** कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्र 11,सेंट्रल स्कुल कसबा बावडा मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव व दिव्यांग सप्ताहानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते गजानन बेडेकर प्राथमिक शिक्षण समितीचे पी आर ओ रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोहर सरगर जिल्हा समन्वयक शकीला मुजावर राजेंद्र अप्पूगडे सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .
कार्यक्रमामध्ये रसूल पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर न्याय देण्याचे महत्वाचे आहे असे मनोगत व्यक्त केले गजानन बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शाळेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे त्यांनी आवाहन केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकांची सुद्धा कौतुक केले समाजामध्ये वावरत असताना भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण दिनानिमित्त या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबर सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे भारतीय राज्यघटना नुसार न्याय स्वातंत्र्य समता बंधुता सर्वधर्मसमभाव हक्क या संविधानाचा आदर राखून पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक न्याय द्यायचे कार्य शाळा करत आहे त्यामध्ये आमच्या शाळेचे सर्व शिक्षक माजी विद्यार्थी मित्र मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी समितीचे सदस्य खरोखरच विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत याचा मला अभिमान आहे असे मनोगत डॉ अजितकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रथम क्रमांक वेदांतिका पाटील द्वितीय क्रमांक पल्लवी कोरवी तृतीय क्रमांक तेजस्विनी माने उत्तेजनार्थ जानवी ताटे व आदिती बिरंगे यांनी संपादन केले सर्व सहभागी स्पर्धकांना रसूल पाटील मनोहर सरगर गजानन बेडेकर राजेंद्र अप्पूगडे सचिन चौगुले या इतर मान्यवरांच्या हस्ते वही व पेन देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव शिवशंभु गाटे आसमा तांबोळी तमेजा मुजावर विद्या पाटील हेमंत कुमार पाटोळे शाळा व्यवस्थापन सदस्य अनुराधा गायकवाड सोनाली जामदार दिपाली चौगुले स्नेहा दाभाडे शिक्षण तज्ञ मुजावर उपस्थित होते परीक्षक म्हणून सुरेखा पाटील जयश्री पुजारी सुनिता अंबाडेकर यांनी काम पाहिले तर आभार उत्तम कुंभार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहकार्य केले.