कोल्हापूर / प्रतिनिधी
सर्व शासकिय व निमशासकिय कर्मचारी संघटनांच्या समन्वयाने व सहभागाने शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी उतरणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन सभागृहामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुक्त बैठकीमध्ये सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
मागील दहा वर्षात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारे चालू असलेला लढा सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशा निर्णायक वळणावर १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोरदार आक्रोश व्यक्त करण्यासाठी शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर ती महाराष्ट्रात सुद्धा लागू झाली पाहिजे. या मागणीसाठी जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी या महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवारी १७ रोजी १२ वाजता टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा निघेल.
या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, एम. जी. पाटील, आर. डी. पाटील, शिवाजीराव भोसले, विनोद पाटील, मनोहर जाधव, मारुती फाळके,मंगेश धनवडे, संतोष गायकवाड, सुदेश जाधव, अमर वरुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर: शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शेजारी दादासाहेब लाड, एस.डी. लाड, राहूल पवार, आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे आदी मान्यवर