कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षकांनी त्यांची शक्ती, युक्ती आणि सक्ती केली नसती तर गुणवंतांची यशस्वी बॅच घडली नसती. नागाव हायस्कूल नागावच्या सन १९९२ - ९३ सालच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या या भावना. वयाची साठी पार केलेले शिक्षक आणि त्रेचाळीस पार विद्यार्थी - विद्यार्थीनींंच्या तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर जमलेल्या स्नेहमेळाव्यात व्यक्त झाल्या. कोल्हापूर येथील हाॅटेल पॅव्हिलियन येथे हा कार्यक्रम झाला.
विद्यार्थी आमच्यापेक्षाही जास्त शिकले आणि आपापल्या क्षेत्रात ते यशस्वी ठरले यापेक्षा आणखी मोठी गुरुदक्षिणा एका शिक्षकासाठी असू शकत नाही, असे मत निवृत्त मुख्याध्यापक अशोक मुंडे यांनी व्यक्त केले. आमचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, तसेच विविध क्षेत्रात कर्तबगार बनले हे पाहून आपणास समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणात मन रमत नव्हते. म्हणून शाळेत जाणे बंद केले. पण त्यावेळी शिक्षकांनी जबरदस्तीने शाळेत नेले. अगदी पेनापासून लागणारे साहित्य दिले. म्हणूनच आज आपण रत्नाकर बँकेच्या वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत पोहचू शकलो असे राजेंद्र बेळंके यांनी सांगितले.
साम, दाम, दंड, भेद या चतूसुत्रीचा वापर करून शिक्षकांनी अभ्यास करून घेतला. त्यामुळे एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांना हाताळणे कठीण जात नाही, असे शोभा कांबळे यांनी सांगितले.
शिक्षणाचा पाया भक्कम झाल्याने उद्योग - व्यापार आणि राजकीय क्षेत्रात आपण यशस्वी ठरलो असे पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी सांगितले.
यावेळी ए. के. चौगले, आर. टी. चौगुले, श्री. ठिकणे, श्री. कांबळे, सौ. स्वामी, सौ. चौगले, प्रकाश लंबे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
पोलिसपाटील बाबासो पाटील, संदिप पाटील, शितल पाटील, सुनील सावंत, प्रविण चौगुले, माणतू कोळी, शिवाजी हराळे, सुनिल नागावकर, माणिक नागावकर, मिलिंद जोशी, अभिजित कुलकर्णी, सागर पाटील, वैशाली मगदूम, रेशमा राजहंस, माधवी लंबे, अर्चना शिरगावे, सरिता लंबे, संगिता यादव, मनिषा यादव, आदी उपस्थित होते.
डॉ. धनाजी घाटगे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
संगीता बोरगावे यांनी प्रास्ताविक केले.
गोविंद नागावकर यांनी आभार मानले.
.......................
फोटो
नागाव : स्नेहमेळाव्यास उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी
.........................................................................................