यवर

Friday, 6 October 2023

पुलाची शिरोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सतीश पाटील यांची एकमताने निवड

हेरले/ प्रतिनिधी
पुलाची शिरोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सतीश भीमराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पद्मजा करपे होत्या. 
यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
 सतीश पाटील यांनी यापूर्वीही सुमारे चार ते पाच वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांनी काम करताना कोणताही जाती पातीचा  भेदभाव न बाळगता सर्व घटकांना योग्य न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांचा गावातील असलेला मोठा  जनसंपर्क, सामाजिक कार्याची आवड व संपूर्ण वेळ काम करण्याची असणारी तळमळ यामुळेच त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली असल्याचे सरपंच करपे यांनी सांगितले .
 यावेळी बोलताना नुतन अध्यक्ष  सतीश पाटील म्हणाले,  शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या आदेशाची पुरेपूर अंमलबजावणी करून त्यांच्या धोरणानुसारच ही समिती निवडली जाईल . तसेच प्रत्येक क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींना या समितीमध्ये संधी देणार असल्याचे सांगितले. 
 या निवडी साठी माजी आमदार अमल  महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.
 यावेळी सरपंच सौ पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, शिरोली विकासचे  संचालक धनाजी पाटील, उद्योजक योगेश खवरे, माजी उपसरपंच कृष्णात करपे,  प्रकाश कौंदाडे , राजेश पाटील, बबन संकपाळ, दिपक यादव,  सदाशिव संकपाळ, रावसाहेब सोडगे, संपत संकपाळ, बाळासो पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्राम विकास अधिकारी ए.वाय.कदम उपस्थित होते.
फोटो.....
येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितेचे नुतन अध्यक्षसतिश पाटील यांचा सत्कार करताना सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, राजेश पाटील, प्रकाश कौंदाडे, धनाजी पाटील, बबन संकपाळ व इतर

Thursday, 5 October 2023

महम्मद पैगंबर जयंती निमित्त उर्दू वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न


  कोल्हापूर प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा शहर कोल्हापूर मार्फत महम्मद पैगंबर जयंती निमित्त उर्दू वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धे मध्ये महानगरपालिकेच्या 5 शाळांमधील 30  विद्यार्थी सहभागी झाले होते.                       
डायटचे प्राचार्य डॉ आय सी शेख साहेब,प्रशासनाधिकारी एस. के.यादव व मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी  सुधाकर सावंत यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य प्रमुख पदी निवड झाले बद्दल नुरुद्दीन पटेल,फारूक डबीर व शकील भेंड़वाड़े यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अमीन मुल्ला होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उमर जमादार यांनी केले.सूत्रसंचालन वसीम शेख व आसिया देसाई यांनी केले.आभार जलील शेख यांनी मानले या सर्व स्पर्धेचे संयोजन अजीम शेख ,रफीक पटेल व आसमा सय्यद यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणुन मुफ्ती आसिफ मौलाना मुआज व मौलाना नियाज यांनी काम पाहिले

       वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

*लहान गट*

1) फातिमा तबरेज काझी
( मनपा एस.ए जमादार उर्दू  स्कूल कोल्हापूर)

इयत्ता: 3री

विषय:मोहम्मद  स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम  के अखलाक व आदात


मार्गदर्शक शिक्षिका: उजमा नाहीद मैनूद्दीन पिरजादे

2) मरियम तबरेज काझी
( मनपा एस.ए जमादार उर्दू  स्कूल कोल्हापूर)

विषय: सिरतुन्नबी

इयत्ता: 5वी

मार्गदर्शक शिक्षिका: उजमा नाहीद मैनूद्दीन पिरजादे

3) ऐमन समीर बागवान
( मनपा एस.ए जमादार उर्दू  स्कूल कोल्हापूर)

विषय: 
मोहम्मद्व स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम  के मोजतात

इयत्ता: 5वी

मार्गदर्शक शिक्षिका: निलोफर समीर बागवान

*मोठा गट*

1) सना अब्दुल सय्यद
( मनपा छ.रा.महाराज उर्दू स्कूल  कोल्हापूर) 

विषय: सिरतन नबी मोहम्मद सल्ल. पर आनेवाले हालात

इयत्ता: 7वी

मार्गदर्शक शिक्षक: असिम बाबर पटेल


2) तस्मिया राजू इनामदार
( मनपा हाजी वंटमुरे उर्दू स्कूल विक्रमनगर कोल्हापूर)

विषय:  आप स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम  की पैदाइश, आपका बचपन       

सिरतन नबी मोहम्मद सल्ल. पर आनेवाले हालात.

इयत्ता: 8वी

मार्गदर्शक शिक्षक: मेहदीमियाॅ अ.नबी  कालेकाजी

3) उम्मेहनी आयुब मुजावर
( मनपा एस.ए जमादार उर्दू  स्कूल कोल्हापूर)

विषय: मोहम्मद्व स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम सिरत
इयत्ता: 7वी

मार्गदर्शक शिक्षिका: आसिया कौसर हुसेन देसाई

Wednesday, 4 October 2023

. ए. वाय. कदम यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथील ग्रामपंचायतीच्या छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभाग्रहात  ग्रामविकास अधिकारी श्री. ए. वाय. कदम यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच सौ . पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी व माजी उपसरपंच राजेश पाटील आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी  माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश कौंदाडे, धनाजी पाटील, तात्यासो पाटील, दिपक यादव,  योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, सौ. धनश्री खवरे, सौ.कमल कौंदाडे, सौ. सुजाता पाटील, सौ. मनीषा संकपाळ,सौ. कोमल समुद्रे,  सौ.मगल शिंदे, सौ. नजीया देसाई , कुमारी.हर्षदा यादव, कुमारी.वसिफा पटेल, बबन संकपाळ,  आरीफ सर्जेखान, विजय जाधव, महादेव सुतार, सदाशिव संकपाळ ,प्रकाश शिंदे, संपत संकपाळ, शिवाजी समुद्रे, सागर कौंदाडे,  विजय यादव, श्रीकांत कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो....
येथील ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम यांचा सत्कार करताना सरपंच सौ. पद्मजा करपे व मान्यवर पदाधिकारी.

Monday, 2 October 2023

स्वच्छतेचे महान पुजारी महात्मा गांधीजी


डॉ अजितकुमार पाटील, सर ( पीएच डी कोल्हापूर )

२ ऑक्टोबर १८६९ रोजी जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्म झाला. ‘शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते’,असा विश्वास बाळगणार्‍या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना संगितले. 
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्त्वाचे योगदान दिले. यामुळेच त्यांना 'राष्ट्रपिता' म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी त्यांची जयंती भारतात मोठ्या थाटात साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त, हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणूनही साजरा केला जातो, कारण त्यांना अहिंसावादी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जाते.

“स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा,
आरोग्य आपले निरोगी करा”
घर हे आपलं असत आणि परिसर हा दुसऱ्याचा असतो. या विचारामुळेच मानवाने निसर्गाचा ऱ्हास केला. स्वच्छता ठेवणे हे फक्त सरकारचे काम नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेची आवड असली पाहिजे. आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे.
हे काम फक्त सरकारच करू शकत नाही तर लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. या भारत देशाला स्वच्छ भारत बनविण्यास आपले योगदान दिले पाहिजे.
महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणी केली केली.
महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी केली होती?
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर, २०१४ साली केली होती.
महात्मा गांधींच्या गुणधर्मांबद्दल बोलताना, त्यांचे संत वागणे हे त्यांच्या वैशिष्ट्यातले खूप मोठे वैशिष्ट्य होते. माझ्या मते, जेव्हा मी महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल वाचले तेव्हा मला आढळले की त्यांनी खरोखरच स्वतःवर विजय मिळवला होता.
सत्यप्रेमी – सत्यनिष्ठा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अनुचित गोष्टींकडे लक्ष दिले नाही. नेहमी लोकांना सत्याच्या मार्गावर जाण्यास सांगायचे आणि स्वतःचे अनुसरण करायचे
मनापासून – त्यांच्या मनात फसवणुकीची भावना नव्हती आणि ते कोणाशी वाईट  विचारांनी वागले नाहीत. त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली.
आज स्वच्छ भारताची मोहीम महात्मा गांधींच्या नावाने चालवली जात आहे कारण ते खूप स्वच्छता  प्रेमी होते आणि स्वच्छ्ता ठेवत असत. आणि त्यांनीच हरि जन सुरू केला. अशा प्रकारे, महात्मा गांधींची अनेक वैशिष्ट्ये होती.
आपल्या देशाचे राष्ट्रपिता, आदर्शवादी व्यक्ती, बापू म्हणून प्रसिद्ध असलेले गांधी यांना सर्वोत्तम समाजसुधारक देखील मानले जाते.गांधीजींनी आयुष्यभर सामाजिक सुधारणेला प्रोत्साहन दिले आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बापूंनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्वाची भूमिका बजावली.
  जय हिंद....

Sunday, 1 October 2023

करवीर तालुका शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेत विबग्योर हायस्कूला विजेतेपद

कोल्हापूर / प्रतिनिधी
             करवीर तालुका शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेत विबग्योर हायस्कूल उचगावने विजेतेपद मिळवले तर संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगरला उपविजेतेपद मिळाले . अशी माहिती प्रसिध्दीस क्रीडा समन्वयक संदीप पाथरे यांनी दिली.
       स्पर्धेचे उद्घाटन नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिये संचलित शिये हायस्कूल जुनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गाडवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णात बसागरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धा मेरी वेदर मैदानावर सुरू आहेत .
   या सामन्याचा पहिला उपांत्य सामना विबग्योर स्कूल व गांधीनगर हायस्कूल यांच्यामध्ये खेळण्यात आला .गांधीनगर हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात 20 धावा केल्या तर हे आव्हान  विबग्योरने दोन षटकात पूर्ण करून विजयी झाले. दुसरा उपांत्य सामना संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर विरुद्ध अल्फोंसा स्कूल यांच्या मध्ये झाला.अल्फोंसा  संघाने सहा षटकात सहा पाच 47 धावा केल्या तर शांति प्रकाश हायस्कूलने हे आव्हान चार षटकात पूर्ण केले .फायनलचा सामना विबग्योर हायस्कूल उचगाव विरुद्ध संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर यांच्यामध्ये झाला .प्रथम फलंदाजी विबग्योर स्कूलने केली. त्याने सहा षटकात 52 धावा केल्या. संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगरने 6 षटकात 42 धावा करता आल्या.  विबग्योर हायस्कूल 10 धावांनी विजयी झाले. या स्पर्धेचे नियोजन क्रीडा समन्वयक संदीप पाथरे यांनी केले .पंच म्हणून शिवाजी कामते, आर.बी. पाटील, संतोष घाटगे, संदीप खुटाळे यांनी केले. 

फोटो ओळी:
करवीर तालुका शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कृष्णात बसागरे. क्रीडा समन्वयक संदीप पाथरे, आर.बी.पाटील

हेरले येथे एक तारीख एक घंटा स्वच्छता व श्रमदान उपक्रम



हेरले /प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत अंतर्गत (हेरले ता. हातकणंगले) येथे प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवण्यासाठी स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करून स्वच्छतेची चळवळ उभी राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार एक तारीख एक घंटा असा उपक्रम स्वच्छता व श्रमदान करून राबविण्यात आला.
       २ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे जे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ च्या कालावधीत स्वच्छता ही सेवा २०२३ अभियान राबविण्यात येत आहे यानिमित्त ग्रामपंचायत हेरले येथे लोकसभागातून एक तास श्रमदान द्वारे स्वच्छता करण्यात आली यामध्ये ग्रामपंचायत हेरले परिसर प्राथमिक शाळा परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र गोमटेश्वर टाकी परिसर बाजारपेठ धार्मिक स्थळे या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली 
         यावेळी सरपंच राहुल शेटे,उपसरपंच बक्तीयार जमादार, ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी महिला बचत गट, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, विद्यार्थी स्वयंसेवी संस्था नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.