प्राथमिक शिक्षण समिती संचालित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा डॉ राजेंद्र भोईसाहेब, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी श्री आर व्ही कांबळे साहेब,शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी ,बाळासाहेब कांबळे ,उषा सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये मध्ये आनंददायी शनिवार इंस्पायर अवॉर्ड ,सक्सेस स्टोरी उपक्रम, जीवन शिक्षण अंक, यशोगाथा व इतर विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते चर्चासत्रामध्ये कुमार पाटील, माधवी सौदलगे, सरदार पाटील मुख्याध्यापक विजय कुरणे इत्यादींनी आपली मते मांडली
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, भावनिक कौशल्य विकसित करणे, ताणतणाव व्यवस्थापन करणे, संभाषण कौशल्य विकसित करणे आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे व विद्यार्थ्यांसी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यास सहकार्य वृत्ती,नेतृत्व गुण अंगी येण्यासाठी त्यास खेळाच्या माध्यमातून कृतिशील अध्यायनातून आनंददायी शिक्षण देऊन आत्मविश्वास निर्माण करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे महत्वाचे आहे. सामाजिक बांधिलकीतून समाजसेवा श्रमदान करणे, पर्यटन, लोकशाहीची मूल्ये ,माहिती तंत्रज्ञान पर्यावरण या शिक्षणातून एक भारताचा आदर्श असा एकविसाव्या शतकातील आव्हान पेलणारा आदर्श नागरिक घडणार आहे.विद्यार्थी स्वावलंबी बनवणे हीच खरी पालक व शिक्षक यांची कसरत आहे प्रतिपादन डॉ अजितकुमार पाटील यांनी प्रतिपादन केले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी उत्तम कुंभार, आसमा तांबोळी, कमलाकर काटे,बालाजी मुंडे,दीपाली यादव,दिपमाला ओतरी,अनिल सरक,मोहन पाटील,सातप्पा पाटील, शिवशंभू गाटे, विद्या पाटील,तानाजी पाटील,छाया पोवार,व इतर मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षक मित्र उपस्थित होते.
नवीनच ऑनलाईन पोर्टल शिक्षक भरती होऊन आलेल्या शिक्षकांचा सत्कार मुख्याध्यापिका विमल जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.
आभार मुख्याध्यापक विजय कुरणे यांनी मानले.