हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले)येथील कौतुक विद्यालयामध्ये मिशन आयएएस हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मी ' आयएएस. अधिकारी होणारच ! या विषयावर' मिशन आयएएसचे संचालक नरेशचंद्र काठोळे यांनी आयएएस होण्यासाठी इयत्ता दुसरी पासून कशी तयारी करावी कोणते प्रश्न सोडवावे यासंदर्भात खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
यावेळी कौतुक विद्यालय व हेरले हायस्कूल हेरले च्या इयत्ता दहावी तील गुणवंत यादीत आलेले विद्यार्थ्यांचा काठोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हेरले येथील कौतुक विद्यालयाचे विद्यार्थी हेरले हायस्कूलचे विद्यार्थी, केंद्र शाळा हेरले, शाळा नंबर दोन, कन्या शाळा हेरले या शाळेतील विद्यार्थी हजर होते. हा कार्यक्रम अनुश्याम मंगल कार्यालय येथे पार पडला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास पवार, संचालक सुनील भोसले, नितीन कारंजे मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
हेरले : आयएएस अधिकारी होणारच ! या विषयावर' मिशन आयएएसचे मार्गदर्शक संचालक नरेशचंद्र काठोळे यांच्या समवेत विद्यार्थी.