Thursday, 25 February 2021

मुल्यमापन व नवे शैक्षणिक वर्षाचे धोरण स्पष्ट करा : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी


पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.26/2/21
या वर्षीचे मुल्यमापन तसेच नवे शैक्षणिक वर्ष धोरण बाबत राज्य शासनाकडून स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  करण्यात आली. या बाबत चे निवेदन सहाय्यक  शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले.
      कोरोनाच्या संसर्गामुळे आठ ते नऊ महिने सर्व प्राथमिक शाळा बंद आहे गेल्या महिन्यापासून पाचवी ते आठवीचा वर्ग सुरू झाले असून सध्या पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे परंतु ऑनलाईन अध्यापनात अनेक अडचणी पालकांकडे मोबाईल फोन , इंटरनेट सुविधा नसणे इ. निर्माण होत आहेत त्यामुळे सध्याच्या शैक्षणिक वर्ष हे रद्द करणे तसेच नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू करणे याबाबत पालक आणि विद्यार्ध्यी यांच्यात संभ्रम निर्माण झाले आहे.
   यावर उपाय म्हणून या वर्षाची शैक्षणिक वर्ष रद्द केल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सदरची शैक्षणिक वर्ष रद्द न करता 40: 60 या सूत्राचा वापर करून अर्थात इयत्ता पहिली चा नवीन वर्ग 15 जून पासून सुरू करणे व दुसरीच्या वर्गापासून गेला इयत्तेचा  सुरुवातीचा 40 टक्के भाग हा  ( चार महिने )  मागील वर्षाचा अभ्यास पूर्ण करून घेणे व 60 टक्के भाग हा  ( ६ महिने )  त्याच वर्गातील अभ्यास पूर्ण करून घेतल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले जाईल.
      त्याच बरोबर दिल्ली सरकारने पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द केले आहे त्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन पद्धतीमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत राज्य शासनाने योग्य ते आदेश द्यावेत अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
     शिष्टमंडळात महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एम.डी. पाटील कार्याध्यक्ष संतोष आयरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राजाराम संपकाळ ,नितीन पानारी, टी. आर. पाटील ,एस वाय पाटील, अभिजीत साळोखे ,संतोष पाटील, राज मेंगे ,स्नेहल रेळेकर, दशरथ कुंभार ,कैलास भोईटे , युवराज गायकवाड यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       फोटो 
लेखी निवेदन सहाय्यक  शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना देताना कार्याध्यक्ष संतोष आयरे राज्य उपाध्यक्ष एम डी पाटील विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे व इतर.

Saturday, 20 February 2021

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सोमवारी शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन करणार

________________________
कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.21/2/21
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा मध्ये आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते.
मुंबई येथील आझाद मैदानावर प्रचलित नियमानुसार अनुदान मागणी साठी आंदोलन सुरू असून शासनाने कारण नसताना तपासणीचा घाट घातला. या दरम्यान शासनाने तपासणी करून अनुदान पात्रतेसाठी याद्या जाहीर केल्या परंतु कोल्हापूर विभागाची तपासणी मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांनी केली पण ‌त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी ‌यांनी वेळेत मागणी करुन देखील शासनास सादर केला नाही.त्यामुळे १०९ ज्यु.काॅलेज मधील शेकडो शिक्षक वेतना पासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.वेतना पासून गेली अनेक वर्षे वंचित असलेल्या शिक्षकांना आत्महत्या करणेची वेळ आली आहे.ज्या अधिकारऱ्याच्या हलगर्जीपणा मुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे ‌त्यांची चौकशी होऊन शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सदर १०९ ज्यु.काॅलेजना अनुदान द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे वतीने सोमवार दिनांक २२फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११वाजल्या पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे एस.डी.लाड यांनी घोषित केले.
         सदर बैठकीस वसंतराव देशमुख  , खंडेराव जगदाळे, इरफान अन्सारी,आर.वाय.पाटील,डी.एस.घुगरे,पी.एस.हेरवाडे,एस.एस.चव्हाण, संदीप पाटील ,सुधाकर सावंत,बी.डी.पाटील, गजाननकाटकरपोतदारएस.एन.वरपे ,एस.एम.पाटील,आर.डी.पाटील,पी.एस. घाटगे, आदी मान्यवरांसह शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
         फोटो 
 शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना एस.डी.लाड, आर.वाय.पाटील,वसंतराव देशमुख , इरफान अन्सारी, खंडेराव  जगदाळे

उद्योजक चंद्रकांत पाटील यांना आनंद गंगा फाऊंडेशनचा 'यशस्वी उद्योजक' पुरस्कार प्रदान

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.20/2/21
  आनंद गंगा फाऊंडेशनचा 'यशस्वी उद्योजक' पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना  माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये आनंद गंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष तानाजी पोवार यांच्या सामाजिक उपक्रमातून हा पुरस्कार  सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी शिक्षण सभापती प्रवीण यादव,सभापती डॉ.प्रदीप पाटील ,विश्वस्त विनायक भोसले,प्राचार्य विराट गिरी ,गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक,शिक्षक बँकेचे चेअरमन प्रशांत पोतदार,शिक्षक नेते एन. वाय. पाटील,अर्जुन पाटील,अनिल चव्हाण, सरपंच रंजना जाधव,अरविंद खोत,शिक्षक बँक संचालक दिलीप पाटील,साहेब शेख,जी.एस. पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.

Friday, 19 February 2021

श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मृतिदिनी प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न

पेठवडगांव / प्रतिनिधी

  वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये वडगाव विद्यालय व श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युती सचेतना फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थिनीसाठी  प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.
      श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मरणार्थ  वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थिनीसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी केले. 
      व्याख्यात्या जी. व्ही. मोहिते यांनी युवती सचेतना फाउंडेशनच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकून आईसाहेबांच्या जीवन कार्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक एस. डी.माने, डी. एस. कुंभार आदी मान्यवरांसह सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
    फोटो 
वडगांव : श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थिनीसाठी प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर आर पाटील उपमुख्याध्यापक एस डी माने शेजारी शिक्षिका.

लहान वयातच उत्तम संस्कार घडतात - डॉ अजितकुमार पाटील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 

**_कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण 
समिती ,कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे केंद्र मुखाद्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी सक्षम व अभ्यासू असणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबातील शिक्षणाचा व संस्कृती,संस्कार यांचे विचार समाजातील व्यावहारिक जीवन जगत असतांना  उपयोग करावा.कोरोनाकाळींन आपत्तीमुळे घराचे आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत आहे.त्यावर उपाय म्हणून आपल्या अंगी जे कौशल्य असेल त्याचा वापर करून उधोजक बनले पाहिजे.राजमाता जिजाऊ यांनी ज्याप्रमाणे शिवरायांना लहान वयात असतांना रामायण, महाभारत यामधील असणाऱ्या चांगल्या उपदेशपर गोष्टी सांगून कठीण प्रसंगी संस्काराचे योग्य असे वळण लावल्यामुळेच शिवरायांच्या मनावर त्याप्रमाणे संस्कार घडत गेले.तेंव्हाच्या काळातील शिक्षण हे स्वराज्याची निर्मिती व आत्मसंरक्षण कसे करणे याला महत्व दिले होते. व्यायाम, दांडपट्टा, कुस्ती,भालाफेक,किल्यांची माहिती घेणे,पाण्याची व्यवस्था, धान्य कोठार, पिकांना संरक्षण देणे, यासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडत असत.त्यामुळेच स्वराज्यात सर्व जाती,धर्म एकमेकांना विचारांचा सन्मान राखत असत. 
आज एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत त्यामुळे समाजातील तरुणांनी शिवरायांचे संस्कार,विचार यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.देशाला व समाजातील प्रगतीकडे नेणारे शिक्षण घेऊन देशासाठी झटले पाहिजे तरच खरी शिवजयंती करण्यास पात्र आहोत.तरुणाने व्यायाम, अभ्यास, नवीन तंत्रज्ञान, त्याच बरोबर जीवन कौशल्य कसे वापरावे याचा विचार केला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्यासाठी कसा करता येईल ह सुद्धा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन केले.
सोशल डिस्टनस च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
नंबर आलेल्या विदयार्थ्यांना केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,उत्तमराव कुंभार, फायरमन संभाजी ढेपले, विजयसिंह पाटील ,रोहन लकडे यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी सुशील जाधव, विद्या पाटील,अश्विनी पाटील,मंगल मोरे,अभिषेक बिरणगे,तनिष्का पाटील, समीक्षा जामदार,अस्मिता लोंढे,समर्थ कांबळे, जान्हवी ताटे, अक्षरा लोंढे, पायल पाटील,श्रावणी पाटील,हेमांतकुमार पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सोशल डिस्टनस चे नियम पाळून कार्यक्रम शिस्तबद्ध करण्यात आला.
आभार प्रेम महेश कापसे  यांनी मानले.

Thursday, 18 February 2021

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या विस्तारित कक्षाचा शुभारंभ

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.18/2/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या विस्तारित कक्षाचा शुभारंभ संपन्न झाला.
     जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, शाखा रुकडी अंतर्गत विस्तारित कक्षाचा  हेरले येथे शुभारंभ  संस्थेचे चेअरमन अनिल भोकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी चेअरमन अनिल भोकरे यांनी घरबांधणी, नविन वाहन खरेदी, सोनेतारण कर्जासाठी दहा टक्के  व्याजदराने तसेच सुवर्ण आभूषण खरेदीसाठी नऊ टक्के व्याज दाराने संस्थेने कर्ज योजना आणली असून हेरले गावातील सभासद व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक आदिनाथ किणींगे यांनी संस्थेकडे ४७० कोटी ठेवी व तीनशे कोटीची कर्जे असून शाखा नसतानाही हेरले गावातील सभासदांनी संस्थेकडे मोठ्या प्रमाणात व्यवहार केले आहेत याबद्दल त्यांचे आभार मानले. तर जेष्ठ संचालक भूपाल गिरमल यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेऊन  गावातील सभासद व ग्राहकांसाठी संस्थेच्या शाखांमधून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या विस्तारित कक्षाच्या माध्यमातून मिळतील असे सांगितले. 
  उदघाटन कार्यक्रमास जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील  पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील,  मुनिर जमादार, उपसरपंच राहुल शेटे यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे सल्लागार सदस्य अमोल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर व्हा. चेअरमन  रावसो पाटील यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी सेवा संस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील ,ए.बी.चौगुले, प्रा.राजगोंडा पाटील संस्थेचे संचालक भरत गाट, सुकुमार पाटील, वि.दा.आवटी, रमेश पाटील, कुमार पाटील, राजेंद्र नांदणे, रावसो मलिकवाडे  सल्लागार पी.ए.पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,वीर सेवा दल सदस्य, सभासद, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     फोटो 
हेरले : कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या विस्तारित कक्षाचा शुभारंभ करतांना चेअरमन अनिल भोकरे व इतर मान्यवर.

Monday, 15 February 2021

किरण शिंदे यांना आविष्कार फौंडेशनचा राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि16/2/21
किरण शिंदे यांना आविष्कार फौंडेशनचा राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
पणजी मडगाव येथे आविष्कार फौंडेशनचा  राष्ट्रस्तरीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भारताचे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
     किरण शिंदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून आविष्कार फौंडेशन मार्फत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमासाठी आविष्कार फौंडेशन चे अध्यक्ष संजय पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उज्ज्वला सातपुते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Sunday, 14 February 2021

शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञान देण्यासाठी सदैव नवनवीन ज्ञान घेत राहिले पाहिजे - माजी खासदार निवेदिता माने

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.15/2/21

शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञान देण्यासाठी सदैव नवनवीन ज्ञान  घेत राहिले पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार निवेदिता माने यांनी आनंदगंगा फौंडेशन च्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले. त्या अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आनंद गंगा फौंडेशनच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
    या वेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांनी फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराव पोवार यांनी राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी  तानाजी पोवार यांनी पुस्तक प्रकाशित करून वाचन चळवळ वाढविण्यासाठी केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  शुभेच्छा देत तालुका, जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी  अधिक जोमाने कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
    प्रास्ताविकात फौंडेशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तानाजी पोवार यांनी फौंडेशनच्या कार्याची माहिती सांगताना भविष्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण,महेश पोळ शिक्षक नेते गौतम वर्धन,पुष्पवती दरेकर यांनी मनोगते व्यक्त केले.
     या वेळी ३० शिक्षकांना 'आदर्श शिक्षक ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विविध स्पर्धा परीक्षा व माहिती साठी उपयुक्त अशा जनरल नॉलेज पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त विनायक भोसले,प्राचार्य विराटगिरी ,गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक,शिक्षक बँकेचे चेअरमन प्रशांत पोतदार,शिक्षक नेते एन. वाय. पाटील,अर्जुन पाटील,अनिल चव्हाण, सरपंच रंजना जाधव,अरविंद खोत,शिक्षक बँक संचालक दिलीप पाटील,साहेब शेख,जी.एस. पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अर्चना नरबळ यांनी केले तर आभार कृष्णात पाटील यांनी मानले. 

                फोटो 
     अतिग्रे:   निमंत्रित सदस्य जि. प. शिक्षण समिती तानाजी पोवार यांच्या जनरल नॉलेज या पुस्तकाचे  प्रकाशन करताना शिक्षण अर्थ समिती सभापती प्रविण यादव ,सभापती डॉ.प्रदीप पाटील, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी व अन्य मान्यवर.

कोनवडे (ता. भुदरगड ) येथील प्रा . एच . आर. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राज्यशास्त्र महाविद्यालयीन परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.15/2/21

कोनवडे (ता. भुदरगड ) येथील प्रा . एच . आर. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राज्यशास्त्र महाविद्यालयीन परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .ते दूधसाखर विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज बिद्री येथे
कार्यरत आहेत . त्यांनी २५ वर्षे अध्यापनाचे काम केले आहे . त्यांचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन निवड करण्यात आली आहे . या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे .

           यावेळी प्रा.संपतराव मोरे यांची अध्यक्ष म्हणून तर प्रा.धनाजीराव देसाई यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली. प्रा. हिंदूराव पाटील यांना
 दूधसाखर शिक्षण  संकुलाचे अध्यक्ष माजी आमदार के.पी .पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष  विठ्ठलराव खोराटे, कार्यकारी संचालक  आर . डी देसाई, सेक्रेटरी  कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर .व्ही . पाटील, उपप्राचार्य एस .एस . पाटील, उपमुख्याध्यापक प्रा . एस . बी जाधव, पर्यवेक्षक एन .पी .फराकटे, व्होकेशनल विभागप्रमुख प्रा.एन. डी. पाटील यांचे सहकार्य लाभले .

Thursday, 11 February 2021

कोजिमाशी पतसंस्थेच्या वतीने कोवीड संसर्ग झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर सभासदांना मदत निधी धनादेश वाटप

पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.11/2/21
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोवीड संसर्ग झालेल्या  शिक्षक व शिक्षकेत्तर सभासदांना मदत निधी धनादेश वाटप करण्यात आला.
वडगांव विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
        कोजीमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड म्हणाले मागील काही महिन्यामध्ये कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थेचे ३४ सभासद शिक्षक मयत झाले.या शिक्षकांचे कर्ज माफ  करून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. या मयत सभासद शिक्षकांना १ कोटी ५५ लाख रुपये इतकी रक्कम कर्जमुक्ती योजनेतून कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच ज्या शिक्षक व शिक्षेकेत्तर सभासदांना कोविड संसर्ग झाला होता त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये  असा मदत निधी वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळात घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये जवळपास ३०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे संस्थेकडून मदत निधी देण्यात येत आहेत.
       संस्थेच्या कोरोना संसर्ग सभासदांना पाच हजार रुपयांच्या मदतनीधी वाटपाची रक्कम सुमारे पंधरा लाख इतकी होत आहे. या सभासदांना  एक आर्थिक छोटीशी भेट म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.संस्थेने सभासदांच्या हिताचे विविध उपक्रम राबविल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संस्थेचे नाव लौकिक झाले आहे.महापुराच्या काळामध्ये ही कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेंच्या शाळांना पंधरा लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे. तसेच संस्थेकडून कोरोना संसर्ग काळामध्ये शासन निधीस मदत म्हणून शासनास  २ लाख ५१ हजार रुपयाचा निधी देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये संस्था सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
         पतसंस्थेच्या जिल्ह्यातील कोल्हापूर,पेठवडगांव,इचलकरंजी,सरवडे, गारगोटी,मुरगूड, शिरोळ, कोतोली, कोपार्डे, कोवाड, शाहूनगर परिते, गडहिंग्लज आदी शाखांमधून कोरोना संसर्ग सभासदांना  मदत निधीचा धनादेश वाटप करण्यात येत आहे.
      या प्रसंगी चेअरमन बाळासाहेब डेळेकर, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, माजी चेअरमन कैलास सुतार, सीईओ अरविंद पाटील, विजय पाटील ,नितीन शिंदे, प्राचार्य आर आर पाटील उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षक दिनकर पाटील, उपप्राचार्य मनोहर परीट, मुख्याध्यापक नांगरे ,मिलींद बारवडे सुधाकर निर्मळे , अशोक माळी , संताजी भोसले ,स्वप्ना थोरात, उमा पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक व शिक्षकेत्तर सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अकबर पन्हाळकर यांनी केले.
        फोटो 
मदत निधीचा धनादेश प्रदान करताना मुख्याध्यापक आर आर पाटील शेजारी चेअरमन बाळासाहेब डेळेकर तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड व्हा.चेअरमन सुभाष पाटील, सीईओ अरविंद पाटील आदीसह इतर मान्यवर

देशाचे ग्रामिण अर्थकारण व समाजजीवन बदलण्याची ताकत प्राथमिक दूध संस्थेमध्ये - डी.व्ही.घाणेकर

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.11/2/21
देशाचे ग्रामिण अर्थकारण व समाजजीवन बदलण्याची ताकत प्राथमिक दूध संस्थेमध्ये आहे. त्यामुळे हा व्यवसाय मोठा करण्यासाठी सर्वच घटकांनी दूध उत्पादक शेतक-यांना सहकार्य केले पाहिजे. असे मत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी व्यक्त केले.
      ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या २५०० लिटर दूध संकलन कलश पुजन व विमा धनादेश वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. उमा चौगुले या होत्या. तर सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ते पुढे म्हणाले, दूधाचे कामकाज हे शास्ञोक्त पद्धतीने करणारा गोकुळ दूध संघ आहे. संस्था मोठी होण्यामागे सर्वांचा खारीचा वाटा असतो त्यांचा इतिहास विसरता कामा नये. संघाला होणारा नफा हा दूध उत्पादकांना वाटप केला आहे. पण खाजगी दूध गोळा करणारे वाटप करीत नाहीत. भविष्यात दूधाला प्रचंड मागणी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक जोमाने दूध व्यवसाय वाढवावा असे आवाहन घाणेकर यांनी केले.
     याप्रसंगी सहाय्यक निबंधक (पदुम) डॉ. गजेंद्र देशमुख म्हणाले कामधेनू दूध संस्थेचे कार्य म्हणजे सहकारातील उत्कृष्ट कार्याचा नमुना म्हणता येईल.संघाचे व्यवस्थापक शरद तुरंबेकर, विमा प्रतिनिधी के.वाय.पाटील, बॅंक व्यवस्थापक दिपक शुक्रे, श्रीकांत सावंत, राजू थोरवत आदींची भाषणे झाली.  
   या कार्यक्रमास गोकुळचे संकलन उप व्यवस्थापक डी.डी.पाटील, सरपंच काशिनाथ कांबळे, संस्थेच्या चेअरमन सौ.‌उमा चौगुले, व्हा. चेअरमन महंमद हजारी, महेश कांबरे, मानसिंग रजपूत, डॉ. विजय गोरड, सुभाष आकिवाटे, अमिर हजारी, संजय चौगुले, बशीर हजारी, सुरेश पाटील, उदय आंबी,सादीक जमादार यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेञात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत माजी उपसरपंच किरण चौगले यांनी केले, प्रास्ताविक सचिव रमेश लोंढे यांनी केले. आभार विजय मगदूम यांनी मानले.

          फोटो 
मौजे वडगाव - कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, सहाय्यक निबंधक डॉ.गजेंद्र देशमुख व शेजारी इतर मान्यवर.

Wednesday, 10 February 2021

तासगाव ग्रामपंचायत सरपंचपदी गुरव तर उपसरपंचपदी सौ. कांबळे यांची बिनविरोध निवड

                    सरपंच श्री चंद्रकांत गुरव

हातकणंगले / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी चंद्रकांत आण्णा गुरव यांची तर उपसरपंचपदी  सौ.पौर्णिमा आदिनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

      उपसरपंच सौ पौर्णिमा आदिनाथ कांबळे

तासगाव ग्रामपंचायतीची सन 2021-2026 साठीची निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंच निवडी साठी झालेल्या विशेष सभेत सरपंच पदासाठी आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग(पुरुष)या प्रवर्गातून  बिनविरोध निवडून आलेले चंद्रकांत गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे   घोषित केले.
दरम्यान याच वेळी उपसरपंच पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून  निवडल्या गेलेल्या सौ पौर्णिमा आदिनाथ कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची ही उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ यांनी काम पाहिले निवडी नंतर नूतन सरपंच, उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच शिवाजीराव पाटील,संपतराव पाटील,जनार्दन पाटील,  रघुनाथ सुतार ,एन डी पाटील,अर्जुन कोकाटे, अर्जुन पाटील,तानाजी पाटील,सागर पाटील,ग्रामसेविका एस एस दगडे तलाठी जाधव,यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



फोटो:-

Tuesday, 9 February 2021

कोजिमाशिच्या चेअरमनपदी बाळासाहेब डेळेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.10/2/21
मिलींद बारवडे

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण  सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी  बाळासाहेब डेळेकर यांची निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज वडगावमध्ये करण्यात आला.
       श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागलचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब  डेळेकर यांची कोजिमाशिच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल तसेच शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या शिक्षक प्रतिनिधी कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक आर आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
       वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आर आर पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या मुख्याध्यापक प्रतिनिधी कौन्सिल सदस्यपदी निवड व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व विद्यालयाचे कार्यवाहक के बी वाघमोडे यांच्या संस्थेच्या उत्कृष्ट सेवेच्या कार्याबद्दल या दोन मान्यवरांचा सत्कार कोजिमाशिचे चेअरमन बाळासाहेब डेळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी या तीन सत्कार मूर्तींनी मनोगती व्यक्त केली.
         कोजिमाशी शाखा पेटवडगाव च्या वतीने चेअरमन बाळासाहेब डेळेकर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मॅनेजर विजय पाटील, स्वप्ना थोरात, पोपट माने, उमा पाटील, पांडुरंग दिपक आदी मान्यवर उपस्थित होते.
        यावेळी उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षक डी के पाटील ,तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी, पी जी सुब्रमणी, दिलीप शेळके, डी एस कुंभार ,मिलिंद बारवडे, पी ए पाटील,रमेश पाटील, पी एस पाटील, अकबर पन्हाळ्कर,सुरेश चव्हाण, जावेद मणेर, नेताजी वडगावकर, रविंद्र वासुदेव,सचिन पाटील आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी विदयार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित लाड यांनी केले.

           फोटो 
वडगांव : कोजिमाशिच्या चेअरमनपदी बाळासाहेब डेळेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक आर आर पाटील करताना शेजारी  उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षक डी के पाटील, कार्यवाह के बी वाघमोडे व इतर मान्यवर.

Monday, 8 February 2021

विवेक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर



हातकणंगले / प्रतिनिधी
दि.9/2/21
हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील विवेक पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल पुणे येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचेमार्फत राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.
   विवेक पाटील हे विविध आंदोलनामध्ये
सहभाग घेत आहेत. त्यांना वारणा
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रावसो
 पाटील, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने,वारणा दूध संघाचे
संचालक महेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन
लाभले.

हेरले येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.9/2/1/21

                वीर सेवा दल शाखा हेरले ( ता. हातकणंगले )आयोजित व ग्रामपंचायत हेरले, प्राथमिक आरोग्य केंद्र,हेरले डॉक्टर्स असोसिएशन,केमिस्ट व एम.आर असोसिएशन,तरुण मंडळे, सामाजिक संस्था हेरले यांच्या विशेष सहकार्याने महा रक्तदान शिबिर संपन्न झाले. १०९ बॉटल्स संकलन झाले.
तसेच वीर सेवा दलाच्या  ४१ शाखांच्या माध्यमातून आतापर्यंत 3000 बॉटल्स चे रक्त संकलन करण्यात आले आहे.
    उद्घाटन प्रसंगी जवाहर साखर कारखाना संचालक  आदगोंडा पाटील,माजी सभापती राजेश पाटील, पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील,प्रा. राजगोंडा पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगले,उपसरपंच  राहुल शेटे,बक्तीयार जमादार,मेडिकल असोसिएशनचे डॉ.अमोल चौगुले, डॉ. महावीर पाटील, डॉ. आर डी पाटील,डॉ. इम्रान देसाई,डॉ. नितीन चौगुले,डॉ. श्रीनाथ कुलकर्णी,डॉ.अमित पाटील,एम् आर असोसिएशनचे  किरण चौगुले,  सचिन पाटील,विशाल परमाज, श्रेणिक राजोबा,केमिस्ट असोसिएशनचे  अभिषेक मोहिते,  संदीप चौगुले, मंदिर समितीचे  ए बी चौगुले,  आदगोंड पाटील,  भिमराव चौगुले, अजित चौगुले
, संदेश चौगुले, संकेत पाटील, साहिल पाटील,सम्मेद हणमंत, अरिहंत परमाज,अभिषेक पाटील,आशिष माणगावे,यश परमाज यांच्यासह मान्यवर व वीर सेवा दल,वीर महिला मंडळ कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
        फोटो
हेरले : वीर सेवा दल ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी आदगोंडा पाटील, राजेश पाटील, राहूल शेटे, नयन पाटील व इतर मान्यवर.

Saturday, 6 February 2021

राजर्षी शाहू विद्यामंदिर ला उपायुक्त रविकांत आडसुळ यांची भेट

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समिती संचलित मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा मध्ये कोल्हापूर उपआयुक्त रविकांत आडसूळ यांनी अचानक भेट दिली असता शालेय व्यवस्थापन व प्रशासन व्यवस्थित असल्याचे दिसून आले शासनाच्या नियमानुसार प्राथमिक शाळा सुरू आहेत त्यांनी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू शाळेला भेट दिली व पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अभ्यासाबद्दल सुसंवाद साधला असता त्यांना विद्यार्थ्यांची प्रगती, शालेय शिस्त, सोशल डिस्टन्स चे नियम काटेकोरपणे वापरलेले आढळून आले.शाळेचे केंद्रमुख्याध्यापक  अजितकुमार पाटील यांनी शाळा सुरू असलेबद्दल सोशल डिस्टेंनसनुसार वर्गाचे तासीकांचे नियोजन,वेळापत्रक,ऑनलाईन विद्यार्थी, ऑफलाईन विद्यार्थी, परिपाठ नियम शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्यानुसार कसे केले आहे त्याची माहिती उपायुक्त साहेबांना दिली. इयत्ता पाचवीच्या वर्गाचे निरीक्षण केले व पाचवी स्कॉलरशिप संदर्भात विद्यार्थ्यांच्या मराठी, गणित या विषयावर एकदम सोप्या भाषेमध्ये सुसंवाद साधला असता समाधान वाटले.उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी विद्यार्थ्यांचे मराठी शुद्धलेखन, इंग्रजी शुद्धलेखन व विद्यार्थ्यांची तयारी त्यांना चांगली वाटली त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी प्रशासनाधिकरी एस के यादवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व  शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी त्यांनी मार्गदर्शन असल्यामुळेच शैक्षणिक प्रवाहामध्ये अपडेट आहोत असे मनोगत व्यक्त केले. उपायुक्त साहेबांनी शाळाबद्दल स्वच्छता,शिक्षक आयडेंटि,मास्क, टापटीपपणा, वर्ग नियंत्रण, याबद्दल मुख्याध्यापक व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांचे अभिनंदन केले.मराठी शुद्धलेखन बद्दल निखिल सुतार,केदार चौगले, कल्पना मैलारी,जान्हवी ताटे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 शाळेचे सेवक हेमंतकुमार पाटोळे, ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव, आसमा तांबोळी, तमेजा मुजावर, सुजाता आवटी, शिवशंभू गाटे, विद्या पाटील, इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

Thursday, 4 February 2021

हेरले ( ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.4/2/2021
                                               सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस ठाणे हातकणगले यांच्या नावे  हेरले ( ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपसरपंच राहूल शेटे यांनी नायब  तहसिलदार दिगंबर सानप यांना दिले.
    लेखी निवेदनातील आशय असा की, कोल्हापूर - सागली रोडवर हेरले गांवामध्ये जाण्यासाठी गावभाग व माळभाग येथून आत जाण्यासाठी रस्ता आहे.त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे. परंतु त्याच्यावर पांढऱ्या कलरने रंगवले नाही त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. दि.१ ते ३१ जानेवारी  २०२१ या एक महिन्याच्या कालावधीत लहान- मोठे एकुण १२ अपघात झाले आहेत. त्यामध्ये हेरले गावातील दोन व्यक्ती मयत झाले आहेत. तर १५ व्यक्तीना गंभीर इजा पोहचली आहे . म्हणून आम्ही खालील बाबींची मागणी करत आहोत.स्पीड ब्रेकरचा फलक लावणे,गाव असले बदल फलक लावणे,वेग मार्यादाचा फलक लावणे,रेड लाईट रिफ्लेक्टर बसवणे, माळभाग व गावभाग या दोन्ही बस थांबा ठिकाणी निवारा शेड उभारने,आपल्या हाद्दीतील अतिक्रमण काढणे आदी या वरील मागण्यांचा विचार करून दहा दिवसात पुर्तता करावी व अपघात टाळण्यास मदत करावी. अन्यथा  १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा उपसरपंच राहूल शेटे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
          लेखी निवेदन नायब तहसिलदार दिगंबर सानप यांना देतांना उपसरपंच राहुल शेटे,शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस मुनिर जमादार,माजी उपसरपंच संदीप चौगले,ग्रा पं सदस्य मज्जीद लोखंडे,बटुवेल कदम,राजू खोत व सतीश कुरणे आदी मान्यवर.

         फोटो 
हातकणंगले नायब तहसिलदार दिगंबर सानप यांना लेखी निवेदन देतांना मुनिर जमादार उपसरपंच राहूल शेटे व इतर मान्यवर