पत्रकार शामराव पाटील यांचा होणार गुणगौरव
कोल्हापूर /प्रतिनिधी
अनुबोध प्रकाशन संचलित मासिक अनुबोधच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त छ.शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ञ यशवंत थोरात यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम माजी आमदार बजरंग देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपादक मिलिंद प्रधान यांनी यावेळी दिली. वर्धापन दिनाच्या औचित्य साधून काही संस्था व काही व्यक्तींना गुण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रम गारगोटी येथील शाहू वाचनालयात 16 मे 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.
डॉ. अस्मिता प्रधान लिखित कोरोना आणि भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्य मीडिया पुरस्कारासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन खडकी पुणे (सामाजिक बांधिलकी विभागांतर्गत) शाहू वाचनालय गारगोटी (शताब्दी वर्ष पूर्ण केले) पत्रकार प्रा. शामराव पांडुरंग पाटील यांनी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ,संभाजी यादव यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात येणार आहे.
भुदगडच्या तहसीलदार अश्विनी वरुटे, राधानगरी गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, गडहिंग्लजचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, गगनबावडाचे गटविकास अधिकारी माधुरी परीट, गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी शरद मगर, चंदगड चे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई, विश्वस्त पल्लवी कोरगावकर, गारगोटी चे सरपंच संदेश भोपळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.