कोल्हापूर / प्रतिनिधी
कागल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो क्रीडा प्रकारात 19 वर्षाखालील मुलींच्या गटात मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले या संघाची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये अनुराधा शिंदे, अनुष्का तहसीलदार, अरुणा रेपे, उत्कर्षा पाटील, गायत्री मसवेकर, दिपाली गुरव, मृण्मयी खराडे, विशाखा कांबळे, शर्वरी मगदूम, सरिता लोहार, सरिता कळमकर ,सृष्टी पाटील या खेळाडूंचा समावेश आहे या खेळाडूंना क्रीडाशिक्षक व्ही. आर. गडकरी यांचे मार्गदर्शन तर शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे, युवा नेते दौलतराव देसाई कोजीमाशीचे जेष्ठ संचालक बाळ डेळेकर प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो...
मुरगुड... मुरगुड विद्यालयाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघासमवेत प्राचार्य एस. आर. पाटील उपप्राचार्य एस. पी. पाटील क्रीडा शिक्षक व्ही. आर. गडकरी.