हेरले / प्रतिनिधी
हेरले गावांमध्ये जनकल्याणासाठीच या संस्थेची स्थापना झाली आहे. या जनकल्याण पतसंस्था रूपी छोट्या रोपट्याचे ग्रामस्थ व सभासद आदी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या वटवृक्षात निश्चीत रूपातंर होईल असे मत माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हेरले या नुतन पतसंस्थेचे उद्घाटन माजी सभापती राजेश पाटील व संस्थेचे मार्गदर्शक सपोनि अस्लम खतीब यांच्याहस्ते संपन्न झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचेअध्यक्ष माजी सभापती राजेश पाटील ,या संस्थेचे मार्गदर्शक सपोनि अस्लम खतीब,माजी उपसभापती अशोक मुंडे, प्रा. राजगोंड पाटील, संस्थेचे चेअरमन निलोफर खतीब, व्हा चेअरमन विजय भोसले,छत्रपती शिवाजी सहकारी सोसायटीचे चेअरमन उदय चौगुले, व्हाईस चेअरमन कपिल भोसले, सुनील खोचगे, जनकल्याण पतसंस्थेचे संचालक संजय खाबडे, नितीन परमाज, रमजान देसाई, समीर नायकवडी, जाफर बिचकते, राजकुमार चौगुले, अर्चना कोळेकर, प्रशांत माळी, हबीब मिर्झाई, आदी मान्यवररासह गावातील नागरिक, संस्थेचे सभासद उपस्थित होते.
फोटो
हेरले : जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हेरले या नुतन पतसंस्थेचे उद्घाटन करतांना माजी सभापती राजेश पाटील व संस्थेचे मार्गदर्शक सपोनि अस्लम खतीब व अन्य मान्यवर