हेरले / प्रतिनिधी
पाच सप्टेंबरच्या जलसमाधी आंदोलनाची सुरुवात प्रयाग चिखली येथून ( पंचगंगा नदी मुळ संगम ) १ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू होणार आहे. या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणेसाठी हेरले (ता. हातकणंगले) येथील शेतकरी विकास सेवा सोसायटीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी सभापती राजेश पाटील, संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार यांच्या मार्गदर्शनाने सभा संपन्न झाली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामा होऊन २०१९ साली मिळालेल्या भरपाई प्रमाणेच योग्य भरपाई मिळावी. तसेच नियमित शेती कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली पन्नास हजाराची मदत १ सप्टेंबर पूर्वी मिळावी याच बरोबर इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाच सप्टेंबरला कृष्णा पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पदयात्रेत हेरले परिसरातील शेतकरी व पूरग्रस्तांनी सहभागी होण्यासाठी आवाहन करणेसाठी या सभेचे नियोजन केले होते.
पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरुवात १ सप्टेबर रोजी होऊन आंबेवाडी , वडणगे येथील जवळील गावे करत शिये येथे मुक्काम , २ सप्टेबंर रोजी शिरोली हालोंडी दुपारी जेवण हेरले मार्गे चोकाक मुक्काम, ३ सप्टेबंर रोजी सकाळी अत्तीग्रे , रुकडी धरणावरून चिंचवाड ,वळीवडे, वसगडे , पट्टण कोडोली बिरदेव मंदिर मुक्काम , ४ सप्टेबंर रोजी इंगळी , रुई , चंदूर इचलकरंजी ,शिरदवाड ,अब्दूललाट मुक्काम , ५ सप्टेबर रोजी येथून नरसोबाचीवाडी येथील जलसमाधीसाठी प्रस्थान होणार आहे.जास्तीतजास्त पूरग्रस्त शेतकऱ्यांचा सहभाग , दिलेल्या मागण्या शासनाने अग्रक्रमाने मान्य कराव्यात आणि पूर बाधितांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी. या मागण्यासाठी या पदयात्रेचे नियोजन केले आहे.
शेतक-यांनी मोठ्या संख्येंनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केले. ही पदयात्रा यशस्वी करणेसाठी मोठ्या संख्येने शेतकरीवर्ग व पूरग्रस्त सहभागी होऊन ही पदयात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहू असा निर्धार माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी सरचिटणिस मुनिर जमादार,अरुण मगदूम , लक्ष्मण निंबाळकर, राजगोंड पाटील,अशोक मुंडे,उदय चौगुले,संदीप चौगुले, बाळगोंड पाटील,अमोल पाटील,सुरेश चौगुले, महंमद खतीब,अस्लम मगदूम,सुनील खोचगे, राजेंद्र कदम,राहुल शेटे,फरीद नायकवडी,दादासो कोळेकर, सरदार जमादार आदी मान्यवरांसह शेतकरी व पूरग्रस्त उपस्थित होते.