कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने फुलेवाडी येथे विनामूल्य कोविड सेंटर सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिह्यासह महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बांधव आपल्या संघाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.
शिक्षक संघ शहर शाखेच्या वतीने सर्वांनी जमा केलेली मदत आज बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी शिक्षक बँकेच्या सभागृहात रोख रुपये ५११११ रुपयांची आर्थिक मदत मान. राज्याध्यक्ष श्री राजाराम वरुटे सर यांच्याकडे राज्यप्रतिनिधी अजितकुमार पाटील ,व अध्यक्ष मनोहर सरगर यांनी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे ज्येष्ठ संचालक बजरंग लगारे , प्रशांत पोतदार , बाजीराव कांबळे , नामदेव रेपे , तानाजी पोवार
यांच्यासह शहर शाखेचे सुनिल गणबावले , उपाध्यक्ष दिलीप माने , सरचिटणीस संतोष बांबळे ,शहर संघटक राजेंद्र पाटील ,खजानीस संदीप सुतार , किरण पाडळकर ,युवराज एरुडकर , दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
आज अखेर संघाच्या कोविड सेंटरमधून १०९ शिक्षक बांधव कोरोना मुक्त होऊन घरी परतलेले आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाच्या उपचारावरील खर्चाचा अंदाज आपणा सर्वांना ज्ञात आहेच.इतका मोठा खर्च संघटनेच्या वतीने केला जात आहे, आजही आपल्या संघटनेच्या कोविड सेंटरमध्ये १२ शिक्षकबांधव उपचार घेत.
कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत शिक्षकांसाठी आधारवड ठरलेल्या या विनामूल्य कोविड सेंटरसाठी राज्यभरातून शिक्षक बांधव ऐच्छिक स्वरूपात मदत करत आहेत.
याप्रसंगी प्राथमिक संघाचे नूतन शिक्षक सदस्य श्री दत्तात्रय शं.पाटील सर यांचे स्वागत मा. राजाराम वरुटे सर यांच्या हस्ते करण्यात आला.