Sunday, 31 January 2021

कसबा बावडा येथे पल्स पोलिओ डोसचे यशस्वी नियोजन

कोल्हापूर प्रतिनिधी 

कसबा बावडा भागातील सर्व शाळांमध्ये💧💧
दोन थेंब जीवनाचे आयुष्यात बालकाच्या महत्त्वाचे💧💧या मोहिमे अंतर्गत पोलिओ डोस 31जानेवारी 2021 शिये नाका व म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बावडा मध्ये यशस्वी नियोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारी म्हणून हे नियोजन यशस्वी केले. या मोहिमेतंर्गत मुकादम आरोग्य रक्षक मनोज कुरणे,सुरेश घाडगे,रामचंद्र कोळी,अजित शिंदे,धनाजी दाभाडे,किशोर आवळे,डॉ ओंकार कुलकर्णी,अंगणवाडी शिक्षिका सीमा पाटील, विद्या पाटील,बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील इत्यादींच्या सहकार्याने नियोजन करण्यात आले होते.

मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड

पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.31/1/21

वडगाव विद्यालय जुनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वडगाव विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        मुख्याध्यापक आर आर पाटील यांनी ३२ वर्षाच्या सेवेत सामाजिक शास्त्र विषयाचे उत्कृष्ट अध्यापनाचे केले आहे.त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचा लौकिक वाढवत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशीलआहेत. त्यांच्या कार्याची दखल लायन्स क्लबने घेऊन'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' व रोटरी क्लब ऑफ गार्गीजने 'नेशन बिल्डर अवॉर्ड' देऊन सन्मानित केले आहे. त्यांचे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पाहून शिक्षक नेते दादासाहेब लाड, कोजिमाशी सभापती बाळासाहेब डेळेकर,मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य  माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड केली. या पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. के. पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक आर आर पाटील व त्यांच्या पत्नी सौ आर आर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
        या प्रसंगी पी जी सुब्रमणी अविनाश आंबी डी. एस.शेळके, डी.एस. कुंभार, मिलिंद बारवडे, जावेद मणेर, सचिन पाटील, अकबर पन्हाळकर, अतुल पाटील, एन एम वडगावकर , ए एम रुग्गे ए एस च०हाण, यु. सी. पाखरे,ए. डी. जाधव आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद उपस्थित होता.

Saturday, 30 January 2021

शैक्षणिक धोरणास न्याय द्या - डॉ अजितकुमार पाटील. कोमनपा शिक्षण समितीच्या राजर्षी शाहू विद्यालय क्रमांक 7,कसबा बावडा मध्ये चौथी शिक्षण परिषद उत्साहात सपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी 

        शुक्रवार दिनांक 29। 1। 2019 रोजी राजर्षी शाहू विद्यालय कसबा बावडा कोल्हापूर सीआरसी क्रमांक 7 अंतर्गत चौथी शिक्षण परिषद   डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक च्या सभागृहांमध्ये उत्साहात व आनंदात पार पडले कै यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर व हायस्कूलच्या मुख्याध्यापकानी शिक्षण परिषदेचे यशस्वी नियोजन केले. 
केंद्र मुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगतामध्ये शैक्षणिक धोरण बद्दल बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असताना यांच्यातील सुप्त गुण ओळखून शिक्षकांनी देशाच्या विकासासाठी खंबीरपणे व सक्षम असा विद्यार्थी तयार केले तरच डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर यांचे भारत एकविसाव्या शतकातील जगातील एक महान देश बनेल.असे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्द आहोत ते आपले परम कर्तव्य आहे.कोरोनाकाळींन शाळा व समाज यांच्यातील वातावरण चिंताजनक होत आहे त्याचा परिणाम  विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार नाही याची दक्षात आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, अभ्यास हा ऑनलाइन, ऑफलाईन, मिसकॉल द्या रेडिओ,स्वाध्याय उपक्रम, शनिवारच्या गोष्टी,पीडीएफ अभ्यासक्रम यासारख्या मीडिया चा वापर करून शोसल डिस्टनस,मास्क,व आरोग्य सांभाळून पालकांनी घरी अभ्यास पूर्ण जरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावीअसा .मौलिक संदेश दिला.
 मुख्याध्यापिका सौ छाया हिरुगडे मॅडम गौतमी पाटील मॅडम व डॉ अजितकुमार पाटील यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणार्‍या व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे गुलाब पुष्प व महिलांसाठी योगासन पुस्तक देऊन अभिनंदन केले. शिक्षण परिषदेमध्ये श्री सुखदेव सुतार यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि प्रशिक्षण आर ए रावराणे ,जयश्री सावंत यांनी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय नेतृत्व या विषयावर श्री गोरख वातकर, सुप्रिया पाटील याने शाळा समूह आणि स्थानिक प्रशासन, माहिती तंत्रज्ञान आणि नेतृत्व याविषयी पाटील यांनी सुरेंद्र बडद यानी  व्यावसायिक शिक्षण, श्री अमित परीट व सौ विद्या पाटील मॅडम यांनी सर्व समावेशित शिक्षण व शिक्षणाचे सार्वत्रिकरण या विषयावर मार्गदर्शन केले यूआरसी चे विषय तज्ञ श्रावण कोकितकर सर यांनी परिषदेला भेट देऊन nep 2020 याविषयी मार्गदर्शन केले  सदर कार्यक्रमासाठी कांबळे सर, चौगले सर, रामराजे सुतार सर यांचे विशेष सहकार्य लाभले सौ गौतमी पाटील यांनी उपस्थित मुखाद्यापक, शिक्षक यांचे आभार मानले एकंदरीत चौथी शिक्षण परिषद आनंदात व उत्साहात पार पडली.

कोजीमाशी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळ डेळेकर यांची निवड


कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळ तथा लक्ष्मण सखाराम डेळेकर यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर चे ए.बी.गराडे यांनी काम पाहिले.यावेळी शिक्षक नेते कोजिमाशी चे तज्ञ संचालक दादासाहेब लाड प्रमुख उपस्थित होते.
   संस्थेचे चेअरमन कैलास सुतार यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या जागी त्यांची निवड करण्यात आली.बाळ डेळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.चेअरमनपदासाठी त्यांचे नाव संचालक सदाशिव गणपतराव देसाई यांनी सुचवले तर संचालक अरविंद मारुती किल्लेदार यांनी त्यास अनुमोदन दिले.विरोधी संचालकांनी सभेकडे पाठ फिरवली.
   स्वागत व प्रास्ताविक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी केले.यावेळे नुतन अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी सभासदांच्या विश्वासा स पात्र राहुन काम केल्याने संचालक पदाच्या कार्यकाळात तिसर्यादा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे.शिक्षक नेते दादासाहेब लाड व संचालक मंडळ यांनी माझी केलेली बिनविरोध निवड ही संस्थेच्या इतिहास एक वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरेल असे काम माझ्या हातून होईल.असे वचन दिले
  यावेळी व्हा.चेअरमन सुभाष पाटील, संचालक आनंदराव काटकर, ,कृष्णात पाटील, कृष्णात खाडे,  शांताराम तौंदकर, राजेंद्र रानमाळे,अनिल चव्हाण, कैलास सुतार,सौ.सुलोचना कोळी,जर्नादन गुरव यांच्या सह उप मुख्यकार्यकारी 
   अधिकारी जयवंत कुरडे,प्रशासन अधिकारी उत्तम कवडे,बाळ डेळेकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळ डेळेकर यांच्या निवडी नंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.आभार व्हा.चेअरमन सुभाष पाटील यांनी मानले.

  कोजिमाशी पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.या पाश्र्वभूमीवर शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी एका अनुभवी,जेष्ठ , सभासद प्रिय, मातब्बर अशा संचालकांना संधी देऊन विरोधका समोर आव्हान निर्माण केले आहे.

Wednesday, 27 January 2021

मुख्याध्यापक संघाच्या विधायक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्यकरण्याची आमदार प्रा. आसगांवकर याची ग्वाही.


पेठवडगाव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

   विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने राबविलेले उपक्रम गौरवास्पद असून संघाची उज्वल परंपरा जोपासण्याचे काम सुरु आहे. ही समाधानाची बाब आहे.संघाच्या विधायक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे
आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी दिली.यावेळी N.M.M.S. पुस्तकाचे प्रकाशन व हिंदी शब्दसंपदा व्याकरण और उपयोजित लेखन या
पुस्तकाचे प्रकाशन पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
  स्वागत व प्रास्ताविकात संघाचे चेअरमन  सुरेश संकपाळ म्हणाले, शाळांनी संघामार्फतप्रकाशित झालेली हिंदी व्याकरण पुस्तक, मराठी व्याकरण, N.M.M.S. पुस्तके व अन्य साहित्य जिल्ह्यातील सर्व शाळांनी संघाकडे जास्तीत जास्त खरेदी करावीत. संघ प्रकाशने अत्यंत दर्जेदार स्वरूपाची असून अल्प किमतीत उपलब्ध असल्याची माहिती  संकपाळ यांनी दिली.     
   कोरोनाकालावधीत शाळा बदं झाल्याने संघाचा व्यवहार ठप्प झाला त्यामुळे संघ आर्थिक आरिष्ठात सापडल्याने संघाच्या पदाधिकारी यांनी बिनव्याजी ठेव संघामध्ये ठेवल्याने संघाचा कारभार सध्या सुस्थितीत चालू आहे.
   संघाचे सचिव दत्ता पाटील म्हणाले, डिसेंबर २०१७ पासून संघाचा कारभार स्वीकारला.त्यावेळी संघाच्या तिजोरीत खडखडाट होता. त्याचा ताळमेळ घालत ३१ मार्च, २०२० पर्यंत ७० लाख रुपये शिल्लक ठेवले. परंतु जागतिक महामारीमुले संघातील सर्व आर्थिक गंगाजली संपुष्टात आली.कर्मचारी पगार व इतर कार्यक्रम घेणे अवघड झाले. संघाचे चेअरमन यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून एका दिवसात सात लाख पन्नास हजार रुपये जमा झालेत.संघाच्या परीक्षा योजनेत सुमारे ४ लाख विद्यार्थी ९ जिल्ह्यातून प्रविष्ठ होतात. आम्ही सत्तेत आल्यानंतर उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छपाईचे काम सुरु केले. यांनी संघाच्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी संघामार्फत गणित प्राविण्य, विज्ञान प्रज्ञा, सोशल टॅलेन्ट सर्च परीक्षा अशा प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षात सुमारे १० हजार विद्यार्थी प्रविष्ठ होतात.गेल्या दोन वर्षापासून N.M.M.S. स्पर्धा परीक्षेचे टीम एक उत्कृष्ट उपक्रम राबवित आहे.त्यामध्ये एक सराव शाळेत व दुसरा सराव केंद्रावरती खर्च करून घेण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातीलN.M.M.S. ची संख्या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांकाची आहे. सध्या N.M.M.S. ची एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. ती अल्प किंमतीत विक्रीसाठी उपल्ब असल्याची माहिती दिली. सदर पुस्तिकेत २० प्रश्नपत्रिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे.माध्यमिक शिक्षण विभाग, उपसंचालक कार्यालय, एस.एस.सी.बोर्ड व डायएट यांना संघाचे नेहमीच सहकार्य असते.विद्यमान आमदार हे एक संस्थाचालक व प्राध्यापक आहेत. कारण पहिल्याच कामकाजात त्यांनी दि. १० जुलै, २०२० ची अधिसूचना रद्द केली. विद्यमान आमदारांच्याकडून शिक्षकांच्या खूप
अपेक्षा आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांचा निपटारा करावी ही अपेक्षा सर्व वर्गातून होत आहे.
     महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सदस्यांची मुदत संपून सहा महिने झालेलेआहेत. महामंडळावर काम करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कौन्सिल सदस्यांची निवड करण्यातआली. त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. कौन्सिलपदी काम करण्याची संधी जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांना मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    हिंदी व्याकरण पुस्तकाचे संपादक बाळासाहेब विभूते, डॉ. रजनीकांत पोवार यांच्या त्यांच्यासंपूर्ण टीमचा व N.M.M.S. चे संपादक जितेंद्र म्हशाळे, डॉ सचिन कोंडेकर, पी. व्ही.आंबोळे,वाय. डी. धामणे, डी. आर. आदींचा सत्कार करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. आभार व्हा. चेअरमन मिलिंद पागिरेकर तर सूत्रसंचालन रविंद्र मोरे यांनी केले.
     यावेळी दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील , भरत रसाळे, डी सी पाटील,व्हा. चेअरमन बी. आर. बुगडे , सहसचिव अजित रणदिवे, ट्रेझरर नंदकुमार गाडेकर,लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, संचालिका अनिता नवाळे, सारिका यादव, संचालक संजय देवेकर, बबन इंदूलकर, श्रीशैल्य मठपती, प्रकाश पोवार, पी. व्ही.पाटील, सुरेश लक्ष्मण उगारे, गुलाब पाटील, एस.एस. चव्हाण, एस. आर. पाटील, एस. एम.मोरस्कर, सागर कुमार घुडाप्पा, सेवानिवृत्त सदस्य एम. के. आळवकर, स्वीकृत सदस्य, बी. सी.वस्त्रद, ए. ए. पाटील, महामंडळाचे पदाधिकारी आर.डी. कुंभार व एम. आर. पाटील आदी उपस्थित होते.
        फोटो 
मुख्याध्यापक संघाच्यावतीने बी. सी. वस्त्रद यांचा सत्कार आम. प्रा. जयंत आसगावकर माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार करतांना शेजारी दादासाहेब लाड सचिव दत्ता पाटील व इतर मान्यवर.

Tuesday, 26 January 2021

७२ वा प्रजासत्ताक दिन हेरले परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा


हातकणंगले / प्रतिनिधी
दि.27/121
हेरले (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरपंच अश्विनी चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी उपसरपंच राहुल शेटे मंडलाधिकारी भारत जाधव, तलाठी संदीप बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण ,पशुवैद्यकीय अधिकारी आशिष पाटीलसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
    मौजे वडगाव येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे  ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या अश्विनी लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाले. झेंडा चौक येथील ध्वजारोहण अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध समाज मंदिराचे ध्वजारोहण सरताज बारगीर यांच्या हस्ते संपन्न झाले. दत्त सोसायटीचे ध्वजारोहण रोहन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक विद्या मंदिराचे ध्वजारोहण संतोष शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष अकिवाटे ,ग्राम विकास अधिकारी व्ही .व्ही. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे, श्रीकांत सावंत, माजी सरपंच रावसाहेब चौगुले, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, डॉ.विजय गोरड, माजी चेअरमन अॅड.विजय चौगुले, माजी सरपंच सतीश चौगुले,स्वप्नील चौगुले , सुनिल खारेपाटणे ,विजय मगदूम ,महेश कांबरे,अमोल झांबरे आदी मान्यवरांसह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
       मौजे माले गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण  सरपंच प्रताप ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपसरपंच रोहिणी भरत गावडे व ग्रामपंचायत सदस्यसह ग्रामस्थ उपस्थित होते.
   मौजे मुडशिंगी गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच मीनाक्षी प्रकाश खरशिंगे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच गजानन जाधवसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
  मौजे चौकाक गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच सुवर्णा प्रकाश सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले तर ध्वज पूजन लता कृष्णात पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सरपंच मनीषा सचिन पाटील, सचिन पाटील आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेरले येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत कार्यक्रम संपन्न

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.27/1/21

हेरले ( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा राणी पाटील यांनी स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची माहिती दिली. 
     पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या अभियानातंर्गत  निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभही संपन्न झाला. हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम व सर्व महिलांना प्लास्टिक मुक्ती अभियानातंर्गत कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या महिला राज्य कार्याध्यक्षा राणी पाटील यांनी स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिले.
    याप्रसंगी महिला  बाल कल्याण सभापती  डॉ. पद्माराणी राजेश पाटील,पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार, डॉ. राहुल देशमुख, सरपंच अश्विनी चौगुले,उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , मुनीर जमादार, ग्रामपंचायत सदस्य सतीश काशीद, डॉ. शरद आलमान, दादा कोळेकर, विजया घेवारी, स्वरूपा पाटील, आरती कुरणे, निलोफर खतीब आदी मान्यवरासह महिला उपस्थित होत्या.
         फोटो 
हेरले येथील कार्यक्रमात बोलतांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या महिला राज्य कार्याध्यक्षा राणी पाटील महिला बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील व अन्य मान्यवर.

हेरले येथे महिला बाल कल्याण सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.27/1/21
हेरले ( ता. हातकणंगले) येथे महिला बाल कल्याण सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
       ग्रामविकास मंत्री नाम.हसन मुश्रीफ ,पालक मंत्री नाम.सतेज पाटील  व आरोग्य राज्यमंत्री नाम .राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने व महिला बाल कल्याण सभापती डॉ. पदमाराणी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हापरिषद कोल्हापूर यांच्या  चौदाव्या वित्त आयोग निधीतून हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्ण वाहिका मिळाली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा महिला  बाल कल्याण सभापती  डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.  
        या प्रसंगी पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार ,वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख,सरपंचअश्विनी चौगुले,उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण,मुनीर जमादार ,ग्रामपंचायत सदस्य सतीश काशीद, डॉ. शरद आलमान, दादा कोळेकर, विजया घेवारी, स्वरूपा पाटील, आरती कुरणे, निलोफर खतीब, आदी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.
       फोटो 
हेरले : रुग्ण वाहिका लोकार्पण करतांना महिला बाल कल्याण सभापती           डॉ.पद्माराणी पाटील डॉ. राहुल देशमुख व अन्य मान्यवर.

वडगाव विद्यालय जुनियर कॉलेज वडगाव मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पेठवडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

वडगाव विद्यालय जुनियर कॉलेज वडगाव मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       वडगाव विद्यालयातील ध्वजपूजन व ध्वजारोहण ज्येष्ठ शिक्षक पी.जी.सुब्रमणी यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतीस्तंभाचे पूजन माजी उपनगराध्यक्षा विदयमान नगरसेविका स्कूल कमिटी चेअरमन श्रीमती प्रविता सालपे यांच्या हस्ते झाले. विश्व अंकाचे प्रकाशन माजी उपनगराध्यक्ष स्कूल कमिटी सदस्य उदयोगपती रमेश बेलेकर यांच्याहस्ते संपन्न झाले. 
      या प्रसंगी नगरसेविका नम्रता ताईगडे, महेमून कवठेकर, शबनम मोमीन, अल्का गुरव,मुख्याध्यापक आर.आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस. डी. माने, पर्यवेक्षक डी. के. पाटील , कार्यवाह के.बी. वाघमोडे,तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी, माजी मुख्याध्यापक ए. आर. पाटील,आर. ए. पाटील, दिलीप जोशी, महावीर रूग्गे, सुनील पसाले, बी .सी. चिकबीरे,बबन गाताडे,डी. एस. शेळके, डी. एस. कुंभार ,मिलिंद बारवडे, सुधाकर निर्मळे, रमेश पाटील,अकबर पन्हाळकर, पी. ए. पाटील आदीसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित लाड यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदवन कराटे ग्रुपचे रक्तदान शिबीराचे आयोजन

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.27/1/21

 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदवन कराटे ग्रुपने एकवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त  रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.   
       आनंदवन कराटे ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते.  सलग  २१ वर्षे अखंड हा उपक्रम सुरू आहे. या शिबीरामध्ये  पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.  सीपीआर च्या ब्लड बँकेच्या पथकाचे सहकार्य लाभले.ब्लड बँकेचे डॉ.शाजिदा ,वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली आवाडे , सुवर्णसिंग चव्हाण , शर्मिला लाड , सुनिता कर्णिक.श्रीविजय कडव, अशोक वाघमोडे, रोहित लोखंडे, पूजा चौगुले,रोहित भोरे.शंकर कांबळे, देवेंद्र कामत आदींचे सहकार्य लाभले.
   संस्थापक अध्यक्ष राजकुमार थोरवत अध्यक्ष संदीप थोरवत,  उपाध्यक्ष बबन चौगुले ,संदीप कांबरे,विजय पाटील संदीप मगदूम, सुनील थोरवत,  निखिल  शिंदे, अमर थोरवत, संतोष माळी, श्रीधर सावंत, धनाजी चौगुले, संतोष शेंडगे, सचिन थोरवत, सोमनाथ मगदूम,क्षीतीज पाटील आदींनी संयोजन केले होते.

Sunday, 24 January 2021

जुनी पेन्शन योजना मार्गी लावणारराष्ट्रीय नेते शरद पवार यांचे आश्वासन


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.24/1/21

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौ-यावर आले
असता त्यांची शासकीय विश्रामधाम कोल्हापूर येथे मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेवून दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक/ कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणेसाठीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी संबंधित विभागाची
बैठक घेण्याची ग्वाही मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाला दिली.
     निवेदनातील आशय असा की , राज्याच्या सर्वांगीण विकासासोबत शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण नेहमीच घेतली आहे. आज शिक्षकांना समाजात जो सन्मान मिळत आहे.तो मिळवून देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. याची आम्हाला जाण आहे. आपणास
राज्य शासनाने दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर नवीन पेन्शन योजना सुरु केलेली
आहे. या तारखेपूर्वी नियुक्त सर्व शासकीय कर्मचारी कंत्राटी मानधन तत्वावरील कर्मचा-यांना जुनी पेन्शान देवू केलेली आहे. पण राज्यातील खाजगी शाळांतील दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशत : अनुदानित कायम आस्थापनेवर काम करणा-या नियमित शिक्षक/ कर्मचा-यांना मात्र वंचित ठेवले जात आहे. सदर
शिक्षक व कर्मचा-यांची दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची मूळ नियुक्ती (Date of Appointment) डावलून १००% शासन अनुदानित ही अट लावून प्रशासन कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेपासून डावलण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रश्नासंदर्भात राज्यातील
शैक्षणिक संघटनांनी आपणास प्रत्यक्ष भेटून, निवेदन देवून व वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न व्यासपीठावर आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
    आपण यापूर्वी संबंधितांना या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच केलेले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात या मागणीसाठी अनेकवेळा मोर्च/आंदोलने झाली. कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आमची न्याय मागणी लावून धरली होती. पण आजमितीस याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. शिक्षण विभागाने दि. १० जुलै २०२० रोजी अधिसूचना काढून मागील पंधरा वर्षापूर्वीपासून हा कायद्याची अंमलबजावणी करावयाची व ९-१० वर्षे विनावेतन काम करणा-या शिक्षक / कर्मचा-यांवर अन्यायकारक धोरण अवलंबण्याचा खटाटोप सुरु केलेला होता. परंतु शिक्षणमंत्री  नाम. वर्षाताई गायकवाड  यांनी दि. ११ डिसेंबर २०२० रोजी सदरची अधिसूचना रद केलेली आहे.सध्या आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून लोबकळत असलेला जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा राज्यातील शिक्षक / कर्मचा-यांत निर्माण झालेली आहे. तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तदनंतर १००% अनुदानावरती आलेले पूर्णवेळ व अर्धवेळ शिक्षक/कर्मचारी यांना जुनी म.ना.से. (निवृत्ती वेतन) नियम १९८२ म.ना.से. (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भ.नि.नि. योजनेचा लाभ मिळण्यासाठी
आपण संबंधित विभागाची बैठक लावण्याची ग्वाही दिली.यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेशसंकपाळ,व्हा.चेअरमन बी. आर. बुगडे, मिलिंद पांगिरेकर, सचिव दत्ता पाटील, खजाननीस नंदकुमार गाडेकर, लोकलऑडिटरइरफानअन्सारी,सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, शिवाजी नाना माळकर, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सदस्य शिवाजीराव कोरवी, एम. आर. पाटील आदी उपस्थित होते.

Saturday, 23 January 2021

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने "ॲक्शन प्लॅन " तयार करावा - शरद पवार

पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.24/1/21

     शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात भेट घेतल्यानंतर  शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या वर  सविस्तर चर्चा झाली त्यानंतर शरद पवार यांनी ॲक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना ना. हसन मुश्रीफ यांना केली. ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन  शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले. 
      यावेळी शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्यासह अंबादास वाजे, आबासाहेब जगताप, विनायक शिंदे, चंद्रकांत यादव,  बाळासाहेब निंबाळकर ,कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रवीकुमार पाटील ,जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील ,कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी पाटील, 
अविनाश गुरव, संतोष जगताप, संजय बुचडे, किरण सोनी, अन्वर मुजावर, सुधीर भाट, भगवान कोर यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
   फोटो 
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजी थोरातसह जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील सरचिटणीस सुनील पाटील जिल्हाअध्यक्षा लक्ष्मी पाटील  शिष्टमंडळ

Tuesday, 19 January 2021

खेळाडूंना ग्रेस गुणांसह शा. शि.शिक्षकांना संचमान्यतेत समाविष्ट करावे. - - शारीरिक शिक्षण संघटनेची शिक्षण मंत्र्याकडे मागणी

*

पेठ वडगाव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

शारीरिक शिक्षकांना संच मान्यतेत समाविष्ट करणेत यावे तसेच राज्यातील शालेय खेळाडूंना ग्रेस गुण देऊन त्याचे हक्काचे गुण असल्याने त्यापासून वंचित राहू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटनेच्यावतीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. यावेळी शिक्षण मंत्री यांनी याबाबत त्रुटींचा विचार करून ताबडतोब निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन संघटनेला देण्यात आले.
       राज्यात शारीरिक शिक्षण शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.शिक्षक भरती प्रक्रियेत या पदांना प्राधान्य मिळावे . राज्यस्तरावर शिक्षक संचमान्यता (पोर्टल) ऑनलाइन भरतीप्रक्रियेत उल्लेखच नाही .यामुळे राज्यात या सर्व विषयांवर त्याच्या पदांना मान्यता दिली जात नाही .राज्यात शिक्षण विषयक 2012 पासून ही पदे भरलेली नाहीत शिक्षक संच मान्यतेच्या ऑनलाइन प्रक्रियेत या सर्व अर्हता व पदांचा बीएड समकक्ष उल्लेख करून शालेय संचमान्यतेत समावेश करणे गरजेचे आहे .तसेच इयत्ता सहावी ते नववी पर्यंत शिकत असलेल्या शालेय स्पर्धेत सहभागाबद्दल ग्रेस गुण देण्याची तरतूद आहे परंतु त्या खेळाडूस दहावी व बारावी मध्ये खेळणे अनिवार्य असल्याची अट आहे .यावर्षी covid-19 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात शालेय क्रीडा स्पर्धा होऊ शकले नाही .सदर परिस्थिती अपवादात्मक आहे यावर्षी दहावी बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्वी खालील वर्गात असताना क्रीडा स्पर्धेत मिळालेले गुण मिळणे गरजेचे आहे आहे .यासाठी शासनाने क्रीडा स्पर्धेत खेळलेल्या पात्र शालेय खेळाडूंना दहावी बारावी  शालेय क्रीडा स्पर्धा संदर्भातील अधिक गुण देणे त यावे अशी मागणी या वेळी निवेदनाव्दारे करण्यात  आली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर.डी .पाटील सचिव संदीप पाथरे,उपाध्यक्ष चंद्रशेखर शहा,डी एस घुगरे राजेंद्र बुवा,संताजी भोसले, महेश सूर्यवंशी ,प्रदीप साळोखे ,अमित शिंत्रे,शंकर पवार,संदीप पाटील,रामचंद्र हालके,वैशाली पाटीलसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
-----------------------------------
         फोटो
 कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघानेच्या वतीने विविध प्रश्नांचे निवेदन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देताना संघटनेचे अध्यक्ष आर.डी .पाटील, चंद्रशेखर शहा ,संदीप पाथरे ,संताजी भोसले आदी.

Monday, 18 January 2021

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करा शिक्षण मंत्र्यांच्याकडे शिक्षक संघाची मागणी.

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि19/1/21
शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांची कनेरीवाडीमध्ये प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन  शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी याबद्दल चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
   शिक्षक संघामार्फत मंत्री  यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  दिनांक १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,शिक्षकांना दहा, वीस, तीस या टप्प्यानुसार वरिष्ठ श्रेणी मिळावी,मनपा शाळांमधील शिक्षकांचे वेतन अनुदान शासनाकडूनच १००%मिळावे,राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे वर्ग विनाअट जोडण्यात यावेत , सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी,एम एस सी आय टी मुदतवाढी बाबत शासन निर्णय पारित करावा,शिक्षण सेवक योजना रद्द करावी व सध्या कार्यरत शिक्षणसेवकांना रुपये पंचवीस हजार मानधन करावे, गेली चार-पाच वर्षे मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली केंद्रप्रमुख पदे तात्काळ भरावीत, सर्व  शाळेत  शिपाई व केंद्र शाळेत क्लार्क मिळावेत,शाळांची लाईट बिल भरण्यासंदर्भात अनुदान मिळावे अथवा सर्व शाळांना लाईटची सोय मोफत करावी ,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अतिउत्कृष्ट कामाबद्दल मिळणारी वेतनवाढ मिळावी . या प्रलंबित मागण्यांविषयी शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली व यातून लवकरच योग्य मार्ग काढत सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
       निवेदन सादर करत असताना शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष  रवीकुमार पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मी पाटील राज्य संपर्कप्रमुख  एस व्हि पाटील आनंदराव जाधव जिल्हा नेते रघुनाथ खोत, सरचिटणीस  सुनील पाटील, सुरेश कांबळे,रावसाहेब पाटील,  विष्णू काटकर  राजेश वाघमारे, राजू दाभाडे, अशोक चव्हाण, शिवाजी रोडे पाटील , बाजीराव जाधव ,मनोज माळवदकर, किरण शिंदे, भीमराव रेपे, तानाजी सनगर,जे डी कांबळे ,संभाजी पाटील, संजय कदम, जीवन मिठारी, रवींद्र परीट, संभाजी लोहार,शरद पाटील, विष्णू मोहिते आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
        फोटो 
शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांना लेखी निवेदन देतांना प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवीकुमार पाटील महिला अध्यक्षा लक्ष्मी पाटील व झ्तर मान्यवर पदाधिकारी

जुनी पेन्शन योजना लागू करा - राज्याच्या शिक्षणमंत्री नाम.प्रा. वर्षाताई गायकवाड यांना निवेदन

कोल्हापूर / प्रतिनिधी
 ता. १८ / १ /२१

       दि.०१ नोव्हेंबर,२००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकडीवर नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन राज्याच्या शिक्षणमंत्री नाम.प्रा. वर्षाताई गायकवाड यांना कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने
शिष्टमंडळाव्दारे देण्यात आले. शिक्षणमंत्री नाम. गायकवाड यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री नाम.सतेज उर्फ बंटी डी पाटील उपस्थित होते.
    यावेळी १० जुलै, २०२० रोजी प्रस्तावित केलेली महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी(सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ संबंधीत अधिसूचना रद्द केल्याबद्दल शिक्षणमंत्र्याचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात १० जुलै, २०२० ची अधिसूचना रद्द होवून दि. ०१ नोव्हेंबर,२००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील नियुक्त पण ०१ नोव्हेंबर, २००५ नंतर १००% शासन अनुदान मिळालेल्या
शिक्षक/कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग सोईस्कर झालेला असताना संदर्भ क्र.२च्या शासन निर्णयाने वरील विषयास अनुसरून सम्यक समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे पुन्हा
वरील विषय संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.१८ डिसेंबर, २०२० च्या शासन निर्णयाने स्थापन केलेली सम्यक समिती रद्द करण्याची
मागणी ५ जानेवारी, २०२१ रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री  नाम. सतेज उर्फ बंटी डी. पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली होती. सदर समिती
रद्द न करता शिक्षक आमदार व संघटना प्रतिनिधी यांचा समावेश करून समितीचा अहवाल तात्काळ सकारात्मक घेवून, वित्त विभागाची संमत्ती घेवून राज्यातील खाजगी शासन मान्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यावरील ०१नोव्हेंबर,२००५ पूर्वी नियुक्त पण ०१ नोव्हेबंर, २००५ नंतर १००% अनुदानावरती आलेले पूर्णवेळ व अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे.
      यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, सेक्रेटरी दत्ता पाटील.
मुख्याध्यापक संघाचे संचालक व मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
       फोटो 
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यांशी चर्चा करतांना मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी.

Sunday, 17 January 2021

आभाळमायेच्या उबदार प्रेमामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे मळे फुलले.


पेठवडगाव / प्रतिनिधी
दि.१८/१/२१
  कोल्हापूर जिल्ह्यातील आभाळमाया  या सामाजिक संस्थेकडून  नेहमीच समाजातील  गरजू असाह्य अनाथ मुलांना वृद्धाश्रमवासी वृद्धांना  मदतीचा हात दिला जातो ऊसतोड कामगारांच्या मुलांना कडाक्याच्या थंडीत  माळावरच्या झोपड्यांमध्ये  कुडकुडत रात्र काढावी लागते त्यांना चांगले शिक्षण अन्नधान्य आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत ही बाब लक्षात घेऊन. करवीर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना आभाळमाया संस्थेकडून शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड मजुरांच्या मुलांना स्वेटर, ब्लॅंकेट, शैक्षणिक खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. 
  आभाळ माया संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजभान जपत आदर्शवत कार्य करीत आहेत असे गौरवोद्गार प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांनी व्यक्त केले. समाजातील दानशूर  व्यक्तींनी अशा ऊसतोड मजुरांच्या मुलांना मदत करण्याची गरज असल्याचे संस्थापिका लक्ष्मी पाटील यांनी सांगितले.
     यावेळी आभाळमाया संस्थेचे पदाधिकारी बेबीनंदा मधाळे, रेखा पाटील, तुषार पाटील, माधवी पाटील, शांता वाकुडे, सविता पोतदार, राजू पाटील, शिवाजी बोंगार्डे ,प्रकाश चौगुले  शरीफा मनेर, वर्षा सनगर, आकांक्षा मोकाशी, अश्विनी संकपाळ, बाळासो कांबळे, मिलिंद कांबळे हे उपस्थित होते. नांदगाव शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मार्गदर्शिका वर्षा सनगर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तुषार पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार  मानले.
     फोटो 
आभाळमाया संस्थेकडून ऊसतोड मजूरांच्या मुलांना वस्तू वाटप करतांना प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे अध्यक्षा लक्ष्मी पाटील व इतर मान्यवर

प्रांतपाल संग्राम पाटील ह्यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ गर्गिसनी मान्यवरांना होकेशनल अवॉर्ड प्रदान

 

हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
दि.19/1/21
रोटरी क्लब ऑफ गर्गिस हा गेल्या १३ वर्षा पासून कोल्हापुरात नावारुपाला आलेला कार्यरत महिलांचा क्लब आहे. रोटरी क्लब ऑफ गर्गिस ने शिक्षण, आरोग्य, कॉविड वैद्यकीय उपकरणांचे दान, कृषी, समाज सेवा, कला आदी क्षेत्रांत ह्या वर्षी कोविड बंधनाचे पालन करून केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
असाच एक कार्यक्रम पॅवेलियन हॉटेलच्या सभागृहात  'होकेशनल अवॉर्ड'हा पुरस्कार सोहळा क्लबनी आयोजित केला, ज्यात कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदारीच्या पलीकडे जाऊन, समाजाचे प्रबोधन केले आहे. अशा व्यक्तींना सन्मानित केले गेले. 
                    ह्या पुरस्काराचे मानकरी प्रा. रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष सणगर, मातोश्री वृद्धाश्नमाच्या प्रमुख वैशाली भूतकर व माजी नगरसेवक  राजसिंह शेळके.आदींना रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षपदावरून बोलतांना रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील म्हणाले सहसा पुरस्कार हे नवांकित व्यक्तींना प्रदान केले जातात, परंतु “होकेशनल अवॉर्डचे  वैशिष्ट्य असे आहे, कि जनसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पोच पावती देण्यासाठी, हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ह्या प्रसंगी सह प्रांतपाल रो. डॉ. सुहास कुलकर्णी, उत्कर्षा पाटील ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
   रोटरी क्लब ऑफ गर्गीजच्या अध्याक्षा  गौरी शिरगावकर यांनी रोटरीच्या या उपक्रमा मागील उद्दिष्ट्ये सभेत सांगितले. तसेच सचिव अंजली मोहिते यांनी उपस्तीथांचे आभार मानले. गौरी शिरोडकर ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. या कार्यक्रमात क्लबच्या खजानीस मधुलिका जगदाळे, व इतर सदस्यासह अशा जैन, लक्ष्मी शिरगावकर,  उन्नती सबनीस, अनघा पेंढारकर, बीना जनवाडकर, सुलक्ष्मी पाटील ह्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

        फोटो 
 'होकेशनल अॅवार्ड' सन्मानितसह पदाधिकारी डावीकडून  सचिव अंजली मोहिते, खजानीस मधुलिका जगदाळे,  उत्कर्षा पाटील,  प्रांतपाल संग्राम पाटील,  सहप्रांतपाल सुहास कुलकर्णी, अध्यक्षा गौरी शिरगावकर.बसलेले डावी कडून  संतोष सणगर, प्रा.रवींद्र पाटील, माजी नगरसेवक राजसिंह शेळके वैशाली भुतकर यांच्या प्रतिनिधी लक्ष्मी पाटील आदी मान्यवर.

Friday, 15 January 2021

शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांचा शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.15/1/21

शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील यांनी ६० वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात
अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रांत एक आगळावेगळा ठसा उमटविला.
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम
राबविले. याचे अनुकरण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्याध्यापक संघांनी केले. वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी डी.बी.पाटील  सरांची २९ ऑक्टोबर २०१९ ला प्राणज्योत मालवली . 
 
त्यांच्या महनीय कार्याचा वसा व वारसा जपण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंचची स्थापना करण्यात आली. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना शिक्षणतज्ज्ञ डी.बी.
पाटील पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय विचारमंचने घेतला. त्यानुसार एकूण ७२ मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांची निवड करण्यात आली.या सर्वांचा सत्कार शनिवार दि.१६/०१/२०२१ रोजी न्यू कॉलेज, कोल्हापूरच्या प्रांगणात
दु.२.३० वाजता शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
    या समारंभाचे अध्यक्षपद ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ हे भूषविणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री ना.सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील व आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषदेचे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार जयंत  आसगांवकर व पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार अरूण  लाड यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे. या समारंभास जिल्ह्याचे खासदार, आमदार व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
      या पत्रकार परिषदेस प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगचे चेअरमनआर .डी.पाटील, अध्यक्ष बी.जी.बोराडे , शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस .डी.लाड, प्रा.सी एम गायकवाड, आर वाय .पाटील, उदय पाटील, खंडेराव जगदाळे, प्रा. समीर घोरपडे रंगराव तोरस्कर, जयसिंग पवार ,संदीप पाटील,एस.के.पाटील
सुधाकर निर्मळे, भाऊसाहेब सकट ,बी .एस.कांबळे आदी उपस्थित होते.

Thursday, 14 January 2021

डॉ. दिपक शेटे यांची सर फाऊंडेशनच्या हातकणंगले समन्वयक पदी निवड


पेठवडगाव / प्रतिनिधी 
दि.15/1/21
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाउंडेशन)च्या हातकणंगले तालुका समन्वयकपदी आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज , मिणचे ( ता. हातकणंगले ) येथील डॉ . दिपक शेटे  यांची निवड करण्यात आली.
      सोलापूर येथे मुख्य कार्यालय असलेले सर फाऊंडेशन हे देशातील शिक्षकांसाठी उपक्रमशील, तंत्रस्नेही व वेगवेगळे प्रयोग राबवविणाऱ्या शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.डॉ.दिपक  शेटे यांना लेखक , संग्राहक , नाटककार , तंत्रस्नेही शिक्षक ,गणित व्याख्याते तज्ञ मार्गदर्शक व उत्कृष्ट शिक्षक अशी त्यांची ओळख राज्यभर आहे .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर फाउंडेशन त्यांची ही निवड केली आहे . श्रीमती रंजीता काळबेरे, वर्षा निशाणदार यांनी त्यांची निवड केली त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे .

.५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत - जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी.


पेठवडगांव/ प्रतिनिधी
मिलींद बारवडे
दि.14/1/21
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना इ. ५ वी ते इ. ८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत अशी मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी (माध्य.)
 किरण लोहार यांना देण्यात आले.     
      याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांना कळविला जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शिष्टमंडळास दिले. शासनाच्या निर्देशानुसार सर्वच शाळांनी दि. २३ नोव्हेंबर, २०२० पासून इ. ९ वी ते इ. १२ वीचे वर्ग सुरु केले आहेत. जिल्ह्यांतील बहुतांशी शाळांनी स्थानिक परिस्थितीनुसार इ. ५ वी ते इ.८ वी
चे वर्ग केले आहेत. परंतु यामध्ये एकवाक्यता नाही. सदरचे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने विद्यार्थ्याना एस.टी. पासही दिले जात नाहीत. त्यामुळे इ. ५ वी ते इ. ८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत शाळांना स्पष्ट आदेश व्हावेत त्याबाबत मार्गदर्शन मिळावे अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने केली.
      यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव लक्ष्मीकांत सावंत, उपशिक्षणाधिकारी डी. एस.पोवार, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, कायम विना अनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा. चेअरमन
मिलिंद पांगिरेकर, सचिव दत्ता पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य शिवाजी यल्लाप्पा कोरवी,एम. आर. पाटील, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
           फोटो 
  माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना  इ.५ वी ते इ.८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत अशा आशयाचे लेखी निवदन देतांना  मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळसह शिष्टमंडळ.

हेरले ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांना उपयुक्त वस्तूंचे वाटप

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.14/1/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील दिव्यांगांना एम. एस. ई. डी. किट,कर्णबधिर लोकांना कानातील मशीन,अपंग लोकांना काठी व कुबड्या,अंध लोकांना लेजर स्टिक आदी वस्तू महिला व बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील व पंचायत समिती सदस्या  मेहरनिगा जमादार यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
     या कार्यक्रमावेळी सरपंच  अश्विनी चौगुले,उपसरपंच  राहुल शेटे,ग्रा पं सदस्य मज्जीद लोखंडे, बटुवेल कदम, दादासो कोळेकर, विजया घेवारी, अपर्णा भोसले, स्वरूपा पाटील ग्रामसेवक संतोष चव्हाण   सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
     फोटो 
हेरले : ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांना वस्तू वाटप करतांना महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील पं.स. सदस्या मेहरनिगा जमादार सरपंच अश्विनी चौगुले उपसरपंच राहुल शेटे व अन्य मान्यवर.

Wednesday, 13 January 2021

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामास सर्वतोपरी सहकार्य करू - महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.13/1/21
जिल्हा परिषद, पंचायतसमिती व ग्रामपंचायतीच्या
माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणी
मंदिराच्या बांधकामास सर्वतोपरी
सहकार्य करू, असे आश्वासन
महिला व बालकल्याण समिती
सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांनी दिले. 
    हेरले (ता. हातकणंगले)येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पायाभरणी सोहळा कार्यक्रमात त्या
बोलत होत्या. यावेळी माजी सभापती
राजेश पाटील व डॉ. पद्माराणी पाटील
यांच्या हस्ते मंदिराचा पायाभरणीचा
कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास
माजी उपसभापती अशोक मुंडे,
पोलिस पाटील नयन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिणीस मुनीर
जमादार, दीपक जाधव, ग्रामपंचायत
सदस्य सतीश काशीद, अपर्णा
भोसले, स्वरूपा पाटील, विजया घेवारी
ग्रामस्थ उपस्थित होते. धार्मिक विधी जनार्दन कुलकर्णी यांनी केले.
        फोटो 
हेरले -विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील माजी सभापती राजेश पाटील व इत्तर मान्यवर

Sunday, 10 January 2021

पत्रकारांनी लोकोपयोगी पत्रकारिता करावी. दै. लोकमतचे संपादक वसंत भोसले यांचे आवाहन.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचा पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न


हातकणंगले  प्रतिनिधी - मिलींद बारवडे 
दि. 11 जानेवारी 2021

समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी पत्रकारितेचा वापर करावा  त्यासाठी लोकोपयोगी पत्रकारिता करावी. प्रत्येक गोष्टी आणि व्यक्ती मध्ये बातमी असते, ती शोधायला पाहिजे त्यासाठी शोधवृत्ती असावी.  बातमीमूल्य लक्षात घेऊन स्वतः शिकत शिकत पत्रकारांनी लोकशिक्षण ही  करावे.असे आवाहन दैनिक लोकमत संपादक वसंतराव भोसले यांनी केले. 
   कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित पत्रकार दिन व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, दै. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे ,कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
        संपादक वसंतराव भोसले पुढे म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारितेवर अवलंबून न राहता उदरनिर्वाहासाठी पर्यायी सक्षम पर्याय शोधणे ही काळाची गरज बनली आहे.  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले . उपस्थित सर्वांचे स्वागत प्रा. रवींद्र पाटील यांनी केले . त्यानंतर प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी  संघटनेच्या  कार्याचा  आढावा  घेतला .
     बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी म्हणाले, पत्रकारांनी समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करावा व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यावे. रंजल्या गांजल्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, समाज त्याची नक्कीच जाणीव ठेवतो. 
      संजय घोडावत पॉलीटेक्निकचे प्राचार्य  विराट गिरी  यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत करून कोरोनामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत , त्या संधींचा फायदा घ्यावा व काळानुसार बदलाला सामोरे जावे असे आवाहन केले.
       दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे  म्हणाले , समाजाला पुढे नेण्यासाठी पत्रकारांचा सिंहाचा वाटा असतो .पत्रकारांच्या मध्ये मोठी ताकत असते, त्या ताकतीचा समाजाला विधायक दिशेने नेण्यासाठी वापर करावा. प्रा. रवींद्र पाटील संपादित 'जागल्या स्मरणिकेचे ' व त्यांच्या 'श्रमिकांचे विश्व '  या कवितासंग्रहाचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते झाले.
       त्यानंतर पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये दै. महासत्ताचे व्यवस्थापक चंद्रकांत मिठारी ,दै . पुढारी चे राजू पाटील ,एबीपी माझा चे विजय केसरकर, दैनिक पुण्यनगरीचे दगडू माने ,छायाचित्रकार निवास कांबळे ,दै.तरुण भारत संतोष सणगर, व लक्ष्मण व्हन्याळकर, दै. लोकमतचे सुहास जाधव, दै. महासत्ता चे विकास सुतार, दै. पुण्यनगरीचे निनाद मिरजे, दै. सकाळ चे गणेश बुरुड ,दै.पुण्यनगरी चे शैलेंद्र उळेगड्डी, दै. पुढारी चे रवींद्र पाटील ,दै.सकाळचे प्रकाश तिराळे, दै. पुढारी चे श्रीमंत लष्कर, दै. तरुण भारतचे सागर लोहार ,एस न्युज चे राम पाटील, दै. सकाळचे संजय पाटील ,दै.तरुण भारतचे सतीश पाटील ,दै.सकाळचे धनाजी पाटील, दै. पुढारी चे संजय साळुंखे यांचा समावेश होता.  जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन उत्तमरित्या केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांचा सत्कार वसंत भोसले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
       यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील ,खजानिस सदानंद कुलकर्णी, कौन्सिल मेंबर अतुल मंडपे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब सकट, ॲड. प्रशांत पाटील ,कौन्सिल मेंबर धनाजी गुरव , डॉ. निवास वरपे, सुरेश कांबरे, जिल्हा संघटक अवधुत आठवले, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील , विवेक स्वामी ,प्रशांत तोडकर , सलीम खतीब ,कोर कमिटी मेंबर ,सर्व तालुका अध्यक्ष ,पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व दैनिक आणि न्यूज चॅनेलचे पत्रकार व सत्कार मूर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते.
     
  फोटो 
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या सोबत संपादक वसंत भोसले,कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, जेष्ठ पत्रकार समीर देशपांडे, प्राचार्य विराट गिरी ,अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील खजानिस सदानंद कुलकर्णी आदीसह पदाधिकारी.

कोल्हापूर मनपा शिक्षक पतसंस्थेचे कामकाज व उपक्रम पाहता महाराष्ट्रात उत्कृष्ट आणि आदर्श -आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर दिनांक 9 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कामकाजाचा अहवाल पाहतात तसेच पतसंस्थेने सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध योजना पाहता ही एक महाराष्ट्रातील गुणवंत व आदर्श पतसंस्था असल्याचे उद्गार माननीय आमदार चंद्रकांत जाधव यांनी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा 'विद्याभवन' येथे झालेल्या गुणगौरव आणि सत्कार समारंभ प्रसंगी काढले .यावेळी अध्यक्षस्थानी सभापती संजय पाटील होते माननीय आमदार पुढे म्हणाले संस्थेने ठेवीदारांना योग्य दर देऊन कर्जाचा दरही अत्यंत कमी ठेवलेला आहे .त्याचबरोबर नवीन पेन्शन धारकांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी  केलेली योजना अत्यंत महत्त्वाची आहे . हे उत्तम काम संस्थेने केले आहे . अनेक सभासदांनी केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या पाल्यांनी विविध परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले  .तसेच महानगरपालिका शिक्षकांच्या वेतनावरील खर्च 100% शासन अनुदानातून मिळावा यासाठी पाठपुरावा करू व शिक्षकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे अभिवचन यानिमित्ताने दिले .
यावेळी पुणे शिक्षक विभागाचे नूतन आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला त्यांनीही शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले . तसेच सर्वांनी मिळून शिक्षण क्षेत्रामध्ये निकोप वातावरण ठेवण्यासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायमपणे पाठीशी राहणार असल्याचे सांगितले . यावेळी  जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ पतसंस्थेचे संचालकतसेच सभापती म्हणून काम केलेले ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनचे  (आयफेटो) राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा व इतिहासाचा आढावा घेतला ,पतसंस्थे मध्ये राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली पतसंस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची जाणीव सभासदांना करून दिली . शिक्षक समितीचे नेते दिलीपराव भोईटे खजानीस उमेश देसाई यांचीही मनोगते झाली . यावेळी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व विविध संस्थांकडून आदर्श पुरस्कार मिळालेल्या  सभासदांचा, शिष्यवृत्ती परीक्षेत मार्गदर्शक केलेल्या शिक्षकांचा ,पीएचडी पदवी प्राप्त करणारे अजित पाटील ,मनपाच्या शाळांना मदत करणारे द्वारकानाथ भोसले, त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांनी विविध परीक्षेमध्ये यश संपादन केले ,अशा सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर सावंत, सूत्रसंचालन सुवर्णा सोनाळकर - संदीप जाधव व आभार प्रदर्शन संजय कडगावे यांनी केले . यावेळी उपसभापती मनोहर शिंदे, वसंत आडके, प्रकाश पाटील ,आशालता कांजर, सरिता सुतार, सुभाष धादवड ,राजेंद्र गेंजगे,शकील भेंडवडे, विजय जाधव ,दिलीप माने, मनोज सोरप आदी संचालक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Monday, 4 January 2021

मौजे तासगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.4/1/21

 हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकित समझोता एक्स्प्रेस सुसाट धावली असून माजी सरपंच शिवाजीराव पाटील गटाने सात तर  संपतराव पाटील गटाने दोन जागा घेत एकूण नऊ जागा बिनविरोध झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे.
    बिनविरोध निवडले गेलेले सदस्य पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक-
शिवाजीराव आकाराम पाटील, सुनीता तानाजी पाटील,जयश्री दिलीप सुतार
प्रभाग क्रमांक दोन-
चंद्रकांत आण्णा गुरव, सागर कृष्णात पाटील,  कु अंजली दिलीप कुरणे
प्रभाग क्रमांक तीन -
विद्या कृष्णात पाटील,पौर्णिमा आदिनाथ कांबळे, बाबुराव आनंदा कांबळे
   दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानत जिल्हा परिषद सदस्य, आमदार,खासदार  तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींच्या  सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील (काका) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचे प्रा.डॉ.के.एम गरडकर याना ' फेलो ऑफ महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस ' हा पुरस्कार प्रदान

*:*हातकणंगले / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाचे वैज्ञानिक प्रा.डॉ.के.एम.गरडकर यांना नुकताच 'फेलो ऑफ महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस ' हा पुरस्कार प्राप्त झाला. संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार आहे. महाराष्ट्र अकॅडमी व सायन्सेस ही संस्था प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात अतुलनीय कामागिरी बजावलेल्या वैज्ञानिकांना हा पुरस्कार बहाल करते. संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स तसेच संशोधन संबंधित रिव्युव्हर  तसेच एडिटर म्हणून केलेले सर्व कार्य इत्यादी निकषाच्या आधारे या पुरस्काराची निवड केली जाते.
प्रा.डॉ.गरडकर हे शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक पदावरती कार्यरत असून त्यांना संशोधन क्षेत्रात २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. सध्या ते इंडस्ट्रियल केमिस्ट्री या विभागाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग इत्यादी क्षेत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.तसेच कॅन्सर या रोगावर उपाय म्हणून विविध नॅनोपार्टिकल वरतीही सध्या त्यांच्या टीम चे संशोधन कार्य सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत १५० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जगभरातील जवळपास ३७२३ हुन अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधासाठी घेतला आहे. त्यांनी आजवर भारत सरकार च्या  युजीसी, डीएइ-बीएआरसी, डीएसटी अशा विविध  संस्थेकडून संशोधन प्रकल्पासाठी १.५० कोटीहून अधिक रुपयांचा निधी आणला आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्यान्वित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत १०  विद्यार्थ्यांनी आपली पीएच डी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले आहे तर ८ विद्याथी पीएच डी शिक्षण घेत आहेत.
त्याचबरोबर त्यांनी भारतातील नामवंत विद्यापीठे व संस्थांमध्ये बोर्ड ऑफ स्टडीज, युजीसी, एलआयसी इत्यादी समित्यांवर शैक्षणिक सल्लागार व मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते भारतातील अनेक विद्यापीठाचे पी.एच.डी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
डॉ. गरडकर  यांचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. तसेच त्यांनी पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंत चे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. प्रा.गरडकर यांचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर पण प्रेरणादायी असा राहिला आहे. प्रा.गरडकर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांना जागतिक पातळीवर सिद्द करण्यासाठी प्रेरित केले आहे. गरजू विद्यार्थी व त्यांचे पालक यांना ते नेहमीच मदत करण्यास तत्पर असतात. यावरून त्यांची समाजाप्रती बांधिलकी दिसून येते. ते अमेरिकन केमिकल सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, एल्सवेअर, स्प्रिंजर, विले, आयओपी अशा १५० हुन अधिक नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यापैकी अनेक जर्नल्सनी त्यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून गौरविले आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधापैकी २५  हुन अधिक शोधनिबंध सायन्स डायरेक्ट च्या विविध जर्नल्स मध्ये टॉप १५ मध्ये गणले गेले आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये तज्ञ म्हणून आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ हुन अधिक  व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर १०० हुन अधिक कार्यशाळा, प्रशिक्षणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र यामध्ये सहभाग दर्शविला आहे.  डॉ. गरडकर यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन अमेरिकन केमिकल सोसायटी, इंडियन सोसायटी फॉर रेडिएशन अँड फोटोकेमिस्ट्री, सोसायटी फॉर मटेरियल केमिस्ट्री, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री इत्यादी संस्थांनी त्यांना आजीव सदस्यपद बहाल केले आहे. याचबरोबर ते अप्लाइड फिजिकल सायन्स इंटनॅशनल नॉलेज प्रेस, केमिस्ट्री अँड अप्लाइड बायोकेमिस्ट्री, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या नामवंत  आंतरराष्ट्रीय जर्नल्स चे संपादक म्हणून काम पाहत आहेत.
या पुरस्काराबद्दल बोलताना डॉ. गरडकर म्हणाले '' भविष्यामध्ये गुणवत्तापूर्ण वैज्ञानिक प्रगतीचा वेग हा खूप असल्यामुळे उद्योगधंदे, प्रशासन, शेती, वैद्यकीय अशा क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज आहे या दृष्टीकोनातून भारताला महासत्ता बनविण्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज आहे. ज्ञानदानापेक्षा ज्ञाननिर्मितीकडे सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मूलभूत संशोधनाकडे वाटचाल करून आपल्या संशोधनाचा समाजासाठी कसा फायदा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. आई वडील, थोरामोठ्यांची आशीर्वाद, हितचिंतक यांच्या जोरावरच आजवर सफल झालो आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. गरडकर  यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.  
photo - डॉ. गरडकर यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रकुलगुरू डॉ.पी.एस.पाटील व कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर

Sunday, 3 January 2021

मुख्याध्यापक संघाने घेतलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत ग्रामीण मधूनशर्वरी पाटील तर 'शहरी मधून अर्पिश कांबळे प्रथम


हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.2/1/21

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत ग्रामीण विभाग लहान गटात शर्वरी पाटील (सरवडे), मोठ्या गटातून मयुरी कांबळे (सरवडे) तर शहरी विभागात लहान गटात उषाराजे हायस्कूलची समृध्दी पंडित तर मोठ्या गटात विद्यापीठ हायस्कूलचा अर्पिश कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
   स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - ग्रामीण विभाग (लहान गट) प्रथम - शर्वरी पाटील (शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे), व्दितीय-सृष्टी ऐतवडे (अनंत बाल विद्यामंदिर पट्टणकोडोली),
तृतीय-अनुष्का गुरव (श्रीराम हायस्कूल, गंगापूर), उत्तेजनार्थ-आयेशा हलकर्णी (परीश्रम विद्यालय,दुडगे), समिक्षा हजारे (दौलतराव निकम माध्य.विद्या. व्हनूर)
ग्रामीण विभाग मोठा गट- प्रथम-मयुरी कांबळे (शिवाजीराव खोराटे मा.वि.सरवडे), व्दितीय प्रध्दा गायकवाड ( श्री विद्यासागर हायस्कूल, अकिवाट), तृतीय-भावना भोई (ताराबाईआण्णासाहेब नरंदे हाय.नांदणी), उत्तेजनार्थ- सानिका कणीरे ( न्यू इंग्लिश स्कूल, (न्यू राजापूर) पट्टणकोडोली),
अर्थव कदम (श्री विद्यासागर हाय.अकि- वाट)
शहरी विभाग लहान गट- प्रथम- अर्पिश कांबळे( विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर), व्दितीय सना कलावंत (मथुरा हायस्कूल, इचलकरंजी), तृतीय-पियुष काकडे (बिलीयंट इंग्लिश मिडियम
स्कूल, शिरोळ ) उत्तेजनार्थ-ईश्यारी परीट (सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी), अर्पिता सुनिल लव्हटे
(आतरभारती विद्यालय, इचलकरंजी)
शहरी विभाग मोठा गट- प्रथम, समृध्दी पंडित (उषाराजे हायस्कूल, कोल्हापूरी, व्दितीय प्रथमेश काकडे (शा.कृ.पंत वालावलकर हाय.कोल्हापूर), तृतीय-अन्विशा पाटील (जनतारा कल्पवृक्ष वि.म.जयसिंगपूर) उत्तेजनार्थ-जानव्ही मोरे, सृष्टी सचिन हिलगे ( म.ल.ग.हायस्कूल, कोल्हापूर)
आदींनी यश प्राप्त केले.
   वक्तृत्व स्पर्धा घेण्यासाठी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन बी.आर.बुगडे, मिलिंद पांगिरेकर, सेक्रेटरी दत्ता पाटील, जॉ.सेकेटरी अजित रणदिवे, ट्रेझरर नंदकुमार गाडेकर, लोकल
ऑडिटर इरफान अन्सारी, संपर्क प्रमुख अशोक हुबळे यांचे सहकार्य व मुख्याध्यापक संघाचे संचालक
रविंद्र मोरे, जितेंद्र म्हैशाळे व डॉ. सचिन कोडेंकर यांनी विशेष परीश्रम घेतले. तर परीक्षक म्हणून आनंदा विष्णू जाधव (डी.एम.हाय.क।। सांगाव), के.आर.पाटील (के.द.भू.पाटील हाय मौजे सांगाव),पी.ए.पाटील (श्री शाहू हाय. इचलकरंजी), वाय.एन.कोथळे (मधुरा हायस्कूल, इचलकरंजी) यांनी कार्य केले. अशी माहिती प्रसिध्दीस मुख्याध्यापक संघाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Saturday, 2 January 2021

शिक्षणाशिवाय प्रगती नाही: - डॉ. अजितकुमार पाटील - - - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न

_*_कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती ,कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये   सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या व शाळेच्या सेविका मंगल मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजचा दिवस ' बालिका दिन ' म्हणून साजरा केला जातो. तसेच महिला शिक्षक दिन म्हणूनही साजरा केला जातो. यावेळी मंगल मोरे यांचा व नंदिनी कांबळे यांचा आदर्श परिपाठ चे पुस्तक देऊन  सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे केंद्र मुखाद्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी सक्षम व अभ्यासू असणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबातील शिक्षणाचा व संस्कृती,संस्कार यांचे विचार समाजातील व्यावहारिक जीवन जगत असतांना  उपयोग करावा.कोरोनाकाळींन आपत्तीमुळे घराचे आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत आहे.त्यावर उपाय म्हणून आपल्या अंगी जे कौशल्य असेल त्याचा वापर करून उधोजक बनले पाहिले.सावित्रीबाई फुलेंनी तेंव्हाच्या काळात अतोनात हाल सोसले आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत त्यामुळे समाज व घर यांचे मधील आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते जपणे गरजेचे आहे.यांचा विचार करून सक्षमपणे महिलांनी उभे राहणे ही आजच्या काळाची गरज आहे.

याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदर्श परिपाठ चे पुस्तके भेट देण्यात आली.यावेळी सोशल डिस्टनस चे नियम पाळून कार्यक्रम शिस्तबद्ध करण्यात आला.
आभार ऋतुराज कोरवी यांनी मानले.

Friday, 1 January 2021

हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे प्रशिक्षण संपन्न

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.1/1/21
हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया यशस्वी करणेसाठी मतदान अधिकाऱ्यांना निवडणूकीमधील मतदान प्रक्रिया संदर्भात पहिले प्रशिक्षण हातकणंगलेचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.
         हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक  निवडणुकीचे मतदान १५जानेवारी रोजी होणार आहेत.या २१ ग्रामपंचायतीमध्ये १७३ मतदान केंद्रे आहेत तर ९४ प्रभागातून २५९ जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यासंदर्भात पहिले प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये पहिल्या सत्रामध्ये  ४४० मतदान अधिकाऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले.तर दुपारच्या सत्रामध्ये  ४६०जणांना प्रशिक्षण देण्यात आले असे एकूण ९०० मतदान अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रास एक केंद्राध्यक्ष व सहाय्यक तीन मतदान अधिकारी असे चार जणांचे पथक गठीत केले आहे. 
         हातकणंगले तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांनी मतदान अधिकाऱ्यांना क्लास रूम ट्रेनिंग व यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक यांचे प्रशिक्षण दिले. पहिले प्रशिक्षण इचलकरंजी मधील घोरपडे नाट्यगृहामध्ये संपन्न झाले. त्यांना या प्रशिक्षणामध्ये इचलकरंजीचे तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार शोभा कोळी, नायब तहसीलदार दिगंबर सानप यांचे सहकार्य लाभले.
       फोटो 
ग्रामपंचायत निवडणूकीच्याप्रशिक्षणामध्ये माहिती देतांना हातकणंगले तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे शेजारी तहसिलदार शरद पाटील नायब तहसिलदार दिगंबर सानप, शोभा कोळी आदी मान्यवर.