हेरले / वार्ताहर
दि.26/10/20
हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा उठाव करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून नवीन घंटा गाडी घेण्यात आली त्याचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील, याच्या शुभ हस्ते झाला.
स्वच्छता पाणीपुरवठा व आरोग्य सेवेसाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीस निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून कचरा उठाव होण्यासाठी घंटागाडी खरेदी केली आहे.
गावामध्ये टॅक्टर ट्रॉली कचरा उठाव करण्यासाठी आहे. गावची लोकसंख्या अठरा हजराच्या दरम्यान असल्याने गावात दररोज चार ते पाच टन कचरा निर्माण होतो. तसेच लहान गल्ली बोळामध्ये मोठी गाडी जात नसल्याने सर्व कचरा उठावासाठी मर्यादा येत होती. यासाठी घंटागाडीची खरेदी केली आहे. या घंटागाडीची लहान गल्ली बोळातून वाहतूक होत असल्याने शंभर टक्के कचरा उठाव होणार आहे. यामुळे गटारी स्वच्छ होऊन रोगराई निर्मुलन होण्यास मदत होणार आहे.
यावेळीसरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहुल शेटे माजी उपसरपंच संदीप चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार ,ग्रामपंचायत सदस्य मज्जीद लोखंडे, सतीश काशीद, डॉ शरद आलमान, बथुवेल कदम,दादासो कोळेकर ग्रामसेवक संतोष चव्हाण आदी मान्यवरांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन घंटा गाडीचा शुभारंभ करतांना महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील सरपंच अश्विनी चौगुले उपसरपंच राहुल शेटे व इतर मान्यवर.