राजर्षी शाहू विद्या मंदिरात वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील मॅडम , प्राथमिक शिक्षण समिती शैक्षणिक पर्यवेक्षक श्री बाळासाहेब कांबळे ,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा, एम एस टी एस ,समृद्धी परीक्षा या परीक्षेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व शहर विभागात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा माननीय उपायुक्त साधना पाटील मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे व विजय माळी,रणजित नावडे सर यांच्या हस्ते भाषा गणित इंग्रजी कला अशा विविध विषयांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. उपायुक्त मॅडम यांनी मुलांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व मुलांच्या यशाचे कौतुक केले. पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील मॅडम यांनी केले व आभार ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सर यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी डॉ अजितकुमार पाटील उत्तम कुंभार उत्तम पाटील मिनाज मुल्ला ,आसमा तांबोळी तमेजा मुजावर, विद्या पाटील, दिपाली यादव, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, बालवाडी मुख्याध्यापिका, कल्पना पाटील ,सेविका सावित्री काळे ,सेवक हेमंतकुमार पाटोळे,भारत स्काऊट गाईड, माझी वसुंधरा विद्यार्थी व आदि उपस्थित होते.