कोरोनाच्या लढाईमध्ये दिवस-रात्र आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर क्रीडाई यांच्या वतीने ५०० फेस शिल्ड जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. क्रीडाईच्या या उपक्रमामुळे कोल्हापूर पोलीस बांधव अजून सुरक्षितपणे या कोरोनाच्या लढाईमध्ये लढू शकतील, असा विश्वास कोल्हापूरचे पालकमंत्री ना.सतेज पाटील यांनी व्यक्त केला. याबद्दल त्यांनी कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आदित्य बेडेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.