Friday, 31 July 2020

मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील बालावधूत हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९२.९५ टक्के

हेरले / प्रतिनिधी
दि.31/7/20

    मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील बालावधूत हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९२.९५ टक्के  लागला.
    बालावधूत हायस्कूल मधील साक्षी तानाजी थोरवत हिने ( ९६.२०) टक्के  गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर साक्षी संभाजी मगदूम हिने ( ९४.४०) टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तुषार तानाजी घुगरे याने (८९.२०) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
          यशस्वी विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्ष बी .बी.कराळे , सचिव एस् .एस्. चौगुले , माजी मुख्याध्यापक व संस्थापक सचिव एस .एस. चौगुले , मुख्याध्यापक एस .ए. चौगुले , संस्थेचे सर्व पदाधिकारी व  सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .

Thursday, 30 July 2020

शिक्षक भारती संघटना नंदुरबार च्या जिल्हाउपाध्यक्ष पदी महेश नांद्रे, संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सुर्यवंशी यांची निवड*


*नंदुरबार  - ( प्रतिनिधी  - वैभव करवंदकर  ) - - - - -*           नंदुरबार येथील 
शिक्षक भारती या संघटनेच्या नंदुरबार  जिल्ह्याच्या कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश नांद्रे , संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सूर्यवंशी यांची एक मताने निवड करण्यात आली.                                 
   जिल्हाध्यक्ष राहुल पाटील व कार्याध्यक्ष आशिष दातीर यांच्या सहिने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
         महेश नांद्रे, तुषार सोनवणे, पुष्कर सुर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन,विनाअनु, शाळा,अतिरिक्त शिक्षक, जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जुनी पेंशन, विनाअनुदानित शाळांना अनुदान, अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लागावे यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात ते नेहमी  सहभाग राहिला आहे. ह्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न ते संघटनेचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांच्या मार्फत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिक्षक भारती संघटनेचे नंदुरबार  जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, इकबाल शेख उमर आशिष दातीर, राजेश जाधव, सतिष मंगळे, गोरख पाटील, संजय पाटील, असंख्य शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

डोंगरशेळकी येथे नऊ घरांचा परिसर सिल.



उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे बुधवारी  एक रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने नागरीकामध्ये खळबळ उडाली खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदरील भाग पंधरा दिवसांत पर्यंत 9 घर आणि 48 नागरीकांना  कन्टेनमेंन्ट झोन म्हणून जाहीर केले आहे तसेच या कन्टेनमेंन्ट झोनमधील नागरिकांना आवश्यक उपाययोजना याची माहिती तपासणी व आढावा आज गुरूवारी  प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणा चे वैद्यकीय अधिकारी डाॅ कानवटे मॅडम यांनी भेट देऊन पहाणी  केले.गावातील सर्व नागरिकांनी घराबाहेर न पडता आप आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, विणाकारण घराबाहेर पडू नये,तसेच बाधित क्षेत्रातील सर्व नागरिकांना ही काळजी घ्यावी,घाबरून जाऊ नये असे आवाहन डाॅ.कानवटे मॅडम यांनी केले आहे.यावेळी सपोनि बाळासाहेब नरवटे यांनी ही पहाणी करून सदरील भागात बॅरेकेट लावले आहेत प्रशासनाच्या वतीने योग्य उपाययोजना केल्या आहेत यावेळी तलाठी दत्ता मोरे,पोलीस पाटील भालचंद्र शेळके,ग्रामसेवक आलेवार मॅडम, बाबुराव मुंडे,अभंग मुंडे,प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचा आरोग्य सेविका, आश्या कार्यक्रत्या उपस्थित होते

सैनिक टाकळी छ. शिवाजी हायस्कूलचा एस एस सी परीक्षेचा निकाल ९६.९७ %

सैनिक टाकळी प्रतिनिधी
येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल चा  मार्च 2020 मध्ये झालेल्या  एस एस सी परीक्षेचा निकाल ९६.९७% इतका लागला आहे यामध्ये गणेश अरुण चव्हाण या विद्यार्थ्याने 94 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर विशाखा विनोद पाटील ८२.६०% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला राधिका धोंडीराम सुतार या विद्यार्थिनीला ८१ % सानिका  दादासो पाटील ही ८०.२०% टक्केवारी मिळवून चौथ्या क्रमांकाने पास झाली याच बरोबर केतकी सुनील कानिटकर  हिने ८० टक्के मार्कस मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक विषय शिक्षक पालक  यांचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेरले हायस्कूलचा दहावीचा निकाल १००% टक्के



हेरले  / प्रतिनिधी
दि. ३o /७ /२०
   हेरले हायस्कूल हेरले ( ता. हातकणंगले) येथील दहावीचा निकाल १००% टक्के लागला आहे. 
    कु.जुयेरा इलाई खतीब हिने  मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेत( ९१.०० )टक्के गुण घेऊन विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकवला.गुणानुक्रमे इतर विद्यार्थी मध्ये द्वितीय कु.सानिका सुनील  पाटील (९०.४० ) टक्के,कु. प्रणिता नंदकुमार जाधव (९०.४० ) टक्के,  तृतीय कु कल्याणी सुरेश कराळे (८८.२० ) टक्के गुण मिळविले.
            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने,मुख्याध्यापक  आर. एस. पाटील आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वर्गाचे मार्गदर्शन लाभले

गांधीनगरमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

एस. एम. वाघमोडे
गांधीनगर :  प्रतिनिधी 
गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून 2 लाख 56 हजार 850 रुपयांचा गुटका जप्त केला. मुलचंद बाशूमल निरंकारी (वय 61, रा. शिरू चौक गांधिनगर) व मनीष लखीराम वधवा (वय   24, रा. कोयना कॉलनी, गांधिनगर) अशी दोघा अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर  यांनी दिली.
गांधीनगर पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना ट्रान्सपोर्ट लाईनला गुटका आनून तो विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस कर्मचारी कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूस गेले. तेथे असलेल्या गाळ्यात निरंकारी व वधवा या दोघा जणांसह गुटका मोठ्या प्रमाणात आढळून आला. अन्नसुरक्षा व मानद कायद्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 56 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छापा टाकलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मलमे, हवालदार मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, अशोक पवार, बालाजी हंगे व संजय कोल्हे यांचा समावेश होता. 

साके ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण


साके प्रतिनिधी ः सागर लोहार 

साके ता,कागल येथील ग्रामपंयातीमार्फत गावात वृक्षांचे रोपन साके-सावर्डे रस्ता ,ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात महिला संरपंच सैा.शिला तानाजी चैागले यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक  शुभांगी पुरेकर यांनी गावातील शेतकरी महिलांना सोबत घेवून गावात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून शेकडे जंगली वृक्षांची लागवड केली असून या वृक्षांचे संगोपण देखील चांगले करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी आरोग्य विभागाच्या एस आर तब्बलजी, शेतकरी महिला महिला सारिका चौगले, सविता चौगले, आक्कताई गिरी ,सुरेखा चौगले पुनम चौगले  तानाजी चौगले,मारुती पाटील,तेजस्विनी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.


फोटो  ः साके ग्रामपंयातीमार्फत वृक्षारोपण करतांना सरपंच सैा.शिला चैागले, एस.आर.तबलजी,ग्रामसेविका शुभांगी पुरेकर सारिका चैागले आदी.महिला  छाया ः सागर लोहार,साके

बेलवळे खुर्द येथे शिवसेनेमार्फत वृक्षारोपण


साके प्रतिनिधी ः सागर लोहार 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,शिवसेना पक्षप़मुख मा उध्दव  ठाकरे , शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव  देवणे याच्या वाढदिवसादिवसाचे औचित्य साधून  शिवसेने मार्फत कागल तालुका प़मुख मा अशोक पाटील यांच्या हस्ते   बेलवळे खुर्द  ता.कागल  येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी बेलवळे,सावंतवाडी डोंगराळ परिसात व रत्याच्या दुतर्फा निलगीरी,फणस,आंबा,जांभूळ आदी जंगली शेकडो वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.   यावेळी उपस्थित शाखाप्रमुख पी एम पाटील, मारुती पाटील,  विशाल पाटील ,अभिजीत पाटील, अक्षय पाटील,आजिंक्य पाटील, समिर पाटील , विनायक पाटिल ,धनाजी पाटील, प्रथमेश पाटील, ओंकार पाटील, सजंराव पाटील ,वैभव डोगळे ,महेश डोगळे ,अमित कांबळे आदी उपस्थीत होते. 


फोटो  ः बेलवळे खुर्द येथे वृक्षारोपण करतांना तालुकाप्रमुख अशोक पाटील , पी.एम.पाटील,अभिजीत पाटील,सर्जेराव पाटील,वैभव पाटील आदी.

वृक्षलागवडी बरोबरच संगोपन देखील महत्वाचे ः संजय घाटगेकेनवडे गायराण परिसरात अन्नपुर्णा संस्थेमार्फत 500 वृक्षांचे रोपण


साके प्रतिनिधी   ः सागर लोहार 

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध संघटाना दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड करतात. त्यामुळे जंगलांची संख्या वाढण्यास मदत होते. पण फक्त वृक्ष लागवड करण्यापेक्षा लावलेल्या रोपांचे संगोपणाची जबाबदारी देखील घेणे गरजेचे असून आज पर्यंत संस्थेमार्फत केलेल्या रोंपांची देखभाल चांगली केल्याने समृध्दी दुध प्रकल्पा प्रमाणेच या गायरानात देखील वृक्षांची संख्या वाढवणार असल्याचा ठाम विश्वास माजी आमदार संजय घाटगे यांनी व्यक्त केला. 
अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था साके,व्हनाळी,केनवडे गोरंबे या संस्थेमार्फत केनवडे येथील गायरान गटनंबरमध्ये आयोजित 500 वक्षांच्या लागवडी प्रसंगी ते बोलत होते. 
सहाय्यक निबंधक संस्था कागल यांचे जा.क्र.127/वृक्षलागवड/उदिष्ठ सुचनेनुसार 500 झाडांचे वृक्षारोपण करणेचे उदिष्ठ देणेत आले होते त्यानुसार संस्थेच्या कमांड एरिया मधील मैाजे केनवडे गायरान मध्ये 500 रोपांचे वृक्षारोपण संस्थेचे चेअरमन मा.आम.संजयबाबा घाटगे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव आकाराम बचाटे,  संचालक विष्णूपंत गायकवाड,साताप्पा तांबेकर,विश्वास पाटील,विलास पाटील,रघुनाथ पाटील,नामदेव पाटील, तुकाराम पाटील, अशोक पाटील आदी उपस्थीत होते. 


फोटो  ः केनवडे ता.कागल येथील गायरानात अन्नपुर्णा संस्थेमार्फत वृक्षारोपन करतांना मा.आम.संजय घाटगे, विष्णूपंत गायकवाड,रघुनाथ पाटील,आदी  छाया ः रघुनाथ पाटील,गोरंबे

Wednesday, 29 July 2020

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलीत वडगाव विद्यालय चा दहावी मार्च२०२०च्या बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.०१ टक्के

हेरले / प्रतिनिधी
दि.३०/७/२०
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलीत वडगाव विद्यालय( ज्युनि कॉलेज/ तंत्र शाखा) वडगावचा दहावी मार्च२०२०च्या बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.०१ टक्के लागला.
         वडगाव विद्यालयामधील एसएससी मार्च २०२०परीक्षेस एकूण  २०२ विद्यार्थी बसले होते.पैकी
१९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयामधील अनुक्रमे यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक कु.नम्रता गावडे(९७.८०),द्वितीय क्रमांक कु. प्रसाद भोरे(९२.२०) ,तृतीय क्रमांक कु. काजल संकपाळ(९१.८०) यांनी यश संपादन केले.टेक्निकल विभागामध्ये ओंकार मेथे याने ८९ टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला.मागासवर्गीय मुला मुलीत प्रथम क्रमांक कु.नम्रता सुरेश गावडे(९७.८०) हिने पटकाविला.सेमी इंग्रजी वर्गाचा निकाल १००% लागला आहे.टेक्निकल विभागाचा निकाल १००%,संस्कृत वर्गाचा निकाल  १००% लागला आहे.
      ७५ टक्केपेक्षा जास्त गुणांनी विशेष प्राविण्य -७४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.६o टक्केपेक्षा जास्त गुणांनी प्रथम श्रेणीमध्ये -८९ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, ५० टक्केपेक्षा जास्त गुणांनी द्वितीय श्रेणीमध्ये -३५ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. 
     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई ,उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, पेट्रन कौन्सील मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी डॉ.मंजिरी देसाई ,कौन्सील मेंबर बाळासाहेब डेळेकर, शाळा समिती चेअरमन प्रविता सालपे आदींची प्रेरणा लाभली.  विद्यालयाचे प्राचार्य आर आर पाटील उपमुख्याध्यापक एस डी माने, पर्यवेक्षक डी के पाटील, तंत्र विभाग प्रमुख अविनाश आंबी, कार्यवाह के बी वाघमोडे आदी पदाधिकारीसह शिक्षकांचे मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थ्यांना लाभले.

दहावी निकाल:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे



उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे 
दहावीच्या परीक्षेतील यशाने लातूरची गुणवत्ता पुन्हा एकदा झळाळली असून १००% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत भर घालणारा निकाल राज्याला पथदर्शक असल्याची प्रतिक्रिया लातूर जि.प.चे अध्यक्ष राहुल केंद्रे  यांनी व्यक्त केली.दहावीच्या परीक्षेत लातूर बोर्डाने मिळविलेले यश अभिनंदनीय असल्याचे केंद्रे म्हणाले.राज्यात १००% गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांमध्ये  ६२% विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत हा गौरवाचा विषय आहे.लातूर जिल्ह्याचा निकाल 96.51% असून राज्यात १००% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या 242 ,पैकी 151 विद्यार्थी लातूर विभागातील असून यापैकी 129 विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहेत.तसेच अनेक शाळांचे निकाल ९०% पेक्षा जास्त आहेत. निकालाची टक्केवारी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असून यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.विद्यार्थी,शिक्षक,पालक,संस्थाचालक,अधिकारी मुख्याध्यापक,शिक्षक या स सर्वांचे यात योगदान आहे असे जि.प.अध्यक्ष राहूलजी केंद्रे म्हणाले.  जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे,जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनव गोयल,जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती भारतबाई साळूंके,कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे,महिला व बालविकास सभापती ज्योतीताई  राठोड,बांधकाम सभापती संगीताताई घुले,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,शिक्षणाधिकारी माध्य.यांनी जि,प,च्या वतीने सर्वांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना विषाणू शोधण्यासाठी मोबाईल टीम सुरू करणार - डॉ.राजेंद्र भारुड

                                                                  

नंदुरबार  -   ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर )

   नंदुरबार जिल्ह्यातील कोविड 19 विषाणूचा  संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले की ,  नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत मोबाईल टिमच्या माध्यमातून कोरोना विषाणूची बाधा झालेली रुग्ण शोधण्यात मदत होणार आहे. या मोबाईल टिमच्या माध्यमातून कोरोना ची साखळी देखिल खंडित करु शकतो.                                                    नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता नागरिकांनी स्वॅब देण्यासाठी पुढे यावे. यासाठी प्रशासनाकडून दोन मोबाईल स्वॅब पथक नंदुरबार शहरासाठी तयार करण्यात येणार आहे. तालुका निहाय देखील स्वॅब घेण्याचे पथक तयार करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी   पत्रकार परिषदेत   सांगितले .                                                 नंदुरबार जिल्ह्यातील  चार शहरांमधील आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने सदरच्या संचारबंदीत काही शिथिलता देऊन सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत असे तीन दिवस सकाळी 07 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत व्यवहार व दुकाने सुरू ठेवण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी राहणार आहे. परंतु त्यासाठी नियमांचे पालन व अटी लागू असतील. नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार शहरांमध्ये सकाळी 07 ते सायंकाळी 07 या वेळेत मागील काळात दिलेल्या आदेशाप्रमाणे मुभा दिलेली दुकाने सुरू राहतील. तर प्रत्येक रविवारी लागू केलेली कडक संचारबंदी कायम असेल. तसेच अक्कलकुवा धडगाव तालुक्यात सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील.

लालपरी’ ची ओळख टिकवायची असेल तर कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे लक्ष द्या!आ.पाटणी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘    *आरिफ पोपटे* 
 कारंजा: राज्यातील एसटी कर्मचारी तसेच  त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकर्‍या तरी टिकणार का? अशा अस्थिर मानसिकतेत कर्मचार्‍यांचे कुटुंबीय जीवन जगत आहे.  महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लालपरीची ओळख टिकवायचे असेल तर कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे द्या! अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांवर इतर काम करण्याची वेळ आली आहे. लाखांपेक्षा अधिक कर्मचार्‍यांचे कुटुंबिय सध्या अत्यंत अस्थिर मानसिकतेत जगत आहे. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकर्‍या तरी टिकणार का? ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना २०१९ मध्ये एसटीच्या सेवेत सामावून घेतले त्यातील ४ हजार ५०० जणांना घरी बसविण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता ५० वर्षांवरील कर्मचार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचा घाट घातला, ही बाब दुर्देवी  असल्याचे आमदार पाटणी म्हणाले. कोरोना काळात सेवा देत असतांना ३२८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुटुंबियांना अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही.
अशा कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे अशीही मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

कोविड ऑर्डर रद्द करा शिक्षक संघाचे निवेदन.

      माजगाव प्रतिनिधी :-
          आज दिनांक 27/7/2020 रोजी राज्याध्यक्ष मा श्री राजारामजी वरुटे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ करवीर तालुक्याचे शिष्टमंडळ शिक्षकांचे कोविड सर्वेक्षणाच्या ऑर्डरी रद्द करण्याच्या निवेदना समवेत मा जिल्हाधिकारी साहेब, व मा सौ आशा उबाळे मॅडम शिक्षणाधिकारी जि प कोल्हापूर, यांच्याशी चर्चा घडवून आली.
           मागील 3 ते 4 महिन्यापासून आमचे शिक्षक बांधव कोविड सर्वेक्षणाचे काम एक राष्ट्रीय काम म्हणून प्रामाणिक पणे पार पाडत आहे. रविवारची पण सुट्टी न घेता अविरतपणे आरोग्य खाते जे काम सांगेल ते करत आहे. पण आता हे सर्वेक्षणाची ऑर्डर रद्द करून आमच्या शिक्षकांना online विद्यार्थ्यांशी सम्पर्क साधू देण्यासाठी मुक्त करा अशी विनंती साहेबांना करण्यात आली.
         साहेबांनीही चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 
        प्रसंगी मा श्री प्रशांत पोतदार सर, मा श्री बाजीराव कांबळे सर, , श्री मारुती दिंडे सर, सौ विद्युलता पाटील मॅडम, सौ हेमलता बनकर मॅडम, सौ शुभांगी मेथे पाटील मॅडम, हेमलता जोपळे मॅडम, श्री संतोष चिमले सर, श्री सुर्वे सर, सर्व शिक्षक संघ प्रेमी उपस्थित होते

आता देशात आयुष भारत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर मिळणार मानधन



पदाधिकाऱ्यांना मानधन देणारी देशातील पहिली मेडिकल संघटना.

सोलापूर : आता देशात आयुष भारत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर मिळणार मानधन आयुष भारत राष्ट्रीय कमिटीचा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुष भारत ची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दरमहा मानधन देण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना मानधन देण्यात येत होते, 
त्यात जिल्हाध्यक्षांचा समावेश नव्हता. पण आता राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणे जिल्हा अध्यक्षांना ही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात देशात ९३०००/- हजार रुपयांची रक्कम जिल्हा अध्यक्षांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिली. याबाबत माहिती देताना डॉ.अमीर मुलाणी म्हणाले की, देशातील डॉक्टरांच्या विकासासाठी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत ही जिल्हाध्यक्षांना ही मोठे योगदान असते. सध्या देशातील राष्ट्रीय अध्यक्षांना दरमहा मानधन मिळत आहे. पण डॉक्टरांच्या विकासासाठी कार्यरत असलेले जिल्हाध्यक्षांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पडली आहे. एकत्रित मानधन जिल्हाध्यक्षांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण देशात ९३०००/- हजार रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी सांगितले. देशात सुमारे ९८९ अध्यक्ष आज कार्यरत असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या देशातील १५७ अध्यक्षांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित अध्यक्षांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिली. 
जिल्ह्यामध्ये आयुष भारत मध्ये समावेश असणाऱ्या पैथी नॅचरोपॅथी, आयुर्वेद, सिद्धा, युनानी, हर्बल, होमिओपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंचर, इलेक्ट्रो होमिओपॅथी, अल्टरनेटिव मेडिसिन, कपिंग थेरेपी, चुंबकीय थेरेपी, cms&ed, रेकी थेरेपी, पॅरामेडिकल आणि सर्व पर्याय पैथी यामधील १००० पर्यंत डॉक्टर लोकसंख्या असलेल्या जिल्हा अध्यक्षांना दरमहा मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिली.

वृक्ष प्रेमातून पतीच्या स्मृतींना उजाळा ...

कंदलगाव - प्रकाश पाटील

    आपल्या सोबत नसणाऱ्या किंवा आपल्यातून निघून गेलेल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात जपून ठेवण्यासाठी त्यांच्या अनेक वस्तू आपण जतन करून ठेवतो. मग एखादे खेळण असो वा त्याला आवणारे पदार्थ असो आपण ते जतन करून ठेवतो.असेच पतीच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कंदलगाव शेजारील केएमटी कॉलनीमधील कांचन घोटणे यांनी त्यांचे पती रमेश घोटणे यांनी लावलेल्या वृक्षांचे त्यांच्या पश्चात संगोपन करून दारासमोरील अंगणात अनेक वृक्ष वाढविले आहेत. दिवसातील कित्येक तास त्या या वृक्षवल्लीचा सानिध्यात घालवितात. आपल्या आईचे बाबांवरील प्रेम अबाधीत होऊ नये यासाठी त्यांना मुलगा,सुन ,नातवंडे यांची साथ मिळत आहे.
    आपल्या घरातील व्यक्तीच्या पश्चात कोण चहा वर तर कोणत्यांना आवडणाऱ्या वस्तू जतन करून आपले प्रेम, आठवणी जागृत ठेवतात. आशाच प्रकारच्या आठवणी घोटणे यांनी आपल्या दारासमोरील वृक्षांत साठवून ठेवल्या आहेत. दररोज त्यांना पाणी घालणे, त्यांचे संगोपन करणे इतकेच नव्हे तर त्यांच्याशी संवाद ही साधून आपले दुःख कमी करतात. त्यांच्या अंगणातील पेरूचे झाड असो वा एखादा वेल त्यांच्यासाठी कुठूंबातील एक सदस्यच असल्याचे त्या सांगतात .
     त्यांचे पती रमेश घोटणे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले त्यांनी दारासमोरील अंगणात लावलेले नारळीचे रोप त्यांची आठवण म्हणून डोक्यावरून घागरीने पाणी घालून त्याला मोठे केले आणि आपल्या पतीच्या स्मृती जिंवत ठेवण्याचा निश्चय केला. तेव्हांपासून अंगणातीलच नव्हे तर रस्त्यावरच्याही वृक्षवेलींवर तितकेच प्रेम बसून राहिले आहे.
    घरासमोरील छोट्याशा अंगणात नारळ, पेरू, आंबा या सह भाजीपाला, फुलांची झाडे पतीच्या आठवणी म्हणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सानिध्यात दिवस कसा जातो कळत नाही. अंगणातील प्रत्येक रोपात आपली व्यक्ति आपल्या सोबत असल्याचा भास होतो. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कोट - आपल्या सोबत असलेल्या व्यक्तिपेक्षा सोबत नसलेल्यांची फार आठवण येते. माझ्या पतींचे वृक्षांवर प्रेम होते. त्यांच्या आठवणी वृक्ष संगोपनातून जिंवत ठेवत आहे .
कांचन घोटणे .

फोटो -. कांचन घोटणे आपल्या नातवंडा सोबत परस बागेत .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )

अन्यायकारक अधिसूचना रद्द करुन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुन्याच पेन्शन योजनेचा लाभ द्यावा यासाठी रस्त्यावरची आक्रमक लढाई लढण्याचा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाचा निर्धार.


हातकणंगले / प्रतिनिधी

मिलींद बारवडे

      शासनाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीत १० जुलैच्या अधिसूचनेद्वारे अनुदानित शाळेच्या व्याख्येत बदल करून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर गदा आणण्याचे कारस्थान रचले असून ही अन्यायकारक अधिसूचना रद्द करुन सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुन्याच पेन्शन योजनेचा लाभ द्यावा. अशा आशयाचे लेखी निवेदने जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार ,प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना देण्यात आली.  तसेच   यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेने केला आहे. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड होते.
      महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील  नियम २ पोटनियम (१) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या अधिसूचनेद्वारे बदलण्यात येत आहे. तसेच निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम क्रमांक १९ व नियम २० यामध्ये १० जुलै २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. वास्तविक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देय असताना शासनाने १० जुलैच्या अधिसूचनेद्वारे अनुदानित शाळेच्या व्याख्येत बदल करून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त पण अंशतः अनुदानित, विनानुदानित व कायम विनानुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
     सदरची अन्यायकारक अधिसूचना रद्द करुन सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा या मागणीसाठी मुख्याध्यापक संघाने केलेल्या आवाहनानुसार शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांनी या अन्यायकारक दुरुस्तीला विरोध व पूर्ण मसुद्यावरच हरकत घेऊन तशा स्वरूपाची पत्रे मेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री व शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पाठविली आहेत. 
     अनेक कर्मचाऱ्यांची जुन्या पेन्शन योजनेत खाती आहेत. तसेच काहींचे कोणतेही खाते नाही. यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत आता शासनाने अधिसूचनेद्वारे बदल केल्यास कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट होईल.  अनेक कर्मचाऱ्यांनी १० ते १२ वर्षे विनावेतन काम केले आहे. आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना पूर्वलक्षी प्रभावाने निर्णयात बदल करणे हा पूर्णपणे अन्याय आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुन्याच पेन्शन योजनेचा लाभ द्यावा. मागणीसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र करुन तीव्र आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाने केला आहे.
        या वेळी अध्यक्ष एस डी लाड, सचिव दत्ता पाटील, दादासाहेब लाड, प्रा. जयंत आसगावकर, बी.जी.बोराडे, भरत रसाळे,खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, सी.एम. गायकवाड, व्ही.जी. पोवार, उदय पाटील, के .के .पाटील, संदिप पाटील, काका भोकरे,  एस वाय पाटील, बी डी साळवी, शिवाजी कोरवी, एम आर पाटील, दिपक पाटील ,अजित रणदिवे, पोपटराव पाटील, शिवाजी पाटील, गजानन काटकर, राजेंद्र सुर्यवंशी, प्रकाश पाटील, पंडीत पवार ,शिवाजी माळकर, समिर घोरपडे  आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


        फोटो 
शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे  यांना लेखी निवेदन देतांना एस डी लाड दादासाहेब लाड सचिव दत्ता पाटील, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, शिक्षण निरीक्षक डी एस पोवार व अन्य मान्यवर.

Monday, 27 July 2020

दिनांक 10 जुलै 2020 ची अन्यायकारक अधिसूचना रद्द करा व 1982 ची जुनी पेंशन योजना लागू करा

               
 शिक्षण संघर्ष संघटनेने केले राज्यभर आंदोलन.

 आरिफ पोपटे - वाशिम:-                             
   महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 मधील नियम 2, पोटनियम (1) चा खंड (ब) मध्ये नमूद  अनुदानित शाळा म्हणजे ज्या "शाळेला शासनाकडून किंवा एखाद्या प्राधिकरणाकडून अनुदान मिळते अशी शाळा" असे नमूद आहे.  या व नियुक्ती दिनांकच्या आधारावर आपण शासन दरबारी व न्यायालयात दाद मागतो आहे.परंतु सदर नियमा मध्ये बदल करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांचे हक्काचे निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवण्याकरिता,व यांनी केलेली चूक लपविण्याकरिता, आता अनुदानित शाळा म्हणजे ज्या शाळेला शासनाकडून 100% अनुदान मिळते अशी शाळा अशा प्रकारचा बदल करण्याचा प्रयत्न 10 जुलै 2020 रोजी राज्याच्या शिक्षण विभागाच्या उपसचिव मा. चारुशीला चौधरी. यांनी स्वतःचे स्वाक्षरीने राज्याचे मा. राज्यपाल यांना सादर केलेल्या अधिसूचनेत (मसुधा) केलेला आहे.      
       केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर 2005 रोजी राज्याचे मा. राज्यपाल यांना सादर केलेल्या राजपत्राचे आधारे 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना अंशादाई पेंशन लागु करण्याचा निर्णय घेतला. व 29 नोव्हेंबर 2010 चे शासन निर्णयाचे आधारे सदर योजना कार्यान्वित  करण्यात आली. 
        29 नोव्हेंबर 2010 चे शासन निर्णयातील नमूद 100% अनुदानित चा अर्थ म्हणजे शासनसेवेत नियुक्त असा होता. कारण या दोन्ही योजना वेगळ्या आहे जुनी पेंशन ही नियुक्ती दिनांकावर आधारित असुन ती सेवनिवृत्तीच्या शेवटच्या वेतनावर ठरत असते, तर अंशादाई पेंशन ही नियुक्ती दिनांकाचे पहिल्या वेतनावर आधारित असते, त्याचे करिताच 29/11/2010 चे शासन निर्णयात 100% नमूद होते. परंतु शिक्षण विभागात अति बुद्धिमान उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुदानित चा अर्थ 1 नोव्हेंबर 2005 रोजी100%अनुदानित असा लावून खासगी शैक्षणिक संस्थेत नियुक्त असणारे  1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे टप्पाअनुदाना नुसार भविष्य निर्वाह निधिंची नियमित होत असलेली कपात थांबविण्यात आली. व तेव्हा पासून आजरोजी पर्यंत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व कार्यरत कर्मचारी कुठल्याही योजनेत समाविष्ट नाही.   त्यामुळे त्यांची अवस्था ही ना घर का ना घाटका अशी झाली आहे.
        
 परंतु 1नोव्हेंबर 2005 पासून आजरोजी पर्यंत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना dcps/ nps लागु करण्यासंदर्भात शासनस्तरावरून निर्णय घेण्यात आलेला नाही. याचाच अर्थ आपल्याला जुनीच पेंशन लागु आहे, असा होतो.  या स्थितीत बरेचसे कर्मचारी विनालाभ सेवानिवृत्त झाले आहेत, बऱ्याच कर्मचाऱ्यांचे अपघाती व आजाराने मृत्यू झालेले आहेत. असल्या संवेदनाहीन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कितीतरी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागलेले आहे व उर्वरितांचे मा. चौधरी. महोदया यांचे आशीर्वादाने लागणार आहेत. 
          या बाबीस शासनाचे दोन्ही घटक शासनकर्ते व शासनातील उच्च पदस्थ अधिकारी जबाबदार आहे. परंतु ही चूक शासनाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली, व ती चूक लपविण्याकरिताच आता अधिसूचना जारी केली आहे.कारण यांनी केलेल्या पापाचे खापर त्यांना शासनकर्त्यांवर फोडायचे आहे.
        1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला आज 20 ते 22 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. व dcps/nps योजना ही नियुक्ती दिनांकच्या पहिल्या वेतनावर आधारित असून त्यात शासन व कार्यरत कर्मचारी या दोघांचाही वाटा जमा होणार आहे, मग 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला जर 20/22 वर्षाचा कालावधी झाला असेल तर त्यांचा वाटा कोण भरणार ? हा प्रश्न निरुतरीत आहे.आनी यदाकदाचित सदर अधिसूचना पारित झालीच तर शासन सुद्धा अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच हे  अधिकारी शासनाला सुद्धा फसवायला मागेपुढे पाहणार नाहीत. हे  त्यांनी काढलेल्या अधिसूचनेवरून लक्षात येते.
       ही सर्व परिस्थिती आपल्या  शिक्षक प्रतिनिधिंना माहिती आहे, तरीसुद्धा आज उपरोक्त अधिसूचनेस विरोध दर्शविन्यासाठी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. वित्तमंत्री, मा. विधानसभा अध्यक्ष व इतर शासन स्तरावर देण्यात येणाऱ्या निवेदनामध्ये  दोन लाख कींवा त्याहीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यावर अन्याय होत  असल्याचे नमूद केल्या जाते.     

           मात्र प्रत्येक्षात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या ही 22 ते 25 हजाराच्याच घरात आहे. मग यांनाही शासनाची दिशाभुलच करायची आहे का? की, अजुनपर्यंत यांनाही सदर बाबीचे गांभीर्य समजले नाही, की समजुन घ्यायचे नाही. इथे आपला बळी जात  आहे, मग खरच हे आपले पाठीराखे आहेत की, पाठीत खंजर खुपसणारे आहेत हा प्रश्न अनुत्तरित असून, हा संशोधनाचा भाग आहे.
         1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशनचा हक्क मिळण्यासाठी जून 2015 पासून सर्वोच्च न्यायालय दिल्ली. येथे दाखल याचिका क्र. 020037/2015  न्यायप्रविष्ट असतांना. तसेच 2019 मध्ये मा. विधानपरिषद सभापती यांनी  अभ्यास  समिती स्थापन  केली व समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास आदेशीत केले. त्यालाही आता वर्ष झाले आहे. व  त्याही समितीचे हेच उच्च पदाधिकारी अध्यक्ष, व सभासद आहेत, परंतु 31 जुलै 2020 रोजी सदर समितीचा अहवाल सादर होणार असल्याने, याच समितीत कार्य करीत असणाऱ्या उच्च पदस्थ अधीकारी यांनी युटर्न घेत अधिसूचना जारी केली.
                    1981 ची जुनी पेंशनचे मागणिकरिता प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना व मा. सभापती यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अप्राप्त असताना, या दोन्ही बाबी पायदळी तुडवून यांना अधिसूचना जारी करण्याचा अधिकार कुनी व कसादीला हे विचारण्याची धमक  आपल्या शिक्षक प्रतिनिधीत नाही काय? असा संतप्त सवाल 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.
          व ती धमक यांच्यात नसेल तर याचा विचार पुढे आपल्याला करावाच लागेल. अशी हजारो शिक्षकांची भावना असल्याचे शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी निवेदनात सांगितले आहे. 
             अशा आशयाचे निवेदन आज वाशिम मंगरूळ मतदार संघाचे आमदार लखन मलिक,कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी,जिल्हाधिकारी कार्यालय,माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.
         यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कवर,उपाध्यक्ष प्रविण कदम,कार्याध्यक्ष विजय भड,कारंजा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे,गजानन लाहे,गणेश ठाकरे,संतोष सुर्वे,डी.डी शिंदे,बंडू टापरे,गजानन गोटे, आर टी गोटे व इतर पेंशन पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळातील वैद्यकीय सेवेचा सेवा यज्ञ मी तसाच चालू ठेवला - डॉ चेतन बच्छाव


 **
                                        
    *नंदुरबार - ( वैभव करवंदकर  ) - - - - -*                                       नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवेच्या हेतूने B.H.M.S  ची पदवी संपादन केली. तळागाळातल्या लोकांना वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा होती. सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या   वस्तीतच माझ्या  वैद्यकीय सेवेची सुरुवात केली.  वडील शिक्षक असल्याने त्यांचे संस्कार मला प्रेरित करत होते.  कोरोना  महामारीच्या काळातील वैद्यकीय सेवेचा सेवा यज्ञ मी तसाच चालू ठेवला. माझ्या रुग्णांचे हाल होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक हेतू होता. लोकांच्या वेदना कमी करण्याचा  प्रयत्न करत होतो परंतु मी तपासलेल्या पेशंटला कोरोनाचे निदान झाल्याचे मला कळाले. सामाजिक भान जपत त्या दिवसापासून मी दवाखाना बंद केला.  घरातल्या घरातच विलगीकरणात  राहू लागलो. डॉ.रवींद्र पाटील(रविकिरण प्याथॉलॉजि लॅब) यांच्या मदतीने कोरोना चाचणी केली. डॉक्टर असूनही मनात भीती व अस्वस्थता होती. तसेच झाले. दि.१८ जुलै वेळ संध्याकाळी सात वा. मला कळालं  मी कोविड पॉझिटिव आहे. मला घेण्यासाठी रुग्णालयाची गाडी माझ्या कॉलनीत आली. बाहेर पावसाचा ओलावा होता. माझ्या कुटुंबीयांचे डोळे अश्रुनी पाणवले होते.  माझं मन आपुलकीचा ओलावा शोधत होतं. माझ्या घरासमोर रुग्णालयाची गाडी उभी राहिली. एखाद्या अपराध्याला घ्यायला यावेत असा आविर्भाव  कर्मचाऱ्यांचा होता. वातावरण गंभीर झाले. त्यामुळे मानसिकदृष्ट्या माझे कुटुंब खूप खचलं. वयस्कर आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा  हताश व हतबलतेचा भाव अधिक  गडद झाला. कोणत्या अपराधाची शिक्षा मी भोगतोय हे मलाही कळत नव्हते. घराकडे जिज्ञासेने, भीतीने, तिरस्काराने  अनेक नजरा कळत नकळत डोकावताना मला जाणवल्या. त्यावेळी  मनाची अस्वस्थता अधिकच वाढली. मी कोणी गुन्हेगार नव्हतो. वैद्यकीय सेवा देताना मला कोरोनाची लागण झाली होती. परंतु रात्री पहाटे कोणाच्याही मदतीला धावणारा डॉ. चेतन बच्छाव आज भीतीचं व  तिरस्काराचं 
 कारण का ठरावा? कोरोना महामारीच्या काळात रुग्णसेवा चालू ठेवली हा माझा गुन्हा होता का ? हे प्रश्न मला सतावत होते.  लक्षणे नसलेला मी कोविड  रुग्ण होतो मला औषधोपचारापेक्षाही आपुलकीची व सहजतेने समजुन घेण्याची जास्त गरज भासत होती.
        नैराश्य व अस्वस्थतेच्या मानसिकतेत मला covid- center ला नेण्यात आले. त्यानंतर आपुलकीचे,मदतीचे, माणुसकीचे आगळे, वेगळं रूप  अनुभवलं. डॉ. राजेश वळवी , रविकिरण लॅबचे  डॉ. रवींद्र पाटील ,डॉ .ज्ञानेश्वर पाटील,  डॉ. रवींद्र पाटील (सेवा क्लिनिक) डॉ. देवेंद्र लांबोळे
डॉ. मनोज तांबोळी डॉ. हेमंत चौधरी,डॉ .कल्पेश चौव्हान,निलेश मेडिकलचे अरविंद पाटील या मित्रांनी मला मानसिक आधार दिला. कोविड सेंटरमधील माझे वास्तव्य अधिक सुखकर व सुसह्य कसे होईल यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खूपच कळकळीने प्रयत्न केले आनी मला तशी सुख,सुविधा ही मिळउन दिल्या. या काळात माझे बालमित्र विश्वनाथ व आनंदाने मला प्रत्यक्ष भेटण्याचा केलेला प्रयत्न  सुखावून गेला. निखळ मैत्रीचा भाव नैराश्य व दुःखाचा अंधकार दूर सारतो हेच खरे. जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सातपुते,डॉ.राजेश वसावे, डॉ. राजेंद्र चौधरी,डॉ.विनयभाई पटेल,डॉ.किरण जगदेव,डॉ. गौरव तांबोळी,डॉ.संजय गावित हे कोविड सेंटरला मला तन्मयतेने देत असलेली 
सेवा,मानसिक आधार उल्लेखनीय,अविस्मरणीय आहे. रुग्णसेवेत नेहमी कार्यमग्न राहण्याच्या सवयीमुळे तेथे शांत बसता आले नाही.   जिल्हा रुग्णालयातील सिस्टरांना कोविड रुग्णांना औषधोपचार देण्याच्या कामात मदत करू लागलो. त्यातून  मला  वेगळेच समाधान मिळाले. लायन्स क्लब नंदुरबार व डॉक्टर मित्र परिवार व इतर मित्रांनी,माझ्या नातेवाईकांनी  माझ्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यातून माझ्यात सकारात्मकता निर्माण झाली. कोरोना रुग्ण कालावधीत नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी खूप सकारात्मक पद्धतीने सहकार्य करताना दिसले. गणेश माळी  माळी वाडा या मित्राने विलगिकरन झाल्यापासून ते कोरोना सेंटरला असतांना माझ्या कुटुंबीयांना सांगेलं ती मदत केली. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे.  कारण त्यांनी केलेली मदत दिलेला मानसिक आधारा मूळे मनातील अस्वस्थतेचा काळोख दूर झाला होता. कोरोना रुग्ण झाल्यावर  तिरस्करणीय नजरा नोंदवल्या, सहकार्याचे हात पाहिलेत, सकारात्मक आश्वासक संवाद ऐकले व मित्रांचा मानसिक आधार अनुभवला.
        कोरोना हा काही मोठा आजार नाही परंतु त्याची संसर्ग क्षमता जास्त असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.काळजी घेत असताना कोरोना रुग्णा बद्दल तिरस्कार निर्माण व्हायला नको. अपराधी असल्याचा 
भाव जपला जायला नको. सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळत आपण आपुलकी, माणुसकी, सहकार्य, मानसिक आधार व सकारात्मक संवाद या माध्यमातून कोरोना रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला आधार देऊ शकतो. या सामाजिक मूल्यांच्या माध्यमातून कोरोनाशी  लढलो तर  लवकर यशस्वी होऊ यात शंका नाही. जगण्यात व जीवनात सहजता व समाजात आरोग्य   निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया

डॉ.चेतन नानाभाऊ बच्छाव
उषाई क्लीनिक, नंदुरबार

कोरोना सोबत दोनहात करुन तहसिलदार व पत्रकार परत आले

                            *नंदुरबार - ( प्रतिनिधी  -  वैभव करवंदकर  ) - - - - -*      
                                नंदुरबार  येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात व दैनिक लोकसत्ता ,  आय बी एन लोकमत न्यूज चैनल चे प्रतिनिधी  निलेश पवार यांनी  कोरोना सोबत दोनहात करत असताना.  त्याची लागन झाल्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचार घेऊन  परत आपल्या  कामावर  आजपासून रूजू झाले आहेत.                                 कोरोना संसर्ग मुक्त झाल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात सोमवारी प्रथमच कार्यालयात दाखल झाले.  त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.  यावेळी  नायब तहसीलदार गोपाळ पाटील  , श्रीमती गंगावणे , मंडळ अधिकारी  यु. जे. पठाण उपस्थित होते .                           
         पत्रकार निलेश पवार  कोरोना संसर्ग मुक्त झाल्यानंतर  त्याच्या  निवासस्थानी नंदुरबार शहरातील पत्रकारानी त्याच्यावर  पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. निलेश पवार यांच्या सौभाग्यवतींनी   औक्षण केले. याप्रसंगी  पत्रकार रविंद्र चव्हाण , विशाल माळी , रणजित राजपूत , देवेंद्र बोरसे , धनराज माळी , गजेंद्र शिंपी , जगदिश सोनवणे , देवेंद्र माळी , जगदिश ठाकुर , जितेंद्र जाधव , वैभव करवंदकर व असंख्य पत्रकार मित्र सोशल डिस्टन चे पालन करत पवार यांचे स्वागत केले.

वीर जवान स्मारकास अभिवादन करून कारगिल दिन साजरा

सैनिक टाकळी प्रतिनिधी 
सैनिक टाकळी येथे वीर जवान स्मारकास अभिवादन करून कारगिल दिन साजरा करण्यात आला यावेळी सुरक्षित अंतर ठेवून माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅण्डल  मार्च आयोजन केले होते .यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाले भारतीय सैन्यांंची कामगिरी इतर कोणत्याही देशातील सैन्यापेक्षा सरस आहे . त्यामुळे भारतीय जवानांचा दबदबा जगामध्ये आहे. कारगील चा विजय सैनिकांचे मनोधैर्य वाढणार होता.आपल्या  देशासाठी जवान व किसान दोघेही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत . यावेळी उपस्थित माजी सैनिकाने वीर जवान स्मारकास मानवंदना दिली .

कारंजा शहर पोलीसांनी पकडलेल्या मालवाहतूक एस टी मध्ये आढळल्या 3 राशन गोणी - मालवाहतूक एस टी मध्ये 10 टन तांदूळ, कारवाईसाठी तहसिलदारांचे पोलीसांना पत्र,

*आरिफ पोपटे* 

कारंजा लाड दि. 26  राज्यपरिवहन महामंडळाच्या मालवाहतूक करणाÚया एस टी तून राशन तांदूळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलीसांनी नागपूर औरंगाबाद ध्रुतगती मार्गावरील कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास एक मालवाहतूक एसटी ताब्यात घेतली. त्यानंतर पोलीसांनी तहसिल कार्यालयाला तपासणीसाठी पत्र दिले. त्यानुसार, 26 जुलै रोजी सदर मालवाहक एस टी तील तांदळाची तपासणी केली असता त्यात एकूण 200 तांदूळाच्या गोण्या आढळून आल्या. त्यापैकी 3 गोण्यावर  मध्यप्रदेश, स्टेट सिव्हील, सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड आर एम एस 2019-20 व्हिट असा छापा आढळून आला. यावेळी कारंजा अन्न पुरवठा अधिकारी ढोके व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, कापसे उपस्थित होते. शेलु बाजार येथून कारंजा मार्गे तुमसर भंडाÚयाकडे जाणाÚया महामंडळाच्या मालवाहू एस टी मध्ये तांदूळ नेल्या जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, यांच्यासह सहकारी पोलीसांनी नाकाबंदी करून एम एच 14 बी टी 0856 क्रमंाकाची बस ताब्यात घेउुन कारंजा ग्रामीण पो स्टे च्या आवारात आणून लावली. या संदर्भात बसचालकाला विचारणा केली असता, सदर तांदूळ मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील गावंडे ट्रेडर्स येथून भरून गुरूदेव राइसमिल भंडारा तुमसर येथे घेउुन जात असल्याचे सांगितले. त्यामुळे तुमसर भंडारा येथून खरेदी केलेला माल शेलुबाजारला कसा पोहचला तसेच शेलुबाजार परिसरात तांदळाचे पिक घेतल्या जात नसतांनाही सदर दुकानात 10 टन माल कुठून आला व तांदूळाच्या वाहतूकीसाठी मालवाहक एस टी चा वापर का केला असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहे. यापूर्वीही मंगरूळपीर येथे दोनदा व कारंजा येथे एकदा तांदळाचा ट्रक पोलीसांनी पकडला होता. सदर प्रकरणी कारंजा तहसिलदार धीरज मांजरे यांनी सखोल तपासासाठी कारंजा पोलीसांना पत्र दिले असून पोलीस तपासात काय निष्पन्न होते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. तसेच तपासा दरम्यान सदर तांदूळ व मालवाहतूक करणारी एस टी पोलीसांच्या  ताब्यात राहील अशी माहिती ठाणेदार पाटील यांनी दिली. मालवाहतूक एस टी मध्ये असेला तांदूळ सरकारी आहे की नाही, यासाठी पोलीसांच्या सखोल तपासाची प्रतिक्षा करावी लागेल. 

प्रतिकिया

    ग्राहक पंचायत जिल्हा संघटक 

अभय खेडकर

 जिल्ह्यात हा प्रकार होत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. ग्राहक पंचायत सुद्धा या प्रकरणावर लक्ष देत

मानवाधिकार संघाने निराधारास मिळवून दिला आधार ; भुकेने व्याकुळ वृद्धास जीवदान


एस. एम. वाघमोडे (गांधीनगर प्रतिनिधी )

 घरातून हरवलेल्या लाईन बाजार ,कसबा बावडा येथील एका मनोरुग्ण वृद्ध व्यक्तीस मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्लीच्या कोल्हापूर टीमने पुन्हा त्याच्या घरी सुखरूप पाठवून गेल्या काही दिवसापासून निराधार बनलेल्या वृद्ध मनोरुग्ण आधार मिळवून दिला. 
गडमुडशिंगी (ता.करवीर ) येथील शिवाजी चौकामध्ये एक वृद्ध व्यक्ती असाह्य, तहान ,भुकेने व्याकुळ अवस्थेत असलेली मानवाधिकार सुरक्षा संघाच्या  जिल्हा समन्वयक महादेव वाघमोडे यांच्या निदर्शनास आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तीस कोणीही मदत करत नसल्याने या व्यक्तीची प्रकृती खालावत गेली. भुकेने आणि तहानेने व्याकूळ या व्यक्तीस उठता बसता येईना व बोलणेही अडखळु लागले. चालताही येत नसल्याने ती व्यक्ती घसटत फिरत होती. ही परिस्थिती पाहून वाघमोडे यांनी त्यांना जेवण दिले.  त्याची आस्थेने चौकशी केली . तदनंतर आपण लाईन बाजार कसबा बावडा (कोल्हापूर ) येथील असून आपले नाव रमेश शिंदे असल्याचे  सांगितले.  प्रसंघावधान राखत वाघमोडे यांनी सोशल मीडिया वरती सदर व्यक्ती ची माहिती व्हायरल करून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या सोशल मीडियावरील संदेशाला कोल्हापूर  जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सदर व्यक्तीच्या नातलगांनी  वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला. तसेच या व्यक्तीची माहिती  सामाजिक कार्यकर्ते आकाराम पाटील यांनी लाईन बाजार प्रभागाच्या नगरसेविका माधुरी लाड यांना दिली‌. त्यांनीही तात्काळ वाघमोडे यांना संपर्क साधला तसेच प्रभागातील नातेवाइकांना याची कल्पना दिली. परंतु लाॅकडाऊनमुळे त्यांच्या नातलगांना गाडीची व्यवस्था करता येत नव्हती. या गोष्टीची कल्पना वाघमोडे यांनी मानवाधिकार सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्यसहसचिव सुभाष भोसले, जिल्हा उपाध्यक्ष भूषण लाड व जिल्हा संघटक मोहम्मद शेख यांनी पुढील कार्यवाही करत मोहम्मद यासीन शेख यांच्या खाजगी गाडीतून सदर व्यक्तीस घरी क.बावडा ,लाईन बझार येथे पोहच केले .  यावेळी त्यांनी सदर व्यक्तीस सॅनीटायझर, हॅन्ड ग्लोज व मास्क देऊन कोरोणा पासून संरक्षण साधले.   या उपक्रमात सुभाष भोसले,महादेव वाघमोडे, मोहम्मद  शेख , भूषण लाड , आकाराम पाटील यांनी योगदान दिले .
 या माणुसकीच्या कार्याचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


 बॉलीवूड अभिनेते विवेक ओबेराय यांच्या नेतृत्वाखाली  मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली कार्यरत असून संपूर्ण देशभरात वंचित उपेक्षित दीनदुबळ्या व अन्यायग्रस्तांना मदत करण्यासाठी या संघटनेचे कार्यकर्ते देशभर कार्यरत आहेत.

दोन असामान्य व्यक्तिमत्त्व

सप्तर्षीच्या  पदस्पर्शाने पावन झालेल्या कवठेपिरान मातीत मारूती माने भाऊंंचा जन्म झाला . भाऊंनी कवठे पिरान गावात राहून हिंदकेसरी व आशियायी स्पर्धत एक सूवर्ण व एक रौप्य पदक  देशासाठी जिंकले . खेडे गावात राहून एवढी मोठी कामगीरी   करणारे हिंदकेसरी मारूती माने ( भाऊ ) यांची आज पुण्यतिथी .
             सांगली पासून अवघ्या १२ किलो मीटर असणारे कवठेपिरान गाव .त्या वेळी सांगलीला जायला साधा रस्ता ही नव्हता .सन .१९६० ते ७० या दशकात कुस्ती मध्ये भाऊंंच्या नावाचे वादळ  पूर्ण देशात घोगांवत  होते .१९५८ मध्ये कराडच्या मैदानात आण्णा पाठोळे या नावाजलेल्या पैलवानाला आस्मान दाखवले आणि मारूती माने हे नाव लोकांना माहीत झाले .एका पाठोपाठ अनेक नामांंकित पैलवाना ना आस्मान भाऊ नी दाखवले .दिनकर दह्यारीकर . चंदगीराम .पै भिमसेन , मंहमंद हनिफ ' विष्णूपत सावर्डेकर व भाऊंं ची कुस्ती खासबाग मैदान तील अविस्मरणीय कुस्त्या आहेत . पावने तीन तास चाललेली कुस्ती मैदानात एक लाख लोक  बाहेर व तेवढे च लोक तिकीट काढून बाहेर उभे  होते.आत मुंगीलाही जागा नव्हती . ही कुस्ती भांऊनी जिकली .
           १९६२ मध्ये भाऊ अशियायी स्पर्धेसाठी जकार्ता येथे गेले व तेथे त्यानी ग्रीक रोमी व फ्री स्टाईल प्रकारात एक सुवर्ण व एक रोप्य पदक जिंंकले व जर्काता वीर हा सन्मान मिळविला .१९६४ मध्ये पंजाब मधील कसाल येथे हे पदक जिकले  हिदंकेसरी ची गदा मिळवली . कवठेपिरान सारख्या खेडे गावात राहून हिंदकेसरी झाले . त्या वेळ संपूर्ण महाराष्ट एका बाजूला व कवठे पिरान एका बाजूला अशी स्थिती होती .पुणे बेळगाव महाराष्ट्र येथून पैलवान तालीम करायला येत असत . साडेतिनशे पैलवान गावत होते . भाऊंची कुस्ती असेल तेव्हा गावात भाऊ कुस्ती जिंंकलेचेकळे पर्यत गावात चुली पेटवत नसत . एवढे गावचे भाउंच्यावर प्रेम व जीव होता .
           महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वंसतदादा पाटील यांनी भाऊंंना राजकारणात आणले . आशिया खंडातील सर्वात मोठा शेतकरी सहकारी कारखान्याचे भाऊंना व्हा  चेअरमन केले . त्यावेळी कारखानाचा नाव लौकी क वाढवला अनेक गोर गरीबाच्या मुलाना भाऊंंनी कारखान्यात काम दिले . तसेच सांगली जिल्हा मध्यवती बँकेचे पाच वर्षे अध्यक्ष होते . त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रंमाक मिळवून दिला .. कवठे पिरानचे पंचवीस वर्षे सरपंच तसेच गावात १९७० पासून गावात कोणतीच निवड नूक न होता गावात सर्व संस्था च्या निवड प्रक्रिया बिनविरोध होत आल्या आहेत . तिच पंरपरा त्याचे पुतणे पै . भिमराव माने यांनी राखली आहे . गावाने त्यांना साथ दिली आहे . याबरोबर सप्तर्षी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून गावात मुलीच्या शिक्षणाची सोय केली आहे . तसेच मुलांंच्या शिक्षणासाठी पन्नास लाख रूपये खर्च करून हिंदकेसरी मारूती माने विद्यालयाची इमारत बांंधून दिली आहे .
       
  
💐महाराष्ट शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार १९८०- ८१ .
💐 भारत सरकारचा मेजर ध्यानचंद जिवन गौरव 2००५ .
💐 महाराष्ट्र शासनाचा दलीत मित्र जिवन गौरव २००७ .
💐 फाय फाऊडेशन चे पुरस्कार
 राज्य सभेवर खासदार 
💐 महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद अध्यक्ष .
💐 आखिल भारतीय कुस्तीगार महासंघ कार्याध्यक्ष .
💐शासकीय परिषद सदस्य . तहयात .
       असे अनेक मान सन्मान भाऊंना मिळाले आहेत     अशा थोर व्यक्तीस विनम्र अभिवादन .

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व हिंदकेसरी मारुती माने या दोघां असामान्य व्यक्तींचा गरिबीतून उच्च पदावर ती गेलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीचा स्मृतिदिन एकाच दिवशी आहे.

स्वप्न ती नाहीत जी रात्री झोपल्यावर येतात, स्वप्न ती आहेत जी रात्रभर झोपू देत नाही' असे अनेक प्रेरणादायी विचार आपल्यासमोर मांडणारे डॉ.एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचा आज स्मृतिदिन. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती होते. 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले. कलामांना मिसाईल मॅन म्हणूनही विशेष संबोधले जायचे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे एक नावाजलेले आणि प्रसिद्ध वैज्ञानिकही होते. अशा असामान्य व्यक्तीमत्वाच्या हस्ते भाऊंना गौरविण्यात आले होते आणि दोघांचाही स्मृतिदिन एकाच दिवशी यावा हे विशेष 

Saturday, 25 July 2020

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेघाचा 12 वीत प्रथम क्रमांक

आरिफ पोपटे कारंजा 

  कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील कु.मेघा धारपवार हिने अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत  शिक्षण घेऊन इयत्ता 12 वि विज्ञान शाखेत महाविद्यालय कामरगाव येथून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल तिचे जिल्हा परिषद सदस्य तथा रा.कॉ. प्रवक्ता अध्यक्ष कारंजा मा. चंद्रशेखर डोईफोडे यांनी मेघाचा व तिच्या कुटुंबाचा शाल श्रीफळ पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात आला,या वेळी माजी.पंचायत समिती सदस्य जगदीश थेर, निखिल धोंगडे सुरेश बहुटे, सुरेश सवाई,सचिन सिदगुर,सचिन सवाई,आकाश सवाई,आदी मंडळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटने च्या वाशिम जिल्ह्या कार्याध्यक्ष पदी उदय गर्जे

*
आरिफ पोपटे 
कारंजा ::
    राज्यातील कृषी पदवीधर व शेतकरी बंधवांच्या समस्या सोडविन्या साठी सन 2012 साली कृषी भूषण  महेश कडूस पाटील यांनी स्थापन केलेल्या कृषी पदवीधर संघटना च्या वाशिम जिल्ह्या कार्याध्यक्ष पदी कारंजातील उदय सुधाकरजी गर्जे यांची श्री राज गरुड़,श्री प्रतिकजी बोंगड़े,श्री विशलजी रामटेके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सदर संघटना ही गेल्या 8 वर्षापासून अनेक विविध आंदोलन करीत शेतकरी बांधवाचे हीत जोपासित विविध उपक्रम राबवून पदविधरांच्या मागण्या मागण्या साठी सरकार कड़े पाठपुरावा करीत असून त्या मान्य करुण घेत आहे स्वता उदय गर्जे है उच्च विद्या विभूषित  कृषी पदवीधर असून त्यांनी कृषी मध्ये एमबीए केलेअसून  एग्री बिसनेस मेनेजमेंट आहेत उदय गर्जे हे कारंजातील जेष्ठ पत्रकार  तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे मा प्रदेश सरचिटणीस सुधारकररावजी गर्जे यांचे चिरंजीव

'संघटने च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना व संघटीत करुण त्यांच्या न्याय व हक्का साठी शेवट पर्यंत लढ़ा देणार असुन दिलेली जवाबदारी पूर्णपणे पार पाडु तसेच सर्व स्तरातील कृषि व संलग्न पदवीधर उद्योजक आणि शेतकरी जिल्हा पातळीवर संघटीत करू"
          उदय गर्जे
  कार्याध्यक्ष,कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे - खा. माने

पट्टणकोडोली ता.२५:- 

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
  या निवेदनात असे म्हटले आहे की,
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता.वाळवा) येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहिर म्हणून परिचित असले तरी त्यांनी मराठी साहित्यातील लोकवाड:मय, कथा,नाट्य,लोकनाट्य,कादंबऱ्या,चित्रपट,पोवाडे, लावण्या,वग,गवळण,प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहेत.तसेच तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी लोकांच्या मधून मोठी जनजागृती केली आहे.त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्येही त्यांनी शाहिरीतून मोलाचे योगदान दिले आहे.
 छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाडय़ाच्या माध्यमातून रशियापर्यंत पोचवीले.पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा सन्मान देखील केला.१ ऑगस्ट २०२० हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य क्षेत्रातील नाव व त्यांचे कार्य पाहता त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी  महाराष्ट्र शासनाकडून शिफारस होणे आवश्यक आहे.त्याकरिता विधानसभा व विधान परिषद या सभागृहात ठराव होणे महत्त्वाचे असते.मात्र, कोरोना पार्श्वभूमीमुळे ते शक्य नाही म्हणून राज्य शासनाने हा प्रस्ताव त्वरित तयार करुन केंद्र शासनाला पाठवावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे हि लेखी निवेदनाद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती देवुन पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती केली आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत रस्त्यांचे प्रस्ताव केंद्र सरकारला सादर --- लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

*

उदगीर प्रतिनिधी :-गणेश मुंडे 

 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक 3 चे संपूर्ण लातूर जिल्हा भरातील प्रस्ताव युद्ध  पातळीवर तयार करून केंद्र सरकारकडे सादर करत आहोत अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम *प्रधानमंत्री ग्राम सडक योजना*  याची लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कमीत कमी दोनशे किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून त्या प्रस्तावाची पाहणी लातूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी टीम सोबत चर्चा करून केली तसेच आपल्या स्वाक्षरीने सदरील प्रस्तावित रस्त्यांची कामेही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करत आहोत अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे यावेळी PMJSY  चे इंजिनिअर श्री खमितकर, गुरमे  आदींसह  टीम  उपस्थित होती.

Thursday, 23 July 2020

हेरले येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण

हेरले / प्रतिनिधी
दि.23/7/20
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या मौजे वडगाव गावातील परिसरामध्ये वास्तव्यास असल्याने या गावातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
        कोराना पॉझिटिव्ह आलेली महिला हेरले गावची रहिवाशी असून त्यांचे कुटुंब राहण्यास मौजे वडगावच्या एका माध्यमिक शाळेजवळ वास्तव्यास आहेत. त्या कोल्हापूर येथील खाजगी दवाखाण्यात नोकरीस आहेत. गुरुवारी रोजी सायंकाळी  पाचच्या दरम्यान त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने हेरले गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत. ही घटना समजताच हेरलेच्या पोलिस पाटील नयन पाटील  ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप चौगुले माजी उपसरपंच विजय भोसले व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करून येथे बॅरिकेट लावून हे क्षेत्र सील केले आहे.कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे पती, सासू, व दोन मुले यांचा स्वॅब घेण्यासाठी अतिग्रे येथील संस्थात्मक विलगिकरणामध्ये शुकवारी रोजी त्यांना पाठविणार असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे. त्यांच्या पतींच्या फर्स्ट व सेकंड संपर्कातील लोकांची लिस्ट काढण्याचे काम सुरू आहे. त्यांची यादी काढून त्यांना होम क्वारंटाईन करणार असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हेरले ग्रामपंचायतीकडून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

वनसंवर्धनाच्या निमीत्ताने वृक्षलागवड

उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे 
लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड,ग्रीन आर्मी उदगीर,अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी वयोगट 05 वर्ष ते 10 वर्ष वायोगटातील विद्यार्थी यांच्या स्पर्धेचे आयोजन  सिंचन वसाहत उदगीर  येथे शिवकुमार लक्ष्मण मुत्तेपवार या विद्यार्थी मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करनण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक राजधर्म चे पत्रकार अंबादास अलमखाने हे होते तर या वेळी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा सौ.अरुणाताई भिकाने,डॉ अनिल भिकाने सर,मित्र मंडळ अध्यक्ष अभिजीत औटे,लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड व मित्र मंडळ सचिव सौ.दिपाली औटे,मित्र मंडळ जिल्हा अध्यक्ष नवनाथ जोगी,लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड कोशाध्यक्ष सौ. वर्षारानी धावारे,लॉयझन ओफिस मधुमती कनशेट्टे,नागसेन मीत्र मंडळाचे अध्यक्ष गौरव गंडारे,शिवकन्या मुत्तेपवार,सौ.मनिषा मुत्तेपवार हे उपस्थित होते.

Wednesday, 22 July 2020

नंदुरबार जिल्हा शिक्षक भारती संघटने तर्फे एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन


*नंदुरबार  - ( प्रतिनिधी  - वैभव करवंदकर ) - - - - -*                 १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी नंदुरबार जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने बुधवार दिनांक २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करण्यात आले.                                                  जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी  महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक आहे. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन आदेशानुसार विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान दयावे मा.शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी द्वारा निवेदन बुधवार दिनांक २२जुलै रोजी देण्यात आले. लाॅकडाऊनमुळे अनेक शिक्षक घराबाहेर पडू शकत नाही. त्यांनी पण घरात राहून कार्डपेपर वर अधिसूचना रद्द करा, प्रचलितसूत्रा नुसार अनुदान द्या असे फलक दाखवून आंदोलनात सहभाग नोंदवला, अधिसूचना रद्द करण्यात यावी यासाठी विधान परिषद नियम 240 अन्वये अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण श्रीमती वंदना कृष्णा आणि उपसचिव श्रीमती चारुशीला चौधरी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र दिले आहे. १० जुलै २०२० रोजीच्या अधिसूचनेवर प्रत्येक कर्मचाऱ्याचा लेखी आक्षेप कुरिअरने अथवा पोस्टाने मंत्रालयापर्यंत पोचणे गरजेचे आहे. 10 ऑगस्टपूर्वी मंत्रालयात लाखो पत्रांचा ढीग पडायला हवा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या हक्कावर घाला घालणारे  निर्णय घेणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घरी बसवण्यासाठी आपण जोरदार विरोध केला. ही अधिसूचना रद्द होऊन प्रचलितसूत्रा नुसार अनुदान वितरीत होईपर्यंत आणि जुनी पेन्शन योजना लागू पर्यंत आपण आपला लढा सुरू ठेवायचा आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर परत शिक्षक भारती मोठ्या ताकदीने आंदोलन करेल, असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोकराव पाटील यांनी यावेळी सांगितले,
 शिक्षणाधिकारी नंदुरबार यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोकराव पाटील. उर्दू विभागाचे अध्यक्ष शेख इकबाल उमर,कार्याध्यक्ष आशिष दातीर, उपाध्यक्ष राजेश जाधव,सय्यद इसरार, कार्यवाह सतीश मंगळे, कार्यवाह महेश नांद्रे, सहकार्यवाह पुष्कर सुर्यवंशी.
संघटक दिनेश पवार, तालुकाध्यक्ष जी. एम. पाटील, संजय के. पाटील, राहुल मोरे, संदीप जाधव, जळोदकर सर, ईश्वर चौधरी   संघटनेची काही सदस्यांनी आपल्या घरी राहून  सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड 19 रुग्णालयास AC भेट

*.
*खरेदी विक्री संघाचे चेअरमन  भरतभाऊ  चामले यांच्या पुढाकार* 

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे : 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उदगीर तर्फे भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून शासकीय covid-19 रुग्णालयास रॅपिड टेस्ट युनिट साठी स्वॅब तपासणीसाठी AC लागतो. हे अडचण लक्षात घेऊन अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाचा अपव्यय टाळून सद्यस्थिती लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तपणे भरतभाऊ चामले यांनी दोन टनाची AC सदर दवाखान्यास भेट दिली.हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोणा योद्ध्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मंगेशेट्टी,तहसीलदार व्यंकटेश मुंढे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड,पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण,कोविड 19 सेंटरचे इन्चार्ज डॉ.हरिदास यांची उपस्थिती होती.
योवेळी उदगीर उपजिल्हाधिकारी प्रविण मंगेशेट्टी बोलताना भरतभाऊ चामले यांनी काळाची अडचण  लक्षात घेऊन रॅपीड अँटीजन टेस्ट साठी  AC  भेट देऊन विधायक पद्धतीने नेत्याचा वाढदिवस साजरा केल्यामुळे खुप छान सामाजिक कार्य केले असे ते कौतुक केले.यावेळी कोरोणा योद्धे म्हणून डॉ.सतीश हरदास,डॉ.शशिकांत देशपांडे,डॉ.राणी कदम,डॉ.पवार मॅडम,डॉ.सौंदळे मॅडम,जळकोटे सिस्टर,सय्यद सिस्टर,विनोद निलंगे सेवक,शंकर बिरादार सेवक,तुकाराम केंद्रे वार्डबाॅय आदींचा सत्कार करण्यात आला.या वेळी बाबुराव आंबेगावे,बाळासाहेब नवाडे,बालाजी परगे,बालाजी चामले,भागवत चामले,सरपंच बापुराव बिरादार,जनार्दन शिंदे,युवराज कांडगीरे,राजू पाचंगे,पत्रकार बसवेश्वर डावळे आदीं उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नवाडे यांनी केले तर आभार बाबुराव आंबेगावे यांनी मांडले.

अनंतशांती संस्थेचा निसर्ग राजा पुरस्काराने सन्मान

पर्यावरण संवर्धानात संस्थेचे सर्वो उत्कुष्ट काम  ग्रीन फौंडेशनने केला गौरव 

नंदगाव प्रतिनिधी : 
     

पर्यावरण संवर्धन ही संपुर्ण भारतीयांची नैतिक जबाबदारी आहे. यालाच अनुसरुन अनंतशाती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे हि संस्था व संस्थेचे पदाधिकारी सातत्याने कार्य करत आहे या संस्थेने संस्था स्थापने पासुन आज अखेर ५० हजार वृक्षांचे वितरण व १० हजार वृक्षांचे संगोपण तसेच डोंगराची स्वछता. वनाची स्वछता .झाडांची स्वच्छता प्लॉस्टीक मुक्ति . कचऱ्याची विल्हेवाट असे . १००हून आधिक पर्यावरण पुरक उपक्रम राबिवले आहेत याचाच आढावा घेवुन महाराष्ट्र शासनाने छञपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार व भारत सरकार व्दारा नेहरु युवा पुरस्काराने गौरविण्यात  आले. तसेच याच उज्वल कार्याची यशोगाथेच्या आर्दश डोळ्यासमोर घेवुन ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी  महाराष्ट्र राज्य यांनी अनंतशांती संस्थेची माहिती घेवुन व तीन वर्ष संस्थेने केलेल्या कामाची दखल घेवुन यांच्याकडुन संस्थेला निसर्ग राजा सन्मान पञाने गौरवण्यात आले  ग्रीन फाउंडेशन चे संस्थापक अमित जगताप यानी संस्थेला निसर्ग राजा पुरस्काराने वन संवर्धन दिना दिवशी गौरवण्यात येणार असल्याची माहिती  दिली  आहे.

पेन्शनवर गदा आणणेचा प्रयत्न केल्यास मंत्रालयाचे दारात आत्मदहनाचा इशारा

हातकणंगले/ प्रतिनिधी

दि.21/7/20
   नव्या अधिसूचनेद्वारे बदल करून पेन्शनवर गदा आणणेचा प्रयत्न केल्यास मंत्रालयाचे दारात आत्मदहन करणार असा इशारा  महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. 
            बाबासाहेब पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकामध्ये म्हटले आहे की, शासनाचे वतीने 10 जुलै 2020 च्या अधीसुचनेद्वारे अनुदानित शाळेच्या व्याख्येत बदल करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त पण अंशतः अनुदानित , विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळेत कायम आस्थापनेवर काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या पेन्शनवर गदा आणण्याचे षडयंत्र केले असून हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. याविरुद्ध तीव्र आंदोलन करणार  व निर्णय मागे न घेतल्यास प्रसंगी मंत्रालयाचे दारात आत्मदहन करणार .
            मुळात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दयेय  आहे. असे असताना शासन 10 जुलै 2020 च्या अधीसुचनेद्वारे अनुदानित शाळेच्या व्याख्येत बदल करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त पण अंशतः विना अनुदानित , विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळेत कायम आस्थापनेवर काम करणाऱ्या राज्यातील सुमारे 2 लाखाहून अधिक  शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या पेन्शनवर गदा आणण्याचे षडयंत्र करू पाहत आहे .
           यातील बहुतांशी शिक्षकांची जुन्या पेन्शन योजनेत खाती आहेत.तसेच काहींना कोणतेच खाते नाहीत.यातील काही लोक सेवानिवृत्त झालेले आहेत. आता शासनाने वरील सूचनेद्वारे बदल केल्यास आम्हा सर्व कर्मचाऱ्यांची 'ना घर का ना घाट का 'आशी अवस्था होईल. मुळात या सर्व कर्मचाऱ्यांनी 9 वर्षापासून 12 वर्षापर्यंत विना वेतन काम केले व वेतनावर आल्यानंतर व आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना पूर्वलक्षी प्रभावाने बदल करणे हा पूर्ण पणे अन्याय आहे.आणि तो कदापिही सहन करणार नाही.त्यामुळे ही अधिसूचना रद्द करून सर्वाना जुन्याच पेन्शन योजनेचा लाभ दयावा अन्यथा मंत्रालयाचे दारातच आत्मदहन करणार याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.  शासनास असेआवाहन कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले.

वृक्षारोपना बरोबर संवर्धनही महत्वाचे... शिवाजी रणदिवे माजी सरपंच, कंदलगाव.

कंदलगाव - प्रकाश पाटील

    कंदलगाव येथील स्मशान भूमीमध्ये अनेकदा वृक्षारोपन करण्यात आले. पण त्या रोपांचे संवर्धन झाले नसल्याने पुन्हा -पुन्हा त्याच खड्डयात वृक्षारोपन केल्याच्या घटना घडत होत्या.
   मात्र दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक पुंदिकर यांनी सन २०१२पासून वृक्ष लागवडी बरोबर संवर्धनाला महत्व देऊन दिवसातील आपले काम सांभाळून परिसरातील लागवड केलेल्या सर्व रोपट्यांसाठी किमान तीन तासाचा वेळ देऊन त्यांच्या संगोपनाला महत्व देतात.
    देशी वृक्षांवर त्यांचे जास्त प्रेम असल्याने त्यांनी लागवड केलेल्या वृक्षांमध्ये वड, पिंपळ,कडूलिंब,चिंच,जांभूळ, आपटा या वृक्षांची निवड केली आहे . त्यांच्या मते हे वृक्षांचे आयुष्य जास्त आहे तसेच ऑक्सीजन हि जास्त देतात .
    सध्या पुंदिकर हे आपला सर्वात जास्त वृक्षसंवर्धनाला देत असून गावातील सर्वच ठिकाणी केलेल्या वृक्षांची काळजी घेण्यासाठी त्यांना विलास कांबळे, अनिल सुतार, उत्तम पाटील, संतोष निर्मळ, अमित चव्हाण, डॉ.मोहन शिर्के, मनोहर लोहार, सचिन संकपाक यांची साथ लाभली आहे.


  - संवर्धनासाठी रविवार ..

      रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी वृक्षसंवर्धनासाठी किमान तीन तास वेळ देता येतो या हेतूने रविवार निवडला असून गावातील नव्याने केलेल्या वृक्षारोपना बरोबर अगदी जुन्या वृक्षांचीही काळजी घेतली जाते. यामध्ये वृक्षांना लागलेली वाळवी काढणे, पाणी देणे, औषध फवारणी, ग्राम स्वच्छता, पाणी परिक्षण या सारखी कामे केली जातात.


फोटो  - कंदलगाव येथील वृक्ष लागवडीचे संवर्धन करताना अशोक पुंदिकर, सचिन संकपाळ, उत्तम पाटील, संतोष निर्मळ, प्रमोद खोत, कुमार पाटील इ .

Tuesday, 21 July 2020

सोशल मीडियावर लॉकडाऊनवाढीची अफवा

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याला अनुसरून काही समाज उपद्रवी लोकांनी एका जून्या आदेशाचा आधार घेऊन लॉकडाऊन 31 जूलै पर्यंत वाढविण्यात येणार आहे अशा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या आहेत. वास्तविक हा आदेश जूना असून तो संपूर्ण राज्यात लागू आहे. पण याचा अर्थ सात दिवसांचा कडक लॉकडाऊन असा होत नाही. 
    दरम्यान अधिकृत सुत्रांनी सांगितले की कडक लॉकडाऊन फक्त सात दिवसांचा असणार आहे.
तेव्हा सर्व जागरुक नागरिकांना आवाहन आहे की अशा अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. 

गायीच्या दुधाला सरसकट १० रु. / लिटर व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान देण्याची मागणी

       

नंदुरबार - प्रतिनिधी  - वैभव करवंदकर  - -                                            
   महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. 
गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करीत आहोत.
या निवेद्नासोबतच गायीचे पवित्र दुध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्याकरिता पाठवीत आहोत. या पवित्र दुधाचे प्राशन करून आपण न्याय बुद्धीने वरील सर्व मागण्या मान्य कराल एवढीच अपेक्षा या संदर्भात जील्हाधीकारी यांना निवेदन देतांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, तळोदा नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, महिला पदाधीकारी डॉ.सपना अग्रवाल, योगीता बडगुजर आदी.

सैनिक टाकळीमधील श्रीयाळ उत्सव रद्द....दोनशे वर्षापुर्वीची परंपरा पहिल्यांदाच खंडीत

सैनिक टाकळी प्रतिनिधी

...
कोरोनाच्या प्रसारामुळे गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय
..
शिरोळ तालुक्यामधील सैनिक टाकळीमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्टी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गावातील प्रमुख चार पाटील कुटुंबाच्या घरी चिखलाचा राजवाडा तयार करून त्यामध्ये नंदीची मुर्ती पूजली जाते. गावातील सर्व जाती धर्मांच्या लोकांचा यामध्ये सहभाग असतो. गावची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुर्वजांनी दोनशे वर्षापुर्वी घालून दिलेल्या नियमांचे आजही काही प्रमाणात पालन केले जाते.

सैनिक टाकळीमधील या श्रीयाळ उत्सावाबाबत जून्या पिढीतील लोक सांगतात की श्रीयाळ नावाचा एक शिवभक्त व्यापारी होता. तो बैलावर धान्य लादून गावोगावी विकत फिरत होता. त्याचा व्यापार पुरेसा होत नव्हता. त्याने अनेक गरीब, दुःखी लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या. त्याने भगवान शिवशंकराकडे हात जोडून प्रार्थना केली आपण राजा असतो तर सर्वांचे दुःख दूर केले असते.

भगवान शिवशंकराने श्रीयाळला दीड़ दिवसाचे राज्य करण्याची संधी दिली. त्याने राज्याची सर्व यंत्रणा कामाला लावली.गोर-गरीब,दीन -दुबळ्या लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला. या दीड़ दिवसा दरम्यान राज्यात कुणीही उपाशी पोटी झोपला नाही. सर्वत्र शांतता,सुख, समृद्धी पसरली. अखंड विश्वात तो एक आदर्श ठरला.

टाकळी गावामध्ये पाटीलकी आणि सत्ता स्थानावरील वर्चस्वामधून वारंवार संघर्ष होत होता. हा वाद संपवण्यासाठी तञ्ज्ञ लोकांनी श्रीयाळ राजाचा आदर्श समोर ठेवला. गावची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीचे विभाजन करून नियम ठरवले.

प्रत्येक वर्षी या जबाबदाऱ्या व नियमांचा दृढ संकल्प करण्यासाठी एकत्रीतपणे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी कोळी समाजाचे लोक चिखलाचा राजवाडा बनवतात, सुतार मखर तयार करतात, शिंपी सजावट करतात अशा प्रकारे बारा बलुतेदार आपआपल्या परिने सहकार्य करतात.
बाळासो पाटील,कुमार पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील या मुख्य पाटील कुटुंबामार्फत अन्नदान केले जाते. सायंकाळी गावचे सरपंच,उप-सरपंच, सदस्य,गाव कामगार पोलिस पाटील, कोतवाल आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गावच्या मुख्य रस्त्यावरून श्रीयाळ राजाच्या प्रतिकात्मक राजवाडयातील नंदीची मिरवणूक काढली जाते. गावाबाहेरच्या तलावात अथवा विहीरीत विसर्जन केले जाते. चिरमुरे,गुळ, खोबऱ्याचा प्रसाद एकमेकांच्या मुखात घालून आनंद व्यक्त केला जातो.

गेल्या दोनशे वर्षापुर्वीपासून सुरू असलेली ही आदर्श परंपरा पहिल्यांदाच खंडीत होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात येत आहे.

केवळ प्रतिकात्मक नंदीची  पूजा प्रमुख पाटील कुटुंबाच्या घरी होईल  इतर सर्व कार्यक्रम रद्द केले जात असल्याची माहिती संयोजकानी  दिली आहे.
.....

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या राज्य दूध संकलन बंद आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद

हेरले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर
दि.21/7/20
     स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या राज्य दूध संकलन बंद आंदोलनास हेरले ( ता.हातकणंगले) येथील सर्व दूध संस्थांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार यांनी केले.
    हेरले गावातील कामधेनू दूध संस्था, दुधगंगा दूध संकलन केंद्र, कामधेनू वडगाव दूध संकलन केंद्र,कोरेगावे दूधसंकलन केंद्र,लाड दूध संकलन केंद्र  या सर्व दूध संस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंद आंदोलनाला पाठिंबा दिला.
     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार म्हणाले आज पवित्र श्रावण महिन्याच्या सुरवातीला शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक दिवसाचे लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्याचे आवाहन केले , त्याला सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संकलन करणाऱ्या संस्था आणि केंद्रे यांनी दूध संकलन बंद करून उत्स्फुर्त पणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बंद ला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद ,आणि आभार , आमच्या केंद्र शासनाने जी २३जून ला दूध पावडर  दहा हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतला तो त्वरित रद्द करावा , तूप ,बटर, इतर दुग्धजन्य पदार्थावरील  जीएसटी रद्द करावी , आणि पाण्यापेक्षा ही सध्या जो दुधाला दर आहे तो वाढवून मिळावा ,  लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला दूध उत्पादकला ५ रुपये थेट अनुदान त्याच्या खात्यावर जमा करावे अशी आग्रही मागणी आमची आहे , तोट्यात चाललेला दुग्ध व्यवसायाला उभारी द्यावी हीच आमची मागणी आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेर- निगा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संकलन बंद आंदोलन शांततेत पार पडले.