माजगाव प्रतिनिधी: बाजीराव कदम. शिक्षण विभाग (प्राथमिक)जिल्हा परिषद कोल्हापूर प्रज्ञा शोध परीक्षा सन 2019-20 इयत्ता 7 वी निवड परीक्षेत कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे.ता.पन्हाळा. जि. कोल्हापूर ची विद्यार्थिनी कु.साक्षी महादेव चौगुले 200 पैकी 162 गुण मिळवून पन्हाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.तिने हे यश अतिशय प्रतिकुल परिस्तितीमध्ये मिळवल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल तिचे शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ व विद्यार्थी या सर्वांच्या तर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले.
तिला पन्हाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. आकुर्डेकर, मुख्याध्यापक श्री. नरहरी पाटील.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रामराव चेचर.शाळेतील अध्यापक श्री.गणपती मांडवकर.श्री कृष्णात कोरे.श्री कांशीराम जाधव.श्री. आंनदा डाकरे. श्री. प्रकाश पोवार. श्री. नामदेव पोवार. सौ.चौगुले.श्री. बाजीराव कदम.यांचे मार्गदर्शन लाभले.