Monday, 28 February 2022

शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा _ स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने मागणी

हेरले / प्रतिनिधी

    महावितरण शेतक-यांना  रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना  वीजेचा शॅाक लागून , गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू होऊन आमच्या माता भगिनी विधवा होत आहेत. यामुळे राज्यातील शेतक-यांच्या पत्नीचे  मंगळसुत्र व कुंकवाचे रक्षण करण्यासाठी  सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा. अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. 
        कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे यांना महिलांनी मंगळसुत्र , कूंकू व बांगड्या देऊन यांचे रक्षण करा अशा भावना व्यक्त केल्या. 
 यावेळी बोलताना जि. प. सदस्या सौ. पद्माराणी पाटील म्हणाल्या कि  शेतक-यास रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी पाजविण्यासाठी जावे लागत आहे. राज्यात दैनंदिन एखादा शेतक-याचा वीजेच्या शॅाकने अथवा वन्यप्राण्यांच्या हल्याने जीव जात आहे. यामुळे शासनाने तातडीने याबाबत शेतीस दिवसा १० तास वीज देण्याचा निर्णय घ्यावा. निमशिरगाव ग्रा. प. सदस्या सौ. वैशाली पाटील बोलताना म्हणाल्या कि सरकार शेतक-यांना  रात्री वीज देत असल्याने घरातील प्रमुख जबाबदार व्यक्ती दररोज पाणी पाजण्यासाठी शिवारात जात असतात दररोज त्यांना वन्यप्राणी यांच्यापासून जीवितास धोका आहे. आजपर्यंत राज्यातील हजारो शेतक-यांचा यामध्ये जीव गेला आहे. यामुळे राज्यातील संपुर्ण महिला शेतक-यांच्यावतीने आपण आमच्या या भावना सरकारला पोहोचवून संपुर्ण राज्यातील शेतक-यांच्या माता भगिनीचे विधवा होण्यापासून रक्षण करावे याकरिता आज आम्ही आणलेले हे मंगळसुत्र, कुंकू व बांगड्या सरकारकडे पाठवून आमच्या भावना कळविण्यात याव्यात. 
   यावेळी जि. प. सदस्या शुभांगी शिंदे , परितेच्या  पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील , सौ. संगीता शेट्टी , सौ. सन्मती पाटील , श्रीमती. सुवर्णा पाटील यांचेसह निमशिरगाव , जयसिंगपूर , परिते , शिरोळ , हातकंणगले व करवीर तालुक्यांतील महिला उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी संशोधकाचे काम करावे - गजानन बेडेकर

*
कोल्हापूर प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समितीच्या म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा 11 मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 123 प्रयोग मांडण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते गजानन बेडेकर, सचिन चौगले, केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे,उषा सरदेसाई, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमेश सुतार,शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोपास पाणी घालून विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.123 बालवेज्ञानिकांचे प्रयोग सादरीकरण करण्यात आले.

प्रयोग मांडणीमध्ये जड हलके,पवनचक्की,घनताचा परिणाम,हवेवर चालणारी बोट,साबण तयार करणे,ज्वलनास ऑक्सिजनची गरज असते आयुर्वेदिक साबण इत्यादी आकर्षक प्रयोगावर भर देणे आला होता.
प्रणित पाटील,पार्थ पोवर,तेजस कारंडे,आयुष केंगारे, अदिती बिरणगे, निखिल सुतार, वेदांतिका पाटील यांनी या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.परीक्षक म्हणून आसमा तांबोळी, विद्या पाटील यांनी काम पाहिले.

केंद्रशाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञान म्हणजे काय व अंधश्रद्धा म्हणजे काय हे तपासून घेणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी समाजातील वाईट रूढी,चालीरीती या विज्ञान व श्रद्धा यांचा विचार करून वागले पाहिजे.कोरोनाकाळातील ताप, खोकला,सर्दी यामागील सत्य काय आहे हे तपासले तरच आपणास विज्ञान कळणार आहे.असे एकविसाव्या शतकातील विचार समजावून सांगितले.

विज्ञान प्रदर्शनात सामाजिक कार्यकर्ते गजानन बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता राणिताई पाटील,शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी,उषा सरदेसाई, शाळा शिक्षण समितीच्या दिपाली चौगले, अनुराधा गायकवाड, नीता घाटगे, कल्पना पाटील,उपाध्यक्ष पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या बालप्रयोगाचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी भारतविर मित्र मंडळाचे विलास भोसले,अनिकेत चौगले, जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव,शिवशंभो गाटे,सुजाता आवटी,हेमन्तकुमार पाटोळे,सार्थक पाटोळे,आसमा तांबोळी, तमेजा मुजावर,सुजाता आवटी,सूत्रसंचालन उत्तम कुंभार यांनी केले.आभार कल्पना मैलारी यांनी मानले

गारगोटी हायस्कूलवर दगडफेक करून मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई करावी : आम.आसगांवकर यांची जिल्हा पोलीसप्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


कोल्हापूर / प्रतिनिधी
      गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्युनिअर गारगोटी (ता.भुदरगड) या प्रशालेवर दगडफेक करून शालेय साहित्याची तोडफोड करत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकी, मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करून शाळा व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी आमदार जयंत आसगांवकर यांनी जिल्हा पोलीसप्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 
      गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ ज्युनिअर गारगोटी या शाळेत शनिवारी दु.१२.४५ च्या दरम्यान विशाल कदम या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत शाळेवर दगड मारले. शाळेच्या खिडकीच्या काचा दगड मारून फोडल्या. अ‍ॅम्पलीपायर मशीन, खुर्च्या, घड्याळ, टेबलवरील काचा फोडून शालेय साहित्याचे नुकसान केले. वर्ग सुरु असताना शिक्षकांना शिव्या देणे सुरु केले. शिक्षकांबाबत एकेरी, अर्वाच्च भाषा वापरली आहे. मोठमोठ्याने ओरडून वर्गातील बेंचवर लाथा मारून विद्यार्थ्यासमोर दंगा केला. यावेळी त्यास जाब विचारला असता अंगावर धावून येऊन शिवीगाळ करत शाळा पेटवून देण्याची धमकी दिली तसेच शाळेचे कर्मचारी नामदेव नारायण शिंदे यास लाकडी खुर्ची मारून  जखमी केले. दरम्यान पोलिसांना बोलविल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेत असतांना त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली.
    शालेय साहित्याची तोडफोड करत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकी, मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करून शाळा व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिक्षक संघटनेचे राजेश वरक, उदय पाटील, गजानन काटकर आदीसह शिक्षकसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

       फोटो कॅप्शन
गारगोटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील साहित्याची तोडफोड करून शिक्षकांना धमकी देणाऱ्या नराधमाला अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे  जिल्हा पोलिस अधिक्षक मा.शैलेश बलकवडे यांचेकडे करताना शिक्षक आमदार मा.जयंत आसगांवकर, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री. एस.डी.लाड, बाबासाहेब पाटील, राजेश वरक,उदय पाटील, गजानन काटकर  व इतर

Sunday, 27 February 2022

पु.शिरोली येथील विविध संस्थांचा मा.खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास पाठिंबा

हेरले प्रतिनिधी

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेले चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हातकणंगले पंचायत समिती सभापती सौ.डॉ.सोनाली सुभाष पाटील व अन्य मान्यवर पदाधिकारी यांनी भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.  
शेती पंपाची विज कपात व ऊसाच्या एफआरपीचे केलेले तुकडे यामुळे सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरले आहे. या झोपलेल्या बिघाडी सरकारला जाग आणण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. पण त्यांच्या तब्येतेची  काळजी घ्यावी असे बिघाडी सरकारला वाटले नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे मी व माझे पती  डॉक्टर असलेने त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याचे भाग्य लाभले असे मत  डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  कार्यकर्ते शिरोलीचे उपसरपंच उदयसिंह पाटील, युवा नेते योगेश कृष्णात खावरे, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, सचिन गायकवाड,उपसरपंच पिंटू करपे, उद्योजक बाळासो पाटील ,सलीम महात, कोल्हापूर जिल्हा  ट्रॅक्टर ट्रॉली असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी पाटील , ज्येष्ठ शेतकरी रामभाऊ बुडकर, निशिकांत पदमाई, भूये गावचे शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
फोटो......
पुलाची शिरोली येथील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. सोनाली पाटील, दिलीप पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, उदय पाटील आदी.

ग्रामीण भागांतील घरोघरी लघुउद्योग हीच आयएमडीएस ची संकल्पना ...अमोल शिंदे


हातकणंगले /प्रतिनिधी
ग्रामीण भागात घरोघरी लघु उद्योग निर्माण व्हावेत हे एकमेव ध्येय घेऊन आयएमडीएस कंपनी ची स्थापना करण्यात आली असून हजारो लघु उद्योजक निर्माण झाल्यास खऱ्या अर्थाने स्टँडउप इंडिया सहित महाउद्योजकचे पाहिलेले स्वप्नं सत्त्यात उतरेल..असे प्रतिपादन आयएमडीसी महाउद्योजक कंपनीचे संस्थपक अमोल शिंदे यांनी केले. * इंगळी (ता.हातकणंगले) येथील साई असोसिएट्स,गणेश व नंदिनी एंटरप्राइज या उद्योग समूहाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी जिप अध्यक्ष नानासाहेब गाठ होते. * ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योजक बनवण्यासाठी आयएमडीसी लिमिटेड महाउद्योजक कंपनीने सर्वोत्तपरी प्रयत्न करून हजारो महिलांना स्वावलंबी बनवले आहे.त्यांच्याच प्रेरणेने आज इंगळी येथील उद्योजकता सविता सुनील देसाई,अमृता रोहित देसाई आणि सुप्रिया चंद्रकांत देसाई यांनी उभारलेल्या लघु उद्योगांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी अमोल शिंदे,नानासो घट,सविता देसाई,अरुण गाठ,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सविता देसाई यांनी तर आभार प्रतीक देसाई यांनी मानले.यावेळी सुधीर भोसले,अरुण माने, शीतल पवार,सुकुमार पाटील,भरत गाठ, शांतीनाथ कनिरे,प्रा.ए.के.माने, सुनील देसाई,आदीक्रांत देसाई,आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------------------------

आदर्श गुरुकुल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा


हेरले / प्रतिनिधी

आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज तसेच ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिले मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये ग्रंथप्रदर्शन व कवी मंगेश पाडगावकर कलादालन उभे करण्यात आले.त्याचबरोबर मराठी राज्यभाषा दिनानिमित्त प्रशालेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात म्हणणे, शब्दकोशातील शब्दांचा अर्थ पाठ करणे ,पुस्तक परीक्षण करणे,अभिवाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.त्याच बरोबर ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
   या कार्यक्रमासाठी  माध्यमिक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे हे उपस्थित होते.आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी.एस.घुगरे ,मुख्याध्यापिका एम डी. घुगरे  उपस्थित होत्या.मुख्याध्यापक एम .एच.चौगुले , प्रशासक एस.जी.जाधव ,एस ए. पाटील ,गिरीगोसावी मॅडम, पी.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता मॅडम यांनी केले. मराठी विभाग प्रमुख सौ. एस.एम.बाबर यांनी आभार मानले.

Saturday, 26 February 2022

कोल्हापूर बोर्डाच्या सहसचिवपदी डी.एस.पोवार यांची नियुक्ती


कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अंतर्गत उप शिक्षणाधिकारी पदावरील राज्यातील ५२ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी डी.एस.पोवार यांना कोल्हापूर बोर्डाचे सहसचिव म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
शिक्षण विभागाने नुकतेच शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश काढला आहे.
     दत्तात्रय शंकर पोवार  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन १ जुलै १९९५  पासून वर्ग  २ राजपत्रित अधिकारी म्हणून उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे त्यांच्या अधिकारी पदाच्या कार्याची सुरुवात झाली. जुलै १९९७  पासून २०००  पर्यंत गट शिक्षणाधिकारी म्हणून पंचायत समिती कवठेमंकाळ,
जून २०००ते २००४उपशिक्षणाधिकारी  माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर,
२००४ ते २००८  या कालावधीत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली,२००९  ते २०१२  उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, २०१२ ते २०१६  उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी, २०१६ते २०२० या कालावधीमध्ये शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर आदी ठिकाणी यशस्वीपणे अधिकारी पदाचे कार्य बजावले.
     सप्टेंबर २०२० ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कार्यरत व सध्या पदोन्नतीने सहसचिव कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर येथे निवड झाली आहे. वर्ग १ अधिकारी पदी या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Friday, 25 February 2022

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास ए प्लस ( A + ) मानांकन

हेरले / प्रतिनिधी

कोल्हापूरचे  विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास ए प्लस  ( A + ) असे मानांकन दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे हे प्रमुख उपस्थित होते. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याची महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी बुधवारी अंतर्गत तपासणी पुर्ण केली. 
श्री. लोहिया यांनी सुमारे दोन तास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीचा आणि विविध नोंदींचा आढावा घेतला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, तक्रारदारांचे केलेले समाधान, गुन्हे उघडकीस आणणे, तपास पूर्ण करणे आदी बाबींचा सविस्तर आढावा घेत महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास ए प्लस  ( A + ) असे मानांकन दिले आहे. 
औद्योगिक वसाहतीमधील उद्योगातून होणार्‍या चोरीचा छडा लावणे, पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी घेतलेली काळजी, महत्वाचे चौक व,सीसी टीव्ही कॅमेरे बसवून चोवीस तास तेथील घडामोडींवर लक्ष केंद्रीत करणे, अंतर्गत शिस्त, कर्मचाऱ्यांचे वागणे या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे. 
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रशिक्षणार्थी आयपीएस गोकुळकुमार, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील आदी उपस्थित होते. 
...................

"तो बहिर्जी होता"या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवरायांचे अत्यंत विश्वासू शिलेदार बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅड.  आनंद रा.देशपांडे लिखित "तो बहिर्जी होता"या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पन्हाळगड येथे  शिवजयंतीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध उद्योजक आणि गुणीदास फौंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे यांच्या हस्ते करण्यात आले.  राजप्रसाद धर्माधिकारी व डॉ. अजित शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर आनंद देशपांडे यांनी पुस्तकातील 'सुटका' आणि 'काजवे' या दोन कथांचे वाचन केले. उपस्थितांच्या कडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अबोली झाडबुके, आण्णासाहेब मोहिते, दिलीप बनछोडे, अरुण नाईक इ विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले सोलापूरचे सुप्रसिद्ध लेखक अ‍ॅड आनंद रा देशपांडे यांनी या पूर्वी 'कातळ मनीचा ठाव, काही जनातलं काही मनातलं, श्री रायगड, आनंदाचे डोही, आनंद तरंग'  इ पुस्तकांचे लेखन केले आहे.  

बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या सैन्यदलातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. चार पाच प्रसंगापेक्षा जास्त सखोल तपशील त्यांच्या विषयी इतिहासात उपलब्ध नाहीत तरीही शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत त्यांची सावली सारखी उपस्थिती होती. अफझलखानाचा वध असो, आग्र्याहून सुटका असो, सिद्धी जोहारच्या वेढ्यातून पन्हाळगडावरून सहीसलामत सुटका असो, सुरतेवरील छापा असो वा लाल महालातील शाहिस्तेखानाच्या छावणीवर केलेला हल्ला असो, अशा प्रत्येक मोहिमेची अचूक आखणी करताना खडानखडा माहिती बहिर्जी नाईक आणि त्यांचे गुप्तहेर शिवरायांना देत असत. त्यामुळे प्रत्येक मोहीम फत्ते होण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान होते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील या आणि अशाच प्रसंगात बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेचे लेखन शक्यतेच्या चौकटीचा कस लावून कल्पना चित्रण स्वरूपात केले आहे. शिवाजी महाराजांच्या अनेक मोहीमा यशस्वी होण्यामागे गुप्तहेराची भूमिका बजावणारा सूत्रधार कोण होता, तर "तो बहिर्जी होता" .
एकूण सोळा कथांचा संग्रह असलेले हे पुस्तक अत्यंत रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. 

फोटो.......
पन्हाळा येथे बहिर्जी नाईक पुस्तकाचे प्रकाशन करताना शिरोली एमआयडीसीतील जेष्ठ उद्योजक शिरीष सप्रे. प्रसंगी राजप्रसाद धर्माधिकारी, अजित शुक्ल व आनंद देशपांडे.

घोडावत विद्यापीठाकडून ''एसजीयु आयकॉन'' पुरस्कार जाहीर


हेरले / प्रतिनिधी

संजय घोडावत विद्यापीठाकडून अध्यक्ष संजयजी घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ''एसजीयु आयकॉन'' हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी साहित्य क्षेत्रातून सोनाली नवांगुळ, क्रीडा क्षेत्रातून अनुजा पाटील, उद्योग क्षेत्रातून दादू सलगर, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातून प्रकाश गाताडे, सामाजिक सेवा क्षेत्रातून संदीप परब यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तसेच या पुरस्काराचे वितरण दि.२८ फेब्रुवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे याठिकाणी होणार आहे अशी घोषणा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी आज केली यावेळी कुलगुरू डॉ.अरुण पाटील व प्राचार्य विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनाली नवांगुळ यांनी साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. स्वतः अपंग असूनही हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम केले.त्यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतर व स्वतंत्र लिखाण केले आहे. कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या अनुजा पाटील यांनी  महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाचे कर्णधार व भारतीय महिला क्रिकेट सदस्य म्हणून भरीव कामगिरी केली आहे. दादू सलगर हे सलगर अमृततुल्य चहा चे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या जवळपास भारतभर २५० शाखा आहेत. प्रकाश गाताडे हे कोल्हापूरचे असून पेशाने शिक्षक आहेत. उमेद सेवा फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरीब व वंचितांसाठी कार्य केले आहे. संदीप परब हे २००७ पासून जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून बेघर झालेल्या व्यक्तीसाठी झटत आहेत.याचबरोबर एड्सग्रस्त लोक व त्यांच्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचे कार्य केले आहे.

Wednesday, 23 February 2022

शिक्षण विभागाची कोल्हापुरातील बैठक राज्याला दिशा देणारी असेल - आमदार प्रकाश आबिटकर

शिक्षण विभागातील प्रश्नांचा निपटारा करण्यासाठीची बैठक कोल्हापूरात संपन्न.

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अंतर्गत (प्राथमिक व माध्यमिक) प्रलंबित कामांचा आढावा घेणेसाठी राज्याचे शिक्षण संचालक यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील न्यू कॉलेज मध्ये आढावा बैठक बुधवार दि. २३ फेब्रुवारी  रोजी  पार पडली. बैठकीमध्ये  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक समस्यांचा आढावा घेण्यात आला. 
     या  बैठकीमध्ये बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले , शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न दुर्दैवाने शासन पातळीवर प्रलंबित राहत आहेत , त्याचा निपटारा करण्यासाठी राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालकांच्या उपस्थितीमध्ये प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बैठकीचे  प्रथमच आयोजन केले असून ही बैठक संपूर्ण राज्याला दिशा देणारी असेल .
      या बैठकीत शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर म्हणाले या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक केली जाणार असून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी या बैठकीचा मोठा फायदा होणार आहे. जे प्रश्न प्रलंबित राहतील त्याच्यासाठी विशिष्ट कालावधी दिला जाणार असून त्या कालावधीतच या प्रश्नांची सोडवणूक करणे संबंधीतावर बंधनकारक राहणार आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.
शिक्षण क्षेत्र निकोप करण्यासाठी अधिकारी वर्गाच्या मदतीने  प्रयत्न केले जाणार आहेत. 
       राज्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर म्हणाले, शिक्षण संचालनालय विभागाच्यावतीने प्रशासन गतिमान केले जाणार असून विभागाचा कारभार  पारदर्शक करणार आहोत. लवकरच प्रलंबित प्रश्नांची निर्गत केली जाणार आहे. संच मान्यता प्रक्रियेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. लवकरच त्यानुसार संच मान्यतेची कार्यवाही करून संभ्रमावस्था दूर केली जाईल. त्यांनी या विषयावर शिक्षण आयुक्त  यांच्याशी या बैठकी मधूनच भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. 
       राज्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर म्हणाले ,शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयीच्या तक्रारी असतील त्या लिखित स्वरूपात द्याव्यात त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. शिक्षण क्षेत्रातील समस्या त्यांची सोडवणूक करण्यासाठी आयोजित केलेली ही राज्यातील पहिलीच अशा प्रकारची बैठक दोन आमदारांच्या उपस्थितीमध्ये होत असून त्याचा निश्चितच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपयोग होईल. 
       प्रास्ताविक  शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी केली. शिक्षण उपसंचालक  महेश चोथे यांनी उपस्थितांचे स्वागत केले . त्यानंतर माध्यमिकचे शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर , प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे , वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के , प्राथमिक वेतन पथक प्रभारी अधीक्षिका वसुंधरा कदम , सिनियर ऑडीटर सागर वाळवेकर यांनी  आपल्या विभागाचा आढावा सादर केला. 
       त्यानंतर विविध संघटनांच्या प्रमुखांनी प्रलंबित प्रश्न या बैठकीमध्ये मांडले. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ , बाबासाहेब पाटील , खंडेराव जगदाळे, बी.डी. पाटील यांच्यासह  उपस्थित अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यामध्ये कामांची चेकलिस्ट द्यावी व  प्रत्येक कामांचा कालावधी निश्चित करावा, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी , संचमान्यता मधील त्रूटी दूर कराव्यात , मेडीकल बिलामध्ये व सेवानिवृत्ती फंडामधील टक्केवारी  घेण्याची पद्धत बंद करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. 
    उपस्थित केलेल्या केलेल्या प्रश्नांची निर्गत  लवकरात लवकर करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित दोन शिक्षण संचालक, दोन शिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी दिले. प्राथमिकचे राजाराम वरुटे , मोहन भोसले , सखाराम राजूगडे यांनी प्राथमिक शिक्षकांशी संबंधित प्रश्न यावेळी उपस्थित केले. त्यामध्ये अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचे प्रश्न  , विज्ञान शिक्षक नियुक्तीसह इतर  प्रश्नांचा समावेश होता. 
        शिक्षण उपनिरीक्षक रवी चौगले, 
उपशिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार, डी एस पोवार ,गजानन उकिर्डे ,भिमराव टोणपे यांच्यासह  शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड,  के. जी. पाटील,बी. जी. बोराडे, शिक्षक नेते  दादासाहेब लाड, भरत रसाळे,खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, उदय पाटील, के. के. पाटील, सुधाकर निर्मळे,आर. डी. पाटील. डॉ.डी .एस .घुगरे, प्राचार्य एन. आर. भोसले, मिलींद बारवडे, भाऊसाहेब सकट, जावेद मणेर , संदीप पाथरे, समीर घोरपडे, मिलींद पांगिरेकर ,इरफान अन्सारी, संतोष आयरे, मोहन भोसले, राजाराम वरुटे, पंडीत पोवार, संतोष आयरे, राजेंद्र कांबळे आदी संघटना प्रमुख पदाधिकारीसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
       फोटो 
महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक  विभागातील प्रलंबित कामांच्या आढावा  बैठकीत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर सोबत शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर , शिक्षण संचालक महेश पालकर, दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, एस डी लाड व इतर मान्यवर.

Monday, 21 February 2022

छ.शिवराय संस्कार काळाची गरज - डॉ अजितकुमार पाटील

*
कोल्हापूर प्रतिनिधी 
कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समिती संचलित म न पा राजर्षी शाहू विद्यालयात शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.38 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वेशभूषा करून शाळेतील वातावरण शिवमय करून टाकले होते भगवा फेटा उपरणे साडी पताके अशा वेशभूषा मध्ये विद्यार्थी स्पर्धेसाठी आले होते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध प्रकारची शिवमय वेशभूषा करून स्पर्धेत भाग घेतला होता एकूण 38 विद्यार्थ्यांपैकी कल्पना मैलारी पायल पाटील वेदांतिका पाटील राजनंदनी कारंडे अक्षरा लोंढे देवयानी पवार जानवी ताटे संध्या चौगुले यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार यांनी विद्यार्थ्यांना मनोगतामध्ये शिवराय संस्कार काळाची गरज असून ज्याप्रकारे जिजामातेने शिवाजी महाराजांना लहानपणी गोष्टी सांगितल्या त्या प्रमाणे सध्याच्या महिलांनी मातांनी आपल्या मुलांना संस्काराचे धडे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले
 केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी शिवरायांची युद्धनीती तलवारबाजी गनिमी कावा संघटन चातुर्य निर्णय क्षमता विविध कौशल्य यावर त्यांनी विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकात जिजामाता ने ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना महाभारत रामायण अशा बोधपर गोष्टी सांगितल्या होत्या त्या प्रमाणे सध्याच्या माता भगिनींनी आपल्या मुलांना अशा गोष्टीचे स्मरण करून देणे अत्यंत गरजेचे आहे व काळाची गरज आहेत असे प्रतिपादन केले कारण यामध्ये दोन वर्षे विद्यार्थी संभ्रमावस्था मध्ये दिसून येत आहे त्याला धड चांगलं समजत नाही पण जर वाईट कोणत्या गोष्टीचा आहे पण समजत नाही त्या साठी हा संस्कार खरोखरच मार्गदर्शक तत्त्वे असून सध्याच्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी शिवराय संस्काराचा आधार घेऊन विचार सांगावेत असे प्रतिपादन केले अंगात ताकद असून चालणार नाही तर कशाला सुद्धा असणे गरजेचे आहे त्या प्रमाणे बुद्धीला प्रात्यक्षिकाची गरज आहे याची जोड देऊन चतुरपणे वागले पाहिजे असे सुद्धा त्यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधले.

 सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धकांना उत्तम कुंभार व इतर मान्यवरांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले कारण प्लास्टिक हटवा देश वाचवा एकच नारा प्लास्टिक बंदी अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी वापर करणार नाही अशी शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभु गाटे यांनी केले.तमेजा मुजावर यांनी रंगरंगोटी रांगोळी घालून शाळेचे वातावरण शोभिवंत केले होते मीना मंच या प्रमुख आवटी मॅडम तांबोळी मॅडम यांनी महिलांना व मुलांना सुरक्षितेचे धडे दिले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड चौगुले राजू लोंढे सदस्य उपस्थित होते सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार सार्थक पाटोळे यांनी मांनले.

आमचं ठरलय ' गावठाण पासून रस्ता सुरू करा अन्यथा २ मार्चला आत्मदहन करायचं

'
      हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरू न केल्यास शेतकरी व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी  सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले. त्यांच्याशी फोनवरून संभाषण झाले असता त्यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता पोळ यांनी त्यांच्या आदेशानुसार निवेदन स्वीकारले.
           निवेदनात म्हटले आहे की, मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्त्याची सुधारणा गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे .सदर रस्त्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी विनामोबदला जमिनी दिल्या आहेत .सदर रस्त्याचा ग्रामपंचायत ग्रामसभा ठरावानुसार कामाची वर्क ऑर्डर गावठाण पासून पाझर तलावापर्यंत अशी आहे. परंतु ठेकेदाराने व गावातील तथाकथित पुढाऱ्यांनी सुरुवातीचे अंतर सोडून पुढचा रस्ता सुरू केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले त्यामुळे ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री घेऊन गेले.
            दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी व खासदार धैर्यशील माने तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जि. प. बांधकाम विभागाला पत्राद्वारे वर्क ऑर्डर नुसार रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे असे लेखी पत्र दिले. तदनंतर बांधकाम उपविभाग हातकणंगले यांनी ग्रामपंचायत मौजे वडगाव यांना दि.१४/१/२०२२ रोजी लेखी पत्र देऊन गावठाण पासून रस्त्याची हद्द निश्चित करून घ्यावी असे कळविले परंतु सव्वा महिना होऊन गेले तरी ग्रामपंचायतीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे अन्यथा २ मार्च २०२२ रोजी शेतकरी व गावातील पदाधिकारी यांच्या वतीने सामूहिक आत्मदहन करीत आहोत. याची नोंद घ्यावी सोबत वर्क ऑर्डर ची झेरॉक्स प्रत, खासदार धैर्यशील माने यांचे बांधकाम विभागाला दिलेले लेखी पत्र, बांधकाम उपविभाग हातकणंगले यांनी ग्रामपंचायतीला दिलेले लेखी पत्र जोडत असून माहितीसाठी प्रत मा. पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आले आहे.
        निवेदनावर मनोहर चौगले, गुणधर परमाज, बाळासो थोरवत, मधुकर अकीवाटे, सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले, सुनील खारेपाटणे, यांच्या सह्या आहेत.

फोटो 
मौजे वडगाव येथील रस्त्या संदर्भात आत्मदहन करीत असल्याचे निवेदन जि .प .चे उपकार्यकारी अभियंता पोळ साहेब यांना देताना शेतकरी व पदाधिकारी.

संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा


हेरले / प्रतिनिधी

संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा संजय घोडावत पॉलीटेक्निक,अतिग्रे यांनी आयोजित केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या बिल्डींगमध्ये होणार आहेत.
जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे. सर्व स्पर्धकांना नऊ फेऱ्या खेळावयास मिळणार आहेत.रविवारी सकाळी नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर साडेनऊ वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.कोल्हापूर,सांगली,इचलकरंजी, सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सोलापूर,पुणे,मुंबई,बेळगाव,हुबळी व गोवा येथील नामवंत बुद्धिबळपटूना आमंत्रित करण्यात आले आहे. साधारण अडीचशे बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
स्पर्धा विजेत्यांना एकूण रोख ५१ हजार रुपयांची ५१ बक्षिसे चषक व मेडल्स सह खुल्या व विविध वयोगटात ठेवली आहेत.खुल्या गटातील २१ बक्षिसे पुढीलप्रमाणे विजेत्यास रुपये ७,०००/- व चषक उपविजेत्यास रुपये ५,०००/- व चषक तर तृतीय क्रमांकास रुपये ३,०००/- व चषक आहे.क्रमांक चार ते नऊ अनुक्रमे  रु.२,०००/- ; रु.१,०००/- ; रु.९००/- ; रु.८००/- ; रु.७००/- ; रु.६००/- क्रमांक  दहा ते एकवीस प्रत्येकी रुपये पाचशे व मेडल याशिवाय वयोगट ९,११,१३ व १५ वर्षाखालील उत्कृष्ट मुले, उत्कृष्ट महिला व उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू या प्रत्येक गटातील पाच उत्कृष्ट बुद्धिबळपटूना १)रु.१,५००/- ; २) रु.१,०००/- ; क्रमांक ३ ते ५ प्रत्येकी रु.५००/- व मेडल उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ठेवले आहे.ह्या व्यतिरिक्त विशेष उत्तेजनार्थ म्हणून  चषक व मेडल्स दिली जाणार आहेत.सर्व स्पर्धकांना चहा,नाश्ता व जेवणाची मोफत सोय केली आहे.
 स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाचशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली प्रवेश फी शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी पर्यन्त गुगल पे किंवा फोन पे ने ९५७९७२४७७३(धीरज   पाटील) यांच्याकडे भरावी व दिलेल्या लिंक वर गुगल प्रवेश फॉर्म भरावा.
असे आवाहन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त व्ही व्ही भोसले सर पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही व्ही गिरी सर स्पर्धा समन्वयक एस एन पाटील सर व मुख्य पंच भरत चौगुले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
--

Sunday, 20 February 2022

अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलावाचे सुशोभिकरणाचे काम दोन महिन्यांत सुरू करणार - ानाम.आदित्य ठाकरे

हेरले / प्रतिनिधी

खासदार धैर्यशील माने यांची मागणी मान्य
अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलावाचे सुशोभिकरणाचे काम दोन महिन्यांत सुरू करणार.नाम.आदित्य ठाकरे
  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मौजे अतिग्रे (ता.हातकणंगले) येथील ऐतिहासिक शाहू तलावाचे संवर्धन करून सुशोभिकरण करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे  यांच्याकडे केली होती.
खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागणीनुसार रविवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे  यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समवेत अतिग्रे येथे तलावास भेट देऊन पाहणी केली व खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीनुसार येत्या आठ दिवसात याबाबत बैठक घेऊन दोन महिन्यांच्या आत तलाव संवर्धनाचे काम सुरू करणार असल्याची घोषणा केली.
    यावेळी अतिग्रे गावचे सरपंच सागर पाटील,  पांडुरंग पाटील, प्रशांत गुरव, जयवंत पाटील,दीपक पाटील, विद्याधर लाटवडेकर,  धनाजी पाटील,नीलेश पाटील, शशिकांत पाटील, आनंद पाटील , धुळोबा पाटील,संतोष कांबळे, किशोर बोरगावे, प्रवीण पाटील,  भगवान पाटील,अविनाश बनगे, बबलू मकानदार, अमोल लोखंडे, अरविंद खोत, कार्तिक स्वामी, सारंग पाटील यांच्यासह अतिग्रे रुकडी पंचक्रोशीतील शिवसैनिक युवासैनिक व नागरिक उपस्थित होते.
     फोटो 
अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील शाहू  तलाव ठिकाणी खासदार धैर्यशील माने  राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत पाहणी करतांना.

हरीश शिंदे यांना शिवाजी विद्यापीठामार्फत रसायनशास्त्रात पीएच. डी. पदवी प्रदान

*
*
हेरले / प्रतिनिधी

हरीश मनोहर शिंदे यांना शिवाजी विद्यापीठाच्यावतीने रसायनशास्त्रातील पीएच.डी. पदवी मिळाली आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. के. एम. गरडकर व डॉ.बी.एस.शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.
हरीश शिंदे यांनी सिंथेसिस कॅरॅक्टरायझेशन ॲंड ॲप्लिकेशन ऑफ झर्कोनियम ऑक्साईड नॅनोकॉम्पोजिट्स या विषयावर विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता.
डॉ. शिंदे यांचे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी विविध परिषदा व चर्चासत्रात भाग घेतला आहे.
प्रा. डॉ. के. एम. गरडकर यांच्या प्रयोगशाळेत झर्कोनियम ऑक्साईड नॅनोमटेरिअल हे जगात पहिल्यांदाच वडाच्या पानापासून तयार केले आहे. झर्कोनियम ऑक्साईड अतिशय उपयोगी असून याचा वापर दातांमध्ये सिमेंट म्हणून वापर केला जातो कारण हे ऑक्साईड जैवसुसंगत असल्यामुळे शरीराला कुठलीच हानी होत नाही. हे ऑक्साईड अतिशय उच्च तापमानाला टिकत असल्यामुळे हे रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणून फरनेस मध्ये त्याचा वापर केला जातो व तसेच हाडातील झीज भरून काढण्यासाठी व हाडाच्या मजबुतीकरणासाठी याचा वापर केला जातो.
हे ऑक्साईड तयार करण्यासाठी प्रोफेसर गरडकर सर यांनी पर्यावरण पूरक पद्धत विकसित केली असून या पद्धतीचा अवलंब करून मोठ्या प्रमाणात हे ऑक्साईड तयार केले जाते विशेष म्हणजे यामध्ये फक्त पानांचा वापर करून पाच ते दहा नॅनोमीटर इतक्या छोट्या आकाराचे आणि अतिशय प्रभावी ऑक्साईड तयार केले आहे.
डॉ.गरडकर यांच्या प्रयोगशाळेत आजपर्यंत अनेक विविध नॅनो मटेरियल्स तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने झिंक ऑक्साईड , टिटॅनियम ऑक्साईड, गोल्ड  आणि सिल्वर  नॅनो पार्टिकल्स यांचा समावेश आहे. या नॅनो मटेरियल्सचा  उपयोग त्यांनी रंग मिश्रित पाणी शुद्ध करणे, कॅन्सर वरील उपचार तसेच बीज रोपण करण्यासाठी केला आहे.  त्यातील महत्वाचे म्हणजे कृषी विभागातील महत्वाचे नॅनो मटेरियलचा वापर करून बीज उगवण प्रक्रिया हे शोध कार्य नव्याने सुरू झाले आहे.  या नविन तंत्रज्ञानामुळे कृषी उत्पादकता वाढल्याचे दिसून येत असून त्याचा उपयोग शेतकरी बांधवासाठी होणार आहे. आज पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थी पीएच.डी पूर्ण केलेली असून सध्या आठ विद्यार्थी या विषयावर संशोधन करीत आहेत.

Saturday, 19 February 2022

ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

हेरले / प्रतिनिधी
 पालकांनी आपल्या पाल्यांना छ. शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला लावले तर महाराजांचा आदर्श घेवून त्यांच्या आयुष्यात नक्कीच  बदल घडेल असे  प्रतिपादन प्रा.डॉ. संभाजी पाटील यांनी केले.ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित् खास विद्यार्थी व पालक यांच्यासाठी स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. पत्रकार राजू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संतोष बाटे होते. शिवसेनाउपशहराध्यक्ष नितीन दळवी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापिका  मनीषा बाटे , प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका सुषमा हाळदे यांनी केले. नियोजन प्रतीक्षा पाटील, शुभांगी भोसले, सीमा लोखंडे यांनी केले यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

             फोटो 
शिरोली माळवाडी येथील ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  शिवजयंती निमित्त आयोजित पालक, विद्यार्थी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करताना प्रा.मनीषा बाटे,प्रा. डॉ. संभाजी पाटील अध्यक्ष संतोष बाटे, नितीन दळवी,  सुषमा हाळदे ,आदी

राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी होणार - कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यापीठाचा निर्णय



कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शासकीय ,निमशासकीय व शिक्षक,शिक्षकेत्तर समन्वय समितीने  २३ व २४  फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या राज्यव्यापी संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार असल्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने शनिवारी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभावन येथील कार्यलयात झालेल्या सभेत घेतला .सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड  होते . 
    सेवेत असलेल्या सर्वाना जुनी पेंशन योजना लागू व्हावी व अन्य शैक्षणिक समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी हा संप होत आहे .
वरील दोन दिवसाचे शालेय कामकाज रविवार दिनांक 27 फेब्रुवारी व रविवार दिनांक 6  मार्च 2022 रोजी शाळा सुरू ठेऊन पूर्ण केले जाईल . या सभेत कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार100%अनुदान मिळावे,अघोषित शाळा त्वरित शासनाने घोषित करून अनुदानाची तरतूद करावी, काही शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास दिला जात आहे अशा सेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करणे तसेच नवीन शाळा सुरू करण्यासाठी बृहत आराखड्यानुसार परवानगी द्यावी,प्रयोगशाळा परिचर यांच्या समस्या शासनाने त्वरित सोडवाव्यात ,यावर सभेत निर्णय घेण्यात आले .या सभेस बी. जी. बोराडे, ,खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील,दादासाहेब लाड,भरत रसाळे, इरफान अन्सारी, आर. वाय. पाटील, सी एम गायकवाड , काकासाहेब भोकरे , सुधाकर निर्मळे,बी. डी. पाटील,समीर घोरपडे,राजेंद्र सूर्यवंशी, पी. एस. हेरवाडे,मनोहर जाधव , बी. एस. खामकर,शिवाजी माळकर , अरुण मुजुमदार ,जगदीश शिर्के, जयसिंग देवकर,  आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Friday, 18 February 2022

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन गौरवशाली वारसा जोपासतेय !


मराठा ऑर्गनायझेशन च्या रक्तदान शिबिरात मान्यवरांच्या प्रतिक्रिया...

कोल्हापूर प्रतिनिधी 

प्रत्येकाच्या संकटाला धावून जाण्याचा वारसा मराठ्यांमध्ये परंपरागत आलेला असून, समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा गौरवशाली वारसा जोपासण्याचे काम वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व त्यांचे स्वयंसेवक प्रामाणिकपणे करत असल्याच्या प्रतिक्रिया कुडित्रे तालुका करवीर येथे झालेल्या रक्तदान शिबिरावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रवीण पिसाळ सर, कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये विविध ठिकाणी  रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या कोल्हापूर जिल्ह्यातील टीमच्या वतीने कुडित्रे तालुका करवीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये 123 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
शिरीष देवरे, दिनेश कदम, सचिन खेतले, देव मोरे, विकास जाधव, संताजी पाटील, जिंतू साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या शिबिराचे नेटके नियोजन करण्यात आले होते. करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी उपमहापौर संजय मोहिते, व्हिजन चॅरिटेबल चे संताजी घोरपडे इ. मान्यवरांनी शिबीर स्थळी भेट देऊन मराठा ऑर्गनायझेशन च्या कार्याचे कौतुक केले. मराठा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने मदत करत असलेल्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला. शिबिरासाठी सीपीआर व अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. मिलिंद जाधव, विनायक देसाई, धनिल मंडलिक, संतोष निगडे, रुपाली कदम, विनायक मेथे - पाटील,  रोहित लांबे, निलेश खराडे, राहुल घोरपडे, योगेश माने, अक्षय तळेकर, स्वप्नील गायकवाड, निखिल माने, विशाल शेंडगे, विकास पाटील, जगदीश गरुड, जयदीप जाधव, तुषार शिंदे, मयुर पाटील,आरती वेंगुळकर यांनी नियोजन केले...

Thursday, 17 February 2022

हेरलेमध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याची मागणी

हेरले / प्रतिनिधी


 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील गट क्र. ४०४ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याच्या मागणीचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांना सिद्धेश्वरनगरमधील ग्रामस्थांनी दिले.
    हेरले येथील गट क्रमांक ४०४ मधून सार्वजनिक रस्ता करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. हा रस्ता ग्रामस्थांनी पूर्ण करून घ्यावा, असे आश्वासन माजी खासदार राजू शेट्टी यांनी सिद्धेश्वरनगरमधील ग्रामस्थांना दिले. येथील गट क्र. ४०४ मधील सार्वजनिक वहिवाटीस असणारा रस्ता पाटील बंधूंनी अडवला होता. रस्त्याचे काम बंद पाडले होते. याबाबत ग्रामस्थांनी याविरोधात हातकणंगले तहसीलदारांकडे दाद मागितली होती. तहसीलदारांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला होता. मुख्यमंत्री सडक योजनेमधून या रस्त्याचे काम सुरू करून रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे. 
       गावातील पाटील बंधूंनी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देवून फक्त  शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला होता.नेमकी शेतकरी संघटना कोणती याबद्दल माजी खासदार शेट्टी यांना ग्रामस्थांनी विचारले असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी ह्या आंदोलन करणाऱ्या  शेतकरी संघटनेशी काहीही संबंध नाही तो  रस्ता पूर्ण करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काहीही हरकत नाही असे  सांगितले आहे. यामुळे या रस्त्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.
    यावेळी बाळगोंडा पाटील, आमगोंडा पाटील, सुकुमार कोळेकर, अमर मुंडे, मोहसीन जमादार, बाबासाहेब रुईकर, समीर पेंढारी, महेश कोळेकर, राजू बारगीर, राहुल निंबाळकर, संतोष कोळेकर, इरफान पेंढारी, मोईन नायकवडी, फिरोज नायकवडी, शमशुद्दीन मुल्ला, ग्रामस्थ उपस्थित होते.
     फोटो
 हेरले येथील गट क्र. ४०४ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याच्या मागणीचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांना देताना सिद्धेश्वरनगरमधील ग्रामस्थ,

आभाळमाया सामाजिक बांधिलकीचे विलक्षण प्रेरणादायी उदाहरण: आमदार जयंत आसगावकर

*
    प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षक आमदार यांनी केले तोंडभरून कौतुक.

हेरले / प्रतिनिधी
 *आभाळमाया ही सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी संस्था म्हणजे सामाजिक बांधिलकीचे महाराष्ट्रातील एक विलक्षण प्रेरणादायी उदाहरण असल्याचे प्रतिपादन या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनी उपस्थित शिक्षक आमदार यांनी केले. कोल्हापूर शिक्षक सहकारी बँकेच्या संचालिका  लक्ष्मी पाटील यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या  आभाळमाया या सामाजिक आणि शैक्षणिक सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन  छत्रपती शाहू महाराज स्मारक भवनात संपन्न झाला.
     जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती रसिका अमर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आभाळमाया राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.संस्थेमार्फत शिक्षकांसाठी राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धाही घेण्यात आली होती त्या स्पर्धेतील विजेत्या कवींना ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.अत्यंत रचनातम शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेऊन हा नेत्रदीपक  सोहळा संपन्न झाला.
   श्रीमती संगीता पुंड या  दिव्यांग (नेत्रांध)  शिक्षिकेने आपल्या तेजस्वी आणि डोळस कार्याने  शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जे वैभवशाली यश मिळवून दिले आहे त्या विलक्षण प्रेरणादायी घटनेचा सर्वांनी विशेष उल्लेख करून त्यांचा आभाळमाया आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन  सन्मान केला. कोरोना काळात अत्यंत प्रतिकुलाशी टक्कर देत असामान्य शैक्षणिक कार्य केलेल्या शिक्षक बंधू भगिनीचा या वेळी  आभाळमाया आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार  देऊन सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय काव्य गायन स्पर्धेतील विजेत्या शिक्षक बंधू भगिनींना या वेळी स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
   या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशाताई उबाळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा नेहमी आघाडीवर का असतो याचे रहस्य आज उलगडल्याचे आपल्या भाषणात सांगितले.प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे नेते मोहनराव मामा भोसले यांनी या कार्यक्रमाच्या कल्पक आयोजक आणि आभाळमाया या सेवाभावी संस्थेच्या प्रवर्तक लक्ष्मी पाटील यांचा आत्मनिर्भर स्त्री शक्ती या शब्दात गौरव करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. समाजभान समूहाचे संस्थापक विश्वास सुतार यांनी आभाळमायेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान मिळाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मधुकर पाटील यांनी आभाळमाया या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आणि आदरणीय असल्याचे प्रतिपादन केले. सन्मानित शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले. तासगाव अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थतज्ञ श्रीकांत कुलकर्णी यांनी आभाळमाया करत असलेल्या असाधारण सामाजिक कार्याचा वसा राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा असे आवाहन केले.
      या राज्यस्तरीय कार्यक्रमात बहारदार कवितांचे सादरीकरण करण्यात आले. आभाळमाया या संस्थेच्या वतीने  निराधार व्यक्तीला आधार दिला जातो. यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांना अनाथ मुलांना शालेय दप्तर आणि शालेय साहित्य प्रदान करण्यात आले आहे. याचा अनेक शिक्षकांनी अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आपल्या भाषणात केला.सत्कारमूर्ती शिक्षकांनी आभाळमाया राज्यस्तरीय पुरस्काराने आपण भारावून गेल्याचे सांगून अध्ययन अध्यापन क्षेत्रात आता अधिक प्रेरणेने कार्य करण्याचा संकल्प केला.
    जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती रसिकाताई पाटील यांनी आभाळमाया या आदर्श सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभ्या असल्याचे प्रतिपादन करून संस्थेच्या आणि विशेषतः श्रीमती लक्ष्मी पाटील यांच्या प्रेरक कार्याचे कौतुक केले.आभाळमाया या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या भावी  कार्यासाठी  मोहन मामा भोसले यांनी पाच हजार रुपये , नामदेवराव  चौगुले यांनी तीन हजार रुपये, ग. ल.कुंभार यांनी दोन हजार पाचशे रूपयांची देणगी प्रदान केली.सत्कारमूर्ती शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून आपल्या उत्तम कार्याची तिथेच पावती दिली.
    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक आणि रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीमुळे कार्यक्रम स्थळ भरगच्च भरून गेले होते. या वेळी समारभांच्या आयोजक श्रीमती लक्ष्मी पाटील यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सचिव अजित वारके आणि आपल्या आई वडील आणि आपले पती  बाजीराव पाटील यांच्या सहकार्याचा आवर्जून  कृतज्ञता पूर्वक उल्लेख केला.महाराष्ट्रातील शिक्षक,विविध संघटनांचे पदाधिकारी..प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक बँक सभासद ,कर्मचारी ,व आपल्या शाळेने मला भरीव सहकार्य केल्याची भावना आयोजक श्रीमती लक्ष्मी  पाटील यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  महेश घोटणे आणि डॉ .स्वाती पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या उपाध्यक्षा सविता पाटील यांनी केले.
     फोटो 
आभाळमाया  सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक सोबत शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर अध्यक्षा लक्ष्मी पाटील व अन्य मान्यवर.

Sunday, 13 February 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत, नविन विहिर खुदाई कामाचा पाणी पूजन समारंभ संपन्न

हेरले / प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२० - २१ अंतर्गत, नविन विहिर खुदाई कामाचा पाणी पूजन समारंभ मुडशिंगी          ( ता. हातकणंगले) येथील शेतकरी नंदकुमार भोपळे यांच्या शेतावर संपन्न झाला.     
      जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभहस्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  मुनीर जमादार  यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती हातकणंगलेचे कृषी अधिकारी  अभिजीत घोरपडे यांनी केले .
     या कार्यक्रमास विस्तार अधिकारी (कृषी)  सर्जेराव शिंदे, सौ. अर्चना कारंडे ,सौ. वर्षा पाटील तसेच  मुडशिंगी येथील सौ. मीनाक्षी खरशिंगे,सौ.अश्विनी भोसले,  शरद पवार,  रणजीत चौगुले , शिवाजी भोसले, सतीश खोत, सुरजित शिंदे, सुमित शिंदे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
       फोटो 
मुडशिंगी येथील कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. पद्माराणी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  मुनीर जमादार  यांच्यासह शेतकरी वर्ग.

भूमिपुत्रांना जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही - माजी खासदार राजू शेट्टी

हेरले / प्रतिनिधी
दि.13/2/21


 सांगली - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित करणे साठी प्रशासन हेरले गावातील जमिन धारकांना गुंठ्यास २ लाख ९८ हजार रुपये देऊ  केले आहेत. ही रक्कम आम्हास मान्य नाही.त्यापेक्षाही जास्त  बाजार भावा दराने खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. केवळ कमी पैसे देऊन शेतकऱ्यांना फसवू पाहणाऱ्या प्रशासनाला जाब विचारू,त्यांचा प्रयत्न हाणून पाडू. आमची जमीन घेऊन त्यावर सरकार रस्ता करणार आहे. अर्थात खाजगीकरणातून करणार आहे, म्हणजे कोणीतरी खाजगी उद्योगपती पैसे गुंतवणार आणि आमच्या जमिनीच्या किमतीच्या १०० पट टोल वसूल  करत राहणार, वाहनधारकांचे शोषण करत राहणार म्हणजे जमिनीला जास्त किंमत देण्याचे प्रशासनाचे उपकार नाहीत. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही परंतु येथील स्थानिकांचे थडगे बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधणार असाल तर त्यांची थडगी बांधल्या शिवाय सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
    ते हेरले ( ता. हातकणंगले)  येथे हातकणंगले तालुक्यातील टोप, नागांव वडगाव, हेरले, माले, चोकाक येथील रत्नागिरी सोलापूर हायवेसाठी नुकसान ग्रस्त भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळणेसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना ,नागरिक कृती शेतकरी यांच्या वतीने आयोजित मेळाव्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती अशोक मुंडे होते.
  माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले, रत्नागिरी-नागपूर  महामार्गासाठी नव्याने संपादित करणा-या जमीनीचा मिळणारा मोबदला हा शेतक-यांवर अन्याय करणारा असून नवीन भूमिअधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यामुळे या महामार्गासाठी जमीनी संपादित करण्यासाठी शेतक-यांनी विरोध करावा व जोपर्यंत आपल्याला पुर्वीच्या कायद्याप्रमाणे मोबदला मिळणार नसेल तोपर्यंत एक इंचही जमीन देण्यात येऊ नये 
   राज्य सरकारने केलेला कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. एनडीएबरोबर असतानाही आपण या कायद्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हा शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीने आपणाला पाठिंबा दिला होता. आता हीच मंडळी या कायद्याचे समर्थन का करीत आहेत?महाविकास आघाडी सरकारलाही शेतक-यांचे काही देणे-घेणे उरलेले नाही.
         रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. पशुखाद्य महागले आहे, शेतीचे साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.पाच राज्यांच्या निवडणुकी नंतर देशामध्ये महागाई ने सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखर, इथेनॉललाही चांगला दर येत आहे. निश्चित एफआरपी देऊनही साखर कारखान्यांकडे चांगले पैसे शिल्लक राहणार आहेत. म्हणून एफआरपीपेक्षा प्रतिटन दोनशे रुपये जादा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठीही आंदोलन छेडणार आहोत.
   माजी सभापती राजेश पाटील म्हणाले,
दहा वर्षापूर्वी सांगली कोल्हापूर रस्ता रुंदीकरण कामी हालोंडी, हेरले, माले, चोकाक या प्रत्येक गावांना वेगवेगळे दर निश्चित करून चौदा ते पंधरा हजार दर प्रशासनाने काढला होता. मात्र आम्ही न्यायालयीन लढा देऊन गुंठ्यास एक लाख २० हजार रुपये शिरोली ते हातकणंगले पर्यंत शेतकऱ्यांना मिळवून दिले.त्यामुळे सद्या प्रत्येक गावास नोटीस नाही, नोटीसा पूर्ण झाले नंतर हरकती घेऊन दर मान्य नाही असे सांगूया. या नवीन हायवेमध्ये १०० मिटर सेंटर पासून आपण आपल्या जमिनीमध्ये काही करू शकत नसल्याने जमिनीस दर मोठ्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. म्हणून व्यापक लढा करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहूया.
  माजी जि.प. सदस्य जयकुमार कोले म्हणाले २५ वर्षे या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देऊन न्याय माजी खासदार राजू शेट्टी यांनी मिळवून दिला आहे. दूधदर,ऊसदर मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी यांनी पंढरपूर ते बारामती, पुणे ते मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व पंचगंगा उगमापासून ते संगमा पर्यंत पदयात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. सद्याचे सरकार लोकप्रतिनिधीचे नसून सरकार नोकरांचे आहे. त्यामूळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या न्याया हक्कासाठी लढा देण्यासाठी सज्ज राहावे.
            स्वागत व प्रास्ताविक मुनिर जमादार यांनी केले.मनोगते राजेंद्र पाटील ( नागांव) माजी सरपंच रावसाहेब चौगुले ( मौजे वडगाव) सुनिल कांबळे ( माले) धनंजय टारे ( आळते ) रमेश कांबळे ( रुकडी) प्रा.राजगोंड पाटील,महंमद खतीब, राहूल शेटे ( हेरले) यांनी व्यक्त केली.
               यावेळी माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील,पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, आप्पासाहेब एडके, तालुका अध्यक्ष अरुण मगदूम,संदीप कारंडे,उदय चौगुले,कपिल भोसले, लक्ष्मण निंबाळकर, आदीसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुरेश चौगुले  यांनी केले.

      फोटो 
हेरले (ता. हातकणंगले) येथे  शेतकरी मेळाव्यात बोलतांना माजी खासदार राजू शेट्टी शेजारी प्रा. राजगोंड पाटील अशोक मुंडे जयकुमार कोले माजी सभापती राजेश पाटील मुनिर जमादार व अन्य मान्यवर.

Tuesday, 8 February 2022

श्री जगदीश शिर्के यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड

** 
हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांची राज्य कार्यकारणीची सभा ही दिनांक  6.2.2022 रोजी औरंगाबाद येथे संपन्न झाली सदर सभेमध्ये श्री जगदीश शिर्के यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली श्री जगदीश शिर्के हे तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नवे पारगाव येथे कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था महाराष्ट्र राज्य चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,  कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ चे सदस्य, आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा कोल्हापूर उपाध्यक्षपदी म्हणून काम पाहत आहेत  श्री जगदीश शिर्के यांच्या कामाची दखल घेऊन राज्याध्यक्ष श्री भरत जगताप यांनी निवड केली

भूसंपादन योग्य मोबदला मिळण्यासाठी लढा उभारला जाईल - राजेश पाटील

हेरले / प्रतिनिधी


 हेरले येथे सोलापूर - रत्नागिरी हायवे भूसंपादन मोबदला संदर्भात भूसंपादन अधिकारी सुनील घाग यांचे बरोबर हेरले मौजे वडगाव  येथील प्रकल्पग्रस्त शेतक-यांची बैठक झाली. ५ तारखेस नोटीस आणि ताबडतोब मिटिंग यामुळे शेतक-यांच्यामध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला.  त्यामुळे आज या शेतकऱ्यांच्या वतीने हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी बाजू मांडत अधिकारी सुनिल घाग यांचेशी विविध मुद्यांवर चर्चा केली.पुढील दिशा लवकरच ठरवून लढा उभारला जाईल असे राजेश पाटील यांनी सांगितले.
    सरसकट हेरले येथील जमिनीचे  व्हॅल्यूशन धरलेमुळे गावठाण लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. योग्य तो मोबदला मिळत नाही ,शासन निर्णयाप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना मान्य नाही , या बैठकी नंतर शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये असे ठरवण्यात आले की नोटीस अभ्यास करता आला नसल्यामुळे सदर अधिकारी यांच्याकडे मुदत घेत अर्ज करण्याचे ठरले. 
    या सभेचे नेतृत्व माजी सभापती राजेश पाटील , स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार  यांनी केले. यावेळी शेतकरी सुनील पाटील , राजगोंडा पाटील , मन्सूर पठाण , महंमद नायकवडी ,कृष्णा कुरणे ,  माणिक लाड आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते. पुढील दिशा लवकरच ठरवून लढा उभारला जाईल असे राजेश पाटील यांनी सांगितले.

शिक्षिकेस न्याय न मिळालेस कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

कोल्हापूर / प्रतिनिधी
 हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या सहाय्यक शिक्षिका  यांना शाळेतील लिपिक तथा संस्थाचालक हे शाळेत कामाच्या ठिकाणी छळ आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाकडे प्राप्त झाल्याने व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली माध्यामिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दोषींवर कारवाई करून महिला शिक्षकेला न्याय देण्याची मागणी केली.
        शिक्षिका या गेली अनेक वर्षे   सहाय्यक शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असून त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून परिसरात परिचित आहेत. अशा या गुणवंत व शिस्तप्रिय शिक्षिकेचा   कामाच्या ठिकाणी छळ व आर्थिक पिळवणूक करून  महिला शिक्षिकेशी उद्धटपणे वागत आहेत. अशा प्रकारच्या दैनदिन छळाच्या त्रासाला कंटाळून सदर शिक्षिकेने आपल्या जिवाचे बरे वाईट केलेस शिक्षण क्षेत्राला लाच्छंनास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागेल . तेंव्हा सदर दोषींची शिक्षण खात्यामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य प्रकारची कारवाई करून या शिक्षिकेस न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचेकडे केली.
        सदर शिक्षिकेस न्याय न मिळालेस कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
    या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दोषींना त्वरित नोटीस देऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
    या प्रसंगी अध्यक्ष एस. डी.लाड, व्ही. जी. पोवार, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर.वाय. पाटील, पी.एस. हेरवाडे, एस. के. पाटील, व्ही.जी. पाटील राजू बरगे, शिवाजीराव चौगुले,जगदीश शिर्के, गजानन काटकर, अरुण मुजुमदार, राजेश वरक, वर्षा पाटील, प्रकाश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

      फोटो ओळ
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ  आंबोकर यांना लेखी निवेदन देतांना अध्यक्ष एस. डी.लाड, व्ही जी पोवार, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर.वाय. पाटील, पी.एस. हेरवाडे, एस. के. पाटील, व्ही.जी. पाटील राजू बरगे, शिवाजीराव चौगुले,जगदीश शिर्के, गजानन काटकर, अरुण मुजुमदार, राजेश वरक, वर्षा पाटील, प्रकाश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, 7 February 2022

भाजप हा सर्व सामान्य माणसांचे हित आणि नितीमुल्ये जोपासणारा पक्ष - भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील

हेरले / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य माणसांचे हित आणि नितीमुल्ये जोपासणारा पक्ष आहे. त्यामुळेच तरुण वर्ग मोठ्याप्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील कार्यक्रमात बोलत होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक व दलितमित्र, जि.प.सदस्य अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, अपघाताने आलेले राज्याचे आघाडी सरकार हे सर्वच क्षेञात अपयशी ठरले आहे. ग्रामीण भागातील समाजासाठी एकही सकारात्मक काम आघाडी सरकारने पूर्ण केलेले नाही. त्यामुळे जनतेतून तिव्र नाराजी आहे. ती नाराजी येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल असे त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, अशोकराव माने, तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांची भाषणे झाली.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच चंद्रकांतदादा पाटील व शौमिका महाडिक यांच्या हस्ते भाजप शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य  अशोकराव माने (बापू ), भाजपा किसान मोर्च्या जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, भाजप तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे, माजी तालुका चिटणीस आनंदा थोरवत, ग्रा. पं. सदस्य अविनाश पाटील, प्रदीप लोहार, स्वप्नील चौगुले, सुनील खारेपाटणे, सागर अकिवाटे, पवन जाधव, ओंकार जाधव, अजिंक्य थोरवत यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो......
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथे भाजप शाखा फलकाचे उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, शौमिका महाडिक, राजेश पाटील, अशोकराव माने, भगवान काटे, भुपाल कांबळे आदी.

हेरले येथे दिशा पंपात सीएनजी पंपाचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे दिशा पेट्रोलिंक्समध्ये सीएनजीचा चोवीस तास पुरवठा करणारे पाच जिल्ह्यातील पहिले स्टेशन ऑनलाईन पंपाचे उद्याटन एच.पी.सी.एल. कंपनीचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक वास्कोचे प्रशांत कांबळे,विभागीय विक्री व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्याचे हर्षद कुंभार, वरिष्ठ अधिकारी विक्री  अभियंता वास्कोचे मित त्रिवेदी,एच. पी. ऑइल गॅस प्रा. लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख बाबासाहेब सोनवणे,  जिल्हा व्यवस्थापक राज झा,दिशा पेट्रोलिंक्स मालक माजी सभापती राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

  एच.पी.सी.एल. कंपनीचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक वास्कोचे प्रशांत कांबळे,विभागीय विक्री व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्याचे हर्षद कुंभार यांनी माहिती देतांना म्हणाले की, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पहिले स्टेशन ऑनलाईन पंपाचे उद्घाटन दिशा पंपामध्ये झाले आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सीएनजी वाहनांसाठी ९ सीएनजी गॅस पुरवठा करणारे पंप आहेत. या पंपाना सीएनजी गॅस पुरवठा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथून होत आहे. चोविस तासांमध्ये एक गाडी पंपास गॅस पुरवठा करीत असल्याने व जिल्ह्यात सत्तर हजारापेक्षा जास्त सीएनजी वरील वाहने नोंद असल्याने या नऊ पंपातून सर्वांना सहज व मुबलक गॅस पुरवठा होत नव्हता. त्यामुळे ज्या पंपात गॅस सुरु आहे त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत. त्यांमुळे सर्वच सीएनजी वाहनांना गॅस सहज व मुबलक मिळेलच अशी शाश्वती नव्हती.
       सद्या दिशा पेट्रोलिक्स पंपामध्ये ऑन लाईन सीएनजी गॅस पुरवठा स्टेशन झाल्याने या पंपावर चोविस तास सीएनजी गॅस मिळणार आहे. तसेच या ठिकाणाहून अन्य पंपानाही गॅसच्या टाकी भरून पुरवठा होणार असल्याने सर्वच पंपावरती सहज चोविस तास इंधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तासन तास सीएनजी वाहनात भरण्यासाठी रांगेत ताटकळत राहण्याची गरज नाही. या सीएनजी पंपाचे ऑनलाईनचे उद्घाटन झाल्याने वाहन धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सीएनजी वाहन धारकांना मुबलक मिळणार असल्याने प्रवास खिशाला परवडणारा  व स्वस्तत होणार आहे.पुढील महिन्यांमध्ये आणखी ६ सीएनजी गॅस पंप सुरु होतील. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सहज व मुबलक सीएनजी गॅस वाहनांना मिळेल अशी माहिती एचपीसीएल कंपनीच्या पदाधिका-यांनी उद्याटन प्रसंगी दिली.
   फोटो
हेरले येथे दिशा पंपात सीएनजीच्या ऑनलाईन पंपाचे उद्घाटन करतांना  एचपीसीएलचे पदाधिकारी प्रशांत कांबळे, हर्षद कुंभार,  मित त्रिवेदी, बाबासाहेब सोनवणे,  राज झा, पंपाचे मालक माजी सभापती राजेश पाटील आदी मान्यवर.

Saturday, 5 February 2022

प्राथमिक शिक्षक संघाची दिनदर्शिका वितरण व हळदी कुंकू समारंभ उत्साहात


कोल्हापूर : दि.०५-०२-२०२२
                   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शहर शाखा-कोल्हापूर च्या वतीने शैक्षणिक दिनदर्शिका 2022 वितरण व हळदी-कुंकू समारंभ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मा.श्री.राजाराम वरुटे सर व प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे प्रशासनाधिकारी मा.श्री.डी.सी.कुंभार साहेब यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
                  याप्रसंगी बोलताना मा.श्री.राजाराम वरुटे साहेब यांनी माहितीपूर्ण दिनदर्शिका या उपक्रमाचे कौतुक केले.या दिनदर्शिके प्रमाणे संघाच्या प्रत्येक सभासदाने आपले शैक्षणिक कार्य उठावदार करण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेच्या आय. टी.सेल प्रमुख पदी श्री.सुशील जाधव व श्री.मच्छिंद्र बगाड यांची निवड जाहीर करणेत आली.नूतन कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
                   यानंतर उपस्थित महिला सभासदांचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.महिला आघाडी प्रमुख सौ.वैशाली अजितकुमार पाटील तसेच नूतन महिला संघटक सौ.स्वाती लंगडे व सौ.संध्या कोरे यांनी सर्व उपस्थित महिलांना वाण देऊन संघटन बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणेचे आश्वासन दिले.  
       मा.प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार साहेब यांनी दिनदर्शिकेची माहिती घेतली . यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी  विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.  प्राथमिक शिक्षण समिती कडून राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमामध्ये शिक्षक संघ नेहमी आघाडीवर राहील याची पदाधिकाऱ्यांनी  ग्वाही दीली. 
                     संघटनेचे नूतन अध्यक्ष श्री.राजेंद्र पाटील सर यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेचे मार्गदर्शक श्री.व.प.चव्हाण सर प्राथमिक शिक्षण समितीकडील लेखापाल श्री.बाबा साळोखे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
                      या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नूतन पदाधिकार्याचा सत्कार पार पडला.  यानंतर  सर्व महानगरपालिका शाळांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.  
                       या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षण समिती कडील शैक्षणिक पर्यवेक्षक मा.श्री.विजय माळी, मा.श्री.बाळासाहेब कांबळे, क्रीडा निरीक्षक मा.श्री.सचिन पांडव सर, संघटनेचे सेवानिवृत्त व नवीन प्रवेशित सभासद व पदाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती कडील कार्यालयीन स्टाफ, शाळांचे मुख्याध्यापक, सभासद शिक्षक,शिक्षिका, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर नेते श्री.सुनिल गणबावले सर यांनी केले तर सरचिटणीस  श्री.दिलीप माने यांनी मान्यवरांचे आभार मानले.