हेरले /प्रतिनिधी
श्री निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मौजे वडगाव (ता. हातकणंगले)या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा विद्यमान अध्यक्ष आबासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होऊन शिवशंकर चिंगळे यांची अध्यक्षपदी व जयसिंग टिकले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करणेत आली.
बिनविरोध कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे संदिप थोरवत (सचिव),महेश भाणसे (खजानिस) सदस्य आबासाहेब देसाई,संतोष माळी , अनिल थोरात, अरुण कोरे, विवेक धनवडे,अरविंद बाबर,बाळासाहेब जाधव असी बिनविरोध निवड मठाधिपती श्री सदगुरु अदिनाथ महाराज यांनी जाहिर केली. त्यास सर्व सभासदानी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला . अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कारानंतर मठाधिपती श्री सद्गुरु अदिनाथ महाराजाचे आर्शिवचन होऊन सभा संपली .