हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथून ह. भ . प. प्रकाश वाकरेकर (महाराज ) व ह.भ.प. अरविंद जाधव (महाराज ) यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त मौजे वडगांव व संभापूर येथील वारकरी सांप्रदयातील बांधवानी श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले. गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदंगाच्या गजरात विठ्ठल रखुमाई मारुती मंदिरात एकत्र जमा होऊन गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, सदस्य तसेच भविकांच्या कडून निरोप देण्यात आला. यावेळी ह. भ. प. अरविंद जाधव ( महाराज ) म्हणाले की, मौजे वडगांव व संभापूर या दोन्ही गावातील मिळून शंभरहून अधिक वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. या दिंडी सोहळ्याचे यंदाचे ९ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
यावेळी दिंडी चालक हभप प्रकाश वाकरेकर ( महाराज ), अरविंद जाधव ( महाराज ), आण्णासो थोरवत, तुकाराम झांबरे, बाळासो चौगुले, भिमराव कांबरे,मालन गरड, संगिता तेली, कल्पना लोखंडे , तर संभापूर येथील नितिन मोहिते , प्रविण मेथे, पोपट पाटील, अशोक झिरंगे , सुरेखा पाटील, वर्षा झिरंगे, यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी उपस्थित होते.