कसबा बावडा प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना सफाई कर्मचारी मात्र जबाबदारीने स्वच्छता कार्य पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून
आमदार श्री ऋतुराज पाटील युवा मंच आंबेडकर नगर का। बावडा यांच्या वतीने प्रभागात आरोग्य कर्मचार्यांचा फेटे , मास्क आणि सॅनिटायझर देऊन जनसत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री डॉ संदिप नेजदार व आरोग्य निरीक्षक श्री नंदकुमार पाटील अजमेर शेख, प्रकाश लोंढे हे उपस्थित होते. या यावेळी कर्मचारी शक्ती नांद्रेकर, परशुराम कांबळे , संतोष कवाळे, सुरज बुचडे, सुखदेव दाभाडे, निवास लोखंडे,
बानाबाई कांबळे,
छाया कुरणे, सुमन लाखे, निलाबाई दाभाडे, शोभा नांद्रेकर, द्वारका पाटोळे ,
घंटा गाडी कर्मचारी शांताराम दाभाडे, महेश पाटोळे या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
सुत्र संचालन श्री सुभाष इंदुलकर यांनी केले. याप्रसंगी आंबेडकर नगर येथील विशाल मच्छले, सिध्दार्थ माने, नागेश कांबळे, प्रशांत कांबळे, गुरुदेव लकडे, निशिकांत कांबळे, शक्ती कांबळे, सुशांत कांबळे, अमेय कांबळे, सुरज कांबळे व महिला दिशा कांबळे, रंजना राजदिप, कल्पना कांबळे, शारदा कांबळे या उपस्थित होत्या.