Friday, 30 March 2018

आज चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती विशेष


राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या अंजनीला म्हणजे मारुतिच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिसारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. आज चैत्र पोर्णिमा आहे व आजचा दिवस  हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुती  राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतीच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी चेपली . तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.

हनुमानची 108 नावे. 


1) भीमसेन सहायकृते

2) कपीश्वराय

3) महाकायाय

4) कपिसेनानायक

5) कुमार ब्रह्मचारिणे

6) महाबलपराक्रमी

7) रामदूताय

8) वानराय

9) केसरी सुताय

10) शोक निवारणाय

11) अंजनागर्भसंभूताय

12) विभीषणप्रियाय

13) वज्रकायाय

14) रामभक्ताय

15 ) लंकापुरीविदाहक

16) सुग्रीव सचिवाय

17) पिंगलाक्षाय

18) हरिमर्कटमर्कटाय

19) रामकथालोलाय

20) सीतान्वेणकर्त्ता

21) वज्रनखाय

22) रुद्रवीर्य

23) वायु पुत्र

24) रामभक्त

25) वानरेश्वर

26) ब्रह्मचारी

27) आंजनेय

28) महावीर

29) हनुमत

30) मारुतात्मज

31) तत्वज्ञानप्रदाता

32) सीता मुद्राप्रदाता

33) अशोकवह्रिकक्षेत्रे

34) सर्वमायाविभंजन

35) सर्वबन्धविमोत्र

36) रक्षाविध्वंसकारी

37) परविद्यापरिहारी

38) परमशौर्यविनाशय

39) परमंत्र निराकर्त्रे

40) परयंत्र प्रभेदकाय

41) सर्वग्रह निवासिने

42) सर्वदु:खहराय

43) सर्वलोकचारिणे

44) मनोजवय

45) पारिजातमूलस्थाय

46) सर्वमूत्ररूपवते

47) सर्वतंत्ररूपिणे

48) सर्वयंत्रात्मकाय

49) सर्वरोगहराय

50) प्रभवे

51) सर्वविद्यासम्पत

52) भविष्य चतुरानन

53) रत्नकुण्डल पाहक

54) चंचलद्वाल

55) गंधर्वविद्यात्त्वज्ञ

56) कारागृहविमोक्त्री

57) सर्वबंधमोचकाय

58) सागरोत्तारकाय

59) प्रज्ञाय

60) प्रतापवते

61) बालार्कसदृशनाय

62) दशग्रीवकुलान्तक

63) लक्ष्मण प्राणदाता

64) महाद्युतये

65) चिरंजीवने

66) दैत्यविघातक

67) अक्षहन्त्रे

68) कालनाभाय

69) कांचनाभाय

70) पंचवक्त्राय

71) महातपसी

72) लंकिनीभंजन

73) श्रीमते

74) सिंहिकाप्राणहर्ता

75) लोकपूज्याय

76) धीराय

77) शूराय

78) दैत्यकुलान्तक

79) सुरारर्चित

80) महातेजस

81) रामचूड़ामणिप्रदाय

82) कामरूपिणे

83) मैनाकपूजिताय

84) मार्तण्डमण्डलाय

85) विनितेन्द्रिय

86) रामसुग्रीव सन्धात्रे

87) महारावण मर्दनाय

88) स्फटिकाभाय

89) वागधीक्षाय

90) नवव्याकृतपंडित

91) चतुर्बाहवे

92) दीनबन्धवे

93) महात्मने

94) भक्तवत्सलाय

95) अपराजित

96) शुचये

97) वाग्मिने

98) दृढ़व्रताय

99) कालनेमि प्रमथनाय

100) दान्ताय

101) शान्ताय

102) प्रसनात्मने

103) शतकण्ठमदापहते

104) योगिने

105) अनघ

106) अकाय

107) तत्त्वगम्य

108) लंकारि

सरकारच्या  नाकर्तेपणामुळे लोकांचे जगणं हैराण बनलंय : प्रविणसिंह पाटील


सरकार उलथवण्यासाठी हल्लाबोल यशस्वी करणार  कार्यकर्त्यांचा निर्धार : शिवानंद माळी



मुरगुड प्रतिनिधी  (समीर कटके)

  " हर हर मोदी, घर घर मोदी," "अच्छे दिन" सारखे जुमले बाजी करणारे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात कोणताही घटक समाधानी नाही. सर्व स्तरात खदखद आहे.  सामान्य लोकांचे जगणं हैराण करणाऱ्या या सरकारचे नाकर्तेपण लोकांच्या समोर  आणण्यासाठी हा हल्लबोल एल्गार यशस्वी करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष आणि बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी केले. दि 2 एप्रिल रोजी होणाऱ्या हल्लाबोल सभेचे नियोजनाची माहिती  कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवानंद माळी यांनी दिली. 

      मुरगुड ता कागल येथे प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रविणसिंह पाटील होते. 

      2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सरकार विरोधी हल्लाबोल यात्रेचा पश्चिम महाराष्ट्र विभागाचा शुभारंभ मुरगुड येथील सभेने होत आहे.  या दिवशी मुरगुड ता.कागल गारगोटी ता. भुदरगड आणि कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा सुप्रिया सुळे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनं

जय मुंढे,  आम जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, आम सुमनताई पाटील,  आम हसन मुश्रीफ आदी उपस्थित राहणार आहेत. सर्व नेते सभेसाठी रविवार दि 1 एप्रिल रोजीच  कोल्हापूर येथील शासकीय निवासस्थान येथे दाखल होणार आहेत. 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वा आंबाबाईच्या दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ होणार आहे. कागल सिद्धनेर्ली केनवडे मार्गे निढोरी येथे सर्व नेतेगण येणार असून तेथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. हजारो मोटरसायकलच्या रॅलीने हा ताफा मुरगुड येथे सभास्थळी येणार आहे. सकाळी दहा वाजता सभेस प्रारंभ होणार आहे. या सभेच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नवी पेठ येथे मुरगुड विद्यालयासमोर 500 फुटाचे भव्य स्टेज उभारण्याचे काम सुरु असून 20000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. थेट प्रक्षेपणासाठी दोन स्क्रीन उभा करण्यात येणार आहेत. जिप मैदानावर पार्किंग व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय, फिरते शौचालय अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या सभांमध्ये सर्वात मोठी सभा यशस्वी करण्याचा मानस केला आहे.

         मुरगुड हे स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांचे गाव असून आंदोलनाची चळवळ उभे करणारे गाव आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून सत्तारूढ भाजप सरकारला हादरा देण्यासाठी मुरगुड येथेच पहिली सभा घेण्यात आली आहे. असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी डी डी चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. रणजित सूर्यवंशी, संजय मोरबाळे,  नगरसेवक राहुल वंडकर, जगन्नाथ पुजारी, पृथ्वीराज चव्हाण, आबासो खराडे, शिवाजी सातवेकर, एम बी मेंडके, पांडुरंग चांदेकर   आदी उपस्थित होते.

फोटो : हल्लाबोल यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या नियोजन बैठकीस मार्गदर्शन करताना प्रविणसिंह पाटील, शेजारी 

शिवानंद माळी, डी डी चौगले आदी..

Thursday, 29 March 2018

सज्जनांचं मौन समाजाला घातकचं...बुद्धीवाद्यांनी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी एल्गार करावा ...संपतराव गायकवाड


मुरगुड प्रतिनिधी समीर कटके 

     २३मार्च रोजी तमाम शिक्षकांच्यावतीने  डॉ. एन .डी.पाटील व डी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे महामोर्चा निघाला. सज्जनांनी मौन सौडलं नाही तर दुर्जनांचं नेहमीचं फावतं. अलिकडं सज्जन माणसं केवळ स्मशानातचं भेटतं असताना प्रचंड संख्येनं सज्जन माणसं मौन सोडून रस्त्यावर उतरली  ही हुरूप वाढवणारी घटना आहे.

आज अखेर माणसं स्वत:च्या आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी  रस्त्यावर उतरत असतं. पण 'देश उभारणीसाठी शिक्षण' या ध्येयाने पेटून बुद्धिवादी रस्त्यावर आले ही मशाल अशीच पेटती ठेवावी असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी संपतराव गायकवाड यांनी केले. 

      "सर जी शिक्षक पालक समाज सम्पर्क" ग्रुपच्या कार्यक्रमात ते शिक्षणाच्या सद्य स्थितीबाबत बोलत होते. 

       'शिक्षण वाचावा'  महामोर्चाबाबत आपली मते व्यक्त करताना संपतराव गायकवाड  म्हणाले पगार वाढीसाठी,वेतन वाढीसाठी ,वेतन आयोग लागू होण्यासाठी रस्त्यावर न उतरता सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक रस्त्यावर उतरला.   गोरगरीबांच्या आयुष्यातील ज्ञानाचा प्रकाश गावातचं मिळावा,गरीबांच्या शाळा बंद पडू नयेत,खाजगी कंपनीकडे शाळा देऊन ज्ञानाचे खाजगीकरण होऊ नये म्हणून सर्वजन रस्त्यावर उतरले. शिक्षणात जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी पूर्वी बृहतआराखड्यानुसार गरज तेेथे शाळा हे धोरण राबविलं होतं.धनाड्यांच्या बगलबच्चांना शाळा काढताना  बृहत आराखडा अडचणीचा ठरतो म्हणून 'स्वयंअर्थसहाय्य व खाजगी कंपनीस शाळा' हे धोरण राबविलं जात आहे. यास सर्व थरातून विरोध  आवश्यक आहे या मोर्चातून व्यक्त झालेला रोष कायम ठवणे गरजेचे आहे.                    

  बुद्धीवादी माणसं कधी एकत्र येत नाहीत असे म्हटले जाते . बुद्धीचा अहंकार त्यांना एकत्र येऊ देत नाही.पण या आंदोलनात सर्व बुद्धीवादी एकत्र जिवाच्या आकांताने भूमिका घेऊन उतरले. फोडा आणि झोडा निती हे धोरणही येथे लागू पडले नाही. कारण एखाद्या ज्वलंतं प्रश्नावर जेंव्हा चळवळ उभी राहते तेंव्हा सर्व वैयक्तिक स्वार्थ गळून पडतात व सर्वजण एकत्र येतात.  काही ठिकाणी शाळा सुरूही झाल्या पण मुळासकट वृत्ती नाहीशी होणं गरजेचं म्हणून मोर्चा  होता. अतिशय शिस्तीत                  

कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही अशी भूमिका घेतली. उर्दू परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून मोर्चेकऱ्यांनी  स्वत:च्या मुलांसारखी उर्दू पेपरला जाणा-या मुलांची काळजी घेतली. आजारीअपंग(दिव्यांग),वयोवृद्ध ,अवघडलेल्या महिलांची काळजी मातेसारखी घेतली जाईल         याचीही  दक्षता  घेण्यात आली.           सत्ताधारी संवेदनशील मनाचे असतील तर सन्मानाने मागण्यांचा विचार करतील.वात पेटली की तोफा आपोआप धडधडू लागतात हे लक्षात घ्या . कोल्हापूरमध्यें ही  वात पेटविण्याचे काम या  ऐतिहासीक महामोर्चाने केले आहे.   केवळ आणीबाणीतचं नव्हे तर सामाजिक प्रश्नावर स्वार्थाशिवाय आपण एक होऊ शकतो हे दाखवून दिले.  सरकार हे जनतेचंच  असतं .सरकार कडे जनतेने मागायचं नाही तर कोणाकडे? असा सवालही त्यांनी केला. यावेळी सुकुमार पाटील, समीर कटके, बाबुराव नारायण चव्हाण, बी वाय कांबळे,विवेक गवळी, बी एम कुंभार, ओमाजी कांबळे आदी उपस्थित होते.

तरुण उद्योजक अमर वडाम यांची सामाजिक जाणिवेतून शाळेस सढळ हस्ते मदत


माजगाव प्रतिनिधी —बाजीराव कदम

संस्कृत सुभाषिताप्रमाण वर्तन करणारी अनेक व्यक्तीमत्व म्हणजे माळवाडी (माजगाव).

शतेषु जयते शुर:सहस्रेषु च पंडीत।

वक्ता दशसहस्रेपु:दाता भवति वा न वा।।

शुरवीर असा मनुष्य शंभरातुन एखादा जन्मतो,विद्वान मनुष्य हजारातुन एखादा जन्मतो.उत्कृष्ठ वक्ता दहा हजारातून एखादा जन्मतो.पण दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच मिळतो.म्हणजे दातृत्व दुर्मिळ असल्याच वास्तव हे सुभाषित मोजक्या शब्दात मांडत.परंतू या सुभाषिताला छेद देणार गाव म्हणजे पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी माळवाडी.

जेमतेम हजारभर लोकवस्तीच हे गाव.आणि ह्या हजारभर लोकांमधुनच जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधांसाठी  सढळ हाताने मदत करणारी अनेक व्यक्तीमत्व आपल्याला या गावामध्ये भेटतात.त्यापैकी एक म्हणजे या गावचे भुमिपुत्र तरुण उद्योजक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री.अमर सदाशिव 

वडाम (साहेब).आपले वडील कै.डाॅ. सदाशिव धोंडी वडाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हापरिषदेच्या मराठी शाळेतील मुल आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कुठेही कमी पडू नयेत या जाणिवेतून या सामाजिक  बांधलकीतुन या शाळेला २५०००₹ चा चेक व Hpकंपनी चा कलर प्रिंटर शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाजीराव शामराव कदम यांच्याकडे भेट म्हणुन सुपुर्द केला. 

या प्रसंगी मुख्याध्यापक म्हणाले."आजच्या पिढीमध्ये अशी सामाजिक बांधीलकी जपणारे तरुण उद्योजक आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.त्यांचे हे कार्य म्हणजे आजच्या तरुणांना दिपस्तंभासारखे  वाटावे असेच आहे."आभार शाळेचे सहा.शिक्षक मंजीत नागमवाड सर यांनी मानले.

Wednesday, 28 March 2018

चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगर सज्ज


 

वाडीरत्नागिरी  (जोतिबा )- आतिश लादे 

श्री जोतिबा सकल जनांचे आराध्य दैवत या देवाची  यात्रा चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीला असते.या यात्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र प्रदेश, गुजरात अश्या अनेक राज्यातून भाविक जोतिबा डोंगर वर दर्शनासाठी येतात. दि.31/3/2018 रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी नाथांचा पालखी सोहळा होतो.

यात्रा शांतेत व सुरळीत पार पाडन्यासाठी प्रशासन व व श्रीपुजकांनी जय्यत तयारी केली आहे.वाहतूकीपासून, दर्शन मार्ग,दवाखाना याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील पुजारी वर्गाने यासाठी खबरदारी म्हणून स्वतः रुग्णवाहिका, दवाखाना व यात्रेकरूंसाठी पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध केला आहेत .स्वच्छता व वाहन पार्किंग साठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे प्रशासन व ग्रामस्थांनी संबोधले आहे.

 *गणित कोष विद्यार्थ्यांच्यासाठी दिपस्तंभ - डॉ .विकास सलगर*

 कोल्हापूर  प्रतिनिधी -  सतिश लोहार .  

                                                        ..................श्री दिपक शेटे लिखित गणित कोष पुस्तक विदयार्थ्यांना शालेय स्तरावर दिपस्तंभ ठरेल असे उदगार डॉ . विकास सलगर यांनी या पुस्तक प्रकाशनवेळी काढले . लेखक दिपक शेटे यांनी पुस्तक परीचय देताना हे गणितीय पुस्तक तिसरे असून माझे वडील कै . मधुकर सदाशिव शेटे ( सर )  यांना अर्पण केले आहे .यामध्ये विद्यार्थ्यांच्या  उपक्रमातुन या पुस्तकांची निर्मिती झाली आहे . गणितीय शब्दापासून त्याची संकल्पना विद्यार्थांना कळावी या उद्देशाने हे पुस्तक लिहीले आहे . शालेय स्तरावरील गणितीय संकल्पनांचे स्पष्टीकरण करण्यात आल्यामुळे स्पर्धा परीक्षेकरीता पुस्तक उपयुक्त आहे . या पुस्तकाचा शालेय विदयार्थी , स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्या साठी गणित विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल या पुस्तकाला डॉ . विकास सलगर यांची प्रस्तावना आहे असे लेखक श्री दिपक शेटे यांनी आपल्या पुस्तक परिचयात सांगितले .शाहू स्मारक भवन,  कोल्हापूर  या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला . यावेळी प्रकाशक ज्ञानराज भेंलोंडे यांचा सत्कार करण्यात आला .



यावेळी दै . पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक डॉ . योगेश जाधव , प्राचार्य डॉ.विकास सलगर, शिक्षण अधिकारी श्री आण्णासाहेब मगदूम , श्री  एस डी लाड,  श्री दादा लाड, तश्री व्ही जी पोवार , श्री डी एस घुगरे , श्री अभय वंटी , श्री आर वाय पाटील , श्री दिपक शेटे , श्री शिवाजी पाटील ,इ. मान्यवर , शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचलन संदिप व्हनाळे, सायली कोरे यांनी केले .

Tuesday, 27 March 2018

महामोर्चानंतरही सरकारने सुधारणा केली नाही तर राज्य स्तरावर कृती कार्यक्रम आखुन शिक्षण क्षेत्रातील समस्या हाणुन पाडूया - जेष्ठ शिक्षण तज्ञ डी.बी.पाटील 

हेरले/ प्रतिनिधी दि. २७/३/१८


 महामोर्चाची दखल घेऊन राज्य सरकारने सुधारणा केली नाही तर राज्य स्तरावर कृती कार्यक्रम आखुन शिक्षण क्षेत्रातील समस्या हाणुन पाडूया असे आवाहन जेष्ठ शिक्षण तज्ञ डी.बी.पाटील 

यांनी केले.

       कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत ते बोलत होते.प्रमुख उपस्थितात शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी.लाड, बी.जी.काटे(गडहिंग्लज) होते.

      महामोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व मोठ्या संखेने उपस्थित राहून यशस्वी केल्याबद्दल सर्व घटकांचे त्यांनी अभिनंदन केले व भविष्य काळात सर्वानी एकीने राहून शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अरिष्ठांना परतवुन लावन्याचे आवाहन त्यांनी केले.

       या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्येवर चर्चा झाली.तालुकावार मुख्याध्यापक समिती तयार करण्यात आल्या.या सभेत महामोर्चा यशस्वी केलेबद्द्ल व शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त डी.बी.पाटील,एस.डी.लाड,व्ही.जी.पोवार व स्टार मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त बी.बी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.या सभेला एस.व्ही.गुरबे(चंदगड),राजेंद्र खुराटे(गडहिंग्लज),जयसिंग पोवार(राधानगरी), एस.एस.वास्कर(शाहुवाडी), डी.ए.जाधव(पन्हाळा), ए.एस.रामाणे(कोल्हापुर),बी.एस.कांबळे(शिरोली), एस.टी.चौगुले(कागल), सी.एम्.गायकवाड व मुख्याध्यापक उपस्थित होते.

        स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी केले.आभार कोल्हापुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ.ए.एम्.पाटील  यांनी मानले.

       फोटो 

 जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांचा महामोर्चा यशस्वी केलेबद्दल व शिक्षणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना बी.जी.काटे,एस.डी.लाड,व्ही.जी.पोवार, डॉ.ए.एम्.पाटील व अन्य

कसबा बावडा पॅव्हिलियन मैदानावर तळीरामांचा ओपन बार


कोल्हापूर प्रतिनिधी -   संदीप पोवार 

कसबा बावडा येथील पॅव्हिलियन मैदानाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सध्या सुरू आहे. येथे राजरोसपणे तळीराम दारू पिऊन बाटल्या फोडतात यामध्ये दोष कोणाला द्यायचा दारू पिणाऱ्यांना की नगरपालिकेच्या कर्मचार्यांना  ? 

कll बावड़ा ग्राउंडवर सध्या नुतनीकरण सुरु आहे. समोर महापालिकेचे ऑफिस असून सुद्धा काही दारुडी मंडळी ग्राउंडवर ठिय्या मांडून खुशाल दारु पित बसतात आणि रिकाम्या झालेल्या बाटल्या अन ग्लास तसेच ठेवून जातात. काही वेळा बाटल्या फोडतात. 

पालिकेच्या कर्मचाऱ्याला याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की तो म्हणाला कोण बोलणार ? कारण पिऊ नका म्हटले तर वाद-विवाद घालून मारहाण करतात.

महानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 


शाहू प्राथमिक विद्यालय शाळा क्र 14 ला साडे नऊ लाख रुपयांचा निधी जाहीर


कोल्हापूर प्रतिनिधी -  ज्योती दिपक पाटील. 

कोल्हापूर तोरस्कर चौक येथील शाहू प्राथमिक विद्यालय शाळा क्र 14 या संस्थेचे अध्यक्ष विक्रम घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या शाळेस साडे नऊ लाख रुपयांचा निधी जाहीर झाला आहे अशी घोषणा करण्यात आली. 

या शाळेस शिवसंस्कार फौंडेशनने 2014 साली दत्तक घेतले होते . त्या वेळी पटसंख्या अवघी 28 होती तर आता पटसंख्या 125 वर झाली आहे. या शाळेत ई लर्निंग, शालेय गणवेश वाटप, शालेय साहित्य व खाऊ वाटप आणि पिण्याचे शुद्ध पाणी पुरविले जाते असे विविध उपक्रम राबविले जातात. 

याशाळेच्या विविध उपक्रमांची दखल घेऊन कोल्हापूर मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी व नगरसेविका सरीता मोरे यांनी शाळेस साडे नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी घोषणा केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जयंत पाटील सर, किरण शिराळे, विश्वास सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लवटे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका कांबळे मॅडम यांनी केले. 


कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती निवड संपन्न

पेठवडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
दि. २७/३/१८
कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी रवीकुमार पाटील शिरोळ व सचिव पदी सुरेश कोळी यांची निवड करण्यात आली.
    शासनाच्या विविध शैक्षणिक धोरणांचा सामना करणेसाठी प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. प्रत्येक संघटनेचे ध्येय शिक्षकांचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी चळवळ करीत असते. ही चळवळ बलशाली बनविनेसाठी संघटनांची एकजूट करून अधिक प्रभावी करणेसाठी सर्वच संघटनांचे नेते व जिल्हा कार्यकारिणी एकत्र येऊन प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीची वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये नेतेपदी मोहन भोसले (मामा) मार्गदर्शक राजाराम वरुटे व प्रसाद पाटील यांची निवड झाली. अध्यक्षपदी रविकुमार पाटील व सचिवपदी सुरेश कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
    सदर बैठकीवेळी सुनिल पाटील मावळते अध्यक्ष कृष्णात धनवडे,सचिव शिवाजी ठोंबरे गौतम वर्धन जयवंत पाटील अर्जुन पाटील तानाजी घरपणकर एस.के.पाटील संजय कुर्डुकर सतिश बरगे हरिदास वर्णे राजमोहन पाटील प्रकाश मगदूम सुकुमार पाटील सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.

सैनिक टाकळी येथे सैनिक पत्नी व गोरगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप

सैनिक टाकळी (प्रतिनिधी)

सैनिकांच्या मुळेच आपण  व आपला देश सुरक्षित असून त्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे याच बरोबर महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे .या भावनेतूनच पेरनॉड  रिकार्ड इंडिया दिल्ली व सिंगापूर कंपनीने सैनिकांच्या पत्नी व गोरगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपाचा निर्णय घेतला असे प्रतिपादन या कंपनीचे जनरल मॅनेजर व्ही सि . नित्यानंदम यांनी सैनिक टाकळी  येथील मोफत शिलाई वाटप कार्यक्रमात केले  सामजिक कार्यकर्ते   भवानीसिंह घोरपडे यांच्या प्रयत्नातून तसेच सैनिक समाज कल्याण मंडळ टाकळी  व  पेरनॉड रिकॉर्ड इंडिया या कंपनी कडुन सैनिक टाकळी व परिसरातील सुमारे १५०  माजी सैनिक पत्नी व गरीब होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले स कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कर्नल विजयसिंह गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून १०९ टी ए बटालियन चे ले. कर्नल मिलन शिंदे तसेच एक्ससाईज डिपार्टमेंट चे सुपरिटेंडेंट गणेश पाटील होते . कंपनीचे मॅनिफॅक्चर मॅनेजर नवेंदू तिवारी.  असिस्टंट मॅनेजर संजय कदरे , सरपंच वंदना माळगे उपिस्थत होते. कार्यक्रमाची सुरवात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून झाली .   यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली . गणेश पाटील यांनी भविष्यामध्ये ही सैनिकी गावासाठी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला . भवानीसिंह घोरपडे यांनी कंपनीचे आभार मानून गरीब होतकरू साठी नेहमीच सामाजिक भावनेतून काम करणार असल्याची ग्वाही दिली .    या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सपत्नीक सत्कार सैनिक समाज कल्याण मंडळामार्फत करण्यात आला  . यावेळी मान्यवरांच्या हस्ते सैनिक टाकळी व परिसरातील लाभार्थ्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले .  स्वागत  सैनिक समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष ऑ ले .बी एस पाटील यांनी केले त्यांनी मंडळाच्या विविध समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला  आभार मंडळाचे सचिव ए वाय पाटील यांनी मानले .कार्यक्रमास टाकळी दत्तवाड व परिसरातील राजकिय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील रहावे - महापौर स्वाती यवलुजे.

कसबा बावडा प्रतिनिधी :



 

कसबा बावडा प्रतिनिधी :

प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजेे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम नगरसेविका माधुरीताई लाड , नगरसेवक अशोक जाधव, मोहन सालपे, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,सदस्य वैशाली करपे,रमेश सुतार,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर,सनराईज रोटरी क्लबच्या गीतांजली ठोमके,लता देसाई,अमर माने,सचिन पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर प्रसंगी शहरस्तरीय कवायत स्पर्धेत प्रथम क्रमांक,विज्ञान प्रदर्शन,राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन स्पर्धा,स्कॉलरशिप परिक्षा,कबड्डी स्पर्धा,स्वाइन फ्लू पथनाट्य,महिला दिन पाक कला,मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व इतर स्पर्धेत यश मिळवलेल्या पालक व विद्यार्थी व परीक्षक यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. 
महापौर स्वाती यवलुजे यानी ,शाहू हस्तलिखित प्रकाशन प्रसंगी राजर्षी शाहू शाळेची *शाहू हस्तलिखित म्हणजे गुणवतेचा आलेख होय*  असे मनोगत प्रकट केले.नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेतील गुणवतेबद्दल शिक्षक व पालक यांना आपल्या विद्यार्थ्यां कडे लक्ष द्या देशाचे सक्षम असा नागरिक घडवा असे शुभेच्छा दिल्या. 
आसमा तांबोळी, मंगल मोरे,हेमतकुमार पाटोळे, अवधूत पाटोळे, अमर लाखे तसेच परीक्षक म्हणून प्राजक्ता शिंदे,पल्लवी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतवीर मित्रमंडळाचे  ,सचिन चौगले,चेतन चौगले,राजू चौगले,राहूल भोसले,स्वप्नील चौगले,कृष्णात चौगले व इतर कार्यकर्त्यांकडून शाळेला १० खुर्च्या भेट दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.व 
शाळेला आर्थिक मदत दिली त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यात गीतांजली ठोमके मॅडम,शारदा पाटोळे,अमर माने,जावेद पखाली, रुद्र पाटील.सदर देणगीदारांचा सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण केले. सादरीकरण केलेल्या गाण्यांमध्ये देशभक्तीपर गीते,सर्वधर्म समभाव, लोकगीते,कोळीगीते,घुमर,ब्रेकडान्स, बालनाट्य,श्रीदेवी श्रद्धांजली,गोविंदा स्पेशल,देवीचा गोधळ आदी वैशिष्ट्यपूर्ण गाण्यांचा समावेश होता.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याद्यापक अजितकुमार पाटील, नियोजन उत्तम कुंभार व सुशील जाधव यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवशंभू गाटे व आसमा तांबोळी यांनी केले.

Monday, 26 March 2018

शिक्षणातील स्वयंभू ता- यांचा शोध घेवून त्यांना स्टार मानांकन करणारी संस्था म्हणजे स्टार अॅकॅडमी - प्राचार्य डॉ.विकास सलगर

कोल्हापूर प्रतिनिधी दि. २६/३/१८

         शिक्षणातील स्वयंभू ता- यांचा शोध घेवून त्यांना स्टार मानांकन करणारी संस्था म्हणजे स्टार अॅकॅडमी, त्याचे हे कार्य शिक्षणाला पालवी देणार आहे . असे गौरव उदगार  प्राचार्य डॉ.विकास सलगर यांनी स्टार गौरव सोहळ्यात काढले.
    ते स्टार अॅकॅडमीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते. शाहू स्मारक भवनामध्ये मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला.प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष दिपक शेटे म्हणाले स्टार अॅकॅडमीचा उद्देश विषद करीत  संस्थाचालक ते शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुरस्कार देणारी स्टार अॅकॅडमी ही महाराष्ट्रातील पहीली संस्था आहे असे  त्यांनी नमुद केले . संस्थाचालक जयंत आसगावकर मनोगतात म्हणाले आम्हाला स्टार अॅकॅडमीने स्टार केले पण खरच ही संस्था सुपरस्टार आहे . सातारा शिक्षण  अधिकारीपदी नियुक्ती आण्णासाहेब मगदूम यांची झाले बद्दल सत्कार अध्यक्ष दिपक शेटे यांनी केला .
      आदर्श संस्था समुहाचे अध्यक्ष डी.एस. घुगरे यांनी स्टार अॅकॅडमीचा पुरस्कार भविष्यात राष्ट्रीय मानांकन पुरस्कार होतील असे मत मांडले यावेळी योगा ,रोप जंप, स्टेज गीते , भारुड , गणेशकृती निर्मिती यांची प्रात्यक्षिके झाली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदिप व्हनाळे व सायली कोरे यांनी केले  तर आभार उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी मानले .
स्टार अॅकॅडमी यांच्या मार्फत शैक्षणिक क्षेत्रातील   स्टार संस्थापक पुरस्कार संस्थाचालक प्रा. जयंत आसगावकर, अशोक चराटी, अशोक पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले. स्टार उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार सुधाकर निर्मळे ( कागल) अशोक कांबळे ( म्हाळुंगे), राहुल फुटाणे (कडगांव) स्टार मुख्याध्यापक पुरस्कार -भगवंत पाटील  (करवीर) सुरैय्या मुजावर (रुकडी), संतोष पाटील  (कागल) स्टार आदर्श शाळा पुरस्कार श्री बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगांव, विद्या मंदिर भैरेवाडी सावर्डे  बुद्रुक स्टार आदर्श शिक्षक पुरस्कार -भारत सावळवाडे ( दत्तवाड) इकबाल मुजावर  (कागल), महेश सुर्यवंशी ( कोल्हापूर ) स्टार शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार-बजरंग गरूड ( गडहिंग्लज), पांडुरंग जाधव ( कसबा वाळवे ) आदी शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करणाऱ्यात आले.
        या प्रसंगी दै. पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव , प्राचार्य डॉ.विकास सलगर, शिक्षणाधिकारी आण्णासाहेब मगदूम , एस डी लाड, दादा लाड, व्ही जी पोवार , डी एस घुगरे , अभय वंटी , आर वाय पाटील , दिपक शेटे , शिवाजी पाटील ,इ. मान्यवर , शिक्षक उपस्थित होते.
      फोटो
स्टार अॅकॅडमीचे शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सोबत प्रमुख मान्यवर.

Saturday, 24 March 2018

भावी पंतप्रधान शरद पवार ???

कोल्हापूर प्रतिनिधी  - ज्ञानराज पाटील

लोकसभा निवडणुका 2019 ला असल्या तरी विरोधी पक्षांनी आघाडीची मोट आतापासूनच बांधायला सुरू वात केली आहे.  नोव्हेंबर 2017 मध्ये कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिरात शरद पवार हे 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवले होते . 2019 हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, असा दावाही त्यांनी केला होता . कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिरात हे वक्तव्य केले असल्याने लोकांनी व प्रसार माध्यमांनी त्याची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही पण आता लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी भारतीय राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचं पहायला मिळतंय. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. शरद पवार यांच्याकडे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. त्याच अनुषंगाने सोनिया गांधींच्या काँग्रेसने त्यांना ही ऑफर दिल्याची चर्चा आहे.

पंतप्रधानपदासाठी शरद पवारच का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. देशाच्या राजकारणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल असाृ शरद पवार यांच्या तोडीचा एकही नेता नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उभरतं नेतृत्व आहेत, मात्र अनुभव आणि मुत्सद्देगिरीच्या बाबतीत ते नक्कीच कमी आहेत.

शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत ( अगदी मोदींसोबतही ) सौदार्हाचे संबंध आहेत. त्यांच्या नावाला सहसा कोणी विरोध करणार नाही अशी परिस्थिती आहे. मोदींविरोधात लढण्यासाठी त्यामुळेच शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.

आज काँग्रेसला  गरज आहे सत्तेची व ती मिळवून देण्यार्या एका चाणक्याची. पवारांहून मोठा चाणक्य आज तरी देशात दुसरा नाही.

आता ते या कसोटीवर किती खरे उतरतात हे येणारा काळच ठरवेल.

Friday, 23 March 2018

कोल्हापूरात शिक्षकांच्या महामोर्चाचा जनसागर

प्रतिनिधी सतिश लोहार  ............

. आज दि .२३मार्च रोजी तमाम शिक्षकांच्या वतीनं मा डॉ. एन .डी.पाटील व मा.डी.बी.पाटील .यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे महामोर्चा निघाला . सज्जनांनी मौन सौडलं नाही तर दुर्जनांचं नेहमीचं फावतं. अलिकडं सज्जन माणसं केवळ स्मशानातचं भेटतं असतात . आज मात्र प्रचंड संख्येनं सज्जन माणसं मौन सोडून रस्त्यावर उतरले आहेत.                       .... आजअखेर रस्त्यावर माणसं स्वत:च्या आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरत असतं. पगार वाढीसाठी,वेतन वाढीसाठी ,वेतन आयोग लागू होण्यासाठी रस्त्यावर न उतरता सामाजिक बांधिलकी म्हणून रस्त्यावर उतरत आहेत.                   ......... गोरगरीबांच्या आयुष्यातील ज्ञानाचा प्रकाश गावातचं मिळावा,गरीबांच्या शाळा बंद पडू नयेत,खाजगी कंपनीकडे शाळा देऊन ज्ञानाचे खाजगीकरण होऊ नये म्हणून सर्वजन रस्त्यावर उतरले आहेत.  .. .शिक्षणात जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी पूर्वी ब्रृहत आराखड्यानुसार गरज येथेचं शाळा हे धोरण राबविलं होतं.धनाड्यांच्या बगलबच्चांना शाळा काढताना ब्रृहत आराखडा अडचणीचा ठरतो म्हणून 'स्वयंअर्थसहाय्य व खाजगी कंपनीस शाळा' हे धोरण राबविलं जात आहे यास विरोध म्हणून सर्व  शिक्षक , शिक्षक संघटना , पालक  एकत्र येऊन लढा देत आहेत.   ...बुद्धीवादी माणसं कधी एकत्र येत नाहीत.बुद्धीचा अहंकार त्यांना एकत्र येऊ देत नाही.पण आज सर्व बुद्धीवादी एकत्र आले           .. फोडा आणि झोडा निती हे धोरणही येथे लागू पडले नाही. कारण एखाद्या ज्वलंतं प्रश्नावर जेंव्हा चळवळ उभी राहते तेंव्हा सर्व वैयक्तिक स्वार्थ गळून पडतात व सर्वजण एकत्र येतात.  .कोल्हापूर मध्ये    .. केवळ आणीबाणीतचं नव्हे तर सामाजिक प्रश्नावर स्वार्थाशिवाय आपण एक होऊ शकतो हे शिक्षकांनी , पालकांनी , विध्यार्थ्यानी  आज दाखवून दिले , गांधी मैदान , दसरा चौक ते कलेक्टर ऑफीस पर्यत मोठया संख्येने मोर्चा निघाला.सरकार ने शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे , शिक्षण असेल तर चांगली पिढी घडेल ..

शहरे झाली बकाल , कचरा व पाण्याची समस्या बिकट

प्रा.अनिल धस
(पर्यावरण अभ्यासक)

औरंगाबाद येथील कचरा समस्येमुळे भविष्यातील प्रत्येक शहर व परिसरामध्ये कसे वणवे पेटतील याची एक झलकच पाहायला मिळाली आहे.  ही खरं तर मस्तवाल शहरांच्या विकृत मानसिकतेमुळे समस्या निर्माण झाली आहे.
आज ही शहरे च प्रचंड कचरा निर्माण करतात परंतु त्याची विल्हेवाट शहराजवळील भागात करतात
आपल्या जवळचे पाण्याचे स्रोत दूषित करून टाकतात व नंतर मात्र पिण्याच्या पाण्यासाठी जवळपासच्या जलसाठे,नद्या यावर हक्क सांगतात.
कोल्हापूर ची सुद्धा हीच स्थिती आहे. कोल्हापूर शहरानेसुद्धा आपल्या तोंडाशी निसर्गाने आणून दिलेला शुद्ध पाण्याचा ठेवा ' पंचगंगा' पूर्णपणे दूषित करून टाकला आहे व आपली तहान भागवण्यासाठी आता करोडो रुपये खर्चून दूरवरील  धरणातून पाणी आणले जात आहे.
अशीच स्थिती आता इचलकरंजी शहराची होत आहे. वारणा नदीतून पाणी मिळावे यासाठी इचलकरंजी शहर या पाण्यावर आपला कसा हक्क आहे हे पटवून देत आहे तर स्थानिक वारणा वासीय यास प्रचंड विरोध करत आहेत. यातूनच 'पाण्यासाठी युद्ध' याची प्रचिती येत आहे.
मुळात आपल्या हक्काच्या पाण्याची काळजी घ्यायची गरज असताना तिथे मात्र निष्काळजी पणा दिसत आहे.
एकंदरीतच आपल्या आसपासचे नैसर्गिक स्रोत जर आपण काळजीपूर्वक वापरले तर ही समस्या निर्माणच होणार नाही.
-

Thursday, 22 March 2018

मार्च अखेरीस बँका सलग चार दिवस बंद - ग्राहकांची होणार गैरसोय

कोल्हापूर प्रतिनिधी

         यंदा मार्च 2018 अखेरीस 29 मार्च ते 1 एप्रिल अशा सलग चार  दिवस बँका ना सुट्टी राहणार आहे असे सूत्रांकडून समजते . त्यामुळे जर महत्वाची  बँकेची कामे असतील तर मार्च अखेरीची वाट न पाहता त्या पूर्वीच कामे करून घ्यावीत असे आवाहन बॅंक अधिकार्यांनी केले आहे. एटीएम मशीन मध्ये पुरेशी रोकड ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल पण तरीही ग्राहकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर त्रास होणार नाही.

   29 मार्च महावीर जयंती
   30 मार्च गुड फ्राइडे
   31 मार्च वर्ष अखेर
   01 एप्रिल रविवार
        अशा सलग आलेल्या चार सुट्ट्यांमुळे सर्वसामान्य लोकांना बँक व्यवहार करणे शक्य होणार नाही.

Wednesday, 21 March 2018

'डॉ. सायरस पूनावाला’ स्कूलचे हिंदी निबंध लेखन स्पर्धेत चमकदार यश. आदर्श प्राचार्या व आदर्श शिक्षक पुरस्कारासह 4 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक


कोल्हापूर प्रतिनिधी.

पेठवडगाव येथील डॉ सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलने राष्ट्रभाषा विकास परिषद पुणे यांच्यामार्फत  सप्टेंबर 2017 हिंदी राष्ट्रभाषा सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या हिंदी निबंध लेखन व हस्ताक्षर स्पर्धेत  दैदीप्यमान यश संपादन केले असून या स्पर्धेत जास्तीत
जास्त विद्यार्थी सहभाग केलेबद्दल प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर तर परीक्षा आयोजक हिंदी
शिक्षक श्री. यशवंत बोराटे यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे .
हिंदी राष्ट्रभाषा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रभाषा विकास परिषद पुणे
यांच्यावतीने आयोजित या परीक्षेत स्कूलच्या 186 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
त्यामधील 75 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून चार विद्यार्थ्याना
सुवर्णपदकासह प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे . यामध्ये अनुक्रमे
कु. अनुष्का सतिश जाधव ( इयत्ता 2 री),
कु. नम्रता शंकर खोत ( इयत्ता 6वी )
कु. वेदश्री प्रमोद पवार ( इयत्ता9 वी)
व अवंतिका राजसिंह यादव ( इयत्ता 10 वी)
या विद्यार्थ्यीनीना त्यांच्या उत्कृष्ठ
लेखनाबद्दल  आदर्श  विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या विद्यार्थ्याचे सुवर्णपदक व
प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धासाठी श्री. शाहू शिक्षण प्ररसारक सेवा मंडळ पेठ वडगांवचे अध्यक्ष श्री
गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव यांची प्रेरणा मिळाली तर संस्थेच्या
सचिव व डॉ. सायरस पूनावाला  इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांचे
प्रोत्साहन तर संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्या  सौ. स्नेहल नार्वेकर यांचे मार्गदर्षन
लाभले. ही परीक्षा पार पाडण्यासाठी हिंदी विषय प्रमुख अमोल निर्वाणे, सविता निकम,
वैभव पाटील सागर सणगर व शुभांगी हंकारे यांचे सहकार्य लाभले.

Tuesday, 20 March 2018

अब्दुल लाट येथे श्री विश्वकर्मा पांचाळ समाज यांच्या वतीने (मौजीं) बंधन व कालिका उत्सव सोहळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी इंचलकरंजी ,

अब्दुल लाट येथे श्री विश्वकर्मा पांचाळ समाज यांच्या वतीने  (मौजीं) बंधन व कालिका उत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला यजमान म्हणून हेरले गावचे  सौ व श्री अभिजीत सुतार व सौ व श्री लाट गावचेे धनपाल सुतार हे यजमान होते या  कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक मा . श्री विजय भोजे (जिल्हापरिषद सदस्य ), मा .श्री राजवर्धन निंबाळकर (जिल्हापरिषद सदस्य,) मा .श्री अनिल यादव (भाजप अध्यक्ष शिरोळ तालुका,) मा .श्री सुरेश दादा पाटील (प्रदेशअध्यक्ष रयत कांती संघटना,) मा .श्री सुशांत पाटील मयूर (मयूर उधोग समूह), मा .श्री सतिश लोहार सर ( जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ) ,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ , कवठे महाकाळ  ,हारोली , इचलकांजी , कबनूर , नांदनी , कोल्हापूर , शिरटी , हसुर  ,तसेच  महाराष्ट्र ,कर्नाटकातील सर्व विश्वकर्मा सुतार , लोहार , सोनार , तांबट , शिल्पकार  सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित राहून  कार्यक्रमाला शुभेच्या दिल्या . तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी- ज्यांनी अन्नदान स्वरूपात देणगी, मंदिर बांधकाम देणगी स्वरूपात मदत केले , सर्वांच्या मदतीने , मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल समाजातील धडाडीचे युवक श्री योगेश सुतार यांनी आभार मानले ,तसेच मा श्री विजय भोजे सर ( जिल्हा परिषद सदस्य ) यांचे समाजासाठी असणारे मोलाचे योगदान व सहकार्य यासाठी विशेष आभार मानले ,भविष्यात विश्वकर्मा, कालिका देवीच्या व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने  आम्हाला यश लाभो , आणि आपला समाज एकीकरण एकजूट होवो हीच प्रभू विश्वकर्मा चरणी प्रार्थना  सर्वानी सर्वाच्या साठी केली ,या कार्यक्रमा साठी  अध्येक्ष सदाशिव सुतार ,व्यवस्थपक सचिव योगेश सुतार ,सेक्रेटरी भीमराव सुतार,खजिनदार नामदेव सुतार , सरचिटणीस स्वप्निल सुतार, उपध्येक्ष बाबू सुतार,कार्यवाह नामदेव सुतार , संचालक अन्नाप्पा सुतार  व सर्व कार्यकारी मंडळ महिला मंडळ ,समस्त विश्वकर्मा पांचाळ समाज व कालिका महिला मंडळ अब्दुल लाट ,ता.शिरोळ जिल्हा. कोल्हापूर यांचा पुढाकर व कार्यक्रमाचे व्यवस्थापन या सर्वांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडले.