तीन दिवस कर्फ्यू लागू ;कोरोणा पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूने वाढवली भिती ; शहरातील ३ किलोमीटरचा परिसर झाला सील
अॅड अमोल कळसे
उदगीर :येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 23 एप्रिल 2020 रोजी अत्यावश्यक अवस्थेत एक वयोवृद्ध महिला रुग्ण दाखल झालेली होती. या दाखल झालेल्या महिलेचा कोरोना स्वाब रिपोर्ट शनिवारी दुपारी पॉझिटिव आलेला होता. तसेच या महिला रुग्णास मधुमेह व रक्तदाब आजार होते व त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी या कोरोना पॉझिटिव महिलेचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे.
उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल कोरोनाबाधित एका वयोवृद्ध महिलेचा शनिवारी (ता.२५) दुपारी मृत्यू झाला. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून महिलेचे वास्तव्य असलेल्या तीन किलोमीटर त्रिज्या क्षेत्रात परिसर सील करण्यात आला होता . व शनिवारी सकाळीच या महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिलेच्या मृत्यूनंतर या महिलेला कोरोनाची लागण झालीच कशी आणि ही महिला कोणाकोणाच्या संपर्कात आली, याची सखोल चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे.
शहरात महिलेला कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यानंतर चौबारा परिसराच्या ३ किलोमीटर परिसरामध्ये कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे . तसेच शहरामध्ये तीन दिवस कर्फ्यू राहणार असून , कोणीही घराबाहेर पडू नये , असे आवाहन जिलाधिकारी जी , श्रीकांत यांनी केले आहे . ३किलोमीटरच्या परिसरातील सर्व व्यवहार , येणेजाणे बंद राहील , केवळ दवाखाने आणि औषधी दुकाने सुरु राहतील . लातूर जिल्ह्यामध्ये कोणीही
छुप्या मार्गानी येऊ नये यासाठी सीमा बंद करण्यात आल्या आहेत . तसेच नव्याने गावात , शहरात कोणी आले असेल तर प्रशासनाला माहिती या . सदर माहिती लपविल्यास सर्वांनाच मोठी किंमत मोजावी लागते . दरम्यान , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . संजय डगे ,
उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी , तहसीलदार व्यंकटेश मुंडे , पोलीस उपविभागीय अधिकारी मधुकर जवळकर , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ . दत्तात्रय पवार , नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड , पोलीस निरीक्षक महेश शर्मा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत .
पालकमंत्री व राज्यमंत्र्यांचेही निर्देश
कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लागण पसरणार नाही , याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले . मयत महिलेचा प्रवास इतिहास तपासून तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घ्या आणि तातडीने क्कवारंटाईन करा , अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यानी दिल्या आहेत . पाणीपुरवठा व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही सातत्याने उदगीरचा आढावा घेऊन सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केले . शासन जनतेसोबत आहे . सर्व सुविधा विनाविलंब मिळतील . परंतु , जनतेने विशेषतः तरुणांनी घराबाहेर पडू नये , असेही बनसोडे म्हणाले .
जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांची चेतावनी !
बाहेरून आलेल्यांची माहिती द्या ; अन्यथा गुन्हे : जी . श्रीकांत नाकाबंदी कडेकोट आहे . परंतु , छुप्या मागनि प्रवेश करुन तुमच्या गावात , शहरात , शेजारी , कुटुंबात कोणीही आले असेल तर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन केले जाईल . मात्र त्याची माहिती प्रशासनाला या . तुम्ही माहिती लपविली आणि इतरांकडून माहिती काली तर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील , असा सज्जड इशारा जिलाधिकायांनी दिला .
कडकडीत बंदोबस्तात सुरक्षा यंत्रणा
ती महिला पूर्वीपासूनच गंभीर आजारी •मृत्यू झालेली महिला पूर्वीपासूनच आजारी होती . तिचा एक मुलगा गुजरातमध्ये आहे . तर दोन मुले , एक मुलगी आणि जावाई है उदगीरमध्येच आहेत . त्या परिवाराशी संपर्क : डॉ . माने • मयत महिलेच्या कुटुंबातील व संपर्कातील १० जणांची तपासणी होणार आहे . ते सर्वजण उदगीरमध्येच आहेत . त्यांचे प्रशासनाला सहकार्य मिळत आहे . अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उदगीरमध्ये असून , बाधा पसरणार नाही , यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ . राजेंद्र माने म्हणाले . दरम्यान , उदगीरमध्ये बंदोबस्त वाढविला आहे .
तर हे विभाग बंद आणि सिल
पोलीस स्टेशनपासून उत्तरेकडचा भाग चौबारा ते जळकोट रोड , कैप्टन चौक परिसर सील राहतील . सदरील सील केलेल्या परिसरात ४ दिवस निर्बंध राहणार आहेत . वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ३ दिवस शहरभर बंद राहतील .