** कोल्हापूर प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११, कसबा बावडा कोल्हापूर च्या शाळेच्या 151 वर्धापन दिनानिमित्त डी सी कुंभार साहेब बोलत होते. शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871 आहे त्यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेविका माधुरीताई लाड होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी डी सी कुंभार साहेब होते .कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास माधुरी ताई लाड यांनी हार घालून सुरुवात झाली.
प्रमुख मान्यवरामध्ये भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले सामाजिक कार्यकर्ते शामराव पाटील तसेच बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव ,मुख्याध्यापक शिवराज नलवडे व प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी इत्यादी होते.
शाळेतील विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा,भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, महाराष्ट्र सभा हिंदी परीक्षा, कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष माधुरीताई लाड बोलताना म्हणाल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेऊन आपल्या बावड्याचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले .
प्रशासन अधिकारी डी सी कुंभार यांनी शाळेचे डिजिटल युगाचा वापर विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी करावा व आपले ज्ञान अद्यावत ठेवावे जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शंका मनात राहणार नाही त्याबद्दल जागृत राहावे असे आवाहन केले .
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये शाळेच्या गुणगौरव म्हणून झालेल्या 151 वर्षाच्या इतिहासातील डॉक्टर,वकील, इंजिनिअर, आदर्श शेतकरी, आदर्श व्यवसाय,नगरसेवक,यशस्वी उद्योजक, आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक विविध क्षेत्रात चमकलेले विद्यार्थ्यांनी शाळेसाठी योगदान दिलेले आहे असे उज्वल परंपरा त्याने आपल्या स्वागत प्रास्ताविकांमधून सांगितले.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले यांनी विद्यार्थ्यांच्या साठी 111 वह्या दिल्या
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार ,नीलम पाटोळे ,दिपाली चौगले ,राजू लोंढे ,उपाध्यक्ष अनुताई दाभाडे ,उत्तम कुंभार, उत्तम पाटील,सुशील जाधव,तमेजा मुजावर, आसमा तांबोळी, विद्या पाटील, हेमंतकुमार पाटोळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना मैलारी व जान्हवी ताटे यांनी केले आभार सुशांत पाटील यांनी मांडले.