हेरले /प्रतिनिधी
नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे निवडणूक कामकाजाची जबाबदारी पार पाडावी तसेच निवडणूक प्रक्रिया निष्पःक्षपणे आणि निर्भीडपणे पार पडण्यासाठी सर्वांनी निवडणूक कामकाज करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले.
हातकणंगले विधानसभा (अ.जा.) मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संजय घोडावत विद्यापीठ येथे शनिवार दि.९ व रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी आयोजीत केले आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षणामध्ये स्क्रीनवर पीपीटीच्या माध्यमातून स्लाईड शोद्वारे सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या वेळेत माहिती दिली. निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील टप्पे
,निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण तपासणी, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी,ईव्हीएमची माहिती,
मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्व तयारी, मतदान केंद्राची उभारणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्राबाबत, मतदान केंद्राचे वेबकॉस्टिंग, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, अंध, दिव्यांग मतदारांची मतदानाची प्रक्रिया आदीची माहिती प्रशिक्षणात देण्यात आली.
दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत विशेष हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ईव्हीएमची ओळख, जोडणी, व्हीव्हीपॅट निरीक्षण, मतदानाचे मॉकपोल, मतदार यंत्र मोहोरबंद करणे आदींचे प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले.दोन दिवसांच्या प्रशिक्षणास सर्व क्षेत्रिय, केंद्राध्यक्ष, एक ते तीन क्रमांकाचे अधिकारी असे १५९२ अधिकार्यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले.
या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अजय नरळे, निवडणूक नायब तहसिलदार संजय पुजारी, निवासी नायब तहसिलदार संदीप चव्हाण,मणुष्यबळ व्यवस्थापक सुरेश बन्ने, गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले आदींचे मार्गदर्शन लाभले.
फोटो
दुसरे प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करतांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, शेजारी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम.