कोल्हापूर प्रतिनिधी -
आज मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र . 11 कसबा बावडा येथे परिसर सुशोभीकरण आणि विविध शैक्षणिक गीते अशा चैतन्यमय वातावरणात शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या फोटो पूजनाने करण्यात आली. फोटो पूजन सहाय्यक आयुक्त विजय पाटील,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्षा अनुराधा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले . तसेच नवागतांच्या हातात फुगे देण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. वर्गात प्रवेश करताना सुमनांचा वर्षाव करण्यात आला .अशा प्रकारे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सहाय्यक आयुक्त विजयकुमार पाटील,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील, आरोग्य मुकादम मनोज कुरणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड , सर्व सदस्य, मुख्याध्यापिका कल्पना पाटील ,सर्व शिक्षक व सेवक यांच्या उपस्थितीत सपन्न झाला.
सहाय्यक आयुक्त डॉ विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा. शालेय जीवनात दैनंदिन व्यवहारात खेळासाठी एक तास,व्यवहार ज्ञान,ध्यानधारणा करावी.मोबाईल पासून योग्य असे वापर करावा. असे प्रतिपादन केले.
केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दररोज एक तास व्यायाम आहार व ध्यानधारणा करून मन शांत राखण्याचा प्रयत्न करावा दररोज योगासने घालावी.सुर्यनमस्कार घालावा घरातील इतर कामे करून घरामध्ये सुद्धा आई-वडिलांचे आज्ञाचे पालन करून योग्य अभ्यास करावा शिक्षणानेच समाज संस्कृत बनणार आहे असे प्रतिपादन केले
सदर कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव उत्तम पाटील तमेजा मुजावर,आसमा तांबोळी मीनाज मुल्ला विद्या पाटील कल्पना पाटील सावित्री काळे हेमंतकुमार पाटोळे यांनी सहकार्य केले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपाली चौगले अनुराधा गायकवाड अध्यक्ष रमेश सुतार यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार साईराज दाभाडे यांनी मांनले.