कोल्हापूर / प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष२०२५ - २६ मधील पहिलीसाठी २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे.२७जानेवारी पर्यंत प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.अशी माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी प्रसिध्दीस दिली.
यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाली असून कोल्हापूर शहरांमधील अहिल्याबाई सेंट्रल गर्ल्स स्कूल मंगळवार पेठ या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समाजकल्याण विभाग कोल्हापूर व प्राथमिक शिक्षण समिती मनपा कोल्हापूर यांच्याकडून मोफत सेंटर सुरू करण्यात आले आहे. तरी पालकांनी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २००९ अधिनियमानुसार इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर दुर्बल व वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी अर्ज करून त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचा लाभ होणार आहे. यासाठी आज अहिल्याबाई सेंट्रल गर्ल्स स्कूल मध्ये उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, आशा रावण बार्टी समाजकल्याण विभाग,शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे,जगदीश ठोंबरे लिपिक,शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका पाटील,अध्यापिका मनीषा तळप, सुवर्णा पालकर, सर्व शिक्षा अभियानाचे अविनाश लाड,नचिकेत सरनाईक, अर्चना कुंडले,अस्मा पठाण,सुनील भांबुरे आदी उपस्थित होते. यावेळी आर टी ई प्रवेशासाठी आलेल्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले