हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले गायीच्या दुधाचे प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी केले.ते मौजे वडगाव, ता.हातकणंगले येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या नूतन इमारत उदघाटन प्रसंगी बोलत होते.
आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते व या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा सहकारी ( गोकुळ) दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे,गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील(आबाजी), संचालक डॉ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, सहाय्यक निंबधक प्रदीप मालगावे, सरपंच कस्तुरी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डोंगळे पुढे म्हणाले, जय हनुमान संस्थेने संघाच्या धोरणांची अंमलबजावणी व पारदर्शक कारभार करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. भविष्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या योजना राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच गोकुळ दूध संघ सोलर धोरण लवकरच अंमलात आणणार असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले ,मौजे वडगाव, तासगाव हा कमी पाण्याचा भाग म्हणून ओळखला जात होता.या भागात सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय समृद्ध बनला आहे. गावातील तरुणवर्ग या व्यवसायाकडे एक वेगळा व्यवसाय म्हणून बघत आहेत.ही एक जमेची बाजू आहे.
याप्रसंगी आमदार अशोकराव माने, माजी आमदार डॉ.सुजीत मिणचेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्कृष्ट दूध पुरवठादारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास उपसरपंच रघुनाथ गोरड, दूध संस्थेचे चेअरमन सतीशकुमार चौगुले, व्हा. चेअरमन इंदूताई नलवडे, संचालक बाळासो थोरवत, सुरेश कांबरे,महादेव शिंदे,रावसो चौगुले, सुभाष मुसळे,महादेव चौगुले, शकील हजारी, जयवंत चौगुले, नेताजी माने,जयश्री यादव,जयश्री रजपूत,सचिव आण्णासो पाटील यांच्यासह सर्व दूध उत्पादक सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
फोटो..
मौजे वडगाव येथे हनुमान दूध संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी दिप प्रज्वलन करताना आमदार अमल महाडिक, प्रसंगी अरुणकुमार डोंगळे, आमदार अशोकराव माने,विश्वासराव पाटील व मान्यवर.