हेरले /प्रतिनिधी
केंद्रिय नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा या निमित्ताने हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव गावाची निवड केली असून ते विविध शासकीय योजनाची माहिती देणार आहेत . तसेच शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी बरोबर संवाद साधणार आहेत व शेतकऱ्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तरी भागातील सर्व लाभार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांनी केले आहे .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजपा नेते दलितमित्र अशोकराव माने , तालूका अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष अविनाश पाटील, ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड ,स्वप्नील चौगुले , चिटणीस आनंदा थोरवत , रावसाहेब चौगुले, आनंदा पोवार , अमोल झांबरे, ज्ञानेश्वर ढेरे, अमर थोरवत ,शप्पीक हजारी,
आजमुद्दीन हजारी, उपस्थित होते .
फोटो
केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दौऱ्या निमित्त नियोजन बैठकीत बोलतांना उपसरपंच सुनिल खारेपाटणे व मान्यवर