प्रतिनिधी:-प्रमोद झिले हिंगणघाट
येरला:- स्थानिक गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने हैदराबाद नागपर राष्ट्रीय महामार्गावर येरला गावाजवळ विनोद वानखेडे यांचे शेतात तेलंगना,बेंगलोर, आंध्रप्रदेश,हैदराबाद. येथून येनार्या प्रवासी कामगार पायदळ सायकलने आपल्या गावाच्या ओढीने परतीचा प्रवासाला लागले. प्रवास करनार्यासाठी दररोज जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवनासोबतच त्यांचा साठी आंघोळ करण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली.
या अन्नछ्त्र करिता येरला येथील सेवाभावी ग्रामस्थ विनोद वानखेडे,राजू रोडे, विलास सरोदे, अमोल साळवे, भैया टोंग, अनिल खंडाळ्कर,कैलास बोरकर,मोन्टू वानखेडे, अमित साळवे, नंदू पावडे, वैभव टापरे, चंदू पावडे, करण साळवे, बंटी कड्वे, अंकित जोगी उपस्थीत होते.