हेरले / प्रतिनिधी ) मौजे वडगांव येथील बारकी पाणंद रस्त्यावर भुयारीमार्ग करावा आशा मागणीचे निवेदन मौजे वडगांव ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम . हसन मुश्रीफ व खास . धैयशिल माने यांना दिले .
नागपूर रत्नागिरी या नविन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पण हा रस्ता करत असतांना शेतकऱ्यांच्या आडचणीचा विचार नकरता काम सुरू असून मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील बारकी पाणंद म्हणून प्रसिध्द असणऱ्या व गावातील सातशे ते आठशे एकर क्षेत्र आसणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणंद रस्त्याचा वारंवार वापर करावा लागतो .
गावच्या गायराण व पाझर तलावाकडे जातांना गावातील शेतकरी जनावरे चरणेसाठी, शेतातील गोठ्यावर धारा काढणेसाठी, शेतींची मशागत करणेसाठी ' दिवस व रात्रीचे शेतीपिकांना पाणी पाजणेसाठी, तसेच रोजंदारीवर काम करण्यासाठी लागणारे शेतमजूर, ऊस वाहतूकीचे ट्रॅक्टर , या सर्वांना याच पाणंद रस्त्यांचा वापर करावा लागतो. तसेच गेल इंडिया , HPCL व BPCL यासारखे शासनाचे मोठे प्रोजेक्ट गायरान मध्ये आसल्याने जाणेयेणेसाठी याच पाणंद रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडणे धोकादायक होऊ शकते . तसेच या आगोदर रस्ते प्रकल्प अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केला आहे . त्यामुळे या पाणंद रस्त्यांवर भुयारी मार्ग करणे अत्यंत्य गरजेचे आहे अशी मागणी ग्रा पं . शिष्टमंडळाने केली . यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी दिपावली नंतर केंद्रिय रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणार आसल्याचे आश्वासन दिले .
या शिष्टमंडळामध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले , प्रकाश कांबरे , आनंदा थोरवत, अमोल झांबरे , अमर थोरवत, उपस्थित होते .
फोटो
भुयारी मार्गासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देतांना मौजे वडगाव ग्रां पं . चे शिष्टमंडळ