उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
सध्या कोरोना या वैश्विक महामारी या आजाराणे देश त्रस्त असताना ग्रामीण भागात पाणी टंचाई चुनुक जाणवु लागली आहे. यंदा पावसाळ्यात तिरू मध्यम प्रकल्प 100% भरला होता.वाढवणा येथील पाटबंधारे उपविभाग अंतर्गत उदगीर व जळकोट तालुक्यातील एकुण 28 मध्यम,लघु, व साठवण तलाव आहेत.28 तलावापैकी यंदा जवळपास 18 तलाव100% क्षमतेने भरले होते.तर उर्वरित 9 तलावात 75% पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला होता. वरिल सर्व लघु,मध्यम,साठवण तलावाचा फायदा शेतकऱ्यांना होऊन 14354 हेक्टर एकुण क्षेत्रापैकी 8000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र जमीन सिंचनाखाली आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी यामध्ये ऊस,हरभरा, भुईमूग, रब्बी ज्वारी,यासह भाजीपाल्याची लागवड केली होती. सध्या तिरू मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून 47/52 खेडी पाणीपुरवठा योजना चालू असुन यासह शिरूर ताजबंद,वाढवणा बु,हाळी-हंडरगुळी,शिवणखेड,कुमठा,
मोर्तळवाडी,चिमाचीवाडी,
आडोळवाडी ईत्यादी गावाला पाणी पुरवठा होतो आहे. तसेच तिरुच्या डाव्या व उजव्या कालव्याने उदगीर सह जळकोट तालुक्यातील सिंचन क्षेत्राला याचा फायदा होत असतो. सध्या एकुण 28 तलावापैकी तिरु मध्यम प्रकल्पात 51% पाणी साठा शिल्लक आहे. तसेच 50 ते 75 % पर्यंत शिल्लक पाणीसाठा असलेले एकुण 12 लघु व साठवण तलाव आहेत. तर एकमेव असा चांदेगाव साठवण तलाव आहे, त्यामध्ये 84% पाणी साठा आजही शिल्लक आहे.तर 50 %पेक्षा कमी असलेले लघु व साठवण तलाव 13 आहेत तर करखेली तलाव कोरडाठाक पडला आहे. एप्रिलमध्ये पाणी टंचाई जास्त निर्माण झाली नसली तरीही मे आणि जुन हे दोन महिने अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे सर्वानीच उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे.
..............प्रतिक्रिया.......................
पाण्याचा अपव्यय शेतकऱ्यांसह सर्वानी टाळावा.शेतकऱ्यांनी ड्रीप,तुषार सिंचनाचा अवलंब करूनच पिके घ्यावीत, जेणेकरून भविष्यात आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाही.
- मोमीन एन.ए.
( शाखा अधिकारी )
- पाटबंधारे उपविभाग वाढवणा (बु)-
.................................................
फोटो
उदगीर तालुक्यातील लघु पाटबंधारे विभाग वाढवणा बु अंतर्गत तिरू मध्यम प्रकल्पात सध्या 51.40 % पाणी साठा उपलब्ध आहे.