Wednesday, 30 June 2021

शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या सहकार्याने शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवणार ! - शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांची ग्वाही

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.1/7/21

महाराष्ट राज्य शिक्षण संस्था महामंडळ अंतर्गत कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था मंडळाची सभा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात शिक्षक आमदार  जयंतराव आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व  कोल्हापूर जिल्हा संस्था संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 
  शिक्षक आमदार प्रा. जयंतराव आसगावकर यांनी सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा केली योग्य मार्गदर्शन करीत शासनाची भूमिका मांडली. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड या अत्यंत सकारात्मक असून त्यांच्या
माध्यमातून शिक्षण संस्थाचालकांचे सर्व प्रश्न समाधानकारक पणे सोडवणार असलेचे मत व्यक्त केले .
   सर्व प्रथम कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष  शिवाजीराव माळकर यानी उपस्थितांचे
स्वागत व सभेचे प्रस्ताविक केले. शिक्षण क्षेतातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करणेत आली . त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले . कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली ,सातारा व सिंधुदुर्ग जिल्हयाचे संचालक, संस्थाचालक यावेळी उपस्थित होते. शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. या सभेत थकित वेतनेतर अनुदान, संचमान्यता ,शाळामूल्यांकान, आर.टी.ई. अॅक्ट , फी वाढ, शाळाप्रवेश,
ऑनलाइन शिक्षण, संस्था शाळा यांचे कोरोना काळातील योगदान ,५वी व ८वी वर्ग जोडणे अडचणी इ.विषयावर चर्चा झाली. यावेळी विभागीय अध्यक्ष शिवाजीराव माळकर , सदानंद भागवत  (रत्नागिरी ), नेमिनाथ बिरनाळे ( सांगली ), राज्य  खजाणिस रावसाहेब पाटील , डॉ. विरेंद्र वडेर , विभागीय उपाध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव ,शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड  , राज्य विशेष निमंत्रक नंदकुमार इनामदार, शिक्षकेत्तर राज्य अध्यक्ष बाबासाहेब पाटील आदिंनी मार्गदर्शन केले . 
या वेळी नंदकुमार इनामदार यानी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर शिक्षक आमदार जयंतराव आसगावकर यांची पदसिद्ध संचालकपदी निवड होणे बाबतचा ठराव मांडला व
तो सर्वानुमते मंजूरही झाला. सभा उत्साहात संपन्न झाली .
      फोटो 
कोल्हापूर विभागीय संस्था चालक संघटनेच्या बैठकीत पुणे विभागाचे शिक्षक आमदार  जयंतराव आसगावकर यांचा सत्कार वसंतराव देशमुख करताना शेजारी रावसाहेब पाटील , एस.डी.लाड , पुंडलीकभाऊ जाधव

Tuesday, 29 June 2021

राजगोंडा पाटील यांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान

हेरले /प्रतिनिधी 
दि.30/6/21

  कोल्हापूर येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् यांच्या वतीने प्रतिवर्षी देणेत येणारा नेशन बिल्डर अवार्ड बालावधुत हायस्कूल मौजे वडगाव चे अध्यापक राजगोंडा बाळगोंडा पाटील यांना देण्यात आला.
       शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांसाठी सदरचा पुरस्कार दिला जातो. सन -२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात बालावधुत हायस्कूल मधील अध्यापक राजगोंडा पाटील यांनी गणित विषयाच्या अध्यापना बाबत व त्यांनी केलेल्या भरीव शैक्षणिक कार्याबद्दल  पुरस्कार दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख श्रीराम पवार यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख श्रीराम पवार, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज चेअरमन श्रीकांत झेंडे, आदी मान्यवरां- सह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

 फोटो 
      दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख श्रीराम पवार यांच्या हस्ते रोटरी क्लब चा पुरस्कार स्वीकारताना राजगोंडा पाटील ,  लिपिक जाधव , व इतर मान्यवर.

Monday, 28 June 2021

विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉ. केदार विजय साळूंखे प्रतिभासंपन्न बालरत्न पुरस्काराने सन्मानित.


 
हेरले / प्रतिनिधी
दि.28/6/21
विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉ.केदार विजय साळूंखे  याला मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई  यांचे वतीने प्रतिभासंपन्न  बालरत्न  राष्ट्रीय अवॉर्ड  २०२१ सन्मानित केले.
    डाॅ.केदार यांने  अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी  चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत   स्केटींग  व सायकलिग  मध्ये  सोळा विश्वविक्रम नोंदवले आहेत.ड त्यास वयाच्या सातव्या वर्षी  डॉक्टरेट इन ॲथलेटीक्स ही पदवी देऊन  द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू  सन्मानित केले आहे.
           डाॅ.केदार साळुंखे यास विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर,   प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे  मार्गदर्शन लाभले आहे.
    फोटो 
डॉ.केदार साळुंखेस प्रतिमासंपन्न बालरत्न राष्ट्रीय  पुरस्काराने सन्मानित करतांना मान्यवर.

Sunday, 27 June 2021

जि. प. सदस्या शौमिका महाडिक यांचेकडून शेती उपयोगी साहित्य वाटप


हेरले / प्रतिनिधी
दि.27/6/21
        जि .प .सदस्या तथा गोकुळच्या संचालिका  शौमिका महाडिक यांच्या फंडातून व सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे यांचे हस्ते करण्यात आले.
     मौजे वडगाव ( ता. हातकणंगले )येथे जि. प. सदस्या व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या फंडातून शेतकऱ्यांसाठी लागणारे एकोणीस हजार रुपये किमतीचे कडबा कुट्टी मशीन सात नग, अडीच हजार रुपये किमतीचे औषध फवारणी स्प्रे पंप तीन नग, ताडपत्री , अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. कोरोणा महामारी च्या
काळात शेतकरी वर्ग अडचणीत असताना अशा शेती उपयोगी दिलेल्या साहित्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
       यावेळी सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले ,अमोल झांबरे, सतीश वाकरेकर, शितल परमाज, अजमुउद्दीन हजारी, भुपाल चौगुले ,विलास सावंत, विलास येलाज ,शिवाजी यादव, यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते .

फोटो 
        मौजे वडगाव येथे शेती उपयोगी साहित्याचे वाटप करताना सुनील  खारेपाटणे, सतीश वाकरेकर,स्वप्नील चौगुले, व इतर मान्यवर.

Saturday, 26 June 2021

आरोग्य खाते हेरलेकरांच्यासाठी ठामपणे उभे राहील - आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

हेरले / प्रतिनिधी
दि27/6/21

तुम्ही हात द्या , मी साथ देतो
आरोग्य खाते हेरलेकरांच्यासाठी  ठामपणे उभे राहील अशी ग्वाही  राज्याचे आरोग्य राज्यमंत्री 
 डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली .  ते हेरले (ता. हातकणंगले) येथे अध्यक्ष हाजी इकबाल देसाई यांच्या लिम्रास शैक्षणिक सामाजिक मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट, हेरले ग्रामपंचायत, मेडिकल असोसिएशन, लोकप्रतिनिधी , सर्व तरूण मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
  या शिबिराचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले . सध्या कोरोना महामारीमुळे सगळीकडे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये हेरलेकरांची साथ ही लाख मोलाची व अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.दिवसभरात विविध मंडळाच्या  १८२ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. याप्रसंगी पती दिग्वीजय आलमान व पत्नी प्रज्ञा आलमान यांनी रक्तदान केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इकबाल देसाई यांनी मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
   या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, बैतुलमाल कमिटी प्रमुख जाफर सय्यद, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉ. पद्माराणी  पाटील , पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कळंबा कारागृहाचे अधिक्षक चंद्रसेन हेडुळकर,पोलिस उपअधिक्षक  रामेश्वर वैजाणे,तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, बादशहा देसाई, पोलिस पाटील नयन पाटील, प्रा. राजगोंड पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख,  मुनिर जमादार,सरपंच प्रतिनिधी संदिप चौगुले, उपसरपंच सतिश काशिद, माजी उपसरपंच राहूल शेटे, माजी सरपंच रियाज जमादार, हिम्मत बारगीर, दादासाहेब कोळेकर, डॉ. महावीर पाटील, डॉ.आर.डी. पाटील, डॉ. अमोल चौगुले,डॉ. इम्रान देसाई आदी मान्यवरासह रक्तदाते उपस्थित होते.
    फोटो 
हेरले : येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन करतांना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर शेजारी हाजी इकबाल देसाई जि. प. माजी सभापती डॉ.पद्माराणी पाटील माजी सभापती राजेश पाटील पोलिस पाटील नयन पाटील व इतर मान्यवर.

Friday, 25 June 2021

महात्मा गांधी विद्यालयामध्ये एनसीसी छात्रांचा पारितोषिक वितरण व सत्कार सभारंभ संपन्न.



हेरले/ प्रतिनिधी
दि.26/6/21

रूकडी ( ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी विदयालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सत्र प्रारंभीच विद्यालयातील एनसीसी छात्रांनी वेगवेगळ्या विभागात प्राविण्य प्राप्त केलेबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
   या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुभेदार मारुती वडणगेकर होते. पाच महाराष्ट्र बटालियन  एनसीसी कोल्हापूर व निवृत्ती सत्कारमुर्ती म्हणून मेजर के.एम.भोसलेउपस्थितहोते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य जे.के.जाधव होते. याप्रसंगी  स्वागत व प्रास्तविक  एनसीसी ॲाफिसर  एम.एस. हजारे यांनी केले. एनसीसी छात्रांनी कोविड काळात देखील वेळोवेळी केलेले ऑनलाईन उपक्रम व मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
   प्रमुख सत्कारमुर्ती सेवानिवृत्ती मेजर भोसले यांनी आजच्या काळात विद्यार्थी कसा देशभक्त घडेल याविषयी अनेक उदाहरणे दिली.प्रमुख पाहुणे सुभेदार वडणगेकर यांनी आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थी घरी असला तरी गुगल नेटचा वापर करून कसा प्रगती साधू शकतो. याविषयी मनोगत व्यक्त केले.आभार  स्वामी यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापिका दाभाडे यांनी केले.याप्रसंगी ग्रंथपाल एल बी पाटील  व शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ व विद्यार्थी पालक उपस्थित होते.
   फोटो 
रूकडी: महात्मा गांधी विदयालयामध्ये एनसीसी छात्रांचा सत्कार करतांना सुभेदार मारूती वडणगेकर शेजारी अन्य मान्यवर.

हेरले येथे बिजप्रक्रिया मोहीम व कृषी विभागाच्या विविध योजना माहिती कार्यक्रम संपन्न

हेरले / प्रतिनिधी
दि.25/6/21

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत  हेरले   (ता हातकणंगले) येथे बिजप्रक्रिया मोहीम व कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
     या प्रसंगी रमेश परीट कृषी पर्यवेक्षक, उपसरपंच  सतीश काशिद, माजी उपसरपंच  राहुल शेटे,  दादासो कोळेकर,  बी एम गोडगे- कृषी पर्यवेक्षक , वसिम मुल्ला - सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक ,  राहुल पाटील कृषी सहाय्यक, सयाजीराव गायकवाड़ आदीसह शेतकरी वर्ग उपस्थित होता.
    फोटो 
हेरले : येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत  बिजप्रक्रिया मोहीम व कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना  माहिती देतांना कृषी अधिकारी.

Wednesday, 23 June 2021

हेरले येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.23/6/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील लिम्रास शैक्षणिक, सामाजिक, मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट, हेरले ग्रामपंचायत, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, सेवाभावी संस्था, सर्वपक्षीय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शनिवारी २६ जून रोजी संपन्न होणाऱ्या जयंती निमित्त औचित्य साधून रक्तदान शिबीराचे अनु शाम मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ४ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
        या रक्तदान शिबीरा प्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा अधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठता एस. एस. मोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस अधीक्षक (सीआयडी) डॉ. दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजाणे, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती  डॉ.पद्माराणी पाटील,  सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचे चेअरमन नविद मुश्रीफ,उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात,तहसीलदार प्रदीप उबाळे, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार,पोलीस पाटील नयन पाटील,कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे प्रमुख जाफर सय्यद, लसीकरण अधिकारी डॉ.फारुख देसाई, वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख, हेरले ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, मेडिकल असोसिएशन आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती प्रसिध्दीस हाजी इकबाल देसाई यांनी दिली.

Monday, 21 June 2021

हेरले कोविड केअर सेंटर ला मा. आमदार सुजित मिणचेकर यांची भेट

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.22/6/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्ग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले मोफत उपचार केंद्र व विलगिकरण केंद्रास माजी आमदार  डॉ. सुजित मिणचेकर यांनी भेट देऊन या मोफत आरोग्य सेवेचे कौतुक केले.

    माजी आम.डॉ.सुजित मिणचेकर  म्हणाले, या गावासाठी आपण ही काही देणे लागतो. या हेतूने गावातील डॉक्टर सामाजिक बांधिलकीतून कोविड केअर सेंटरला  मोफत सेवा देत आहेत. त्यांचे सेवाभावी कार्य कौतुकास पात्र आहे. तसेच गावातील कोरोना परस्थिती हाताळत असताना माजी सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील,  ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी,  मेडिकल व एमआर असोसिएशन, आशा स्वयंमसेविका,अंगणवाडी सेविका या सर्वांनी गावासाठी दिलेले योगदान व केलेल्या उपाययोजनामुळे कोरोनाची परिस्थिती आज नियंत्रणात आली आहे. आपण केलेले योगदान जनता कधी ही विसरणार नाही असे मत व्यक्त केले. या प्रसंगी कोरोना आजाराने बरे झालेल्या रुग्णांना डीस्चार्जचे पत्र देण्यात आले.
   यावेळी माजी साभापती राजेश पाटील, पोलिस पाटील नयन पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, सरपंच प्रतिनिधी संदिप चौगुले,उपसरपंच सतीश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले ,माजी उपसरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य रणजित इनमादर, संदीप मिरजे, तुषार अलमान, मंदार गडकरी, इब्राहीम खतीब, डॉ. अमोल चौगुले, डॉ. आर डी पाटील, डॉ. महावीर पाटील, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

     फोटो 
हेरले : येथील मोफत विलगिकरण केंद्राची पाहणी करून  रूग्णांना डिस्चार्जचे पत्र देतांना माजी आम.डॉ. सुजित मिणचेकर माजी सभापती राजेश पाटील पोलिस पाटील नयन पाटील व अन्य मान्यवर.

Friday, 18 June 2021

मुख्याध्यापक महामंडळावर उपाध्यक्षपदी निवडीबद्दल व्ही.जी.पोवार यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी
दि.18/6/21

        मुख्याध्यापक महामंडळावर उपाध्यक्षपदी व्ही.जी.पोवार यांच्या निवडीने कोल्हापूर जिल्ह्याला सन्मान दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या समस्या सोडविण्यासाठी यामुळे मदत होईल असे प्रतिपादन शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी लाड यांनी केले.
        कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या
 उपाध्यक्षपदी व्ही.जी.पोवार, विभागीय अध्यक्ष एन.आर.भोसले, सदस्य शिवाजीराव कोरवी, चेअरमन सुरेश संकपाळ यांच्या निवडीबद्दल करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
        एस.डी लाड यांनी संघटनांच्या अंतर्गत वादात नुकसान होत आहे त्यामुळे भविष्यात जुटीने काम करावे असे आवाहन केले.यावेळी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ,उपाध्यक्ष मिलिंद पांगीरेकर,बाबासो बुगडे,सचिव दत्ता पाटील,जॉईंट सेक्रेटरी अजित रणदिवे,बाबासाहेब पाटील,जीवनराव साळोखे यांची भाषणे झाली.
व्ही.जी.पोवार यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांचे स्मरण केले.
      यावेळी कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी.चौगुले संचालक श्रीकांत पाटील,सुरेश उगारे,उपस्थित होते.या समारंभाचे स्वागत मिलिंद पांगीरेकर यांनी केले तर आभार शिवाजीराव कोरवी यांनी मानले.

      फोटो 
व्ही.जी.पोवार यांचा सत्कार करताना जीवनराव साळोखे व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी

लिम्रास ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकीतून कोरोना रुग्णांना अडीचशेवर मोफत ऑक्सीजन सिलेंडर चे वाटप

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.18/6/21
             
हेरले येथील लिम्रास शैक्षणिक सामाजिक मेडिकल ट्रस्टतर्फे केवळ  सामाजिक बांधिलकीतून कोरोना रुग्णांना अडीचशेवर मोफत ऑक्सीजन सिलेंडर चे वाटप करून कोरोना रुग्णांना जीवन दान देण्याचे आदर्शवत कार्य हाजी इकबाल भाई देसाई यांनी केले आहे.     
                 सध्या राज्यात सर्वत्र देशात सर्वत्र कोरोनाचे दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे .त्यातून कित्येकांचे बळी जाऊन संसार उघड्यावर पडण्याची वेळ आलेली आहे.विशेषता या काळात केवळ ऑक्सिजन , व्हेंटिलेटर  मुळे कित्येकांना आपले जीव गमावण्याची वेळ आल्याने शासन पातळीवरून कित्येक संस्थांच्या माध्यमातून ऑक्सीजन प्लांट उभारून ऑक्सिजनचे पुरवठा करण्याचे प्रयत्न झाले .परंतु अशा या महामारीच्या काळात हेरले येथील  लिम्रस शैक्षणिक सामाजिक मेडिकल संस्थेतर्फे जनतेची अडचण लक्षात घेऊन हेरले,शिरोली हातकणंगले, शिरोळ,इचलकरंजी जयसिंगपूर रूकडी या भागात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या संस्थेचे अध्यक्ष हाजी इक्बाल भाई देसाई यांनी मानवता धर्म पालन म्हणून  अडीशेवर जम्बो ऑक्सीजन सिलेंडर चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत भागात एक वेगळा आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.या शिवाय या कोरोना महामारीच्या  काळात  ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे याचा विचार करून वृक्ष लागवडीचे नियोजन करून वृक्षसंवर्धन सुरू केले आहे.याबाबत बोलताना इक्बाल भाई देसाई म्हणाले या महामारीच्या काळात आपले मानवजातीला मदत करून जास्तीत जास्त रुग्णांना  जीवन दान प्राप्त करून देण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे.त्यांच्या माध्यमातून आशीर्वादाची शिदोरी हीच उराशी बांधून आम्ही ऑक्सीजन सिलेंडर वाटप करण्याचा निर्णय घेतला असून कोरोना लाट संपेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार आहे.

Wednesday, 16 June 2021

हेरले मोफत कोविड सेंटरचे कार्य आदर्शवत - आम. राजूबाबा आवळे

हेरले / प्रतिनिधी

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत व मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत चालविलेल्या उपचार केंद्राची आरोग्य सेवा व विलगिकरण केंद्राच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत केलेले उपचार म्हणजे  सामाजिक बांधिलकीतून केलेले हे गौरवास्पद कार्य म्हणजे महाराष्ट्रात आदर्श मानले जाणारे आहे. असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.
        ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील मोफत उपचार केंद्र व विलगिकरण केंद्रास भेटी प्रसंगी बोलत होते. ग्रामपंचापत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट  असोसिएशन , सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपचार केंद्र व कोविड केअर सेंटर सुरू केले आहे या केंद्रास सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.
     ग्रामपंचायत व आरोग्य सेवा देणाऱ्या असोसिएशनने हेरले गावातील रुग्णांची संख्या आटोक्यात आणून त्यांना आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी मोफत घर टू घर आरोग्य तपासणी, आरटीपिसीआर व अँटीजन चाचण्या, रूग्ण वाहिका, घोडावत कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना भरती सेवा,  लक्षणे नसलेली मात्र पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना उपचार सुरू केले आहेत. आदी  मोफत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवाच्या स्तुत्य उपक्रमाची पाहणी करून त्यांच्या सेवाभावी कार्यास प्रेरणा देण्यासाठी आम. राजूबाबा आवळेंनी या उपचार केंद्रास भेट दिली. या प्रसंगी डॉ. अमोल चौगुले यांनी या केअर सेंटरची त्यांना सविस्तर माहिती दिली.
       या प्रसंगी वैद्यकिय अधिकारी राहूल देशमुख, पोलिस पाटील नयन पाटील, राजेंद्र कचरे, अर्जून माने, तलाठी एस.ए. बरगाले, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. अमोल चौगुले ,डॉ. नितीन चौगुले, डॉ. सुरेखा आलमान, डॉ. इम्रान देसाई,प्रविण पाटील महमंद जमादार आदीसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
       फोटो 
हेरले : येथील कोविड केअर सेंटरच्या भेटी प्रसंगी आम. राजूबाबा आवळे, राजेंद्र कचरे वैद्यकिय अधिकारी, डॉ. राहूल देशमुख, पोलिस पाटील नयन पाटील व अन्य डॉक्टर्स

Monday, 14 June 2021

मुख्याध्यापक संघाच्या विधायक भूमिकेमुळे एकसंघपणे शैक्षणिक प्रश्नसोडवणूकीसाठी निश्चित उपयोग होईल - आम. जयंतराव आसगांवकर


महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचा नुतन पदाधिकारी सत्कार समारंभ

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.14/6/21
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबईच्या उपाध्यक्षपदी
कोल्हापूरचे व्ही. जी. पोवार, विभागीय अध्यक्षपदी एन. आर. भोसले, पदसिध्द सदस्यपदी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष  सुरेश संकपाळ तर सदस्यपदी शिवाजीराव कोरवी यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या राजर्षि शाहू सभागृहात पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंतराव आसगांवकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. 
             शिक्षक आमदार जयंतराव आसगांवकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील वैचारिक मतभेद बाजूला सारत मुख्याध्यापक संघाने सर्वांना बरोबर घेवून जाण्याची विधायक भूमिका घेतल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सुटण्यासाठी याचा
निश्चितच जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला उपयोग होईल अशा विधायक भूमिकेला माझे पाठबळ नेहमीच राहील.
      शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, शिक्षण क्षेत्रात जिल्हा स्तरावर निर्माण झालेले मतभेद महामंडळाच्या निवडीने दूर झाले असून एकसंघपणे प्रयत्न केल्यास आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास मदत होईल.
       व्ही जी पोवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील नव्याने येवू घातलेल्या आव्हानाना तोंड देण्यासाठी नेहमीच
मुख्याध्यापक संघाच्या पाठिशी राहण्याचे अभिवचन दिले.
   यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, संघाचे सेक्रेटरी दत्ता पाटील, व्हा.  चेअरमन बाबासाहेब बुगडे, जॉ.सेक्रेटरी अजित रणदिवे, मार्गदर्शक जीवनराव साळोखे, मुख्याध्यापक संघाचे संचालक सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, विभागीय अध्यक्ष एन. आर. भोसले व एस.टी.चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हा. चेअरमन मिलिंद पांगिरेकर तर आभार महामंडळ सदस्य शिवाजीराव कोरवी यांनी मानले.

      फोटो 
 महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचा नुतन पदाधिकारी सत्कार समारंभप्रसंगी शिक्षक आमदार जयंतराव आसगांवकर सोबत एस डी. लाड, बाबा पाटील, बी.आर, बुगडे, मिलिंद
पांगिरेकर, जीवनराव साळोखे, दत्ता पाटील, अजित रणदिये, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील. एस.टी. चौगुले आदी मान्यवर.

Sunday, 13 June 2021

शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना covid-19 ड्युटीतून मुक्त करावे - डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंचची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.13/6/21

*शिक्षकांना दहावी निकालाची कामे वेळेत करण्यासाठी, तसेच शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करिता शिक्षकांना covid-19 ड्युटीतून मुक्त करावे,* अशी मागणी डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंच कोल्हापूर यांचेवतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. विचारमंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले.
     त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रांतील विविध प्रश्नासंबंधी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व वेतनपथक अधीक्षक कोल्हापूर यांनाही निवेदन देण्यात आले. covid-19 ड्युटीतून शिक्षकांना मुक्त करावे,  नवीन शिक्षक व शिक्षकेतर भरती सुरु करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन व प्रॉव्हिडंट फंड रकमा विनाविलंब आदा कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या.
    या शिष्टमंडळामध्ये मंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार, उपाध्यक्ष एस.के.पाटील, ए.एस.रामाने, के.के.पाटील, बी.बी.पाटील, रंगराव तोरस्कर, उदय पाटील, दत्तात्रय जाधव, राजेंद्र खोराटे, एस.टी.चौगुले यांचा समावेश होता.
       फोटो
शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे अधिक्षक एन एम शिंदे यांना लेखी निवेदन देतांना डी बी पाटील शैक्षणिक विचारमंचचे शिष्ट मंडळ.

Saturday, 12 June 2021

डॉ. विजय कुमार गोरड यांची सामाजिक बांधिलकी



हेरले /प्रतिनिधी
 दि.12/6/21
 मौजे वडगाव ( ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते व हातकणंगले संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य    डॉ. विजयकुमार गोरड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील गरीब व गरजू लोकांना एन ९५ मस्क चे मोफत वाटपप्रमुख पाहुणे  हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते केले. प्रमुख उपस्थिती गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांची  होती.
         आम. राजूबाबा आवळे  म्हणाले, की डॉ. विजय गोरड यांनी पेन्शनच्या माध्यमातून गरीब लोकांना जगण्याचा अधिकार दिला आहे. तसेच सामाजिक उपक्रम जपत आपल्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटून सामान्य जनतेची काळजी घेतली आहे .त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून त्यांना चांगले निरोगी आयुष्य लाभू दे असे सर्वांनी मिळून आशीर्वाद देऊया. यावेळी गोकुळचे नूतन संचालक बयाजी शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
        यावेळी आमदार राजू बाबा आवळे, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, डॉ. उत्तम मदने, नगरसेवक सचिन चव्हाण, सरपंच काशिनाथ कांबळे, यांच्यासह विविध  संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मयूर गोरड यांनी केले. तर आभार भगवान कांबळे यांनी मानले.

    फोटो

मौजे वडगाव येथे गरजू लोकांना मास्क चे वाटप करताना आम. राजू बाबा आवळे, गोकुळचे संचालक बयाजी शेळके डॉ. विजयकुमार गोरड, बबनराव रानगे व इतर मान्यवर.

Friday, 11 June 2021

माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्युटी रद्द करण्याची मुख्याध्यापकसंघाची मागणी - सुरेश संकपाळ


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.12/6/21

माध्यमिक शाळांच्यामध्ये इ.१० वी निकालाच्या संदर्भाने मूल्यमापनाची कार्यवाही सुरु असून यासाठी माध्यमिक शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती गरजेची आहे. इ. १० वी निकालाचे काम विहित मुदतीत करावयाचे असल्याने शिक्षकांना कोवीड ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक
संघाच्या सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.
     या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवदने देण्यात आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इ.१०वी ) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा तपशील जाहीर केला आहे यानुसार विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्त्ते वर्गशिक्षकांकडे सादर करणे
तसेच वर्गशिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून शाळा समितीकडे सादर करणे. शाळा समितीने निकालाचे परिक्षण करून प्रमाणित करणे, मुख्याध्यापकांनी विषयनिहाय गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरणे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे निकाल व इतर प्रपत्रे विभागीय मंडळात जमा करणे ही कार्यवाही दि.११/०६/२०२१ ते दि ३०/०६/२०२१ या कालावधीत पूर्ण करावयाची असल्याने माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या कोविड ड्युट्या रद्द करून शैक्षणिक कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यात यावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ
यांनी केले.
   यावेळी संघाचे उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, मिलिंद पांगिरेकर, सचिव दत्ता पाटील,सहसचिव अजित रणदिवे, टेझरर नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडिटर आय. ए. अन्सारी,संपर्क प्रमुख अशोक हुबळे, संचालक पी.जी.पोवार, रविंद्र मोरे, श्रीशैल्य मठपती, सागर कुमार चुडाप्पा, जितेंद्र म्हैशाळे, संजय भांदुगरे, सखाराम चौकेकर, संजय देवेकर, श्रीकांत पाटील,गुलाब मारुती पाटील, सुरेश उगारे, एस.एस.चव्हाण, एस. आर. पाटील, जनार्दन दिडे संचालिका अनिता नवाळे, सारिका यादव स्वीकृत सदस्य बी.सी. वस्त्रद सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, शिवाजी नाना माळकर आदी उपस्थित होते.

Wednesday, 9 June 2021

तिर्थक्षेत्र श्री कुंथुगिरी आळते येथे 108 रोपांचे वृक्षारोपण

हेरले / प्रतिनिधी
दि.9/6/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील नितीन परमाज यांनी पुत्ररत्न झालेबद्दल व सहर्ष विजय शेटे याच्या वाढदिवसानिमित्त  तिर्थक्षेत्र श्री कुंथुगिरी आळते येथे एकशे आठ रोपांचे वृक्षारोपण करून आनंदोत्सव  साजरा केला.
     या वृक्षरोपण कार्यक्रमात नितीन     परमाज, विजय शेटे ,रोहन परमाज, अक्षय परमाज ,अरूण लाटवडे, यश परमाज आदींनी सहभाग घेतला.
     फोटो 
तिर्थक्षेत्र श्री कुंथुगिरी आळते येथे वृक्षारोपण करतांना हेरले गावामधील युवा वर्ग.

Tuesday, 8 June 2021

हालोंडी येथे गरजूंना औषधे व रेशन कीटचे वाटप

हेरले / प्रतिनिधी
दि.8/6/21

सोशल मीडियामुळे जेव्हा एकीकडे साध्या साध्या गोष्टीचा इव्हेंट साजरा करण्याची पद्धत रूढ झाली असताना, दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर करत आणि अत्यंत निस्वार्थी अशा पद्धतीने आपल्या आजुबाजूच्या समस्या जाणून घेणे आणि नेहमीच  अशा कठीण काळात सुद्धा  टी टी सी चॅरिटेबल ट्रस्ट,  ,नृसिंह फाउंडेशन हालोंडी यांनी या विषाणूंचा धोका आणि त्याबाबत आवश्यक असणारी जनजागृतीची मोहीम सर्वप्रथम या ग्रुपने हाती घेतली. 
    गर्दी कमी करण्यासाठी थेट लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व पटवून देणे, बाहेर गावाहून आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे,  या बाबतीत प्रशासनाला सर्व प्रकाराचे सहकार्य या ट्रस्ट मार्फत करण्यात आले. 
    एकीकडे जनजागृती बाबत काम सुरू असताना आवश्यक व गरजू लोकांची माहिती गोळा करणे व त्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी या ट्रस्ट कमालीची तत्परता दाखवली. यासाठी या ट्रस्ट सदस्यांनी स्वेच्छेने वर्गणी काढून त्यातून गरजू लोकांच्या पर्यंत 20 रेशन किट पोहचवण्याचे कार्य केले.
या कार्यामध्ये सर्वात मोठा मदतीचा हात हा शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि कर्मचारी व Vagmi फाउंडेशनचे समारियाह मॅडम यांचा लाभला. यांच्या पुढाकाराने गरजू लोकांना  ७० रेशन किट व ४०० परिवाराला  एक महिन्याचे मल्टी व्हिटॅमिन व व्हिटॅमिन सी चे टॅबलेट देण्यात आले.  आवश्यक ती सर्व मदत करण्यास देखील पुढाकार घेतला आहे. अनेक भुकेल्या कुटुंबांना मदतीचा हात देऊन समाजकार्य अविरत चालू करून शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो. नि. किरण भोसले  करून एक अत्यंत कौतुकास्पद कार्य केले, यातून समाजासाठी पोलिस प्रशासन सदैव उपलब्ध आहेत याचे उत्तम उदाहरण दिले.
    या कार्यक्रमास राजेंद्र चौगुले, जे. बी पाटील , सुनील पाटील , बाबूराव चौगुले ,गणपती चौगुले, अजय पाटील, किरण कांबळे ,किरणं महाजन ,सचिन चौगुले ,अतुल नाईक ,निलेश चौगुले यांनी नियोजन केले होते.

    फोटो 
हालोंडी : येथे मोफत औषधे वाटप करतांना मान्यवर

Sunday, 6 June 2021

संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये 'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा

हातकणंगले / प्रतिनिधी

संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये  'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री.विराट गिरी यांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पॉलीटेक्निकचे कार्यालयीन सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री.विराट गिरी म्हणाले '' छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी ६ जून हा आनंदाचा दिवस. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा अरुणोदय झाला, शासनाने हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास सांगितलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा मिळाला आहे. महाराज अत्यंत धाडशी आणि उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि याच्या जोरावरच मुघल सामाज्र्याचा नायनाट केला यासाठी त्यांनी गनिमी कावा व अन्य युद्धरणनीतीचा वापर केला.''
या आयोजनाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित व संकलित कवितागायन स्पर्धेचे निकाल जाहीर

हेरले / प्रतिनिधी
दि.6/6/21
आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित व संकलित कवितागायन स्पर्धेचे निकाल कोल्हापूरच्या आभाळमाया या शैक्षणिक सामाजिक सेवा संस्थेच्याा अध्यक्षा लक्ष्मी बाजीराव पाटील यांनी जाहीर केला आहे. 
     कोरोनाच्या भयग्रस्त निराशेच्या वातावरणात स्वतःसह इतरांनाही काही क्षण रिजवावे, समाजात मानवी मूल्यांची रुजवणूक व्हावी राज्यभरातील शिक्षकांच्या काव्य प्रतिभेस व्यासपीठ उपलब्ध व्हा वे या उदात्त हेतूने आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने समाजभान समूहाचे संस्थापक, लेखक विश्वास सुतार, कवी सुनील सुभाष पाटील मडीलगेकर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षिकांसाठी ऑनलाइन स्वरचित व संकलित कविता गायन सादरीकरण स्पर्धेचे आयोजन २१एप्रिल ते  १० मे या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक गोवा राज्यातील शिक्षक शिक्षिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता  सदर स्पर्धेचा निकाल विजेते व सहभागी स्पर्धक यांना प्रमाणपत्र देऊन ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यासाठी तांत्रिक सहाय्य तुषार  पाटील,योगेश माने यांनी केले .या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून कवी चित्रपट गीतकार बी. अनिल पाटील, कवी राजेंद्र कोरे, लेखिका  नयना संजय पाटील, कवयित्री सविता पाटील यांनी काम पाहिले.यावेळी संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते . 

आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित / संकलित  काव्यगायन सादरीकरण स्पर्धा सन २०२१अंतिम विजयी स्पर्धक यादी
 
(स्वरचित  काव्य )
-प्रथम क्रमांक पुरुष युवराज रघुनाथ पाटील  येवती ( ता.करवीर),

प्रथम क्रमांक महिला सुरेखा सुरेश कुंभार  उदगाव (ता.शिरोळ) 

द्वितीय क्रमांक  पुरुष सचिन उत्तम राजमाने  ओंढ( ता.कराड ) ,

द्वितीय क्रमांक  पुरुष सुभाष नाथा  मुगडेवाडी  (ता. पन्हाळा),

द्वितीय  क्रमांक महिला संगीता सखाराम राजुगडे एकोंडी  (ता.कागल),

द्वितीय  क्रमांक महिला वर्षा सुधाकर कोकाटे चक्रधर स्वामी (नागपूर), 

तृतीय क्रमांक  पुरुष बाळासाहेब  तुकाराम निंबाळकर सांगाव (ता.कागल )

,तृतीय क्रमांक  पुरुष आदिनाथ कानिफनाथ  शिदोरे  (अहमदनगर) ,

तृतीय क्रमांक  महिला किशोरी महादेव चौगले  कळे (ता.पन्हाळा),

तृतीय क्रमांक  महिला विद्यादेवी वसंत देशिंगे  चिंचवाड  (ता.करवीर )


   अंतिम विजयी स्पर्धक काव्य

प्रथम क्रमांक पुरुष राजेंद्र बापुसो एकल  वाघापूर,

प्रथम क्रमांक महिला मनीषा दत्तात्रय एकशिंगे  शिये  

 ,द्वितीय क्रमांक  पुरुष विलास  विनायक लाटकर केळोशी,
द्वितीय क्रमांक  पुरुष शंकर महादेव दिवटे कुरुंदवाड, 

द्वितीय  क्रमांक महिला सुरेखा सुरेश कुंभार उदगाव,

द्वितीय  क्रमांक महिला वैशाली संभाजी बोरचाटे  चिपरी, 

तृतीय क्रमांक  पुरुष समीर दस्तगीर मुल्लांनी  बाचणी, 

तृतीय क्रमांक  पुरुष धनाजी गंगाराम  केने  रामनवाडी,

तृतीय क्रमांक  महिला तेजश्री जयंत डांगरे  तारदाळ,

तृतीय क्रमांक  महिला सरला नंदू पाटील  थेरगाव ,पुणे 

  आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित / संकलित   काव्यगायन सादरीकरण स्पर्धा

प्रथम क्रमांक पुरुष बाळकृष्ण पांडुरंग   बामणी (  ता.कागल)


प्रथम क्रमांक महिला कांचन तानाजी देसाई क| सांगाव (ता.कागल)


द्वितीय क्रमांक  पुरुष शरद पांडुरंग  कळंबे तर्फ कळे (ता.करवीर)

द्वितीय क्रमांक  पुरुष सोमनाथ अरविंद जाधव कोल्हापूर ,

द्वितीय  क्रमांक महिला सुनिता शंकर व्हनारे खुपिरे  (ता.करवीर)

द्वितीय  क्रमांक महिला कल्पना  घोळवे  कुरुंदवाड  (ता.शिरोळ)
तृतीय क्रमांक  पुरुष सुभाष  बाबुराव गायकवाड   माजगाव,

तृतीय क्रमांक  महिला आरती लाटणे खोतवाडी (ता.हातकणंगले)

तृतीय क्रमांक  महिला कल्पना दत्तात्रय डांगे वडगाव,

विशेष प्राविण्यप्राप्त स्पर्धक -

प्रथम क्रमांक पुरुष महेश शिवाजी सावंत  कोतोली (पन्हाळा) ,

प्रथम क्रमांक महिला किरण जाधव प्रबोधन कुर्ला  (मुंबई) ,

द्वितीय क्रमांक  पुरुष उत्तम बाबासो पाटील मांगनूर  (ता.कागल ),

द्वितीय क्रमांक  पुरुष विलास  धोंडू पळसंबकर कुर्ला (मुंबई) 

,द्वितीय  क्रमांक महिला जैनब आदम शेख  नागदेववाडी ( ता.करवीर ) ,

द्वितीय  क्रमांक महिला सुनंदा सुनील पाटील उदगाव (ता.शिरोळ) ,

तृतीय क्रमांक  पुरुष  हरिबा  महादेव कोळी  दानोळी (ता.शिरोळ) 

,तृतीय क्रमांक  महिला श्यामली  तारदाळ  (ता.हातकणंगले )
 आदी शिक्षक शिक्षिकांनी यश संपादन केले.

Thursday, 3 June 2021

मौजे वडगाव येथे विलगीकरण केंद्राचे उद्घाटन

हेरले /प्रतिनिधी
दि.3/6/21

   मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून संस्थात्मक विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून गाव कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. ग्रामस्थांनी कुटुंबाची आणि गावाची काळजी घ्या तसेच गावासाठी  लागणाऱ्या सहकार्यास  मी तत्पर आहे. असे मत जि. प .सदस्य दलितमित्र       डॉ.अशोकराव माने यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून उभारलेल्या कोव्हिड विलगीकरण केंद्राचे उद्घाटन दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
सरपंच काशिनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  गावातील या केंद्रासाठी नियोजन चांगले केले असून पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे मत सरपंच काशिनाथ कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच सुभाषअकीवाटे ,माजी उपसरपंच किरण चौगुले, ग्रामसेवक प्रशांत मुसळे, तलाठी संदीप बरगाले, कोतवाल महंमद जमादार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.वाघमोडे ,डॉ. विजयकुमार गोरड, डॉ. संगीता चौगुले, डॉ.एस जी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे,अविनाश पाटील, सर्जेराव सावंत, रामचंद्र चौगुले ,यांच्यासह मेडिकल असोसिएशन ,एम आर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, कोरोना सनियंत्रण समितीचे पदाधिकारी आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व अन्य सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
       फोटो 
मौजे वडगाव : येथील विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करतांना दलित मित्र डॉ. अशोकराव माने शेजारी सरपंच काशिनाथ कांबळे व अन्य मान्यवर.

Wednesday, 2 June 2021

हेरले येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी
दि.2/6/21

हेरलेमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्र स्थापन झाले असून या अलगीकरण केंद्राच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून गाव शंभर टक्के कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.यासाठी गावातील सर्व घटकांचे सहकार्य लाभले आहे. हा उपक्रम स्तूत्य आहे. असे मत माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केले.     
   ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथे जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत ,प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लक्षणे नसलेली मात्र कोरोना अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांसाठी नॉन ऑक्सिजन ३० बेडचे संस्थात्मक विलगीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी बोलत होते. या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांच्या हस्ते संपन्न झाले.
   या प्रसंगी हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन.पाटील म्हणाले, गावांमध्ये नॉन ऑक्सिजन ३० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू झाले आहे खरोखरच गावाचे हे कार्य         गौरवास्पद असून या आरोग्य सेवेस पोलिस प्रशासनाकडून सदैव  सहकार्य राहिल. 
   या वेळी या संस्थात्मक विलगीकरणाची माहिती देताना वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख म्हणाले, नॉन ऑक्सिजन ३० बेडच्या संस्थात्मक विलगीकरणात १५ पुरूषांसाठी व १५ स्त्रियांसाठी बेडची सोय केली आहे. या रुग्णांच्या सेवेसाठी एक वैद्यकिय अधिकारी,दोन सहाय्यक खासगी डॉक्टर ,तीन वॉर्ड बॉय,एक टेक्निशियन,एक डाटा एंट्री ऑपरेटर,एक फार्मासिस्ट,तीन नर्स, एक चालकसह रुग्णवाहिका या सेंटरच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहे. रुग्णांना मोफत औषध पुरवठा ग्रामपंचायतीने पंधरा वित्त आयोगातून केला आहे .अशी माहिती दिली.
         या प्रसंगी पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, पोलिस पाटील नयन पाटील , उपसरपंच सतिश काशिद ,माजी उपसरपंच संदिप चौगुले, विजय भोसले, राहूल शेटे,मुनिर जमादार,डॉ.आर. डी.पाटील, डॉ महावीर पाटील, डॉ अमोल चौगुले, डॉ. इमरान देसाई,डॉ शरद आलमान, डॉ. सुरेखा आलमान,कोतवाल मंहमद जमादार आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व अन्य सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
       फोटो 
हेरले: येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार शेजारी माजी सभापती राजेश पाटील ,पोलिस पाटील नयन पाटील, डॉ.राहूल देशमुख व अन्य मान्यवर.

Tuesday, 1 June 2021

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी एन. आर .भोसले यांची निवड

हेरले / प्रतिनिधी
दि.1/6/21
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या कोल्हापूर विभागिय अध्यक्षपदी संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव  एन. आर .भोसले यांची 
 निवड झाली. 
  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये विभागिय अध्यक्षपदाची निवड झाली. सर्वांनी सहसचिव एन आर भोसले यांचे मनोमन अभिनंदन केले. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्याच्या अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले, प्रशासन, प्रशासिका , प्राचार्य, उपप्राचार्य ,शिक्षक बंधू-भगिनी सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या मंडळावर त्यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होतच आहे. आजपर्यंत त्यांच्या 30 वर्षांच्या या अनुभवावरून त्यांना हा मिळालेला मान सार्थ आणि अभिमानाचा वाटतो.

मौजे वडगांवमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

हेरले / प्रतिनिधी
दि.1/6/21

मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील श्री बिरदेव मंदिरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन  सरपंच  काशिनाथ कांबळे डॉ. विजय गोरड यांच्या हस्ते संपन्न झाले.
   या प्रसंगी बापुसो शेंडगे, आनंदा गोरड, मारुती शेंडगे, रघुनाथ गोरड, समाधान भेंडेकर, बाबासो लांडगे, सुनील भेंडेकर, अण्णासो गोरड, आनंदा भेंडेकर, संजय गोरड, विनायक शेंडगे, अविराज शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
      फोटो 
मौजे वडगांव  येथील श्री बिरदेव मंदिरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करतांना सरपंच  काशिनाथ कांबळे डॉ. विजय गोरड व इतर मान्यवर.