.
कोल्हापूर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री यांचे ७ कलमी कृती कार्यक्रम व शालेय शिक्षण मंत्री यांचे १० कलमी कृती कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सक्षमपणे राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केलेल्या आवाहनास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांनी सहविचार सभेत सहमती दर्शविली.
डॉ. एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी आपल्या दालनात
अध्यक्ष / सचिव, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, (सर्व) खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कोल्हापूर संघटना यांची सहविचार सभा आयोजित केली होती त्या प्रसंगी ते बोलत होते.
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी शालेय शिक्षण मंत्री यांचे १० कलमी शिक्षणाचा कृती कार्यक्रम,महाराष्ट्र गीत "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" या गीताची सर्वत्र अंमलबजावणी करणे,मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य सर्व कर्मचारी, शिक्षक व अधिकारी शिक्षक यांना बंधनकारक, विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण अशैक्षणिक कामे वगळून शिक्षकांच्या अडी-अडीचणीचे निराकरण करुन अध्यापनासाठी मुबलक वेळ देणे,सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे विकास करणे,शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढविणे, विद्यार्थी पालक - शिक्षक, व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था, अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा यथोचित गौरव करणे,
राज्याच्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यवस्थापन समित्या, शैक्षणिक संस्था, शिक्षण तज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक मुद्यांचा समावेश करणे,शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे,विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे, मिनी अंगणवाडी, इंग्रजी शाळा / क्लासेस फी नियंत्रण आदींची माहिती देऊन सर्व संघटनांनी हा १० कलमी कार्यक्रम यशस्वी करावा असे चर्चेत त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. आंबोकर पुढे म्हणाले की, होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्याचे अभियान राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांची परीक्षा भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्या आवाहनास सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या प्रसंगी माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष बाळ डेळेकर, सुधाकर निर्मळे, बाबा पाटील, जगदीश शिर्के, मनोहर जाधव, राजेंद्र सुर्यवंशी, विष्णू पाटील, निलेश म्हाळुंगेकर, सुशांत शिरतोडे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
फोटो
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक संघटनांची सहविचार सभेत बोलतांना शेजारी माजी आमदार भगवान साळुंखे एस. डी. लाड,दादासाहेब लाड,राहुल पवार, आर. वाय. पाटील, बाळ डेळेकर