कोरोना विषाणूजन्य फैलावाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉक डाउन मुळे व विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ग्रामीण तसेच नागरी आरोग्यसुविधा पुरविणाऱ्या सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना सुसज्ज राहण्यास सांगितले असतानाच सद्या बाजारात असणाऱ्या सॅनिटाईजर्स च्या टंचाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनच नव्हे तर रुग्णालयांचे नियोजनदेखील विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील डी. वाय. पाटील समूहाच्या,डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या च्या केमिकल विभागाने संशोधनातून चांगल्या प्रतीच्या सॅनिटाईजर्स निर्मिती करून डी. वाय. पाटील समूहामार्फत बावड्यातील लाईन बझार येथील सेवा रुग्णालयाला सदर सॅनिटायझर्स देण्यात आले.सदर प्रसंगी सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम रुग्णालयाच्या परिचारिका, इतर स्टाफ तसेच केमिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव तसेच प्रा.राहुल महाजन, विद्यार्थी प्रतिनिधी सुदर्शन बागल, प्रतीक कांबळे, राज ठाकूर, ओंकार गावडे,निखिल कुडके आदी उपस्थित होते. या सर्वानीच सदर उत्कृष्ट प्रतीचा सॅनिटायझर्स बनविण्यासाठी तसेच वितरण करणेसाठी विशेष परिश्रम घेतले. सदर उपक्रमाकरिता समूहाचे कार्यकारी संचालक, अनिलकुमार गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या क्षमा कुलहल्ली, उपप्राचार्य अजितसिंह जाधव तसेच संस्थेचे अध्यक्ष, डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज डी.पाटील, आमदार श्री. ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले.