हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जय शिवराय ग्रामविकास आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कस्तुरी अविनाश पाटील यांचेसह आठ सदस्य विजयी झाले व सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास आघाडी व मौजे वडगाव ग्रामविकास आघाडी यांचा पराभव करून सत्तांतर घडवले.
येथील ग्रामपंचायत निवडणुक सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास आघाडी, जय शिवराय ग्रामविकास आघाडी व मौजे वडगाव ग्रामविकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती.
यामध्ये जयशिवराय आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ. कस्तुरी अविनाश पाटील या ११९ मतांनी विजयी झाल्या.व आठ सदस्य विजयी झाले. तर सत्ताधारी संयुक्त आघाडीचे तीन सदस्य विजयी झाले.
जय शिवराय आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:-
सौ. सुवर्णा श्रीकांत सुतार, स्वप्नील रावसाहेब चौगुले, सौ. दिपाली दयानंद तराळ, सौ.सविता तानाजी सावंत, सुनिल सर्जेराव खारेपाटणे, सुरेश मनोहर कांबरे, सौ.सुनिता दगडू मोरे, रघुनाथ यशवंत गोरड,
सत्ताधारी गटाचे नितीन संभाजी घोरपडे, सौ. मधुमती सचिन चौगुले, सौ.अश्विनी संतोष आकीवाटे.
निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.