हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांना हेरले पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत निराधार योजनेतील पेन्शनसाठी दिव्यांग बांधवाना उत्पन्नाची अट शिथिल करावी व सर्व दिव्यांगांना रेशन कार्डवर अंत्योदय योजनेतून धान्य मिळावे या बाबत चर्चा झाली. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांना आदेश देऊन प्रलंबित १५ रेशन कार्ड तात्काळ देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी माजी उपसरपंच राहुल शेटे, वेद अपंग सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भोसले, अमित पाटील, सुधीर चौगुले, कपिल पाटील, अशोक राजमाने व हालोंडी, चोकाक, अतिग्रे गावचे दिव्यांग प्रतिनिधी होते.
फोटो
हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांना हेरले पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन देतांना माजी उपसरपंच राहूल शेटे शिवाजी भोसले ,अशोक राजमानेसह अन्य