कोल्हापूर दि.१९-१०-२०२२
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शहर शाखा कोल्हापूरच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित *आदर्श शिक्षक-सेवक व स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थी सत्कार सोहळ्यात* कोल्हापूर मनपा शिक्षकांचे कार्य कौतुकासाद असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षक संघाचे राज्य सल्लागार व मार्गदर्शक *मा.श्री राजाराम वरुटे* यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका शाळांच्या गुणवत्तेचा डंका राज्यात वाजतोय आणि गाजतोय याचे संपूर्ण श्रेय प्रशासन-शिक्षक- सेवक विद्यार्थी आणि पालक यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य कोषाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल *मा.श्री. संभाजी बापट* यांचा सत्कार करणेत आला, यावेळी मनपा शाळांचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे मत त्यांनी मांडले.
संपूर्ण शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण बनवण्याचे आपले ध्येय असल्याचे मत *प्रशासनाधिकारी मा.श्री. डी. सी. कुंभार* यांनी व्यक्त कोले.
शिक्षक संघाचे शहराध्यक्ष *श्री.राजेंद्र पाटील* यांनी हृदयस्पर्शी व तडफदार भाषणाने सर्वांची मने जिंकली.
यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक *श्री.विजय माळी व श्री.बाळासाहेब कांबळे* उपस्थित होते.प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री.बजरंग लगारे व *Kop माझा न्युज* चे *श्री.राजेंद्र कोरे* कार्यक्रमास उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक, सेवक, अधिकारी व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी अशा जवळपास १६० गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आदर्श पटवाढ शाळा ल.कृ.जरग विद्यामंदिर, हिंद विद्यामंदिर व रावबा विचारे विद्यालय या शाळांतील स्टाफचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तहसिलदार मा.श्री.स्वरूप कंकाळ यांचे दिवंगत पत्नीचे स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात आल्या.
याप्रसंगी सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष. श्री.व.प.चव्हाण, श्री.बरगे, महिला आघाडी प्रमुख सौ. वैशाली अ-पाटील, श्रीम.आशालता खाडे, महिला संघटक श्रीम.जयश्री कांबळे, कोषाध्यक्ष विजय सुतार, उपाध्यक्ष कमलाकर काटे, सुनिल कुरणे ,किरण पाडळकर, साताप्पा पाटील, सुभाष मराठे, नेताजी फराकटे, अमित जाधव संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पुरस्कार प्राप्त शिक्षक,सेवक ,विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. सारिका पाटील व श्री.संतोष मोरमारे यांनी केले. प्रास्ताविक सरचिटणीस श्री.दिलीप माने यांनी तर राज्यप्रतिनिधी अजितकुमार पाटील यांनी आभार मानले.