कसबा बावडा प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका संचलित, म न पा राजर्षी शाहू विद्यामंदीर शाळा क्र 11, कसबा बावडा, कोल्हापूर मध्ये महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशासनाधिकरी एस के यादव, यांच्या प्रेरणेतून व शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई यांच्या नियोजन मधून 75 व्या महास्वच्छता अभियान अंतर्गत शालेय परिसर, व्हरांडा आणि वर्गखोल्या, इमारत, स्वच्छता गृह,ऑफिस,शालेय क्रीडांगण परिसरातील झाडे स्वच्छ करण्यात आले. तसेच झाडांना पाणी व खत घालून वृक्ष संवर्धन करण्यात आले.
या मोहिमेची सुरवात केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या हस्ते झाडांना पाणी व कम्पोस्ट खत घालून करण्यात आली. शुद्ध हवा , पाणी, आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. महात्मा गांधीजी यांनी आपल्या वर्धा साबरमती आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते स्वच्छतेचे महत्व व स्वावलंबी शिक्षणाचे धडे देत असत. कोरोना काळात अगदी प्रत्येक माणूस अस्थिर झालेला दिसून येत आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता प्रत्येकाने राखली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी, बाजार पेठेत, भाजीपाला मंडई, दुकानामधील दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना सुद्धा स्वच्छतेची खबरदारी घ्यावी. दररोज योगासने, प्राणायाम , सूर्य नमस्कार , ताजी फळे, भाजीपाला , कडधान्ये यांचा वापर आहारात करावा व जागरण टाळावे असे प्रतिपादन केले.
महास्वच्छता करण्यामागील हेतू व महत्व कल्पना पाटील मॅडम, सुजाता आवटी मॅडम यांनी सांगितले.
महास्वच्छता बद्दल नियोजन तमेजा मुजावर मॅडम, विद्या पाटील मॅडम यांनी केले होते.
या महास्वच्छता अभियानासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अनुताई गायकवाड, अध्यक्ष रमेश सुतार, शिक्षणतज्ञ इलाई मुजावर सर, व इतर पालक सहभागी झाले होते.
महास्वच्छता कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले बद्दल सावित्री काळे मॅडम यांनी आभार मानले.