कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष कै शिवाजीराव पाटील उर्फ आण्णा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने शहर शाखा शेठ रुईया विद्यालय कोल्हापूर मध्ये शिक्षक संघाचे सेवानिवृत्त अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व शेठ रुईया विद्यालयात विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आल्या.
अध्यक्षस्थानी वसंतराव चव्हाण, नामदेव बरगे,संघाचे विद्यमान अध्यक्ष मनोहर सरगर,संदीप सुतार,सुनील गणबावले, डॉ अजितकुमार पाटील,कमलाकर काटे,प्रमोद गायकवाड, राजेंद्र पाटील, कुलदीप जठार, विजय सुतार, नामदेव वाघ,सुभाष मराठे,अशोक जोग,सुनील कोळी,तानाजी इंदुलकर, दिलीप माने,श्रीकांत हुबाले, राहुल बागडी आदी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यतिथी स्मरण करण्यात आले.
प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात येऊन डॉ अजितकुमार पाटील यांनी *शिक्षक महर्षी शिवाजीराव पाटील आण्णा* यांच्या जीवनकार्याचा शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचा वेध घेणारा *साप्ताहिक शोध*
या वैचारिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
डॉ अजितकुमार पाटील यांनी या लेखांमधून शिवाजीराव पाटील आण्णा यांच्या जीवनकार्याची माहिती देत असतांना नेतृत्व गुण,संघटना चातुर्य,चौफेर ज्ञान,कसे असावे व शासन दरबारी प्रश्न कसे मांडावेत याबद्दल मनोगत व्यक्त केले.अण्णांच्या संस्काररुपी वसा एकविसाव्या शतकातील कार्यकर्ते शिक्षक, पदाधिकारी यांनी कसे जपावेत व संस्कारांची गरज कशी आहे ते मत व्यक्त केले.
सेवानिवृत्त संघटनाचे वसंतराव चव्हाण यांनी शिक्षक अधिवेशनात अण्णांचा आवाज व विचार कसे होते त्यांच्या रत्नागिरी,शिर्डी, दिल्ली,अहमदनगर, सांगली, व इतर ठिकाणी झालेल्या शिक्षक अधिवेशनातील कार्याची माहिती व विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप सुतार व विजय सुतार यांनी केले तर आभार मनोहर सरगर यांनी मानले.