हेरले /प्रतिनिधी
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मौजे वडगांव ( ता . हातकणंगले ) येथील डॉ. संगिता चौगुले व सामाजिक कार्यकर्त्यां संगिता सावंत या दोन महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने 'पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आसल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील यांनी दिली.
महिला व बालविकास विभाग महाराष्ट शासन यांच्या आदेशाने व ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्यावतीने ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण , महिला स्वयंसहायता बचत गट , आरोग्य , साक्षरता , यासारख्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कामांची दखल घेऊन त्यांना सरपंच कस्तुरी पाटील व उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांच्या हस्ते सन्मान पत्र , सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ, व रोख रक्कम देऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे व अविनाश पाटील तसेच पुरस्कार प्राप्त महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड ,स्वप्नील चौगुले , अविनाश पाटील , अमोल झांबरे,सविता सावंत, सुवर्णा सुतार, सुनिता मोरे ,दिपाली तराळ , डॉ. वाघमोडे मॅडम , डॉ. पंकज पाटील, पोलिस पाटील, यांच्यासह ग्रा.पं. कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो
ग्रामपंचायतींच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देताना मान्यवर