प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये माजी नगरसेविका माधुरी लाड सुभाष बुचडे संदीप नेजदार,सचिन चौगले, सुनील पोवार,अशोक जाधव ,अनिकेत चौगले,सद्दाम मुजावर, निशिकांत कांबळे व केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त च्या वह्या वाटप करण्यात आल्या .
प्रसंगी शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे.मंदिरामध्ये मनोभावे ज्ञानसाधना करावी .आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात त्यांचे विचार संस्कार चांगले शिकून मोठे व्हावे व देशाची सेवा करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना नगरसेविका माधुरी लाड यांनी केले.
शिक्षक हेच खरे समाजाचे शिल्पकार आहेत त्यांच्या गुणवत्तेचा फायदा पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले .
महाराष्ट्र राज्य शासकीय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये शिवम शिवतेज बाजारी हा जिल्ह्यात पंचविसावा आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते वर्ग शिक्षिका आसमा तांबोळी ,प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय विद्यार्थी आल्याबद्दल वर्गशिक्षिका विद्या पाटील, तमेजा मुजावर, मिनाज मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल वर्गशिक्षक उत्तम पाटील, सुशील जाधव, उत्तमराव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी शैक्षणिक धोरणाला न्याय द्यायचं काम आमचे शिक्षक अहोरात्र करत आहेत त्यासाठी पालक व शिक्षक एकमेकांच्या जुटीने सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत यांचे श्रेय संपूर्ण पालक व शिक्षक यांना आहे कारण शिक्षक व पालक यांच्या समन्वयनातूनच एकविसाव्या शतकाला न्याय देणारा जो उद्याचाआदर्श नागरिक आहे तो विद्यार्थी सक्षम बळकट आणि कार्य कुशल बनणार आहे असे मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा उपक्रम अंतर्गत झाडांचे वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली त्यासाठी दिपाली यादव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, दीपाली चौगले, अनुराधा गायकवाड, शितल पाटील, राहुल भोसले, अभिजित जाधव,आनंदा करपे,मयूर दाभाडे,बजरंग रणदिवे, नीलम पाटोळे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील उपमुख्याध्यापिका सावित्री काळे, हेमंतकुमार पाटोळे माता पालक संघाचे सदस्य यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आभार सुनील पोवार यांनी मांनले.