जुनी पेन्शन योजना लागू करणे, परिविक्षाधीन शिक्षकांना १८००० रुपये मानधन करणे, शालार्थ आयडी चा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावा आदी मागण्यांचा समावेश.
*कोल्हापूर* : ९ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी कोल्हापूर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले .शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे,कार्याध्यक्ष बाळ डेळेकर , कोल्हापूर शहराध्यक्ष सूर्यकांत चव्हाण , शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हा अध्यक्ष गजानन चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने विविध शैक्षणिक मागण्याबाबत शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्याशी चर्चा करण्यात आली. निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्यांचा समावेश होता. सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानां जुनी पेन्शन योजना लागू करणेत यावी, घोषित -अघोषित विनाअनुदानित शाळांना 100% वेतन अनुदान देण्यात यावे, 17 मे 2017 चा रात्र शाळाबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी तुकडीचा निकष शहरी भाग 25, ग्रामीण भाग 20 डोंगराळ भाग 15 विदयार्थी हा निकष कायम ठेवावा, कला- क्रीडा व आय.सी.टी. शिक्षकांचा संचमान्यतेत समावेश करण्यात यावा, सावित्री -फातिमा शिक्षक कुटुंब स्वास्थ्य योजना त्वरित लागू करण्यात यावी , वेळखाऊ व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे शालार्थ आयडी संगणकप्रणाली रद्द करण्यात यावी व शालार्थ आयडी चा अधिकार शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांना देण्यात यावा,परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षकांना किमान वेतन मानधन 18 हजार रुपये देण्यात यावे, 2018 पासून प्रलंबित असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सदोष संच मान्यता दुरुस्त करण्यात यावी, कोविड व अन्य आजाराने मयत शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपावर तात्काळ नोकरी देण्यात यावी,पोस्ट कोविड आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत समावेश करण्यात यावा , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून वगळण्यात यावे व ऑनलाईन - ऑफलाइन शैक्षणिक कामकाजासाठी त्यांना पुरेसा वेळ देण्यात यावा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना नोकरी व शेतीतून मिळणारे उत्पन्न वगळून अन्य उत्पन्नाचा आधार घेण्यात यावा, महापूर व कोविड परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटसमयी विद्यार्थ्यांची इयत्ता दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले . वरील सर्व मागण्या राज्य शासनाकडे तात्काळ पाठविल्या जातील असे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. या धरणे आंदोलन प्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हा सचिव अनिल चव्हाण, शिक्षक भारतीचे ज्यूनियरचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, तालुका पदाधिकारी मोहन कोलते, प्रकाश कोकाटे, रमेश कुंभार,शांताराम तौदंकर ,मच्छिंद्र शिरगावकर ,मदन निकम, सुभाष पाटील, रवींद्र मोरे ,सुधाकर डोणोलीकर, संजय व्हनागडे, अशोक मानकर ,विश्वास धुरे , सुभाष भोसले ,कादर जमादार, राजेंद्र कुंभार, दत्तात्रय सुतार , प्रदीप जाधव, दिनकर कुंभार , संजय म्हावळे, दिलीप भोसले, मनोहर पाटील, शिवाजी माने , सर्जेराव लोहार, बाबुराव राजीगरे, तसेच शिक्षक भारतीचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.