उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
शासन, प्रशासन, सामाजिक संस्था सर्वांनी काळजी घेवूनही शेवटी लातूर जिल्ह्यात उदगीर शहरामध्ये कोरोना विषाणूचा रुग्न आढळला आहे. जिल्हा परिषद लातूर परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. नागरिकांनी नियमांच्या बंधनात स्वतःला अडकावून घ्यायला पाहीजे, विनाकारण रस्त्यावर फिरु नका तर धोका अटळ आहे.आरोग्य विभागपोलीस विभाग,दिवसरात्र नागरिकांच्या सेवेत आहेत. भाजीपाला जेवनासाठी अत्यावश्यक असेलही पण बाबांनो तुमचा जीव त्यापेक्षा अत्यावश्यक आहे त्यामूळे घरीच रहा विनाकारण कोरोणाचे पार्सल बनू नका असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल भैय्या केंद्रे यांनी केले आहे.अमेरिका,चिन इटली,स्पेन,फ्राँस अशा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या देशात कोरोणा या आजाराणे अनेक रुग्नाना मृत्यु कवटाळत आहे. आपण असेच गाफील राहीलो तर शासन,प्रशासन काहीच करु शकणार नाही. आपले शासन व प्रशासन आपल्या काळजीपोटी रात्रीचा दिवस मेहणत करत आहे.प्रशासनाला सहकार्य करा, त्यांच्या सुचनाचे तंतोतंत पालन करा, स्वतःचे व इतरांचे जीवन धोक्यात घालू नका,अन्यथा कडक कारवाई करुन बेजबाबदार वागण्याला आळा घालावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.कोरोना बाधित महिलेबद्दल अधिक माहीती घेतली जात आहे.सदरिल महिलेल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतः पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे व साखळी तयार होणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकांवर यशस्वी उपचार होत आहेत त्यामूळे विनाकारण काळजी करू नये, आरोग्य विभाग आपल्यावर योग्य उपचार करण्यासाठी सज्ज आहे. अफवा करु नका किंवा अफवेवर विश्वास ठेवू नका असेही केंद्रे यांनी सांगितले आहे.
.................................................
गुजरातवरुन प्रवासाची प्राथमिक माहिती
सदरील कोरोणा बाधित महिलेची प्रवास गुजरात ते उदगीर असल्याची प्राथमिक माहिती येत असून यावर तपास सुरु आहे. परंतु,एकटी वयोवृध्द महिलेने राज्यबंदी, जिल्हाबंदी,नाकाबंदी असताना गुजरातपासून उदगीर पर्यंत प्रवास केला असेल का..? त्या महिलेसोबत इतर प्रवाशी होते.? हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याचा लवकर तपास व्हावा व संपर्कात आलेल्या सर्वांना आरोग्य उपचारासाठी दाखल करावे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रत्येक गावात पुन्हा एकदा बाहेरुन आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.