Wednesday, 30 May 2018

रत्नागिरी महामार्ग भूसंपादन जमिनीच्या मोजणीस विरोध 


शिरोली/ प्रतिनिधी दि. ३०/५/१८

अवधूत मुसळे

    भूसंपादन जमिनीच्या मोजणीस विरोध करीत सोलापूर रत्नागिरी महामार्गास जमिनी देणार नाही. प्रशासनाने बळाचा वापर केल्यास प्रसंगी अटक करून घेणार असा निर्धार सोलापूर रत्नागिरी महामार्गाच्या शेतजमिनी बचाव कृती समिती शेतकऱ्यांनी स्थापन करून निश्चय केला आहे. निरंजन महाराज आश्रमामध्ये सभा घेऊन समितीची घोषणा करण्यात आली.

      सोलापूर -रत्नागिरी महामार्ग चोकाक, माले, हेरले, मौजे वडगांव, नागांव, टोप आदी गावातून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गास जमिनीची मोजणी करून भूसंपादन केले जाणार आहे. मात्र आदी गावच्या शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केला आहे. जिरायती जमिनी खासगी पाणी पुरवठाद्वारे बागायती केल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपया कर्जे असून जमिनीवरही बोजा चढलेला आहे. तसेच या शेतकऱ्यांना चरितार्थासाठी या भागातील तोकडीच जमिन आहे. या प्रकल्पात जमिनी गेल्या तर काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे.

            टोप, नागांव, मौजे वडगांव, हेरले , माले, चोकाक आदी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन माजी सभापती राजेश पाटील व माजी. जि.प. सदस्य सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर -रत्नागिरी महामार्गाच्या जमिनीस विरोध कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या वतीने जमिनी देण्यास विरोध असून या गावातील होणाऱ्या जमिनींच्या मोजणीस विरोध, भूसंपादन विरोधी कायदेशीर सल्लागार नेमून कायदेशीर मार्ग अवंलबीत उच्च न्यायालयात न्याय मागणे, प्रसंगी बळाचा वापर केल्यास स्वतः अटक होणे आदी निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. यानुसार मौजे वडगांव , चोकाक गावची मोजणी बंद पाडण्यात यश मिळविले.

     या सभेस माजी सभापती राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य सुभाष पाटील, मुनिर जमादार, अशोक मुंडे, अॅड. विजय चौगुले, बाजीराव थोरवत, स्वप्नील चौगुले, जलद पाटील, महावीर पाटील, पोपट चौगुले, बी.टी. सावंत, अभयसिंह पाटील, राजेंद्र पाटील, रंगराव गायकवाड,महावीर आलमाने, आदी प्रमुखासह शेतकरी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.

   फोटो 

कृती समितीच्या वतीने मौजे वडगांवचे सरपंच काशिनाथ कांबळे निवेदन मोजणी अधिकार काटकर यांना देतांना.

Monday, 28 May 2018

मौजे चोकाकच्या शेतकऱ्यांचा रत्नागिरी - सांगोला महामार्गास जमिनी देण्यास विरोध


हेरले / प्रतिनिधी दि. २४/५/१८


  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत -रत्नागिरी - सांगोला महामार्ग क्र १६६ चे चौपदरीकरण व सुधारणा करून पर्यायी मार्गाचा अवलंब करणे बाबत मौजे चोकाक गावच्या शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून सुधारणा न झालेस आत्मदहन व रास्तारोकोचा इशारा  दिला आहे.

        निवेदनतील आशय असा की, हातकणंगले मौजे तालूक्यातील चोकाक  येथील गट नंबर २४,२५,२६,२७,२९,३०अ,३०ब,३१,३३,३४,३६,५७,५८,५९,६०,६१,६२,६३,६४,६५,६६,६७,६८,६९,७०,७१,७२,७४ व ७७ या गट नंबर मधून उपरोक्त चारपदरी रस्त्याच्या कामा संदर्भात गावचे सर्व शेतकरी बांधव आपणास विनती करीत आहोत कि सदर जमिनीचे आम्ही अल्प भूधारक शेतकरी कुटुंब असून आमचा पूर्ण चरितार्थ व रोजी रोटी समन्धित शेतीवर अवलंबून असून सदर जमिनी मधून रस्ता झाल्यास  आमच्या कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आपणास विनंती की सदरचा रस्ता करने ऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.         यासाठी दि १६ एप्रिल २०१८ इ रोजी खासदार राजू शेट्टी  व जिल्हा अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठिकीमध्ये समिती गठित करुण त्या बाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रस्त्याची मोजनी व अक़्वारिशन बाबत विचार करु असे  जिल्हाधिकारी यानी संगितले होते.

   मात्र आजआखेर कहिही करवाई न करता आज दि २३ मे रोजी समजूतीची मोजणी करणे कामी आपणास नोटिस देऊन प्रत्यक्ष मोजनीस सुरवात केली आहे. हे आमच्या निर्देशनास आल्याने आम्ही सर्वानी त्यास विरोध केला आहे.जिल्हा अधिकारी यांनी पर्यायी रास्ता बाबत विचार करू असा शब्द दिला होता त्यावर काहिही करवाई केली नाही. (चोकाक ते सांगली फाटा ते टोप)

      सदरचा रस्ता कायमचा होऊ नये व आमची रोजी रोटी हिरावून घेऊ  नये. ही विनंती या व्यतिरिक्त जबरदस्ती व कायद्याची सक्ती करुण जर रस्ता काम सुरु केल्यास ना इलाजस्त्व आम्ही अन्यायग्रस्त शेतकरी आत्मदहन व रास्ता रोको सारखे आंदोलन करुन त्यानंतर होणाऱ्या सर्व परिस्थिस आपण जबाबदार राहाल. म्हणून सदरचे निवेदन  गाव नियुक्त सरपंच या नात्याने  सर्व शेतकऱ्यांच्या व ग्रामपंचयतीच्या वतीने भूमिअभिलेख अधिकारी अमोल क्षीरसागर व कोल्हापूर प्राधिकरण अधिकारी अनिल गोरड देऊन विनती केली आहे की सदरचे काम रदद् करावे . निवेदनाच्या प्रती माहितीसाठी, जिल्हाअधिकारी तहसीलदार,भूमिअभिलेख अधिकारी ,गाव कामगार तलाठी, पोलीस निरीक्षक  हतकाणंगले यांच्याकडे पाठिविल्या आहेत. 

   अशी माहिती प्रसिध्दीस सचिन पाटील यांनी दिली आहे. निवेदनावर सचिन पाटील महावीर पाटील, सुकमार पाटील, अजित पाटील, महावीर आलमाने,संजू आलमाने,विजय आलमाने,सुभाष बुकशेटे, सतीश पाटील, सुनील पाटील,जम्बू पाटील, अमोल पाटील, सूरज सुतार,विकास कुंभार,मदन सरदार,कृष्णात पाटील, विजय ननवरे,नयन जाधव,बंटी चौकाकर,विकास चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

    फोटो 

मौजे चोकाक गावचे शेतकरी व  सचिन पाटील  लेखी निवेदन भूमिअभिलेख अधिकारी अमोल क्षीरसागर व कोल्हापूर प्राधिकरण अधिकारी अनिल गोरड यांना देतांना शेजारी अन्य शेतकरी

रत्नागिरी -सांगोला महामार्ग हा विकासकांच्या फायदयाचा असून शेतकरी वर्गास मारक - खा. राजू शेट्टी

हेरले / प्रतिनिधी दि. २७/५/१८

   

रत्नागिरी -सांगोला महामार्ग हा विकासकांच्या फायदयाचा असून शेतकरी वर्गास मारक आहे. खासगीकरणातून हा मार्ग तयार होत आहे. या मार्गास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव या विभागाचा खासदार या नात्याने राहणार असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

     माजी सभापती राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य मामा पाटील, आदींच्या नेतृत्वाखाली  टोप, चोकाक, हेरले, मौजे वडगांव , नागांव, माले ,शिये आदी गावातील शेतकरी शिष्टमंडळाशी ते चर्चा प्रसंगी बोलत होते.

      या गावातील शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीतून पाच ते दहा किलोमीटर कोटयावधी रुपये खर्च करून पाणी पुुरवठा योजना कार्यान्वीत करून जिरायती शेती बागायती बनविली आहे. मात्र प्रशासन या शेतीस जिरायतीच्या नावाखाली जमिन संपादित करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची रोजी रोटी हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे.कोल्हापूर सांगली महामार्ग चौपदरीकरण झालेले असल्याने वास्तवतः या मार्गाची गरजच नाही. नागांव, टोप,शिये या गावांलगतच राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे या रत्नागिरी -सांगोला मार्गामुळे बागायती शेती जिरायती शेतीच्या नावे कवडीमोल भावाने संपादन सुरू आहे. या परिससरातील सर्व शेतकरी या रस्त्यास विरोध करीत आहेत. खासदार या नात्याने सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रियाशील राहणार.

       या वेळी अशोक मुंडे, पोपट चौगुले, मुनिर जमादार ( हेरले) माजी सरपंच अभयसिंह पाटील  (माले)राजेंद्र पाटील, बि. टी. सावंत, भाऊसाहेब  कोळी ( नागांव), रंगराव गायकवाड  रणजित पाटील ( टोप ), महावीर आलमाने, जलद पाटील  (चोकाक), बाजीराव थोरवत,अॅड. विजय चौगुले, रावसाहेब चौगुले  (मौजे वडगांव )

        फोटो 

खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करतांना शेतकरी शिष्टमंडळ

चोकाक येथे विकास कामांचा शुभारंभ

हेरले / प्रतिनिधी दि. २८/५/१८


     चोकाक गावच्या विकासासाठी कटिबध्द असून या गावची  कायमची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी विशेष मुख्यमंत्री निधीतून पेयजल योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही योजना पुढील  एका वर्षात कार्यान्वीत होईल असे प्रतीपादन  रुकडी जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांनी  केले.

       चोकाक( ता. हातकणंगले) येथे जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांनी त्यांच्या  फंडातून  २५ लाखाची विविध विकास कामासाठी मंजूर केले आहेत. आयोजित कार्यक्रम  प्रसंगी त्या बोलत होत्या. कामांचा शुभारंभ त्यांच्यासह  प. स. सदस्या मेहरनिगा जमादार, माजी सभापती राजेश पाटील, माजी सभापती अविनाश बनगे , मुनिर जमादार, गटनेते कृष्णा निकम, सुकुमार बुकशेटे,तातोबा जाधव, सचिन पाटील,सरपंच मनिषा पाटील, उपसरपंच विकास चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

    गावातील दलीत वस्ती रस्ता डांबरीकरण व गटर्स ९.५ लाख,रूकडी चोकाक रस्त्याचे पॅचवर्क ५ लाख, पंचवीस /पंधराअंतर्गत चॅलेंज ग्रुप गल्ली  गटर्स ५ लाख, मराठी शाळा छ्त दुरुस्ती ४ लाख, सार्वजनिक दर्गा तालीम मंडळ प्लेव्हींग ब्लॉक २ लाख आदीसाठी २५ लाख रुपयांची विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, सुकुमार पाटील, लता पाटील, अर्चना हलसवडे, विजय ननवरे, सुवर्णा सुतार, स्मिता सरदार, योगेश चोकाकर, कल्पना जाधव, मनिषा कुंभार, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

   फोटो

मौजे चोकाक येथे विकास कामांचा शुभारंभ करते वेळी जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, मेहरनिगा जमादार, सरपंच मनिषा पाटील व इतर मान्यवर

Thursday, 24 May 2018

व्हायरल इन्फेक्शन पासून बचावासाठी सेप्टीलीन उपयुक्त

सर्दी पडसे झाले कि डॉक्टर म्हणतात काही नाही किरकोळ व्हायरल इन्फेक्शन आहे. आणि अॅण्टी बायोटिक गोळ्या घेऊन आपण बरे होतो. पण मुळात व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणूंचा संसर्ग होण्यापासून स्वतःचा बचाव केला तर ?

होय आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की च्यवनप्राश च्या नियमित सेवनाने आपण आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवून अशा संसर्गजन्य आजारापासून मुक्ती मिळते.

हिमालय कंपनी च्या सेप्टीलीन नावाच्या टॅबलेट मिळतात. याच्या सेवनाने आपण व्हायरल इन्फेक्शन वर मात करु शकतो. सर्दी शिंका घसा खोकला श्वसन नलिका संसर्ग आदी लक्षणावर उपयुक्त आहे.

स्वाइन फ्लू आणि आता निपाह असे नवनवीन व्हायरस येत आहेत तेव्हा आयुर्वेदीक औषधी घेऊन आपण आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवली तर अशा आजारांना आपण सहजासहजी बळी पडू शकत नाही.

अर्थात डॉक्टरांचा सल्ला मोलाचा !

ज्ञानराज पाटील ©

Friday, 18 May 2018

सेेैनिक टाकळी टेनिस  क्रिकेट स्पर्धेत  छत्रपती स्पोर्टस क्लब अजिंक्य

सैनिक टाकळी ( प्रतिनिधी) 

सेेैनिक टाकळी येथिल सोल्जर स्पोर्टस क्लब च्या वतीने  भरवणेत आलेल्या    भव्य  खुल्या फुलपिच टेनिस  क्रिकेट स्पर्धेत  छत्रपती स्पोर्टस क्लब ने अजिंक्य पद पटकावले.  या स्पर्धेमध्ये एकुण ३० संघानी सहभाग नोंदवला होता. उपांत्यपूर्व सामना बोलवाड टाकळी स्पोर्टस व आर . बॉईज रेंदाळ तसेच छत्रपती ग्रुप कोल्हापुर व मिरज स्पोर्टस यांच्या मध्ये झाले या मध्ये छत्रपती ग्रुप व आर बॉईज  यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत उपांत्य फेरी गाठली होती .


अंतिम सामन्यामध्ये   प्रथम फलंदाजी करताना आर बॉ ईज संघाने ५ षटकात केवळ २९ धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी संघापुढे  ठेवले होते .छत्रपती ग्रुपने ही धाव संख्या  ३ गड्याच्या मोबदल्यामध्ये सहज पार करत विरजवान चषक पटकावला. या सामन्यासाठी  शिवतेज पाटील व नारायण पाटील यांनी पंच म्हणुन काम पाहिले .  मालिकावीर  म्हणुन आर  बॉइजचे शरिफ .  सामनावीर  छत्रपतीं  ग्रुपचे मनोज तर   सर्वोत्तम गोलंदाज मिरज स्पोर्टस चे सोहेल यांची निवड झाली. विजयी संघानां उपसरपंच रणजीत पाटील  मेघराज पाटील . संजय पाटील .सुधीर पाटील महेश पाटील श्रीधर भोसले।आनंदराव पाटील . सुनील कोष्टी . रविकांत पाटील. भरत जाधव  बजरंग पाटील. सचिन पाटील. या   मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले . 

Thursday, 17 May 2018

सिद्धनेर्ली परिसराला अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले

सिद्धनेर्ली  (वार्ताहर) परिसराला अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले .चार वाजल्याच्या  सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह दुव्हाधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने लोकांची भाबेरी उढली. सिद्धीनेर्ली परिसरात झालेल्या या पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले असून त्याच बरोबर शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी घातलेल्या व्हळ्याचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे .शेतामध्ये असणाऱ्या अनेक आंब्याच्या झाडांचे काही प्रमाणवर नुकसान झालेले असून सोसाट्याचा वाऱ्याने परिसरातील अनेक झाडेही मोडून पडली आहेत.जोरदार पावसाच्या सरीबरोबर वाराही आल्याने रस्त्यावरील मोठ्या वाहनांनाही थोडा वेळ थांबून पुढे जाण्याशिवाय पर्याय नसल्याने ठीक ठिकाणी अनेक वाहने थाम्बलेली होती त्याच बरोबर मोटर सायकल चालकांचीही चांगलीच गोची निर्माण झाली होती .

Wednesday, 16 May 2018

द्या आम्हाला साथ आणि करूया भ्रष्टाचारावर मात पोलीस उप अधिक्षक गिरीश गोडे



शिरोली / प्रतिनिधी दि. १६/५/१८

   अवधूत मुसळे


     समाजातील सर्व घटकांनी भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी भ्रष्टाचार विरोधी कारवाई करण्यासाठी निर्भय व सज्ञान बनले पाहिजे. भ्रष्टाचारी वृत्तीस धडा शिकविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून लोकसेवकांची तक्रार देऊन भ्रष्टाचार संपविण्यासाठी व भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी साध द्या असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक गिरीश गोडे यांनी केले. ते मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने भ्रष्टाचारावर मात करण्याच्या प्रबोधन शिबीरा प्रसंगी बोलत होते.

     उप अधिक्षक गोडे पुढे म्हणाले की, कोणताही लोकसेवक आपणांकडे शासकिय कामासाठी पैसे मागत असेल तर त्याच्या विरूद्ध कारवाई करता येते. त्यासाठी स्वतः निर्भय बनून गोपनियता बाळगावी. प्रथमतः लाचलुचपत विभागाशी  संपर्क साधून स्वतः हस्तक्षरात तक्रार अर्ज त्या लोकसेवकाच्या विरोधात दयावा लागतो. तदनंतर विभागाकडून पंच समवेत त्या लोकसेवकाची भेट घेऊन त्याने पैशाची मागणी केली आहे ही सत्यता पंचच्या साक्षीवरून तसेच त्यांच्या कडील व्हाईस रेकॉर्ड वरून आवाज ऐकून आदी बाबी पडताळून पुढील कारवाईचा सापळा रचला जातो. त्याआगोदर तक्रारदाराकडे मागितलेली रक्कम विभागाकडे पावडर लावणे व त्या नोटांचा नंबर नोंद करण्यासाठी दयावी लागते.

        त्या लोकसेवकाला लाचेची रक्कम स्विकारतांना पकडणेसाठी दिवस व वेळ ठरली जाते. त्यांच्या सोबत पंच ही पाठविले जातात. त्यावेळी आजूबाजूला लाचलुचपत विभागाचे अधिकारी दबा धरून असतात. ज्यावेळी तक्रारदार लोकसेवकास रक्कम देतो. त्यानंतर तात्काळ बाहेर येऊन तो अधिकाऱ्यांना इशारा करताच त्या लोकसेवकास पकडले जाते. सर्व घटनेचा घटनास्थळी शासकिय नोकर पंचाच्या समोर पंचनामा करून त्याच्यावर गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर करतात. न्यायालयातून त्यांस जामिन मिळून त्याची अटकेतून सुटका होते. मात्र त्याच्या विभागास लाचलूचपत विभागाचे कारवाईचे पत्र गेल्यानंतर त्या विभागाकडून तात्काळ त्या लोकसेवकाचे तीन ते सहा महिन्यासाठी निलंबन होते.

      तक्रारदाराची ती रक्कम न्यायालयात हजर करावी लागत असल्याने शासनाकडून त्या रक्कमेचा चेक मिळतो. दोषारोप न्यायालयात पंचनामा करून दाखल केले जाते.तक्रारदाराने आपला जबाब नोंदवितांना विवेक बुद्धीने नोंदवावा तोच न्यायालयात निर्भयतेने मांडावा त्यामुळे त्या लाची लोकसेवकास १० वर्षापर्यंत तुरूंगवास होऊ शकतो.पुढील कार्यवाहीसाठी  तक्रारदार निर्भय बनने महत्त्वाचे असते. आजपर्यंतच्या कारवाईमध्ये पंचवीस टक्के शिक्षा झाल्या आहेत. जे निर्दोष सुटले आहेत त्यामध्ये तक्रारदारांच्या जबाब बदल व न्यायालयातील बोलण्यामध्ये विसंगती म्हणून तक्रारदार निर्भय होणे महत्त्वाचे असते.

     खाजगी व्यक्ति काम करतो म्हणून पैसे मागून फसवणूक करीत असेल तर त्याच्यावरही कार्यवाही करता येते. आपली आर्थिक फसवणूक व लुबाडणूक होऊ नये म्हणून सतर्क राहून लाचलुचपत विभागाशी  संपर्क साधा असे आवाहन केले.

     या प्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच किरण चौगुले, पोलीस पाटील अमीर हजारी, तंटामुक्ती अध्यक्ष राजू थोरवत, प्रताप रजपूत, अवधूत मुसळे, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, प्रकाश कांबरे, महेश कांबरे, संदिप उलस्वार, पोलीस पाटील महादेव सुतार  (टोप), धनंजय शिंदे ( भुये ) अंजली पाटील  (हालोंडी) ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अवधूत मुसळे यांनी मानले.

     फोटो कॅप्शन

मौजे वडगांव ग्रामपंचायतीमध्ये लाचलुचपत कारवाई संदर्भात मार्गदर्शन करतांना पोलीस उप अधिक्षक गिरीश गोडे व इतर मान्यवर

रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांची कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीला भेट

सिद्धीनेर्ली (वार्ताहर)

रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते आणि "दुष्काळ आवडे सर्वांना "या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार  पी साईनाथ हे कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे  कॉम्रेड संतराम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व कॉम्रेड गणपती ईश्वरा पाटील वाढदिवस  गौरव समिती यांच्या निमंत्रण वरून येथे आले होते.

   भारतातील सद्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर स्वतंत्र डाँक्युमेंटरी करण्याचे त्यांचे काम सुरू असून श्री पाटील यांचीही त्यासाठी त्यांनी माहीती घेतली .  त्यांच्याशी पाणी प्रश्न,स्वातंत्र्य चळवळ,सिमा लढा यासह डाव्याचळवळीतील कांही आठवणी यासह विवीध विषयावर  चर्चा केली .

         ते पुढे म्हणाले सारकारी विद्यापीठे व बियाणे कंपनीच्या सल्ल्यावर शेतक-यांनी अवलंबून राहू नये.त्यापेक्षा स्वतःचे अभ्यास गट तयार करून शेतीतील प्रयोग व अनुभव यांची सांगड घालून स्वतः च तज्ञ व्हावे.व गावोगावी सामुदायिक  संशोधन केंद्रे उभारावीत.त्यामुळे  निसर्गासह सरकारी कोपामुळे शेतीतील होणारे नुकसान शेतकरी टाळू शकतील .

असमान पाणी वाटप व्यवस्थेवर आसुड ओढताना ते म्हणाले भारत जगातील एकमेव देश आहे जिथे नद्यांचे एकीकडे राष्ट्रीयीकरण तर दुसरीकडे पाण्याचे मात्र विविध अभ्यास प्रयोगांच्या गोंडस नावाखाली खाजगीकरण केले जाते.ग्रामीण भारतातील शेतक-यांच्या हक्काच्या पाण्यावर सरकारी वरदहस्ताने शहरी भारतीय अतिक्रमण करत आहेत .एकीकडे टंचाई ग्रस्त भागात कामाचा खोळंबा करून माता भगीनी पन्नास पैशापासून एक रूपये दराने पाणी पिण्यासाठी विकत घेतात .तर त्याच भागात बियरच्या कारखान्यांसाठी  एक पैसा प्रती लिटर दराने तीस वर्षाच्या कराराने सरकार पाणी पुरवित आहे .शिवाय औद्योगिक वापरासाठीही पिण्याच्या व शेतीसाठीच्या वापरातीलच पाणी वळवले जाते.ही विषमता थांबवण्यासाठी आता शेतक-यांनीच पाणीदार होऊन पाणी वाचविले पाहीजे.अन्यथा पाण्यासाठी ग्रामीण भारत व शहरी भारत यांच्यात संघर्ष अटळ आहे.

यावेळी श्री पाटील यांचा साईनाथ यांनी सत्कार केला.तर श्री साईनाथ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नीता पाटील यांनी तर पत्रकार संघाच्या वतीने सकाळचे बातमीदार पंडित कोईगडे,चंद्रकांत निकम, यांच्यासह  विजय कुरणे,शिवाजी पाटील ,विजय पाटील ,रवींद्र  पाटील आदींनी  पुस्तक भेट देऊन केला.यावेळी अजीत पाटील शेखर सावंत यशवंत पाटील सुनिल मगदूम विलास पोवार किसन मेटील  सदाशिव निकम शिवाजी मगदूम सुवर्णा तळेकर एम बी पाटील आनंदराव पाटील  आदी उपस्थित होते.चौकट हतबल मिडीया हताश माणसं लाखोंच्या संख्येने पोटतिडकेने शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात मोर्चे काढतात .शासनकर्ते त्यांची थट्टा हे खरे शेतकरी नाहीत अशी करतात .तर पी टी आय सारखे क्राईमचा प्रतिनिधी या मोर्चाच्या वार्तांकणासाठी पाठवितात .आता शेतीतील गंधही नसणारा काय लिहीणार?असा प्रश्न  उपस्थित करून जनताही निमुटपणे हे सारे पाहते.असे सांगत साईनाथ यांनी मिडीया हताश असून जनता हतबल झाली असल्याचे जळजळीत सत्य यावेळी मार्मिक शब्दांत मांडले .




छायाचित्र- सिद्धनेर्ली येथे सामाजीक कार्यकर्ते काँ गणपती पाटील यांचा वयाची शंभरी पार केल्या बद्दल सत्कार करताना ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ

सिद्धनेर्ली पत्रकार संघाच्यामार्फत पी साईनाथ यांचा सत्कार 




सिद्धनेर्ली (वार्ताहर) 

रमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते आणि "दुष्काळ आवडे सर्वांना "या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार  पी साईनाथ हे कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे  कॉम्रेड संतराम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व कॉम्रेड गणपती ईश्वरा पाटील वाढदिवस  गौरव समिती यांच्या निमंत्रण वरून येथे आले होते.

   भारतातील सद्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर स्वतंत्र डाँक्युमेंटरी करण्याचे त्यांचे काम सुरू असून श्री पाटील यांचीही माहिती ते घेण्यासाठी आलेले असताना सिद्धीनेर्ली पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धीनेर्ली पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय कुरणे ,चंद्रकांत निकम,शिवाजी पाटील,पंडित कोईगडे, विजय पाटील रवींद्र पाटील आदी पत्रकार यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते 


फोटो-सिद्धनेर्ली येथिल पत्रकार संघाच्या वतीने पी साईनाथ यांचा सत्कार करताना पंडित कोईगडे,विजय पाटील ,रवींद्र पाटील,शिवाजी पाटील,विजय कुरणे ,चंद्रकांत निकम आदी

Tuesday, 15 May 2018

अन्याय कारक बदल्यांचा विरोधात कोर्टात जाणार - शिक्षक समन्वय समिती

कोल्हापूर प्रतिनिधी 

  मिलींद बारवडे


   जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेतील त्रुटी विरूद्ध संवर्ग ५ मधील अन्यायग्रस्त शिक्षकांच्यासाठी शिक्षक समन्वय समिती कोर्टात जाण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. नागनाथ मंदिरात बदली विरूद्ध धोरणात्मक निर्णयासाठी आयोजित शिक्षक समन्क्य समितीच्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला.

     राजाराम वरुटे व प्रसाद पाटील या दोन्ही राज्याध्यक्षांचे कार्य प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच  प्रसारमाध्यमांनीही विविध समस्या परखडपणे मांडत शिक्षकांना एकवटन्याचे कार्य नेटाने केले आहे. शिक्षक नेते मित्रत्व म्हणून कार्य करीत असून प्राथमिक शिक्षकाचे अधिकार शासन काढून घेत आहे त्यासाठी  संघटीत लढा देणे आवश्यक आहे. असे मत कोल्हापूर शिक्षक संघ संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले यांनी व्यक्त केले. ते समन्वय समितीच्या अन्यायकारक बदली संदर्भात आयोजित सभाप्रसंगी बोलत होते.

   शिक्षक नेते मोहन भोसले पुढे म्हणाले की अन्याय सहन करणे पाप आहे. सर्वांनीच बदली संदर्भात धाडसी निर्णय घेऊन कार्य केले पाहीजे. त्यासाठी नेत्यांनी शिक्षकांनी सर्व सनदशिर मार्गांचा अवलंब केला पाहिजे. शिक्षकांनी त्रुटी समजून घेऊन त्यावर उपचारात्मक मार्ग शोधले पाहिजेत. अन्यायाच्या  विरूद्ध लढने आमचे कार्य असून वेळोवेळी जि.प. पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे.अन्याय होणाऱ्या बाजूस आम्ही सतत आहोत. म्हणून  महाराष्ट्रात प्रथम समन्वय समिती कोल्हापूरात स्थापन करून विविध समस्या सोडविण्यात यशस्वी झालो आहोत. नेत्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हीच या चळवळीत अग्रभागी होऊन समस्यांचे निराकरण करण्यास क्रीयाशिल राहावे.प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक निवडून वकीलांमार्फत शासनाशी वैचारिक व कागदोपत्री चर्चा करणे महत्त्वाचे बनले आहे.

    समन्वय समिती मार्गदर्शक राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी शासनाने बदली संदर्भात कशी अन्यायकारक खेळी केली आहे त विविध उदाहरणे देऊन  स्पष्ट केले. तसेच राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्हयात मोठेे मोर्चे काढून प्रशासनास जाग आणण्याचा मनोदय व्यक्त केला.

         समन्वय समिती मार्गदर्शक राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले की, बहुजन शिक्षकांची वाट लावण्याचे कार्य शासनाच्या या अन्यायकारक बदली धोरणांने केले आहे.बदली संदर्भातील संवर्ग १ते ४मधील त्रुटी कोणकोणत्या आहेत त्या स्पष्ट करून लढा न देता हरण्यापेक्षा लढा देऊन हरणे या तत्वाचा सर्वांनी स्विकार करून न्यायालयीन लढयासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. न्यायालयीन लढा निश्चित जिंकणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला.

   समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील म्हणाले की, शासनाच्या बदली धोरणातील विविध संवर्गात खुप मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. विस्थापित शिक्षकांच्या वरील अन्याय दूर करणेसाठी व या त्रुटी दूर करण्यासाठी बदली धोरणा विरोधात न्यायालयीन लढया शिवाय पर्याय नाही. त्यामुळे समन्वय समितीच्या वतीने बदली विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

     या प्रसंगी जिल्ह्यातून विविध संघटनांचे प्रमुख शिक्षक व शिक्षिका पदाधिकारी उपस्थित होते. अर्जुन पाटील, गौतम वर्धन, सुधाकर निर्मळे,सतीश वरगे, सुनिल पाटील, संजय कुर्डुकर, हरिदास वर्णे, एस.के. पाटील, चंद्रकांत पाटील, कल्पना जाधव, स्मिता डिग्रजे,  रघुनाथ खोत, प्रशांत पोतदार, शरद केनवडे, संदीप माने, संदीप मगदूम धनाजी पाटील, राजेंद्र पाटील आदी प्रमुख मान्यवरांसह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

       फोटो 

शिक्षक समन्वय समितीमध्ये मार्गदर्शन करतांना शिक्षक नेते मोहन भोसले , राजाराम वरुटे, प्रसाद पाटील,रविकुमार पाटील व इतर मान्यवर

हेरले येथील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचा विजेता शाहू सडोली 

हातकणंगले / प्रतिनिधी दि. १४/५/१८

    सलीम खतीब


   शाहू क्रीडा मंडळ सडोली संघाने तरूण भारत सांगली संघावर १९ गुणांनी मात करत प्रथम क्रमांक पटकाविला.तरूण भारत सांगली संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.हेरले क्रीडा मंडळाच्या निमंत्रित मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचा थरार अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

       हेरले क्रीडा मंडळांने अनेक क्रीडा रत्न तयार केले. त्या रत्नांनी विविध शासकिय विभागातून सेवा बजावतही कब्बड्डी खेळास उंच्ची व दर्जा मिळवून देऊन मंडळाचा लौकिक वाढविला आहे. या गावची मातीच कब्बड्डी खेळासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. असे मत माजी जि.प. उपाध्यक्ष धैर्यशिल माने यांनी व्यक्त केले. ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित मॅटवरील निमंत्रित कब्बड्डी स्पर्धेच्या बक्षिस समारंभ प्रसंगी बोलत होते.

      माजी सभापती राजेश पाटील म्हणाले की, गेली सहा महिने गावांमध्ये सार्वजनिक लोकोत्सव संपन्न होऊ शकला नाही. मात्र हेरले क्रीडा मंडळाच्या कब्बड्डी स्पर्धेने गाव एकवटला आहे.अशाच प्रकारे निवडणूकी पुरताच विरोध मानत तदनंतर सदैव गट तट विसरून अशी एकता अखंड गावांत प्रस्थापित राहावी. हे कार्य या मंडळाने केले आहे. खरोखरच हा उपक्रम स्तूत्य आहे.

  

उप उपांत्य फेरीचे सामने निकाल- ओमसाई तळसंदे संघाने किणी विद्यार्थी मंडळ संघावर ११ गुणांनी, तरूण भारत सांगलीने जय शिवराय हेरलेवर ६ गुणांनी, शाहू सडोलीने जय हनुमान बाचणीवर ५ गुणांनी, सम्राट सांगलीने जयकिसान वडणगेवर ४ गुणांनी ,शिवशाहू सडोलीने ओमसाई तळसंदेवर १५ गुणांनी, तरुण भारत सांगलीने नवभारत शिरोलीवर१२ गुणांनी, शाहू सडोलीने छावा शिरोलीवर १० गुणांनी, हेरले क्रीडा मंडळाने सम्राट सांगलीवर २ गुणांनी विजय मिळविले.

      उपांत्य फेरी सामने निकाल

तरुण भारत सांगली संघाने अटीतटीच्या सामन्यात शिवशाहू सडोलीवर १ गुणांनी विजय मिळविला. शाहू सडोलीने हेरले क्रीडा मंडळावर ६ गुणांनी विजय मिळविला. दोन्ही सामने शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीचे झाले.

 

   अंतिम सामन्यात शाहू सडोलीने एकतर्फी ४२ गुण मिळविले. तरूण भारत सांगलीने २३ गुण प्राप्त केले. शाहू सडोली संघाने प्रतिस्पर्धी संघास १९ गुणांनी सहज नमवून अजिंक्य ठरला. शाहू सडोली प्रथम क्रमांक रोख २१ हजार व चषक, तरुण भारत द्वितिय क्रमांक रोख १५ हजार व चषक, तृतीय क्रमांक हेरले क्रीडा मंडळा५ हजार व चषक, चतुर्थ क्रमांक शिवशाहू सडोलीस ५ हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कामधेनू समुह प्रमुख आदगोंडा पाटील, अभियांता धनाजी वड्ड , आण्णासो गावडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

     उत्कृष्ट खेळाडू हेरले क्रीडा मंडळाचा राहुल कोळेकर, उत्कृष्ट चढाईपट्टू शाहु सडोलीचा सागर गजबर, उत्कृष्ट पक्कड तरुण भारत सांगलीचा अरूण नराले आदी खेळाडू वैयक्तिक बक्षिसास पात्र ठरले त्यांना मनगटी घडयाळ, एअर कुलर देऊन सन्मानित करण्यात आले.पंचप्रमुख कुबेर पाटील, मनोज मगदूम, संतोष घाडगे, अमर नवाळे, अभिजीत पाटणे, उत्तम नलवडे, कमरूद्दीन देसाई, सागर लंबे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.

      या प्रसंगी आण्णासो गावडे, सपोनि अस्लम खतीब, अजित पाटील, गणी देसाई,विनोद वड्ड, प्रकाश खुपिरे,उत्तम माळी, भरत कराळे, बाबासाहेब कोळेकर, केशव मिरजे, जयकुमार करके, नारायण कटकोळे, प्रा. भाऊसाहेब वड्ड, अजरूद्दीन खतीब, बाबू बारगीर, सचिन भोसले, सुरज कोळेकर, प्रकाश हक्के, संजय खाबडे कर्मचारी आदी मान्यवरासह क्रीडा शौकिन मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

   फोटो 

हेरले येथील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचा विजेता शाहू सडोली संघास बक्षिस व चषक प्रदान करतांना मान्यवर

Friday, 11 May 2018

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचे आम.डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते उद्घाटन

हातकणंगले/ प्रतिनिधी 

      सलीम खतीब


    हेरले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली आहे. या मंडळाचा सर्वसामान्य खेळाडू अस्लम खतीब पोलीस अधिकारी पदी पोहचले यातून मंडळाचा लौकीक दिसून येतो. असे मत आम.डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले.ते हेरले  (ता.हातकणंगले) येथे हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित प्रो कब्बड्डी धर्तीवर मॅटवरील निमंत्रित कब्बड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रास्ताविक गणी देसाई यांनी केले.

     आम.डॉ. मिणचेकर पुढे म्हणाले की,१९७६ साली या मंडळाची स्थापना झाली असून गेली ४२ वर्षे कब्बड्डीची परंपरा जपली आहे. तरूणाईस शरीर संपदा देण्याचे कार्य मंडळाने केले आहे.अनेक खेळाडूं राष्ट्रीय, राज्यस्तरावर खेळल्यांना त्यांना  शासकिय नोकरीची संधीही प्राप्त झाली असल्याने मंडळाचे कार्य गौरवास्पद आहे.युवकांनी जास्तीत जास्त खेळास महत्त्व द्यावे व शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

 

   आम.डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते रोपास पाणी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते नवभारत शिरोली विरूध्द डायनॅमिक झ्चलकरंजी यांच्या पहिला सामन्याचे नाणेफेक उडवून सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ. पद्माराणी पाटील, शाहीर कुंतिनाथ करके यांनी मनोगते व्यक्त केले.पंचप्रमुख कुबेर पाटील, मनोज मगदूम, संतोष घाडगे, अमर नवाळे, अभिजीत पाटणे, उत्तम नलवडे, कमरूद्दीन देसाई, सागर लंबे आदी पंच म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील २५ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत.

      हेरले क्रीडा मंडळ विरूद्ध सह्याद्री कोल्हापूर सामना समान गुणावर सुटला. तरूण भारत सांगलीने शिवप्रेमी शिरोलीवर विजय मिळविला,छावा शिरोलीने जयशिवराय हेरलेवर विजय मिळविला, शिवशाहू सडोलीने भादोले क्रीडा मंडळावर विजय मिळविला, नवभारत शिरोलीने मावळा सडोलीवर विजय मिळविला, किणी विद्यार्थी मंडळाने डायनॅमिक इचलकरंजीवर विजय मिळविला. पहिल्या दिवशी सहा सामने अटीतटीचे झाले.

   या प्रसंगी शाहीर कुंतिनाथ करके, वेदांतिका माने. जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, सपोनि अस्लम खतीब, सुधाकर निर्मळे, राजू मोरे,उपसरपंच विजय भोसले, निलोफर खतीब, केशव मिरजे, कपिल भोसले, संदीप शेटे,राहूल शेटे, अमित पाटील, विनोद वड्ड, उत्तम माळी, भरत कराळे, बाबासाहेब कोळेकर, प्रकाश खुपिरे, रिजवाना पेंढारी, प्रा. भाऊसाहेब वड्ड, सलीम खतीब,रणजित इनामदार, जयकुमार करके, नारायण कटकोळे आदी मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

     फोटो 

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी संघासोबत आम.डॉ. सुजित मिणचेकर, शाहीर कुंतिनाथ करके,वेदांतिका माने, जि.प. सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व इतर मान्यवर

Thursday, 10 May 2018

शिक्षण समिती जिल्हा परिषद कोल्हापूरचे जिल्हा परिषद शाळांचा विकास व उन्नती होण्यासाठी सभा अध्यक्ष शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे यांनी भरघोस निधीचे महत्त्वपूर्ण घेतले निर्णय.

कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. १०/५/१८

       मिलींद बारवडे

    

     डीजीटल क्लासरुम अंतर्गत जि.प.शालांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे ४९ लाख रुपये,

शंभर वर्षे पूर्ण करणार्या  ७५ शाळांना जे.पी.नाईक जन्मशताब्दिपूर्ती निमित्त ५लाख रुपयांची भेट,

शालांना क्रीडा साहित्य प्राथमिक सुविधा पुरविणे  २५ लाख रुपये, जि.प.शालेय विध्यार्थी अपघात मदत योजना,3 महिन्यात प्रस्ताव येणार्यास जास्तीत जास्त १०हजार रुपये बजेट ७लाख,जि.प.शाळांंना विद्न्यान साहित्य प्राथमिक सुविधा प्रयोगशालांना पुरविणे तथा  प्रयोगशालां उभारणे 20 लाख रुपये

शिक्षकांचे तेचतेच लेखी काम कमी करणेसाठी केंद्रप्रमुखांना १ प्रमाणे १७१लँपटाँप वाटप ,शालांना  ६९ संगणक वाटप, शाळांना १६५० संगणक साँफ्टकाँपीसाठी पेनड्राईव्ह  वाटप, ई. माँनेटरिंग संगणक साँफ्टवेअर ५ लाख,

    राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशवंत खेळाडूस 10 ते 20 हजार मदत 2 लाख बजेट,जि.प. ४ थी व ७ वी विद्यार्थ्यांसाठी प्रद्न्याशोध परीक्षा व निवड पात्रांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे व सर्टीफिकेट,जि.प. ५ वी ६ वी ७ वी व ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी विद्न्यान परीक्षा व निवड पात्रांना ट्रँकसूटसह विमानाने ईस्त्रो सफर गुणवंत शिक्षकांनाही संधी,छत्रपती शाहू निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर शालेत जि.प. विद्यार्थांना निवड चाचणीतून प्रवेश. मोफत ड्रेस भोजन निवासासह राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण,उदगाव शालेस ११ लाख रुपयांसह जिल्ह्यातील गरजवंत शालांना करोडो रुपयांच्या वर्गखोल्या मंजूरी,शिक्षण अभ्यासासाठी 3 लाख रुपये,छत्रपती शाहू अध्ययन सम्रुद्धि कार्यक्रम इंग्रजी Dmlt 3 लाख

  २o१८-१९ साठी प्राथमिक शिक्षणासाठी  २२३८९ लाख रुपयांची शिक्षण समितीत मंजूरी स्थायी व जनरल च्या मंजूरीसाठी ठेवली आहे. 

   इंग्लिश मेडीअम शालांतून गतवर्षी राबवलेल्या कार्यक्रमामुले १५००वर मुले जिल्हा परिषद शालांत प्रवेश घेतले आहेत यावर्षी ही गती वाढवण्याच्या द्रुष्टिने खास लक्ष शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगेंनी घातले आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले ,भगवान पाटील,रसिका पाटील विनय पाटील वंदना जाधव,स्मिता शेंडूरे,अनिता चौगले ,प्रियांका पाटील,मनिषा कुरणे ,रविकुमार पाटील ,सुनील पाटील,प्रसाद पाटील ,सर्व गटशिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी दिली.

गोकुळ हॉटेल ते गवत मंडई रस्ता ट्रॅफिक जाम ! कोल्हापूरात वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा


कोल्हापूर प्रतिनिधी - रुपाली कागलकर

कोल्हापूर शहरातील गोकुळ हॉटेल ते गवत मंडई या मुख्य रस्त्यावरून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने गुरुवारी 10 मे रोजी वाहनधारकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मुख्य रस्त्यावर तासनतास खोळंबावे लागल्याने मोठी गैरसोय झाली होती. वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील वाहतुकीची शिस्त न लावली गेल्याने शहरात वाहतुकीचे तीनतेरा झाले आहेत. शाहूपुरी व्यापार पेठ व होलसेल दुकाने असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या वाहनांसह लहान वाहनांचीही मोठी वर्दळ असते. परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून ठिकठिकाणी अवजड वाहने उभी केली जातात. तसेच हातगाड्या, बेशिस्त पार्किंगमुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत असतात.


या रस्त्यावरूनच वाहतूक कोंडी या ठिकाणी नित्याचीच झाली आहे. या ठिकाणावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखी आहे. वाहतूक शाखेने जरी या ठिकाणी एक कर्मचारी कायमस्वरुपी उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. 

Wednesday, 9 May 2018

सिद्धनेर्ली येथे मुश्रीफ व घाटगेंच्या एकत्र सत्काराने तालुक्यात चर्चेला उधाण


फोटो- सिद्धनेर्ली येथील कार्यक्रम दरम्यान हसन मुश्रीफ व संजय घाटगे यांचा एकत्र सत्कार करताना ग्रामस्थ

सिद्धनेर्ली (वार्ताहर) - रविंद्र पाटील 

 येथे लोकवर्गणी मधून ग्रामस्थांनी बांधलेल्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा अध्यात्मिक व भक्ती मय वातावरणात संपन्न झाला   यावेळी .शुक्रवारी ता ४  या मंदिराचा वास्तू शांती सोहळा झाला.शनिवारी ता ५  आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डाँ श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता  मुर्ती प्राण प्रतिष्ठापना करणयात आली .त्याआधी सकाळी मुर्तींची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली .सायंकाळी सात वाजता रामचंद्र भिवासे यांचे कीर्तन  ठेवन्यात आले होते तर रविवारी ता ६  आडीच्या दत्त देवस्थानचे प पू राजीवजी महाराज यांच्या हस्ते दूपारी बारा वाजता कलाशारोहन सोहळा झाला.त्यानंतर महाप्रसाद वाटप ही करणयात आले  .दूपारी बारा ते तीन या वेळेत ठिकपुर्ली येथील स्वर माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम तर सांयकाळी सात वाजता कृष्णानंद शास्त्री यांचे कीर्तनाचे आयोजन ही करण्यात आले  होते चाळीस लाखांहून अधिक रक्कम खर्चून हे मंदिर उभारले आहे .

      या कार्यक्रमाला कागल तालुक्यातील अनेक दिगग्ज नेत्यांनी हजेरी लावली. 

*सिद्धनेर्ली येथील लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना  व कलशारोहण कार्यक्रम दरम्यान कागल तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्र आल्यानंतर त्यांच्या एकत्र सत्कार सोहळ्याचा एक फोटो व्हायरल झाल्याने कागल तालुक्यात अनेक उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे. 


Tuesday, 8 May 2018

मौजे वडगांव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 


शिरोली/ प्रतिनिधी : दि. ८/५/१८

      अवधूत मुसळे

 मौजे वडगांव( ता. हातकणंगले) येथे शिरोली जि.प. मतदार संघ अंतर्गत जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी विविध विकास कामांचा ३९ लाख रुपयांच्या निधीचा शुभारंभ पं.स. सदस्य उत्तम सावंत यांच्या समवेत केला. 

    मौजे वडगांवमध्ये विरोधी पक्षनेते अविनाश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक यांच्या फंडातून प्रभाग क्रं.४ नवीन वसाहत येथे गल्ली क्रं. ०२ अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, प्रभाग क्रं.१ दलित वस्ती सुधारण योजने अंतर्गत चर्मकार समाज गल्ली खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, प्रभाग क्रं.२ देखभाल दुरूस्ती अंतर्गत गावातील पाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे ७ लाख, प्रभाग क्रं.३ जनसुविधा अतंर्गत सार्वजनिक स्मशानभूमी सुधारणा करणे ५ लाख अशी २२ लाखांची विकास निधीतून कामांची  सुरूवात झाली आहे.

   तसेच इजिमा क्रं.१९२ हेरले, मौजे वडगांव , तासगांव रस्ता दुरुस्ती करणे १७ लाखासह असा जवळपास ३९ लाख निधीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सरपंच काशिनाथ कांबळे, भाजपा तालूका उपाध्यक्ष विरोधी पक्ष नेता अविनाश पाटील, आनंदा थोरवत, ग्रां.पं सदस्य,अवधूत मुसळे, सुभाष अकीवाटे, स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे, ग्रां. पं. सदस्या सुनिता मगदूम, सरिता यादव, सरताज बारगीर, माधुरी सावंत, मायावती तराळ, अश्विनी लोंढे,  माजी सरपंच यासीन मुलाणी, चेअरमन अॅड.विजय चौगुले, मोहन शेटे, माजी चेअरमन अमीरहमजा हजारी, डॉ. अमीर हजारी, रंगराव कांबरे, महावीर शेटे,बाबगोंडा पाटील, मधुकर अकिवाटे,उपस्थित होते, स्वागत अविनाश पाटील यांनी तर आभार भाजपा शाखाप्रमुख प्रदिप लोहार यांनी मानले.

       फोटो कॅप्शन

मौजे वडगांव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करतांना जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक, पं.स. सदस्य उत्तम सावंत, अविनाश पाटील आदीसह अन्य मान्यवर.

८ मे, १७५८ मधे मराठ्यांनी पेशावर (पाकिस्तान) येथे भगवा फडकाविला होता, अपरिचित इतिहास जाणून घ्या व शेअर करा


आज ज्याला पाकिस्तान म्हणतात त्यावर ही फडकाविला होता मराठा साम्राज्याचा भगवा. हा संदर्भ विकिपीडिया मधून घेतला आहे. पेशावरच्या (मूळ नाव पुरुषपूर) युद्धामध्ये आजपासून साडे तीनशे वर्षे पूर्वी ८ मे, १७५८ मधे मराठ्यांनी क्रुर अफगाण व पठाण सेनेचा सडकून पराभव करून प्रत्यक्ष पेशावर वरती भगवा फडकाविला होता. काय हा इतिहास आपण कधी एकला आहे का  ?

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ही अभिमानाची बाब आहे. रघुनाथराव मल्हारराव होळकर आणि तुकोजी होळकर यांनी तैमुरशाह दुर्राणी याचा धुव्वा उडविला होता आणि मराठा साम्राज्याचे निशाण भगवा ध्वज फडकाविला होता.

विकिपीडिया वरुन साभार 

संकलन - ज्ञानराज पाटील 

Monday, 7 May 2018

हेरले येथे प्रो कब्बड्डी स्पर्धेच्या धर्तीवर मॅटवरील स्पर्धांचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी दि. ७/५/१८


  हातकणंगले तालूक्यातील हेरले क्रीडा मंडळ यांच्या वतीने ७० किलो वजनी गटातील मॅटवरील निमंत्रित कब्बड्डी स्पर्धा ११ ते १३ मे या दरम्यान आयोजित केल्या आहेत. अशी माहिती संयोजक राष्ट्रीय खेळाडू सपोनि अस्लम खतीब यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

      कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशन मान्यतेने  आयोजित केली आहे. प्रथम क्रमांकास रोख रू.२१००० व चषक, द्वितीय क्रमांकास रोख रू. १५००० व चषक, तृतीय क्रमांकास १०००० व चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड, अष्टपेलू खेळाडू, मॅन ऑफ द डे अशा वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक भेट वस्तू दिल्या जाणार आहेत.

       स्पर्धा खाटीक तलाव येथे होणार असून प्रवेश फी ५०१ रू.आहे. उद्घाटन समारंभ दि. ११ मे रोजी ४ वाजता प्रो कब्बडी खेळाडू निलेश साळुंखे, काशिलिंग आडके, तुषार पाटील, श्रीकांत जाधव, यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद वड्ड, उत्तम माळी, जयकुमार करके, भरत कराळे यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाहनविमा हवाच !


मोटारीचा, वाहनाचा विमा हा अपरिहार्य आहे. मोटार, आतील प्रवासी, चालक तसेच मोटारीमुळे कोणाचे नुकसान झाले, तो जखमी झाला, वा त्याचा मृत्यू झाला, तर त्यासाठी विम्याची रक्कम विमा कंपनीतर्फे मिळू शकते. न्यायालयाने सुनावलेली सजा काहीवेळा भोगू शकाल पण एखाद्याच्या मृत्यूने झालेला आघात त्यामुळे भरून येणार नाही. मात्र काही प्रमाणात अशावेळी मोटारीचा विमा कामास येऊ शकतो. असा हा विमा नेमका काय प्रकारचा असतो ते पाहू. मोटारीच्या देखभालखर्चामधीलच हा एक वाटा आहे, त्याचप्रमाणे ती तुमची जबाबदारी आहे हे पक्के ध्यानात असूद्या.

मोटार वा वाहन मग ते चार चाकी असो वा दुचाकी, ट्रक असो वा बस; वाहन हे रस्त्यावर आणायचे झाले तर कायदेशीरदृष्टया काही अपरिहार्य वा सक्तीच्या बाबी पाळाव्याच लागतात. त्यांचे पालन करण्याने नुकसान नव्हे तर फायदाच असतो, ही बाब प्रत्येक वाहन मालक-चालकाने लक्षात ठेवायला हवी. मोटारींची आरटीओकडे नोंद असणे ही जशी कायद्याने सक्तीची बाब आहे, तसेच वाहन रस्त्यावर ज्या वेळी तुम्ही आणता तेव्हा त्याचा विमा उतरविण्यात आलाच पाहिजे, हीदेखील कायद्याने सक्तीची बाब आहे व ती नक्कीच तोटयाची नाही. त्या विमा पॉलिसीनुसार व कायद्यानुसार त्या कृतीचे पालन करण्याने नुकसान टाळता येते हे महत्त्वाचे.

वाहन प्रवासी असो वा मालवाहू, व्यावसायिक उपयोगाचे असो वा वैयक्तिक वापराचे, प्रत्येक वाहनाला विमा हा सक्तीचा आहे. त्यात तुमच्या वाहनाचे मूल्य किती, ते नवीन आहे का, त्याला किती वर्षे वापरून झाली आहेत, त्याच्या विम्यासाठी किती प्रीमियम भरला आहे, आदी बाबी ध्यानात घेऊन विमा किती ठरविला जातो, त्याचा प्रीमियम किती, त्यावर वाहनाच्या अपघाताबाबत होणार्या दाव्यात दिल्या जाणार्या नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली जाते. काहीशा सोप्या भाषेत सांगायचे तर, वाहनाला अपघात-दुर्घटनेमध्ये नुकसान झाल्यास वा माणसाला-माणसांना इजा झाल्यास वा प्राणहानी झाल्यास वा मालमत्तेचे नुकसान झाल्यास ते पैशामध्ये भरून देण्याचे वाहन विमा हे उपयुक्त साधन आहे.

वाहन विमा दोन प्रकारांमध्ये १) थर्ड पार्टी पॉलिसी (टी.पी.) विमा व २) पॅकेज पॉलिसी, ज्याला कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलिसी असेही म्हणतात. या दोन प्रकारांची प्राथमिक माहिती खालीलप्रमाणे-

थर्ड पार्टी पॉलिसी ज्या वाहनासाठी थर्ड पार्टी पॉलिसी विमा उतरविण्यात आलेला असेल, त्या वाहनाला अपघात झाल्यास त्या वाहनामुळे तिसर्या पक्षाचे म्हणजे अन्य एखाद्या वाहनाचे, मालमत्तेचे वा एखाद्या व्यक्तीचे काही नुकसान झाले असेल, तर या प्रकारच्या विम्यातून त्या तिसर्या पक्षाची झालेली हानी ही या विम्याद्वारे विमा कंपनीकडून देण्यात येते. अर्थात वाहनाचा विमा ज्या मूल्याने उतरविण्यात आला असेल, त्याच्या ठरलेल्या मापदंडानुसार ही हानी भरून दिली जाते. हा विमा उतरविलेल्या ज्या वाहनाद्वारे हा अपघात झाला असेल, त्या वाहनाचे मात्र काही नुकसान झाले असल्यास त्याची क्षतिपूर्ती विमा कंपनीकडून केली जात नाही. विम्याचा लाभ हा तिसर्या पक्षाला होतो, यासाठी या पॉलिसीला थर्ड पार्टी इन्शुरन्स असे म्हणतात.

या प्रकारातील पॉलिसीमध्ये समजा एखाद्या स्कूटरचा या प्रकारातील विमा उतरविण्यात आला असेल आणि त्या स्कूटरमुळे अपघात झाला व त्यामुळे तिसर्या इसमाच्या वाहनाचे वा मालमत्तेचे वा त्याच्या शरीराला इजा झाली अशा प्रकरणात त्या पक्षाला विमा कंपनीकडून नुकसानाची भरपाई दिली जाते. मात्र हा विमा ज्या मूल्याचा असेल त्या अनुषंगाने नुकसानभरपाई देण्याची एक रक्कम त्या मूल्यानुसार निश्चित करण्यात आलेली असेल त्या रकमेइतकीच ही नुकसानभरपाई दिली जाऊ शकते.

पॅकेज पॉलिसी वा कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलिसी या प्रकारच्या पॉलिसीमध्ये एखाद्या वाहनासाठी विमा उतरविल्यास त्यामध्ये विविध प्रकारचे फायदे अपघात झाल्यास होऊ शकतात. त्या वाहनामुळे अपघातामध्ये नुकसान झालेल्या दुसर्या वाहनाचे, मालमत्तेचे वा जखमी इसमासाठी वा त्यात मरण पावलेल्या तिसर्या व्यक्तीसाठी तसेच या विमा उतरविलेल्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई होऊ शकते. त्याचप्रमाणे वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाल्यासही त्यात काही तरतूद असते. त्याचप्रमाणे विमा उतरविलेल्या या वाहनात असलेल्या आसनक्षमतेनुसार त्यामध्ये बसलेल्या व अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांसाठीही विमा नुकसानभरपाई देऊ शकतो. समजा, मोटारीचा विमा उतरविला आहे, त्या मोटारीतील प्रवाशांची आसनक्षमता आरटीओने ठरवून दिलेल्या नियमानुसार ४ प्रवासी व एक चालक अशी पाचजणांची असेल; परंतु अपघाताच्या वेळी सहा-सातजण बसलेले असतील, तर त्या सहा-सात जणांना त्याचा फायदा होत नाही. नियमाप्रमाणे जितकी आसनक्षमता असेल तितक्याच प्रवाशांसाठी हा विमा फायदेशीर ठरतो. उर्वरित लोकांना विम्याचा लाभ दिला जात नाही. म्हणजेच पाचजणांची आसनक्षमता असलेल्या या वाहनातील पाचपेक्षा जास्त असणार्या प्रवाशांना विम्याचा लाभ या पॉलिसीद्वारे दिला जात नाही. बेकायदेशीर प्रवास करणार्या या प्रवाशांना जसा लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे वाहन अयोग्य कारणासाठी वापरले जात असेल, म्हणजे खासगी वाहन टुरिस्ट म्हणून वापरताना आढळले तरीही विम्याचा फायदा मिळत नाही.

या पॉलिसीमधील आणखी एक फायदा म्हणजे वाहनचालकासाठी आहे. अपघातात त्या वाहनचालकाचा मृत्यू झाल्यास त्याला पॉलिसीच्या विमा प्रीमियमनुसार जो फायदा मिळतो, त्यासाठी अधिक रक्कम वेगळी भरल्यास तो फायदाही वाढू शकतो.

सध्या खासगी विमा कंपन्याही मोठया प्रमाणात विमा क्षेत्रात उतरल्या आहेत. पॅकेज पॉलिसीमध्ये आरटीओ नियमानुसार वाहनाचे आयुष्य १५ वर्षे मानले गेले आहे. १५ वर्षांनंतर मात्र ही पॉलिसी त्या वाहनासाठी घेता येत नाही. त्यासाठी थर्ड पार्टी पॉलिसीच घ्यावी लागते. मात्र निमसरकारी विमा कंपन्या पूर्वीच्याच काही धोरणांवर चालू असल्याने १५ वर्षांची कालमर्यादा या वाहनांसाठी आहे, पण ती ओलांडली असेल व या १५ वर्षांच्या काळात या वाहनासाठी एकही अपघात दावा केला गेला नसेल तर या पॅकेज पॉलिसीचा लाभही निमसरकारी विमा कंपन्या देऊ शकतात. मात्र ते त्या त्या शाखेच्या व अधिकार्याच्या निर्णयावर अवलंबून असते. अर्थात हा अपवाद जरी असला तरी तो विमा उतरविण्याबाबत विमा कंपन्यांच्या त्या त्या वेळच्या निर्णय व धोरणावर अवलंबून असणारी बाब आहे. खासगी विमा कंपन्या मात्र अशा प्रकारे १५ वर्षे झालेल्या वाहनांना पॅकेज पॉलिसी देत नाहीत. अर्थात हा विमा म्हणजे एक प्रकारची कंपन्यांच्या दृष्टीने रिस्क फॅक्टर असतो हे नक्की. थोडक्यात काय, तर वाहन कोणतेही असो, दुचाकी, चारचाकी, ट्रक, अवजड वाहन, त्यांना विमा उतरवावाच लागतो. ते वैयक्तिक वापरासाठी असो वा खासगी वापरासाठी असो, त्यांना वाहन रस्त्यावर आणताना विमा उतरवावाच लागतो. तो न उतरविता वाहन रस्त्यावर आणून चालविणे हा गुन्हा तर आहेच, पण त्याहीपेक्षा तो वाहनमालक, चालक, पादचारी व अन्य वाहने यांच्यासाठीही गंभीर धोका ठरू शकतो, याची प्रत्येकाने जाणीव ठेवायला हवी.


इंटरनेट वेगवान यावेबसाईटच्या सौजन्याने 

जि.प. अध्यक्षा शौमीका महाडीक यांचा मौजे वडगांव येथे २२ लाखांच्या निधीच्या विकास कामांचा शुभारंभ


शिरोली / प्रतिनिधी : मौजे वडगांव( ता. हातकणंगले) येथे शिरोली जि.प. मतदार संघ अंतर्गत जि.प. अध्यक्षा शौमीका महाडीक यांनी जवळपास ३९ लाख रुपयांच्या निधीच्या कामाचा शुभारंभ पं.स. सदस्य उत्तम सावंत यांच्या समवेत केला. यामध्ये प्रभाग क्रं.४ नवीन वसाहत येथे गल्ली क्रं. ०२ अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, प्रभाग क्रं.१ दलित वस्ती सुधारण योजने अंतर्गत चर्मकार समाज गल्ली खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, प्रभाग क्रं.२ देखभाल दुरूस्ती अंतर्गत गावातील पाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे ७ लाख, प्रभाग क्रं.३ जनसुविधा अतंर्गत सार्वजनिक स्मशानभूमि सुधारणा करणे ५ लाख , तसेच इजिमा क्रं.१९२ हेरले, मौजे वडगांव , तासगांव रस्ता दुरुस्ती करणे १७ लाख असा जवळपास ३९ लाख निधीच्या कामाच शुभारंभ केला.यावेळी सरपंच,विरोधी पक्ष नेते ग्रां. पं.अविनाश पाटील, ग्रां.पं सदस्य,अवधूत मुसळे, सुभाष अकीवाटे,युवा नेते स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे, ग्रां. पं. सदस्या, सुनिता मगदूम, सरिता यादव, सरताज बारगीर, माधुरी सावंत, माया तराळ, अश्विनी लोंढे, तसेच माजी सरपंच यासीन मुलाणी, सतिश चौगुले,श्री दत्त वि.से. संस्था चेअरमन विजय चौगुले, मोहन शेटे, श्री कामधेनू दुध डेअरीचे माजी चेअरमन अमीरहमजा हजारी, डॉ. अमीर हजारी, रंगराव कांबरे, महावीर शेटे,बाबगोंडा पाटील, मधुकर अकिवाटे,उपस्थित होते, स्वागत अविनाश पाटील यांनी तर आभार भाजपा शाखाप्रमुख प्रदिप लोहार यांनी मानले

Sunday, 6 May 2018

सर्वगुण संपन्न छात्र सैनिक बनविण्याची गरज - कर्नल आर.के. तिम्मापूर


कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. ६/५/१८

     मिलींद बारवडे

  छात्र सैनिकांना अधिकाधिक सैन्यदलाचे ज्ञान देण्यासाठी पाच महाराष्ट्र बटालियनसह एनसीसी अधिकाऱ्यांनी क्रीयाशील राहणे गरजेचे आहे. तसेच भारत सरकारच्या स्वच्छता अभियानास मोठ्या प्रमाणात छात्र सैनिकांच्या मदतीने हातभार लावून ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक विभाग , पुतळे परिसरासह सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून स्वछ भारत बनविण्यास अग्रभागी राहूया. असे मत कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के.तिम्मापूर यांनी व्यक्त केले.

      ते पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने आयोजित सभा प्रसंगी बोलत होते. यावेळी कोल्हापूर, रत्नागिरी , सिंधुदूर्ग आदी जिह्यातील एनसीसी अधिकारी उपस्थित होते.

       कर्नल तिम्मापूर मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, ज्युनिअर सिनिअर डिवीजनच्या छात्र सैनिकांच्या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करून यामधून अधिकाधिक सैन्यदलाचे ज्ञान देण्यासाठी संयोजन केले जात आहे. तसेच विदयार्थ्यांची भरती प्रक्रिया, त्यांना संचलन प्रशिक्षण, एनसीसी थेरी माहिती, विविध कँम्पची माहिती, विविध खेळ, प्रजासत्ताक संचलन निवड प्रक्रिया, स्वच्छता अभियान, विविध प्रबोधनपर रॅली आदींची माहिती देऊन ही कार्ये उत्तम रित्या वर्षभर करून , विविध उपक्रम राबवून सर्वगुण संपन्न छात्र सैनिक बनविण्यासाठी सर्वांनीच उत्तम कार्य करण्याचे आवाहन केले.

   

  यावेळी अॅडम ऑफिसर मेजर विश्वनाथ कांबळीमठ, सुभेदार मेजर मानिक थोरात, सुभेदार शिवाजी सुपनेकर, हरी गावडे, राजाराम पाटील, श्रीधर पोतदार आदीसह एनसीसी अधिकारी उपस्थित होते.

       फोटो 

पाच महाराष्ट्र एनसीसी बटालीयनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर बोलतांना

Saturday, 5 May 2018

सामान्य लोकांना गँस मिळावा म्हणून उज्वला गँस हि महत्वाकांक्षी योजना - उत्तम सावंत


हेरले / प्रतिनिधी दि. २७/४/१८

           भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या विविध योजनांचा सर्व सामान्य नागरिकानी लाभ घ्यावा . असे आवाहन भाजपचे पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी केले. ते मौजे वडगाव ता.हातकणंगले येथे जय मल्हार गँस एजन्सीच्या वतीने आयोजित उज्वला गँस वाटप कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ कांबळे होते. तर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पी.डी.पाटील व समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     सावंत  पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सामान्य लोकांना घरगुती वापरासाठी गँस मिळावा म्हणून उज्वला गँस हि महत्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेमुळे गोर गरीब लोकांच्या घरा घरात मोफत गँस कनेक्शन देण्यात येत आहेत. यासह अनेक योजना कार्यान्वित आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

            पी.डी.पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सबका साथ सबका विकास ' हा ऐकमेव उद्देश ठेवून केंद्र व राज्य सरकारने सर्वच क्षेत्रात अनेक लोकाभिमुख योजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून उज्वला गँस हि योजना आहे. यामुळे मागासवर्गीय, भूमिहीन, शेतमजूर, दारीद्रय रेषेखालील नागरिक या सर्वांना मोफत गँस कनेक्शन जोडणेत येत आहेत. याची संपूर्ण रक्कम केंद्र सरकार स्वतः भरत आहे. तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

   तालुका अनुसूचित जाती उपाध्यक्ष भूपाल कांबळे यांनी मौजे वडगाव या गावात या योजनेचे साडे चारशे कनेक्शन तर एकूण साडे सहाशे कनेक्शन आहेत. येत्या काही दिवसांत गावातील वंचित लोकांना गँस देवून संपूर्ण गाव गँस ग्राम करणार असल्याचे सांगितले.

जय मल्हार गँसचे प्रकाश कौंदाडे यांनी शिरोली, नागाव, टोप, मौजे वडगाव, हालोंडी, हेरले, माले, मुडशिंगी आदी गावासह सुमारे दीड हजार उज्वला गँस कनेक्शन जोडली असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास सागर कौंदाडे, सौ. रूपाली कांबळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

     फोटो कॅप्शन

मौजे वडगांव येथे गॅस कनेक्शन वितरीत करतांना पं.स. सदस्य उत्तम सावंत, पी.डी. पाटील, प्रकाश कौदांडे, भुपाल कांबळे आदी मान्यवर.

रिकामे पोते बारदान जमाखर्चामध्ये शिक्षकांना गोवल्यास आंदोलन - जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील

कोल्हापूर/ प्रतिनिधी 

       मिलींद बारवडे


    शासनाने तांदळाची रिकामी पोती विकून पैसा जमवण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून या विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची सभा प्रिन्स शिवाजी बोर्डिंग मध्ये पार पडली.अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

          डी.बी.पाटील पुढे म्हणाले, एका बाजूला शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना मुक्त केले असताना रिकामे पोते बारदान जमाखर्चामध्ये मुख्याध्यापकांना गोवण्याचा हेतू काय? यासाठी एकत्रित येवून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी.

          महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी सरल मध्ये विद्यार्थी माहिती एकत्रित असताना समग्र शिक्षा अभियान मध्ये पुन्हा नव्याने माहिती संकलित करण्याची गरज नसल्याचे सांगितले.विनाअनुदानितचे नेते खंडेराव जगदाळे यांनी १ जून पर्यंत विनाअनुदानित शाळांबाबत शासनाच्या भूमिकेची वाट पाहिली जाईल, त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.कोल्हापुर विभागाचे अध्यक्ष आर.वाय.पाटील यांनी कर्मचारी यांच्या वरिष्ठ श्रेणीसाठी शाळेला ए ग्रेड सक्ती चुकीची असल्याचे सांगून कर्मचारी यांच्यावर यामुळे अन्याय होणार असल्याचे सांगितले.

          एस.के.पाटील यांनी ७ व्या वेतन आयोगामधील मुख्याध्यापकांच्या त्रुटी दुरुस्तीसाठी बक्षी समितीसमोर भूमिका मांडावी असे स्पष्ट केले. बी.एल.ओ.प्रश्नाबाबत डी.एस.घुगरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी केली.यावेळी जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अनेक अडचणीवर चर्चा झाली. 

          यावेळी के.बी.पोवार, के.के.पाटील, बी.जी.बोराडे, बी.जी.कुदळे, ए.आर.पाटील, व्ही.के.पगरे, डी.एस.जाधव, एस.एम.पाटील, डी.पी.कदम, वाय.व्ही.कांबळे, जे.एम.पोवार उपस्थित होते. सभेचे स्वागत एस.के.पाटील यांनी केले, तर आभार डी.एस.घुगरे यांनी मानले.

            फोटो 

     कोल्हापुर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत बोलताना डि.बी.पाटील,व्ही.जी.पोवार, आर.वाय.पाटील.व अन्य मुख्याध्यापक वृंद

राजर्षी शाहू संस्कार शिबीर अभिनंदनीय उपक्रम - मा.श्री.एस.के.यादव, प्रशासनाधिकारी



कसबा बावडा: ज्ञानराज पाटील 


प्राथमिक  शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू संस्कार व्यक्तिमत्व शिबीर चे 1 मे ते 5 मे मोफत आयोजन करण्यात आले होते.शिबीराचा सांगता समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी मा. एस.के.यादव साहेब यांच्या हस्ते व शैक्षणिक पर्यवेक्षक मा.विजय माळी सर, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस मनोहर सरगर,उपाध्यक्ष दिलीप माने,सभापती संजय पाटील,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर सर,उमेश देसाई, सुनील पाटील,राजेंद्र पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,रमेश सुतार,भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले, राजू चौगले,स्वप्नील चौगले, प्राथमिक शिक्षक समिती चे अध्यक्ष उमेश देसाई,उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचे बक्षीस वितरण व शिबीर सांगता समारंभ पार पडला.

 प्रशासनाधिकारी मा.यादव साहेब यांनी सदर शिबीर उपक्रमाचे अभिनंदन  केले व विद्यार्थ्यांना खरे शिक्षण यातून प्राप्त होते असे उपक्रम शाळा शाळातून राबवले गेले पाहिजेत यातून नक्कीच  देशाचा सक्षम असा नागरिक  घडेल असे गौरव उदगार काढून शिबिराचे अभिनंदन केले.

शिबीरातील मुलांना शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील गणबावले,प्रमोद गायकवाड,सुशील जाधव,शिवाजी तरुण मंडळ,शिवाजी पेठचे सामाजिक कार्यकर्ते हर्षल माने,विजय शिंदे,राकेश शिंदे,मनोहर सरगर,दिलीप माने,वेध फाऊंडेशनचे रुद्र पाटील, प्रा,दीपक उलपे,यांनी वही, बिस्किटे,केळे वाटप केले.

या शिबिरात योगासने व सूर्यनमस्कार उत्तम कुंभार,प्रार्थना श्लोक प्राजक्ता कुलकर्णी मॅडम,रांगोळी रंगसंगती व मार्गदर्शन प्राजक्ता शिंदे,सर्प विषयक माहिती राजेंद्र पाटील,प्रभावी सूत्रसंचालन आर.जी.कांबळे,इंग्लिश स्पेक्किंग जयश्री पुजारी मॅडम, कागदकाम कोलाज द्वारकानाथ भोसले , एरोबिक्स प्रकार स्वाती लंगडे,सुजाता आवटी,पुस्तक वाचन व मनन प्रदीप पाटील,मराठी शुद्धलेखन अजितकुमार पाटील, लाठी काठी सह्याद्री प्रतिष्ठन चे शुभम कोळी,लेझीम उमेश देसाई ,अभिनय गीत मोरे मॅडम,हालगीवादन हेमंतकुमार पाटोळे इत्यादी  मार्गदर्शकांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले.


  सदर शिबिरात ध्यान धारणा, मनःशांती ,प्राथनेचे महत्व,लेझीम प्रकार ,रिलॅक्ससेशन,व्यायाम,कवायत,फुटबॉल,रांगोळी, लेझीम,संगीत,गायन,नृत्य,चित्रकला,हस्तकला,सर्पज्ञान,नियोजन,कार्यानुभव,वाचन, मनन, हास्यकल्लोळ,सूत्रसंचालन,भाषण,

अभिनय अशा विविध विषयांचे ज्ञान मुलांना देणेत आले.


प्रास्ताविक व शिबीर चा उद्देश मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,परिश्रम घेतले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे, आभार जे.बी. सपाटे यांनी मानले.

Thursday, 3 May 2018

फास्टॅग वापरा, टोल मधील भ्रष्टाचार रोखा



प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील 

फास्टॅग हा आरएफआयडी टॅग असून बँकांच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही सेवा उपलब्ध आहे. याचा वाहनचालकांना वेळ आणि इंधन बचतीसाठी फायदा होणार आहे.

फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे. भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.

फास्टॅगमध्ये रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन आरएफआयडी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. याद्वारे, प्रीपेड किंवा संबंधित बचत खात्यातून टोलची रक्कम भरली जाऊ शकते. हे गाडीच्या पुढील काचेवर बसविले जाते आणि अशा गाडीला टोलनाक्यावर थांबणे आवश्यक नाही. 

प्रत्यक्षात टोल नाक्यांवर आलेल्या वाहनांच्या तुलनेत कमी संख्या दाखवणे, काही वाहनांना टोलमधून सवलत देणे आदी कारणांमुळे शासनाचा महसूल बुडत होता. त्यामुळे ‘फास्टॅग’ प्रणाली कार्यान्वित झाली. टोलवसुलीतून होणाऱ्या प्रचंड भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक वाहनधारकांने फास्टॅगच वापरावा. 

‘फास्टॅग’ धारकांसाठी असणाऱ्या राखीव लेनमध्ये अन्य वाहने आल्यास संबंधितांकडून दुप्पट शुल्क आकारणी घेण्याचा नियम आहे. 

सध्या कित्येक टोलची वसुली पुर्ण झाली आहे तरीही कमी वसुली दाखवून मुदत वाढवून दिली जात आहे तेव्हा असे टोल नाके बंद होण्यासाठी प्रत्येकाने फास्टॅग चा वापर करून भ्रष्टाचार रोखायला हवा. 

Tuesday, 1 May 2018

राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे चितळे कुटुंब

सोशल मीडिया एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप वरुन साभार 

क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशन च्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन



क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशन च्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त व महाराष्ट्र दिन,सरसेनापती हंबीरराव मोहिते जयंती निमित्त कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता. त्याला नगरसेवक मा. श्री शेखर कुसाळे यांचे सहकार्य लाभले. कुसाळे यांच्या  सौजन्याने ऋणमुक्तेश्वर तालीम येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र, कान, नाक, घसा तपासणी , आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर चा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला... यावेळी लहान मुले, स्त्रीया,  पुरुष, वृध्द मोठ्या संखेने हजर होते....

आरोग्य शिबीराचे उदघाटन खासदार मा. श्री धनंजय महाडिक यांच्या  शुभ हस्ते करण्यात आले या वेळी नगरसेवक मा. श्री शेखर कुसाळे , मा. श्री विकी महाडिक , क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशन चे अध्यक्ष मा. प्रसाद मोहिते, ऋणमुक्तेश्वर तालीम चे अध्यक्ष मा. श्री राहुल वास्कर,* धर्मराज पाडळकर, संदिप कुंभार, पुष्कर श्रीखंडे, अमित माळी, विपुल घाटगे, शाहुराज काटे भोसले, सचिन भोसले, प्रतीराज निकम, प्रदिप माने, सिध्दांत भेंडवडे, प्रसाद लाड, पराग मोहिते, अक्षय कुमठेकर, स्वरुप पाटील, उत्कर्ष शहा आदी फौंडेशन चे व तालमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

विद्यार्थांनी शाहू संस्कार शिबिराचा लाभ घ्यावा -- माधुरी लाड(नगरसेविका)

*

कसबा बावडा:

प्राथमिक  शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू संस्कार व्यक्तिमत्व शिबीर चे 1 मे ते 5 मे मोफत आयोजन करण्यात आले आहे.शिबीर चे उदघाटन नगरसेविका माधुरी लाड यांच्या हस्ते व मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,,रमेश सुतार,भारतवीर मित्र मंडळाचे कार्यकर्ते,प्राथमिक शिक्षक समिती चे अध्यक्ष उमेश देसाई,उपाध्यक्ष सुनील पाटील,यांच्या प्रमुख उपस्थिती शिबीर चे उदघाटन झाले प्रसंगी 1 मे ध्वजवंदन जवान सकटे यांच्या हस्ते करण्यात आले.नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेतील शिबीर बद्दल  पालक,भागातील विद्यार्थ्यांनी शिबीर चा लाभ घ्यावा असे आवाहन केले.उमेश देसाई यांनी विद्यार्थीनी  देशाचा सक्षम असा नागरिक घडवावा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.


 भारतवीर मित्र मंडळाचे चेतन चौगले,राजू चौगले,संभाजी कुंभार, प्रमुख उपस्थित होते.


  सदर शिबिरात ध्यान धारणा, मनःशांती ,प्राथनेचे महत्व,लेझीम प्रकार ,रिलॅक्ससेशन,व्यायाम,कवायत,रांगोळी,मेहंदी, लेझीम,झान्ज,संगीत,गायन,नृत्य,चित्रकला,हस्तकला,सर्पज्ञान,नियोजन,कार्यानुभव,वाचन, मनन, हास्यकल्लोळ,सूत्रसंचालन,भाषण,

अभिनय आशा विविधहु विषयांचे ज्ञान मुलांना दिले जाणार आहे.


प्रास्ताविक व शिबीर चा उद्देश मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,परिश्रम घेतले.कार्यक्रमचे आभार प्राजक्ता कुलकर्णी यांनी मानले.