हेरले /प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद एस सी ई आर टी महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यास करून आराखडा 2024 तयार करण्यात आला आहे .
सदर राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यावर आधारित शालेय अभ्यासक्रम निर्मिती करिता गणित विषयाकरिता तज्ञ सदस्यपदी डॉ. दिपक मधुकर शेटे नागांव यांची निवड झाली.
डॉ. दिपक शेटे हे स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन आणि ज्युनिअर कॉलेज मिणचे ता . हातकणंगले येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांचा शालांत परीक्षेचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागला आहे . नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने केल्याबद्दल त्यांची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केलेले आहे . सुमारे पंच्चेचाळीस लाख रुपये खर्चून स्वघरी गणितायण लॅब निर्मिती केली आहे. त्यांची गणितातील अवलिया म्हणून राज्यभर ओळख आहे .
त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले आहे .
त्यांना डाएटचे प्राचार्य राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचे प्रोत्साहन मिळाले व संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी एस घुगरे, सचिव एम ए परीट यांचे मार्गदर्शन लाभले.