हेरले / प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी मौजे वडगाव (ता. हातकणंगले)येथे घेण्यात आलेल्या केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत केंद्रिय प्राथमिक शाळा हेरलेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा प्रकारात पदकाची लयलूट करीत घवघवीत यश मिळवले.
दि. 30 नोव्हेंबर व १ डिसेंबर या कालावधीत झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लहान गट आणि मोठ्या गटात उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत मोठा गट सांघिक स्पर्धा कबड्डीत प्रथम विजेता ठरत तालुकास्तरीय सर्वेक्षण पात्र ठरला. सांघिक खो-खो मोठा गट द्वितीय क्रमांक, मोठा गट लांब उडीत आदर्श कटकोळे याने द्वितीय क्रमांक पटकावला, मोठा गट 200 मी धावणे आर्यन लोहार द्वितीय क्रमांक पटकाविला, कुस्ती ४५ कि. वजनी गटात प्रवर्तक हाबळे याने प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला. तर लहान गटाने सांघिक खो-खो प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. ५० मी. धावणेमध्ये रुद्र खोत याने प्रथम क्रमांक पटकाविला,१०० मीटर धावणे मध्ये रूद्र खोत याने द्वितीय क्रमांक पटकाविला,२५कि. वजनी गटात कुस्तीत अनुकल्प डोरले याने द्वितीय क्रमांक मिळवला.
केंद्रशाळा शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व पालक, मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कौतुक कार्यक्रमामध्ये विविध बक्षीसे देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक रावसाहेब चोपडे, शिक्षक सय्यद , कोरे , प्रेरणा चौगुले, निगार कराडे, जी. एम लोंढे , पूनम चव्हाण यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे पालकांमधून कौतुक होत आहे.
फोटो
हेरले केंद्रिय प्राथमिक शाळेचे केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक रावसाहेब चोपडेसह शिक्षकवृंद