हेरले /प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर तर्फे प्रशिक्षणात महिला बांबू कारागिरांचे समुह संघटन, क्षमता बांधणी व कौशल्य विकास आदी कौशल्याची प्रशिक्षणामध्ये सुरुवात झाली.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, चंद्रपुरचे संचालक अशोक खडसे यांनी हे प्रशिक्षण मंजुर केले आहे. १५ दिवसाचे प्रशिक्षण सत्र असून या प्रशिक्षणात आकाशकंदिल, टेबल लॅंप, भिंत्तीचित्रे, फुलदाणी, पेन होल्डर, राखी इत्यादी विविध बांबुच्या कलावस्तुचे प्रात्यक्षिक घेतले जाईल अशी माहिती अजित भोसले, समन्वयक , महाराष्ट्र बांबु विकास मंडळ, नागपूर यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी सामुहिक सुविधा केंद्र ( बांबु ) भुईंज, ता. वाई, चे व्यवस्थापक व पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था , वाईचे तज्ञ बांबु हस्तकला प्रशिक्षक, प्रवीण सोनवले या प्रशिक्षणार्थींना बांबु लहान आकाराच्या विविध रंगातील पट्ट्यांचे विणकाम करणे व त्यापासुन विविध हस्तकला वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणासाठी महिलांचे समुह संघटन यशस्वीरित्या
हेरले येथील अभिजीत सपाटे यांनी केले असुन एकूण ३२ महिलांची निवड प्रशिक्षणासाठी केली आहे. प्रशिक्षणानंतर या महिला कारागिरांना सामुहिक सुविधा केंद्र, भुईंज ( वाई) मार्फत बांबू पट्ट्या विविध आकाराच्या व रंगाच्या पुरवठा करण्याचे काम करेल तर कारागिरांनी तयार केलेल्या बांबुच्या कला वस्तु विकत घेणे व त्याची विक्री करणे यासाठी पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था वाई प्रयत्नशील राहील असे प्रवीण सोनवले यांनी सांगितले.
हेरले येथे प्रथमच बांबू हस्तकला प्रशिक्षण मंजुर केल्याबद्दल सोनवले व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब यांनीही या प्रशिक्षणाच्या उद्घाटनानंतर सांगितले कि, हेरले येथे बांबू हस्तकला निर्मितीसाठी वाव असून या उपक्रमातुन स्थानिक रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त केली. या प्रसंगी
कोल्हापूर बुरुड समाजाचे अध्यक्ष जयवंत सोनवले, समाजातील सदस्य शाम सपाटे, धनंजय सुर्यवंशी, तानाजी सुर्यवंशी,सूरज पाटील प्रशिक्षण सत्राच्या उदघाटनास उपस्थित होते.
फोटो
हेरले: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर यांचे
प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी चर्चा करतांना मान्यवर.